ही घटना सन 1974 ची . . .
हंगेरीतील वास्तुरचनाशास्त्राचे प्राध्यापक एरनो रुबिक आपल्या विद्यार्थ्यांना त्रिमितीय रचना समजावून सांगायचे तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, यासाठी निव्वळ तोंडी शिकवण्याबरोबर एखादे पूरक शैक्षणिक साधन निर्माण केल्यास विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजायला सोपी जाईल. मग विचारांती त्यांनी विशिष्ट प्लास्टिकच्या घटकांचा वापर करून 3 X 3 X 3 रचनेत एक क्यूब तयार केला. त्यामध्ये त्याच्या सहा पृष्ठभागांवर सहा वेगळ्या प्रकारचे रंग दिसणार अशी ती रचना होती. तशी रचना केल्यानंतर मग त्यांनी क्यूबचे विविध भाग हलवून ही रंगसंगती बिघडवून टाकली. आता पुन्हा एकदा मूळची रंगसंगती आणण्यासाठी बराच विचार करुन झगडावे लागतय हे त्यांच्या लक्षात आले.
अशा प्रकारे या क्यूबमुळे एका रंगतदार बौद्धिक खेळाचा जन्म झाला. बिघडवून टाकलेली रंगसंगती जेव्हा अथक प्रयत्नांती पुनर्स्थापित केली जाई तेव्हा बघणाऱ्याला एकदम जादू झाल्यासारखे वाटे. म्हणूनच त्या क्यूबला त्यांनी जादूचा क्यूब असे नाव दिले. त्यानंतर काही वर्षांनी रुबिक यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव या क्यूबला देण्यात आले.
(प्रा. एरनो रुबिक)
. . .
पुढे 51 वर्षानंतर म्हणजेच आज हा क्यूब जागतिक पातळीवर अगदी झळाळून उठलाय. सध्याच्या डिजिटल युगातही निव्वळ हाताने फिरवाफिरवी करायचा हा बैठा बौद्धिक खेळ खूप लोकप्रिय असून त्याचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवून आहे. तो एकट्याला खेळता येतो हे देखील त्याचे एक वैशिष्ट्य. सध्या रुबिक क्यूब हे मुद्रानाम कॅनडाच्या स्पिन मास्टर कॉर्पोरेशनची मालकी असून त्यांनी आतापर्यंत 500 दशलक्षहून अधिक अधिकृत क्यूबजची विक्री केलेली असून त्यातून सुमारे 75 दशलक्ष डॉलर्सची कमाई केलेली आहे. याच्या जोडीला अनधिकृतरित्या देखील क्यूबजची विक्री जोरात असून दोन्ही प्रकारच्या विक्रीतून आजपावतो कोट्यवधी क्यूबज विकले गेलेत.
1974 ते 2024 या अर्धशतकातील या क्यूबची टप्प्याटप्प्याने प्रगती आणि वाटचाल कशी झाली ते आता पाहू.
1970 च्या दशकात प्रा. रुबिक बुडापेस्ट येथील अकॅडमी ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्टस या संस्थेत प्राध्यापक होते. हा क्युब तयार करण्यामागे त्यांचे दोन हेतू होते :
१. या क्यूबमधून मुळात एक रचनात्मक प्रश्न मांडलेला आहे. क्यूबचे विविध भाग विविध पद्धतीने हलवून सुद्धा संपूर्ण क्यूबचा सांगाडा जसाच्या तसाच राहतो.
२. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तूरचनेतील त्रिमितीय संकल्पना नीट समजते.
प्राध्यापक महोदयांनी रंगीत क्यूब प्रथम तयार केला. नंतर त्याची रंगरचना मुद्दाम बिघडवली आणि मग विशिष्ट प्रकारे क्यूबचे भाग फिरवून ती पुनर्स्थापित केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपण एका अभिनव बौद्धिक कोड्याला जन्म दिलेला आहे. या महत्त्वपूर्ण शोधाचे पेटंट मिळवण्यास ते उत्सुक होतेच आणि लवकरच म्हणजे 1975 मध्ये त्यांना हंगेरीत ते मिळाले. पुढे 1977 मध्ये प्रायोगिक स्वरूपातील क्यूबज तयार करून ते बुडापेस्टमधील खेळण्यांच्या दुकानात विक्रीस ठेवले गेले. पुढील एक दोन वर्षात त्याची खेळण्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये युरोपात जाहिरात करण्यात आली. त्याची संभाव्य जागतिक लोकप्रियता लक्षात घेऊन अखेर 1980 मध्ये त्याला रुबिक क्यूब असे सार्थ मुद्रानाम दिले गेले.
रंगसंगती
सुरुवातीच्या क्यूबच्या सहा पृष्ठभागांवर प्रत्येकी नऊ स्टिकर्स लावले होते आणि ते सहा ठळक रंगांत होते -
पांढरा, लाल, निळा, नारिंगी, हिरवा आणि पिवळा.
पुढे क्यूबच्या मूलभूत रचनेत सुधारणा करून प्लास्टिक पॅनेल वापरण्यात आली. त्यामुळे रंग अगदी पक्के राहतात. 1988 पासून ही रंगसंगती अशी प्रमाणित करण्यात आली :

- पांढऱ्याच्या विरुद्ध बाजूस पिवळा,
- निळ्याच्या विरुद्ध बाजूस हिरवा, तर
- नारंगीच्या विरुद्ध बाजूस लाल.
वाचने
4497
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला रुबिक क्युब १९८३ साली भेट
छान लेख!!
लेख छान
आजकाल टाइम पास करण्यासाठी
सर्वांचेच प्रतिसाद
फार पूर्वी एकदा लॉजिक शिकून
+१
In reply to फार पूर्वी एकदा लॉजिक शिकून by गवि
नेहमीप्रमाणे वाचनीय सुंदर लेख.
अवांतर
बैठे खेळ आवडत नाहीत, कधीतरी...
वा ! उत्तम
In reply to बैठे खेळ आवडत नाहीत, कधीतरी... by कर्नलतपस्वी
इथे मिपावर कोणीतरी पत्त्यांचे
In reply to वा ! उत्तम by हेमंतकुमार
गोल्फ ?
In reply to इथे मिपावर कोणीतरी पत्त्यांचे by गवि
धन्यवाद मंडळी !
छान .........
मला ते कधीच जमलं नाही
यूट्यूबीवर हे बघा आणि करून बघा रुबिकोद्योग.
धन्यवाद !
क्यूब अति वेगात सोडवण्यामुळे
वादग्रस्त
In reply to क्यूब अति वेगात सोडवण्यामुळे by युयुत्सु
अरेच्चा! नवलच आहे!!
In reply to वादग्रस्त by हेमंतकुमार
इथे काही लोक मला "सर्वज्ञ"
In reply to अरेच्चा! नवलच आहे!! by युयुत्सु
श्री० कुमार१
@ युयुत्सु,
In reply to श्री० कुमार१ by युयुत्सु
वंशाच्या श्रेष्ठत्वाची आणि कनिष्ठत्वाची लक्षणे कोणकोणती ?
In reply to श्री० कुमार१ by युयुत्सु
ठोकळा उलगडायचा माझा टाईम ....
वा,
लेख फारच सुरेख!! धन्यवाद!!