Skip to main content

पुणे कट्टा रविवार २१ डिसेंबर २०२५

लेखक स्वधर्म यांनी शुक्रवार, 19/12/2025 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
या धाग्यावर चर्चा झाल्यामुळे पुण्यात कट्टयाचा प्रस्ताव एका नवीन धाग्यात देत आहे. भक्ती ताई यांनी जमल्यास व अभ्या यांनी नक्की येतो असे सांगितले आहे. टर्मिनेटर यांचा उत्साह तर भारीच आहे. ते उशीरा भेटायचे असेल तर येतो म्हणालेत म्हणून दुपारची वेळ सुचवत आहे. जास्तीत जास्त लोकांना जमावे म्हणून रविवारचा मुहूर्त काढला आहे. मागे कर्नल तपस्वी यांनी पण पुणे कट्टा केल्यास भेटू म्हटले होते. तर खालील स्थळ आणि वेळ सुचवत आहे. स्थळः वाडेश्वर, डेक्कन वेळः रविवार २१ डिसेंबर २०२५ दुपारी ठीक ४ ते ६. वेळेबाबत दुसरा प्रस्ताव असेल तर मी तसा १० ते ४ कधीही येऊ शकेन. इतर उत्साही मिपाकरांना वेळ असेल तर इथे फक्त येतो असा प्रतिसाद द्यावा ही विनंती. आणखी जास्त उत्साही मिपाकराने 'हे आता ठरले' असे जाहीर करावे, कारण शेवटपर्यंत अनिश्चितता नसावी. थोडा प्रवास आहे उद्या त्यामुळे माझा पटकन प्रतिसाद येऊ शकणार नाही पण मी नक्की येणार.

वाचने 8607
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

कट्टा वृत्तांताइतक्याच प्रतिक्रिया आणि उपवृत्तांतही भन्नाट. बाकी आमच्या टर्मिनेटर साहेबांनी थेट पुणे बस किंवा वाहन न पकडता सोळाव्या सतराव्या शतकातल्यासारखी मजल दरमजल करत पुणे का गाठले? असा विचार आला. कोणत्याही गावातून पुण्याला थेट कनेक्शन असायला कठीण नसावे. कदाचित साहसाची गंमत घ्यायची असेल.. उत्तम वर्णन.

In reply to by गवि

"थेट पुणे बस किंवा वाहन न पकडता सोळाव्या सतराव्या शतकातल्यासारखी मजल दरमजल करत पुणे का गाठले? "
हा प्रश्न कोणा ऐऱ्या गैऱ्या नत्थू खैऱ्याला पडला असता तर 'बिना पुरा पढेही आ जाते हैं कोईभी मुंह उठाके' असा विचार करून हसून दुर्लक्ष केले असते 😀 पण साक्षात आमच्या गविशेठना हा प्रश्न पडला म्हंटल्यावर एका वाक्यात का होईना पण 'संत शिरोमणी इम्रान हाश्मींच्या' शैलीत उत्तर देणे अगत्याचे ठरते.... "रास्ते की परवाह करता... तो मंजिल बुरा मान जाती..."

In reply to by टर्मीनेटर

सकाळी तो येईपर्यंत मला घराबाहेर पडणे शक्य नव्हते. नाईट ड्रायव्हिंग आता बंद केल्याने आपले वाहन घेऊन जाण्याचा पर्यायही बाद झाला होता आणि सकाळी निघायची नक्की वेळच माहिती नसल्याने रेल्वे किंवा बसचे बुकिंगही आधीपासून केलेले नव्हते. अचानक एकट्यानेच पुण्याला जायचा प्रसंग ह्याआधीही २-३ वेळा आला होता तेव्हा वापरलेला प्रवासाचा एक 'हायबब्रिड' प्रकार आताही वापरून दुपारी तीन-सव्वातीन वाजेपर्यंत पद्मावतीला राहणाऱ्या मामेबहिणीकडे जाऊन, कपडे बदलून कट्टास्थळी पोचतो असे अभ्याला सांगितले होते.
हम पूरा पढकेइच पूछा टर्मिनेटर सेठ.. बुकिंग शिवाय थेट पुणे बस मिळणे कठीण असावे तुमच्या इथून असे दिसते आहे. किंवा फ्रीकवेंसी कमी असेल. असो. एकूण प्रवास थरारक झाला तर..

In reply to by गवि

"किंवा फ्रीकवेंसी कमी असेल."
येस सर... देअर यु आर! सकाळी १०:३० पर्यंत आणि संध्याकाळी ४ नंतर महाराजा, पिंकबस, कोंडुस्कर, मोरया, AR ग्रुप आणि तत्सम डेली सर्विसच्या इतक्या बस आहेत की तेवढ्या प्रमाणात त्यांना प्रवासी तरी मिळत असतील का? असा प्रश्न पडावा. एका टूर ऑपरेटरची सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाने एक 'इनोव्हा' ची सर्वात आरामदायक आणि जलद सेवाही आहे पण ती फक्त कोथरूडपर्यंतच आहे. तीच गत रेल्वेची. दहा-साडेदहा पर्यंत बऱ्याच गाड्या आहेत पण नंतर पुढचे दोन अडीच तास मात्र ठणठण गोपाळ... खोपोली-लोणावळा-पुणे असा हायब्रीड प्रवास आधीही यशस्वीरीत्या करून झाला आहे. हा थोडा वेळखाऊ प्रकार असला तरी प्रवास व्यवस्थित बसून होत असल्याने गर्दी, चेंगराचेंगरी अशा त्रासदायक गोष्टी टाळता येतात त्यामुळे माझ्यासाठी सोयीस्कर ठरतो! ह्या प्रकाराने आधीही कधी दगा दिला नाहीये आणि खरंतर ह्यावेळीही तो फारकाही त्रासदायक वगैरे वाटला नाही, त्या मिरवणूका वगैरेंमुळे होणाऱ्या वाहतूक खोळंब्याचा वैताग आला होता खरा पण काहीसा उशिराने का होईना पण कट्टास्थळी म्हंटलं तर योग्य वेळेत पोचलो ह्याचे समाधान जास्त आहे. मला वाटतं आता अधून-मधून असे वेडेवाकडे प्रवास मुद्दाम करावेत, त्यातही एक वेगळीच 'किक' आहे 😀

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमच्या रिक्षेत बसून 'तिकडेही' फिरून आलो 😂 मला हा धागा आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचेही आठवत होते, पण हा लेख तुमचा होता की जेम्स वांड ह्यांचा होता हे लक्षात येत नव्हते, कारण त्यांचाही अशाप्रकारे करावा लागलेल्या प्रवासावरचा एक धागा होता त्यामुळे बहुधा थोडा कंफ्युज झालो होतो! असो... आज पुन्हा त्या 'महान' प्रवासावरचा लेख आणि प्रतिसाद वाचून मजा आली! "देख रही हो ना भक्ती... हम ढाई साल पेहले जैसे थे, वैसेही आज भी हैं". बिलकुल भी बदले नही हैं 😀

In reply to by गवि

गविराज हे गगनविहारी असल्याने त्यांना सगळी अंतरे एरियल डिस्टन्स दिसतात. त्यांनी friedrichshafen ते वाडेश्वर पुणे व्हाया म्युनिक आणि सोलापूर हा प्रवास 12 घड्याळी तासाचा सागितलं असता. प्रत्यक्षात माझे चार दिवस गेले तेही ट्रेन, विमान , कॅब , बस आणि बाईक अशी वाहने ही गोष्ट वेगळी.. . म्हणून आम्ही सांगतच नाही. ;)

In reply to by अभ्या..

friedrichshafen ते वाडेश्वर पुणे व्हाया म्युनिक आणि सोलापूर हा
अहो अभ्याशेठ, आम्ही कसले अंतर आणि वेळ सांगणार? तुमच्या friedrichshafen च्या उच्चाराच्या शोधातच आमचे बारा तास जाणार. तुमची जर्मन शब्दरचना म्हणजे श्वास न घेता लावलेली शब्दांची आगगाडी. ;-)

In reply to by गवि

आम्ही फ्राईड राईस हाफ इन असा तोडतो तो शब्द. . आई काळूबाई चायनिज सेंटर वर ऑर्डर दिल्याप्रमाणे.

In reply to by गवि

तुमच्या friedrichshafen च्या उच्चाराच्या शोधातच आमचे बारा तास जाणार
अगदी अगदी! आम्हालाही त्याने वरील प्रमाणे 'फ्राइड राईस हाफ इन' अशी फोड करुन त्याचा उच्चार कसा करायचा हे सांगीतल्याने ते थोडे सोपे गेले 😀

कैच्याकै लांबलचक असुनही कट्टा वृत्तांत वाचणार्‍या आणि तो आवडल्याचे कळवणार्‍या सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक आभार 🙏 @ बिपीन सुरेश सांगळे
आपली भेट राहून गेली
आज ना उद्या आपल्याही भेटीचा योग जुळून येईलच 👍

कट्ट्यासाठी इतके सायास करून पुण्यास आलेल्या धुरंधर टर्मिनेटर यांना साष्टांग दंडवत. पुण्यातल्या पुण्यात असूनही येऊ शकलो नाही याबद्दल आता फारच चुटपुट लागून राहिली आहे. धुरंधर स्टाईल कट्टा वृत्तांत अत्यंत आवडल्या गेलेला आहे. पुढच्या कट्ट्यानंतर तृष्णातृप्तीचा एक एक्सटेंडेड कट्टा सुद्धा प्लॅन करून टाकू.