नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.
आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही.
१. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी )
२. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५
३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!
वाचने
25223
प्रतिक्रिया
228
मिसळपाव
प्रतिक्रिया
SIR
In reply to मला वाटते महाआघाडीला जास्त by शाम भागवत
मतदारयादीत बांगलादेशी आणि
In reply to SIR by चंद्रसूर्यकुमार
एस.आय.आर
In reply to SIR by चंद्रसूर्यकुमार
साडे अकरा वाजून गेले.
In reply to एस.आय.आर by चंद्रसूर्यकुमार
मतदारांची दिशाभूल करणे , १०
In reply to साडे अकरा वाजून गेले. by सुबोध खरे
त्या चार अनारक्षित गाड्यातून
In reply to मतदारांची दिशाभूल करणे , १० by सुबोध खरे
मुख्यमंत्री कोण ?
माहिती आणि प्रसारण
आनंद करंदीकर गेले...
अरेरेरे
In reply to आनंद करंदीकर गेले... by स्वधर्म
ज्ञानपीठ विजेत्या बापाचे
In reply to अरेरेरे by अभ्या..
सर्वांना घेऊन जाण्याचे राजकारण
Aadhaar Card यापुढे जन्म तारखेचा पुरावा नाही
आधार आणि जन्मतारीख...
In reply to Aadhaar Card यापुढे जन्म तारखेचा पुरावा नाही by धर्मराजमुटके
१ जून
निवडणूकांचा घोळ आणि कायदा
धाग्याचे अध्यक्षच तुम्ही तर
In reply to निवडणूकांचा घोळ आणि कायदा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिहार इलेक्शन फ्रॉड