Skip to main content

माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 30/09/2025 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी. आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात. विद्या भारती ही शैक्षणिक संस्था १२,७५४ शाळा चालवते, जिथे भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते आणि आधुनिक विषयांचाही समावेश असतो. सेवा भारती ही सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती मदतीसाठी हजारो प्रकल्प राबवते, विशेषतः दुर्बल आणि दुर्गम भागांमध्ये. राष्ट्र सेविका समितीसारख्या स्त्री संघटनांद्वारे महिलांना नेतृत्व आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्था मिळून शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम सध्या देशभरातील ६३,९२६ वनवासी गावांपैकी २१,८२९ गावांमध्ये विविध सेवा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये शाळा, बालवाडी, निवासी वसतिगृहे, आध्यात्मिक केंद्रे, दवाखाने आणि आरोग्य रक्षकांचे कार्य समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील ५,६०० वनवासी गावांपैकी सुमारे २,००० गावांमध्ये आश्रमाचे कार्य सक्रिय आहे. याशिवाय, शिक्षण व आरोग्य सेवांबरोबरच ११३ कृषी विकास केंद्रेही कार्यरत आहेत, जी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी मदत करतात. १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धकाळात RSS ने देशसेवेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वयंसेवकांनी रक्तदान, अन्नवाटप, मदत शिबिरे, आणि अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सीमेवर सैनिकांना मदत केली. या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात RSS च्या स्वयंसेवकांना पथसंचलनासाठी आमंत्रित केले. महात्मा गांधी यांनी १९३४ साली वर्धा येथे संघाच्या शिबिराला भेट दिली. त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे.” हे उद्गार ‘हरिजन’ साप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी कराड (सातारा) येथे संघाच्या शाखेला भेट दिली. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि संघाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “जरी काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी मी संघाकडे आपुलकीच्या भावनेने पाहतो.” ही घटना ‘केसरी’ दैनिकात ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली होती. देशावर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात किंवा कोरोना सारखे आजार पसरतात, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तत्काळ आपदाग्रस्त जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतात. १९९३च लातूर भूकंप, २००१ गुजरात भूकंप, २०१३ उत्तराखंड पूर, २०१८ केरळ पूर अशा अनेक आपत्तींमध्ये संघाने मदत शिबिरे, वैद्यकीय सेवा आणि पुनर्बांधणीचे कार्य केले. हजारो कुटुंबांना नवजीवन मिळवून देण्यात संघाचा सेवाभाव महत्त्वाचा ठरला. २००१ साली कच्छ जिल्ह्यातील भूकंपानंतर, आरएसएस आणि सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी भुज, अंजार आणि गांधीधाम परिसरात शेकडो मदत शिबिरे उभारले. अन्न, पाणी, औषधे आणि तात्पुरते निवारे पुरवण्यात आले. हुनरशाला फाउंडेशन आणि कच्छ महिला विकास संघटन यांच्या सहकार्याने पारंपरिक भुंगा घरांची रचना पुन्हा उभी करण्यात आली. स्थानिक मजुरांना भूकंप प्रतिरोधक बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि गुजराती भाषेत मॅन्युअल तयार करून मार्गदर्शन करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात, RSS चे ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते. काही स्वयंसेवकांनी आपला जीव गमावला, तरीही सेवा थांबली नाही. पाच जून २०२१ पर्यंत, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपासून ते जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारण्यात आली. ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स, २८७ शहरांमध्ये आयसोलेशन सेंटर्स, ५ कोटी भोजन पॅकेट्स, ७३ लाखांहून अधिक कुटुंबांना राशन, आणि ४४ लाख स्थलांतरित मजुरांना सेवा पुरवण्यात आली. २०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली. शहरातील निवासी असो की वनवासी – सर्व भारतीयांची सेवा करणे आणि भारताला परम वैभवशाली बनविणे हेच आरएसएस च मुख्य ध्येय आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21589
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

स्वतःच्या भूमिकेबद्दलः >> माझा त्या गोष्टीवर विश्वास नाहीच पण म्हणून मी सार्वजनिक न्यासावर हिरीरीने त्याबद्दल वाद घालायलाच हवा आहे का? दुसर्‍यांच्या भूमिकेबद्दलः >> डावे पुरोगामी नेहमी अशा गोष्टींवर सार्वजनिक न्यासावर टाहो फोडत असतात पण होमीओपॅथी, बकर ईद ला प्राण्याचा बळी देणे अशा विरूद्ध मूग गिळून गप्प असतात त्यावरून काढलेला निष्कर्षः >> दुटप्पी दांभिकपणा (अर्थात इतरांचाच फक्त) >> भूत विद्या किंवा ज्योतिष विद्यापीठात शिकवणे यावर इतकी रडारड करण्यासारखे काय आहे? + >> याचा अर्थ फल ज्योतिष किंवा भूत विद्येवर माझा विश्वास आहे हा शोध आपण कसा काय लावला हे समजत नाही विश्वास नाही हो, होमिओपथीची २५० हून अधिक कॉलेजेस आहेत म्हणून भूतविद्येचे असले तर काय बिघडले असा अजब तर्क लावला आहे आपण. झकास! चालू द्या.

In reply to by स्वधर्म

होमिओपथीची २५० हून अधिक कॉलेजेस आहेत म्हणून भूतविद्येचे असले तर काय बिघडले असा अजब तर्क लावला आहे आपण. मी उगाच होमिओपॅथी किंवा फलज्योतिष किंवा तत्सम बाबींवर सार्वजनिक न्यासावर रडारड करताना दिसलो आहे का? मग मी भूतविद्येबद्दलच कशाला उगाच आवाज काढू? अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर माझा विश्वास नाही. याचा अर्थ माझे त्याला समर्थन आहे असा जावईशोध आपल्याला लावायचा असेल तर त्याला काही इलाज नाही. डावे फुरोगामी जिथे तिथे रडारड करताना दिसतात.उदा दिवाळीच्या प्रदूषणाबद्दल टाहो फोडतात पण ख्रिसमसच्या मेणबत्त्यांबद्दल किंवा नववर्षाला फोडले जाणारे फटाके याबद्दल काही बोलत नाहीत किंवा बकर ईदला मारल्या जाणाऱ्या लाखो बकर्यांबद्दल मूग गिळून गप्प असतात या दुटप्पीपणाबद्दल बोललो तर आपल्याला मिरच्या झोंबल्या? आश्चर्य आहे.

In reply to by स्वधर्म

डार्विनचा सिद्धांत नाहीये डार्विनची थिअरी आहे. थिअरी आपल्या मनाला हवी तशी मांडता येते. सिद्धांत सिद्ध झालेला असतो. एक थिअरी काढली आणि दुसरी थिअरी समाविष्ट केली. गुणात्मक फरक काही नाही. मास्क वापरून कोरोनाला अटकाव होतो किंवा कोविडमध्ये भारतात ४० कोटी माणसे मारतील अशीसुद्धा थिअरी होती ना. त्याचे काय झाले सगळ्यांनी पहिले.

In reply to by अप्पा जोगळेकर

कोरोना सारखा विषाणू फक्त थंड वातावरणात प्रभावी ठरेल, भारतासारख्या उष्ण प्रदेशात अजिबात परिणाम करणार नाही, त्यामुळे घाबरायचे कारण नाही. अशी थिअरी सुध्दा काही विद्वान लोकांनी मांडली होती. पण कोरोना नि कहर केला होता. त्या थियरी चे काय झाले ते सगळ्यांनी पाहिले

In reply to by अप्पा जोगळेकर

डार्विनचा सिद्धांत नाहीये डार्विनची थिअरी आहे.
सिद्धांत आणि थिअरीचा अर्थ एकच आहे.

In reply to by आग्या१९९०

सिद्धान्त = law उदा . : औष्मगतिक सिद्धान्त = Law of Thermodynamics याउलट Theory = उपपत्ती उदा. : प्रस्फोट उपपत्ती = Big Bang Theory चूकभूल देणेघेणे. -गामा पैलवान

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ज्या संस्थेचा (जिची अधिकृत नोंदणी आहे की नाही?) समाजाला काडीचा उपयोग नाही, हे वाक्य सोडून बाकीच्या प्रतिसादाशी सहमत आहे! कधीही कुठेही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास सर्वात पहिले संघ स्वयंसेवक तिथे मदतकार्यासाठी पोहोचतात हे लहानपणापासून पाहिले असल्याने त्यांचा "समाजाला काडीचा उपयोग नाही" असे म्हणणे काही पटले नाही! बाकी सर्वसामान्य स्वयंसेवकांची (भयंकर विषारी) विचारसरणी कधीच पटली नाही 😀

समरसतेच्या गप्पा फक्त संघाचे शीर्षस्थ त्यांच्या भाषणात (तोंडी लावण्यासाठी) मारतात. तळागाळातले कार्यकर्ते कधी समरसतेची वाट चालताना दिसतात का? मध्यंतरी श्री० भागवत यांनी उच्चवर्णीयांनी केलेल्या अन्यायाची कबुली दिली होती तेव्हा तळागाळातले कार्यकर्ते किती भडकले होते आठवा...

काय ठरलं आहे मग? संघ चांगला आहे की वाईट आहे? की पन्नास करड्या छटांमध्ये कुठेतरी आहे?

In reply to by कांदा लिंबू

आलात का! या या या! जर देशप्रेमाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर संघ निश्चितच वाईट आहे, मनुवादी दृष्टीने पाहिले तर संघाहून चांगले जगात काहीच नाही. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आलात का! या या या!
हो, धन्यवाद! धन्यवाद!! धन्यवाद!!! खरंच; आबासारखे माझे निस्सीम चाहते इतक्या प्रेमाने माझे स्वागत करतात हे पाहून उर भरून आला.

110000 हून जास्त वाचकांनी हा लेख वाचला. त्यांना संघ कार्यांची माहिती मिळाली. लेखाचा उद्देश्य पूर्ण झाला. प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. बाकी विरोधात प्रतिसाद देणार्‍या नाही संघाचेकार्य देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आहे, 100 टक्के पटते, हे ही सत्य आहे.

" लापटाला मारलं पिडं, लापट म्हणतं बसायला दिलं. " Speaking at an event in Bengaluru, Bhagwat cited three instances when RSS was banned in the past as proof of the government’s acknowledgment of its existence. “If we were not there, whom did they ban?” he remarked. https://www.moneycontrol.com/news/india/even-hindu-dharma-not-registere…