दाटलेली हुरहूर.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
2 Feb 2026 - 5:43 pm

दाटलेली हुरहूर
मन असं सैरभैर
कुणाचे हे रंग सारे
पसरले मनभर
काय झाले असे
मन वेडेपिसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.

रंग न्हाली सांज येई
कुणाची ही भूल पडे
गंध ओल्या वाऱ्यातून
कुठे मन दूर उडे
शोधिते कुणाला
कळेना मनाला
झाडातून पानातून कोण आता दिसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.

उमललेल्या पहाटेस
सपनात येई कोण
बहरल्या वेलीपरी
मोहरुन जाई मन
कुणाचे हे रूप
मनभर धूप
पसरून दिसभर गंधाळते जसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.

https://youtu.be/RBXDiuu3qT8

गाणेप्रेम कविताकविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

10 Feb 2026 - 11:07 pm | गणेशा

रंग न्हाली सांज येई
कुणाची ही भूल पडे
गंध ओल्या वाऱ्यातून
कुठे मन दूर उडे

प्रेमाचे शब्दातून पडलेले कवडसे आवडले..

गणेशाजी मनःपूर्वक धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Feb 2026 - 7:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहीते राहा...!

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटेजी मनःपूर्वक धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

19 Feb 2026 - 5:45 pm | चौथा कोनाडा

मस्त ... आवडली रचना !

प्रेमाची अव्यक्तअबोल अवस्था व्यक्त करते ही कविता !

Deepak Pawar's picture

22 Feb 2026 - 10:28 am | Deepak Pawar

चौथा कोनाडाजी मन:पूर्वक धन्यवाद.