Skip to main content

वोट चोरी वर चर्चा

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 05/09/2025 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
बगीच्यात फेरफटका मारताना निरनिराळ्या लोकांशी भेट होत असते. आजकाल ‘वोट चोरी’चा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. असाच एक तरुण मुलगा भेटला—आयटी क्षेत्रात काम करणारा, अमेरिकन कंपनीत नोकरी करणारा. साहजिकच, स्वतःला महाज्ञानी समजणारा. गप्पा मारताना तो सहज म्हणाला, “ईव्हीएमच्या मदतीने वोट चोरी सहज शक्य आहे.” मी विचारलं, “कसं शक्य आहे? ईव्हीएमला इंटरनेट कनेक्शन नसतं. शिवाय एकदा मतदान झालं की ती मशीन बंद केली जाते—वीजही नसते.” तो म्हणाला, “आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. इंटरनेट नसतानाही आकाशीय तरंगांच्या माध्यमातून ईव्हीएममध्ये फेरफार करता येतो.” त्याची गूढ भाषा मला काही समजली नाही. शेवटी मी त्याला म्हटलं, “मला तुझं सगळं पटतंय. ईव्हीएममध्ये वोट चोरी होऊ शकते.” तो खुश झाला. म्हणाला, “म्हणजे राहुल गांधींचे आरोप बरोबर आहेत!” तेवढ्यात मला पार्कमधल्या एका बाकावर एक गृहस्थ टाइम्स ऑफ इंडिया वाचताना दिसले. मी त्याला विचारलं, “आकाशीय तरंगांच्या माध्यमातून या वर्तमानपत्राचं नाव बदलून हिंदुस्तान टाइम्स करता येईल का?” ते माझ्याकडे पाहून म्हणाले, “काका, हे शक्य नाही. कागदावर छापलेले शब्द बदलता येत नाहीत.” मी म्हणालो, “ईव्हीएमचा डेटा जर बदलला, आणि त्यानुसार छापील कागदी स्लिप्स बदलल्या नाहीत, तर चोरी सहज उघडकीस येईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काही निवडणूक क्षेत्रांमध्ये ईव्हीएमसोबत छापील स्लिप्सची मोजणी केली जाते. त्यामुळे वोट चोरी शक्य नाही.” त्याचं तोंड अगदी लहान झालं. म्हणाला, “मला हे माहीत नव्हतं.” बहुतेक त्याने कधीच मतदान केलेलं नसावं.

वाचने 13085
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

In reply to by चित्रगुप्त

राहुल बाबचे आरोप चुकीचे आहेत. हे तरुणाला व्यवस्थित कळले. बाकी त्याने कधीच मतदान त्यामुळे ईव्हीएम मध्ये कागदी स्लिप ही असतात हे माहीत नव्हते.

तरुणांमध्ये वोटचोरीबद्दल जागरूकता निर्माण होते आहे हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगले लक्षण आहे! ह्यामुळे वोटचोरी करून सत्ता हडपणाऱ्या पक्षांना आणी काही अशिक्षित नेत्याना चाप बसेल अशी अपेक्षा!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमचे म्हणणे सत्य अशिक्षित नेते त्यांची नावे मी घेत नाही. एका अशिक्षित नेत्याची जो सर्वांना अशिक्षित समजतो प्रेस कांफेरेन्स करत राहतो. बाकी ईव्हीएम मध्ये हेराफेरी होऊ शकत नाही. हे कधी मत न देणार्‍यांना ही कळू लागले आहे.

कुठलेही इलेक्ट्रॉनिक device हॅक होऊ शकते . ओव्हर the एअर ऍक्सेस वर वायर्ड ऍक्सेस नसेल तरीही . ट्रान्स्पोर्टशन , हँडलिंग , मेकिंग इ. ला ऍक्सेस मिळू शकतो . सॉफ्टवेअर ओपन नाही आहे , म्हणजे सॉफ्टवेअर चे बग्स संभवतात . क्रिप्टोग्राफी पण ओपन नाही . क्लोज्ड सॉफ्टवेअर ला हॅकिंग चा धोका जास्त असतो. VVPAT पण १००% नाही, आणि सॅम्पलिंग मध्ये errors येतात. कदाचित १००% matching केलं कि समजेल किती विसंगती येते. त्या पेक्षा खोटे मतदार उभे करणं सोपं असेल. जिथे पाहिजे तिथेच आणि जेवढा पाहिजे तेवढाच केलं कि manage होऊ शकतं . EC ने transparency ने व्हेरिफाय केलं पाहिजे .

In reply to by निपा

आपण यातील तज्ज्ञ दिसत, कृपया काही शंकांचे निरसन विस्ताराने कराल का? म्हणजे आमच्या सारख्या अज्ञान सामान्य जनांना काही खरी माहिती मिळेल. ईव्हीएम नक्की कोणत्या टप्प्यात हॅक केले जाते? मतदान सुरु असताना / मतदान सुरु होण्यापूर्वीच / मतदान संपल्यावर सीलबंद केले गेल्यावर? कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिवाइस पॉवर अप नसताना कसे हॅक केले जाते? इव्हीएमची सॉफ्टवेअर सुरक्षा खरंच इतकी तकलादू आहे कि कोणीही कधीही कुठूनही ते हॅक करू शकतो , आणि जर असे असेल तर देशातील कोणत्याही विरोधी पक्षाला असे हॅकर का मिळत नाहीत जे सत्ताधाऱ्यांऐवजी विरोधकांची हॅकिंग करतील कि असा काही कायदा केला गेला आहे हॅकरनी फक्त सत्ताधाऱ्यांसाठीच हॅकिंग करावे ?

In reply to by संजय खांडेकर

सेट केले असतील तर? कारण इव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत चार गुजराती भाजपेयी डायरेक्टर आहेत म्हणतात! ईव्हीएम मशीन गुजरात मध्ये बनतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बापरे. गुजरात मधे बनणारे खाकरे, ढोकळे, फरसाण वगैरे खाणे आता बंद केले पाहिजे म्हणायचे. गुजराती भाजपेयी फरसाणवाल्यांनी त्यात काय काय सेट केलेले असेल कुणास ठऊक. लईच डेंजरस मामला हाय ह्यो. परम.पूज्य. राजदुलारे साहेबांनी अजून याचा विरोध कसा केलेला नाही, याचे अश्चर्य वाटते.

In reply to by चित्रगुप्त

खाकरे, ढोकळे, फरसाण नाय वो, नाक्यावरचा मारवाडी देखील बनवतो,महाराष्ट्रात बरका! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कुछ भी, गुजरात मधला मारवाडी गुजराती मग तामिळनाडूतील मारवाडी तामिळ का...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माझ्या वरीलएकाही प्रश्नाचे समाधानकारक / विस्तारपूर्वक उत्तर मिळाले तर बऱ्याच शंकांचे समाधान होईल, नुसत्या शक्यतांनी आरोप सिद्ध होत नाहीत ना?

In reply to by संजय खांडेकर

मला माहित नाही. मी ईव्हीएम डिव्हाइसचा तज्ञ नाही. मी पेमेंट डोमेनमध्ये फसवणूक विश्लेषक आहे. माझ्या तज्ज्ञतेच्या क्षेत्रात, सोशल इंजिनिअरिंग द्वारे ऍक्सेस घेणे खूप सोपे आहे. कधी कधी प्रत्यक्षात डिव्हाइस हॅक होतात. परंतु मॅक्सिमम वेळा ते दोन्हीच्या संयोजनात केले जाते . पुन्हा, मी असा दावा केला नाही की ईव्हीएम हे हॅक केलेले डिव्हाइस आहे. परंतु माझ्या समजुतीनुसार, कोणतेही डिव्हाइस हॅक करणे शक्य आहे. ते हॅक प्रूफ असूच शकत नाही. आपल्याला माहित नाही की ते कोणते सॉफ्टवेअर वापरत आहेत, सिस्टममध्ये कोणते मशीन सूचना (एम्बेडेड) आहेत. पुरेशी चाचणी केली गेली आहे की नाही किंवा कोणत्या प्रकारचे एन्क्रिप्शन वापरले जात आहे. त्यामुळे भाकित करणे खूप कठीण आहे . परंतु जर तुमच्याकडे डिव्हाइसमध्ये प्रवेश असेल तर ते सर्व करणे निश्चितच शक्य आहे. सरकार एक पक्ष आहे जिथे अमर्याद शक्यता आहेत. मी अशा अनेक फसवणूक आणि विश्लेषणात्मक कंपन्यांना भेटलो आहे जे अतिशय सुव्यवस्थित डिव्हाइस हॅक करण्याचा दावा करतात. मी अशा प्रात्यक्षिकांमध्ये भाग घेतलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हॅक प्रूफ आहे तर तुम्ही मूर्खांच्या स्वर्गात राहत आहात..

In reply to by निपा

परंतु जर तुमच्याकडे डिव्हाइसमध्ये प्रवेश असेल तर ते सर्व करणे निश्चितच शक्य आहे. सरकार एक पक्ष आहे जिथे अमर्याद शक्यता आहेत. ईव्हीएम समर्थक नेमके हेच मुद्दे मान्य नाहीत. ८० च्या दशकात रंगीत टीव्ही रिमोट आणि विना रिमोट मिळत. दोनपेक्षा अधिक चॅनेल भारतात उपलब्ध नसल्याने रिमोट tv च्या तुलनेने स्वस्त विनारिमोटचे टीव्ही घेण्याकडे लोकांचा कल असे. केबल टीव्ही मुळे अनेक वाहिन्या उपलब्ध झाल्यावर, टीव्ही दुरुस्ती करणारे ह्याच टीव्हीना रिमोटचे सर्किट लावून द्यायचे. हेच सरकार ईव्हीएम सोबत करू शकते. त्यामुळेच निवडणूक आयोग आव्हान देणाऱ्यांना ईव्हीएम यंत्र खोलण्याची परवानगी देत नाही.

In reply to by युयुत्सु

असहमत. जे डिव्हाईस सॉफ्ट्वेअर प्रोग्राम वापरून चालतात / कंट्रोल करता येतात अशीच उपकरणे हॅक करता येतील. ( उद्या म्हणाल की भिंतीवरचे इलेक्ट्रॉनिक घड्याळ हॅक करा) त्यातही ज्या उपकराणात डाटा इंटरॅक्ट्इव्ह पद्धतीने प्रोसेस होते अशी उपकरणे हॅक होऊ शकतात. याचे कारण असते की उपकरणातील रॅम वापरली जात असताना त्यात डाटा किंवा इन्स्ट्रक्षनची सरमिसळ करता येते.

In reply to by निपा

आकाशीय तरंग घेण्याची सुविधा नसेल तर कोणत्याही डिवाईस मध्ये बदल करता येत नाही. ईव्हीएम मध्ये मत नोंद होण्याची काळ आणि वेळ असते. बाकी प्रत्येक ईव्हीएम मत देण्याआधी अजेंट किमान 50-60 स्लीप्स चेक करतात. ईव्हीएम ठीक आहे याची खात्री करतात. त्यामुळे प्रत्येक विधान सभा क्षेत्रात 5 ईव्हीएम मोजले तरी भरपूर आहे. बाकी जे कधी मतदान करत नाही त्यांचा मनात फालतू शंका येतात.

In reply to by विवेकपटाईत

जिथे चिप आहे , म्हणजे machine instruction आहेत . तो device हॅक होऊ शकतो . हे सर्व फार बेसिक आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हॅकिंगची शक्यता कमी करण्यासाठी काही उपाययोजना आहेत. पण त्यामुळे हॅकिंगची शक्यता नाहीशी होत नाही. तो नेहमी शून्य नसलेला(नॉन-zero ) असेल.

In reply to by सुक्या

सर्वज्ञ म्हणतात ना कुठलेही इलेक्ट्रॉनिक device हॅक होऊ शकते . १००१% सहमत! म्हणजे हॅक होऊ शकते. तुम्ही कोण गोमाजी लागून गेलात कॅल्क्युलेटर हॅकी करून दाखवा म्हणणारे

In reply to by सुक्या

हॅकिंग फक्त तरंग मधूनच होत असते का ? हॅकिंग म्हणजे इल्लिगल ऍक्सेस . तो कसाही मिळवता येतो. calculator ला हॅक करून chaतgpt लावणारे महाभाग आहेत या जगात.

In reply to by निपा

तुमचे ज्ञान कितीही परफेक्ट असले तरी जोपर्यंत त्यांच्या पार्टी ला सपोर्ट करीत नाही, त्यांच्या थिअरीज ना मदत करीत नाही तोपर्यंत काहीही उपयोग नाही. सगळे ग्यानेश कुमार एकतर काहीही बिनबुडाची उदाहरणे देतील नाहीतर खिल्ली उडवतील. भले तुमच्या ज्ञानाने थोडी जरी विरोधी शंका निर्माण झाली तर कसे व्हायचे? सो...काहीही झाले तरी."मशीन परफेक्ट, चु. आयोग परफेक्ट, ग्यानेश परफेक्ट, निवडून आलो ती निवडणूक परफेक्ट, पार्टी परफेक्ट आणि सुप्रीम तर काय परफेक्शनचे दुसरे नावच" असेच म्हणायचे बरं का.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

दिल्लीच्या मुख्यमंत्री बाईंनी मान्य केले ,परंतु बीजेपी समर्थक एक वेळ बिळात लपतील पण चुकूनही मान्य करणार नाही.

In reply to by निपा

calculator ला हॅक करून chaतgpt लावणारे महाभाग आहेत या जगात. calculator ला कोणतीही तार किंवा वायरलेस प्रणाली न लावता हॅक करणे शक्य आहे? विज्ञानाचे सामान्य ज्ञान असणाऱ्या व्यक्तींना काही तरी पटेल असेल विधान असावे. अगदी वादासाठी एखादे इ व्ही एम हॅक केले जाईल असे मान्य केले तरी १०-१२ लाख इ व्ही एम हॅक करणार? त्याशिवाय VVPAT जितक्या वेळेस वापरले तितक्या वेळेस बरोबर आले. असो आकाशातील ग्रहांची शांती करता येते दुराग्रहाची नाही.

In reply to by सुबोध खरे

तुम्ही अजूनही वायरलेस हॅकिंगमध्ये अडकला आहात. हा एकमेव मार्ग नाही. प्रवेश सर्वात महत्वाचा आहे. हे कुठेही होऊ शकते, उत्पादन, रॅम बर्न करणे, सूचना लोड करणे, माहिती लोड करणे, movement........ जर तुमच्याकडे पुरेसे संसाधन असेल तर हे करता येईल.....माझा ओपी तपासा, मी नमूद केले आहे की कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हॅक करणे शक्य आहे. निकाल बदलण्यासाठी प्रत्येक ईव्हीएम हॅक करणे आवश्यक नाही. व्हीव्हीपीएटी ऑडिट ट्रेल देखील त्याच डिव्हाइस आणि तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले जाते. तसेच व्हीव्हीपीएटी मशीन देखील बिघाड होऊ शकते. ते फक्त गुंतागुंत वाढवते. नियमानुसार, सिस्टम जितकी गुंतागुंतीची असेल तितकी ती भेद्यतेसाठी अधिक संवेदनशील असते. शेवटचे ईव्हीएम मशीन हॅक करता येते का? उत्तर हो आहे. ते करणे सोपे आहे का? उत्तर नाही आहे. तुम्हाला प्रचंड संसाधने आणि अंतर्गत समर्थन लागेल. तुम्हाला सर्व ईव्हीएमएस हॅक करण्याची आवश्यकता आहे का? नाही. कदाचित तुम्ही फक्त जिथे गरज असेल तिथेच हॅक कराल. हॅक फार स्पष्ट असण्याची गरज नाही. बहुधा स्विंग सीटवर. जिथे विजय निश्चित आहे तिथे तुम्ही सोडू शकता. जिथे पराभव निश्चित आहे तिथे देखील सोडू शकता.

In reply to by निपा

निपा, हॅकिंग थोडा वेळ बाजुला ठेवा. थोडाच वेळ. आता मतदान प्रक्रिया कशी होते. तिथे ईवीएम कसे सेट करतात. सर्व हजर लोकांच्या साक्षीने डमी वोट टाकुन कशी ट्रायल घेतली जाते. मतदान झाल्यावर किती लोकांच्या समक्ष ते यंत्र सील होते. गोडाऊन मधे किती सीसीटीवी च्या देखरेखित ते असते. किती लोकांच्या साक्षीने ते उघडले जाते. आणी शेवटात त्याचे मत कसे मोजतात ह्या सगळ्या प्रक्रिया समजाउन घ्या. (ह्या सगळ्या मला अगदी डिटेल मधे माहीती आहेत कारण माझ्या घरातले ३ जण हे प्रत्येक निवड्णुकीत ह्यात सहभागी असतात) मग विचार करा, हॅकिंग कुठे करता येउ शकते. कसे करता येईल. वगेरे वगेरे. . . बाकी जर ईवीएम हॅक करता येत असेल तर निवडणुक आयोगाकडे तक्रार देउन त्यांची चुक दाखवुन द्यायला काय हरकत आहे? दुध का दुध पाणी का पाणी.

In reply to by सुक्या

मला वाटतं तुम्ही दुसऱ्या दिशेने जात आहात. मी फक्त एवढंच बोलत आहे की कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण हॅक केले जाऊ शकते का. ही एक निश्चित शक्यता आहे आणि प्रचंड संसाधनांसह ते करता येते. पण त्यामुळे मतपत्रिका प्रक्रिया चांगली होत नाही. मतपत्रिकेपेक्षा ईव्हीएम चांगली आहे. हे माझे मत आहे. आपण एक साधनसंपन्न देश आहोत आणि नेहमीच सुधारणांना वाव असतो. आता, माझ्या कुटुंबात अनेक सरकारी शिक्षक आहेत आणि त्या तर्काने, मला ही प्रक्रिया कशी कार्य करते हे देखील माहित आहे. तुम्हाला हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की कोणतीही प्रक्रिया बिनचूक नसते. ते अशक्य आहे.

In reply to by निपा

>>ईव्हीएम मशीन हॅक करता येते का? उत्तर हो आहे.>> असे दावे अमेरिकेतून करणारे मात्र अमेरिकेतील बॅलट मतदान घेत नाहीत यावर गप्प आहेत.

In reply to by कंजूस

कदाचित! मला अमेरिकन प्रणाली माहित नाही. मी नेदरलँड्समध्ये राहतो आणि इथे कागदी मतपत्रिका आहे. आमच्या कदे सर्व नागरिकांसाठी किंवा काही प्रकरणांमध्ये कायमस्वरूपी रहिवाशांसाठी ती येते. वैयक्तिकरित्या मला कागदी मतपत्रिकांपेक्षा ईव्हीएम उपकरणाबद्दल कोणतीही समस्या नाही. दोन्ही चुका आणि हॅक (घोटाळे) होण्याची शक्यता असते. पण ईव्हीएम हॅक करता येत नाहीत हा एक हास्यास्पद दावा आहे.

बिना निवडणूक जिंकता रस्त्यावर क्रांति घडवून सत्तेत येण्याचे ज्यांचे मनसुबे आहे, ते नेता वोट चोरी इत्यादि आरोप लावतात आहे. निवडणूक पूर्वी महिना दोन महीने आधी प्रत्येक बूथ वर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांजवळ मतदाता सूची असते. निवडणूकीच्या 15 दिवस आधी ही नाव टाकले जाऊ शकतात. त्यानंतर ही तीन महीने आक्षेप घेण्यासाठी असतात. ते न करता वर्षभरांनी मीडियात बोंब मारायची. दुसरी कडे SIR चा विरोध करायचा. बोगस नावे, मृतांची नावे, डुप्लीकेट मतदारांची नावे कापण्याचा विरोध करायचा. असाच मूर्खपणा सुरू राहिला तर बहुतेक 2029 मध्ये ही मजबूरी में मोदींना लोकांना मतदान करावे लागेल. राहुल विसरून जातात भारत बंगला देश आणि नेपाळ नाही.

In reply to by विवेकपटाईत

आज राहुल गांधींनी टाकलेली " एस " निवडणूक आयोग कशी परतवते ह्याची उत्सुकता आहे.

In reply to by आग्या१९९०

आज राहुल गांधींनी टाकलेली " एस " निवडणूक आयोग कशी परतवते ह्याची उत्सुकता आहे. काही लोक अजून राहुल गांधींवर विश्वास ठेवतात हे वाचून फार करमणूक झाली. त्यांनी ऍटम बॉम्ब फोडला https://www.thehindu.com/news/national/what-we-have-found-is-an-atom-bo… मग हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहेत https://www.indiatoday.in/india/story/rahul-gandhi-hydrogen-bomb-congre… आमच्या बंड्याने( बोका) एक डोळा सुद्धा उघडला नाही

In reply to by सुबोध खरे

अडवणूक आयोग भाजपला मदत करायला कुठल्याही थराला जाईल! भाजपनेही उपकाराची जाणीव ठेऊन आयोग प्रमुखावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही ह्याची तजवीज करून ठेवली आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भाजपनेही उपकाराची जाणीव ठेऊन आयोग प्रमुखावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही ह्याची तजवीज करून ठेवली आहे. भुजबळ बुवा तुम्ही कायम काही तरी भंपक टंकून स्वतःला हास्यास्पद करण्याचा पण केला आहे का? मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून काढून टाकण्यासाठी महाभियोग करावा लागतो ज्याच्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमत लागते. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना काढून टाकण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते तीच. एवढा टोकाचा विरोध करून सुद्धा काँग्रेस च्या सरकारला श्री शेषन याना का हाकलता आले नाही याचे कारण हेच आहे टंकण्यापूर्वी नीट वाचन तरी करत चला.

वाचत आहे .... रागा म्हणताहेत ते रोचक आहे : " मी विरोधी पक्षनेता असून 100 टक्के पुराव्यांसह बोलत आहे "


In reply to by चौथा कोनाडा

रागांना एका प्रश्न विचारला गेला की - सबूत है तो आप कोर्ट मे क्यों नही जाते ? त्यावर त्यांचे उत्तर होते - वो मेरा काम नही है. मै Opposition leader हूं. मेरा काम है oppose करना.

निवडणूकीची चोरी उघडी पाडण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करावे लागतात. असे प्रयत्न करणे पप्पू व/वा कॉंग्रेसच्या आवाक्याबाहेरील काम आहे. अशा प्रयत्नांचे उदाहरण म्हणून २०२० सालच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतली मतांच्या चोरीवर लिहिलेला माझाच लेख उद्धृत करतो : https://misalpav.com/comment/1185927 -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पद्धतशीर प्रयत्न ? ख्याख्या. एलिजिबल अर्थात पात्र मतदार आणि राज्यनिहाय नोंदणीकृत मतदार ह्यात गोंधळ घालून रचलेला मनोरा म्हणजे पद्धतशीर प्रयत्न ? अरे देवा :)

In reply to by कॉमी

कॉमी, मी पद्धतशीर प्रयत्न करून पोटस निवडणुकीतला घोटाळा उघडकीस आणला, असा दावा करीत नाहीये. सिडनी पॉवेल सारख्या अनेकांनी तो उघडकीस कसा आणलाय ते सांगतोय. पद्धतशीर प्रयत्न केल्याविना पीटर नावारो यांना Immaculate Deception नामे ३६ पानी अहवाल प्रकाशित करणे अशक्य आहे. तसेच पद्धतशीर प्रयत्न केल्याविना सिडनी पॉवेल यांना २७० पानी बाड प्रकाशित करणे अशक्य आहे. आ.न., -गा.पै.

इव्हीएम बनवताना, त्यात उमेदवारांची नांवे घालताना, ते परत नेऊन ठेवल्यावर गोदामात इ.इ. त्याला अ‍ॅक्सेस हा असतोच. त्या अ‍ॅक्सेस मध्ये काय करता येईल याच्या शक्यता अनंत आहेत. मागे तर इव्हीएम्स कुठे कुठे सापडली अशी बातमीही आली होती. पण... काहीही छेडछाड शक्य नाही असे केवळ तेच म्हणू शकतात ज्यांनी आधीच मत बनवलेलं आहे. आणि अगदी सुप्रीम कोर्टात जाणारे लोक आहेत. कशासाठी? सत्य शोधण्यासाठी नव्हे, तर क्ष व्यक्तीची डीग्री खरी आहे की नाही हे सत्य विद्यापीठाने सांगू नये यासाठी! जेंव्हा तर्कशुध्द सासासार विचार हा प्रकारच संपतो, तेंव्हा पुढे काहीच होऊ शकत नाही. बाकी पप्पू म्हटलं तरी रागा यांचं पारडं जड होत आहे, जे पचवायला थोडं कठीणच जातंय. पण समजू शकतो.

In reply to by स्वधर्म

इव्हीएम बनवताना, त्यात उमेदवारांची नांवे घालताना, ते परत नेऊन ठेवल्यावर गोदामात इ.इ. त्याला अ‍ॅक्सेस हा असतोच. त्या अ‍ॅक्सेस मध्ये काय करता येईल याच्या शक्यता अनंत आहेत. इतकेच नाही, मतदार नोंदणी पासून ते निकाल जाहीर करुन सर्टीफिकेटं देण्यापर्यंत जबाबदारी निवडणूक आयोगाचीच आहे. त्यातल्या बहुतांश घटक संशयास्पद वाटत आणि तसेच वागतही आहेत. फक्त मतदानयंत्रावर आणि ते हॅक होते की नाही हे सुध्दा स्वतःच्या पध्दतीने ठरवणार्‍या निवडणूक आयोगावर कितपत विश्वास ठेवायचा हेच ठरत नसताना आणि केवळ तोच मुद्दा उचलून बाकींच्या मुद्द्यांना आणि ते मांडणार्‍याना खोटे ठरवायचे ही तर पॉलीसी चालू आहे. व्यक्तीद्वेषाची कावीळ असे सतत हिणवत राहून स्वतःही प्रचंड द्वेषपूर्ण विषेशणे वापरणार्‍यांकडून भले ते कितीही हुशार दाखवत असले तरी तर्कशुध्द सारासार विचार अपेक्षितच नाहिये.

In reply to by अभ्या..

>> बाकींच्या मुद्द्यांना आणि ते मांडणार्‍याना खोटे ठरवायचे ही तर पॉलीसी चालू आहे. अगदी अगदी! शिवाय ते हॅकींग करुन दाखवण्याचे आयोगाचे आव्हान तर आणखीनच मजेदार आहे. काय तर म्हणे ते फक्त कोरी इव्हीएम देणार आणि तुंम्ही म्हणे फक्त त्यात मते देऊन फक्त ती बरोबर येत नाहीत असे दाखवायचे. हॅकिंग हे किती अनंत प्रकारे होऊ शकते हे सरकारी डोके असलेल्यांना समजणं खरोखरच अशक्य आहे कारण समजून घ्यायचंच नाही!

In reply to by स्वधर्म

काहीही छेडछाड शक्य नाही असे केवळ तेच म्हणू शकतात ज्यांनी आधीच मत अगदी,अगदी. सहमत आहे. जे कुणी इ व्ही एम हॅक करू शकतात अशा मिपाकरांचा कायप्पावर ग्रुप बनवूया. याची माहीती सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग व राहूल गांधी यांना देऊ . जर प्रयत्न सफल झाले तर भारतीय लोकशाहीवर मोठे उपकार होतील. मिपा मालक,चालक,संपादक यांनी विशेष लक्ष घालावे ही विनंती. अन्यथा.....

In reply to by कर्नलतपस्वी

तुंम्ही केलेला उपहास पोहोचला पण... 'काहीही छेडछाड शक्य नाही असे केवळ तेच म्हणू शकतात ज्यांनी आधीच मत बनवलेले आहे' हे माझे वाक्य हे अशांसाठी होते की वरती निपा यांनी जे मुद्दे मांडले, तशी हॅकिंगची शक्यता असू शकते हे मान्य करण्याएवढेही ज्यांच्या मनाचे दार किलकिले होऊ शकत नाही. तसेच आयोगाने रागा यांच्या मागील आक्षेपांना कशी उत्तरे दिली, ते आपण पाहिलेच आहे. संध्याकाळी मतदान बंद झाल्यावरचे व्हिडिओ फूटेज न देण्याचे 'मा-बेटीयोंकी इज्जत का सवाल' वगैरे लंगड्या सबबी सत्य समोर येऊ नये यासाठी पुढे केल्या गेल्या ते पाहता.. ...आयोगाचा सत्य शोधण्यात रस आहे आणि त्यावर विश्वास आहे असे केवळ श्रध्दावानच मानू शकतात. अशांसाठीही ते वाक्य आहे.

In reply to by स्वधर्म

@स्वधर्म भाऊ, उपहास नाही हा. मी खरेच म्हणतो आहे. निदान यांच्या प्रतिसादानंतर मनाचे दार किलकिले झाले म्हणून तर लिहीले आहे. जात,धर्म, पक्ष,राजकारण या सर्व गोष्टीपासून दुर राहीलो आहे. जर इ व्हि एम व्हलनरेबल असेल तर एक सजग नागरिक म्हणून आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे की ही गोष्ट सिद्ध करून लोकशाहीला पुढील संभाव्य धोक्यांपासून वाचवायला हवे. कृपया याला उपहास समजू नका. सुप्रीम कोर्टात सुद्धा याच्यावर मोठा उहापोह झालाय. कदाचित असामाजिक तत्त्वांनी काही माहीती लपवली असेल. किवां प्रणाली सुद्धा काॅम्प्रमाईज झाली असेल. प्रत्येक वेळेस याचिका रद्द केली आहे. @पटाईत सर ,आपण राजधानीत आहात आपल्याकडे ब्युरोक्रेसीचा भरपूर अनुभव आहे. आपण सुद्धा यात मदत करू शकता. @निपा हे सुद्धा नेदरलॅंड मधून आपल्याला मार्गदर्शन करू शकतात.

In reply to by कर्नलतपस्वी

कायप्पा ग्रुप करून रागा व सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचायचं म्हटल्यामुळे उपहास केला असं वाटलं असो. कोपायलट ला इ व्ही एम च्या हॅकिंग चॅलेंज संदर्भात विचारले तर तो म्हणतो: While the ECI's challenge was designed to demonstrate the robustness of EVMs under controlled conditions, it does not conclusively prove that EVMs can never be hacked. The lack of openness to independent technical audits, realistic threat modeling, and external scrutiny leaves room for skepticism.

In reply to by स्वधर्म

हा वाद म्हणजे आपण उत्तम नोटा तयार करण्यासाठी अतिशय उत्तम यंत्रे आणून नोटा तयार केल्या तरी खोट्या नोटा तयार होतातच ना मग त्यापेक्षा विनिमय प्रणाली ( barter system) च चांगली होती हे म्हणण्यासारखे आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या देशात जवळ जवळ १०० कोटी मतदारांसाठी मतपत्रिका छापायच्या सर्व दूर पोचवायच्या तिथून घेऊन यायच्या मोजायच्या आणि वेळेत निर्णय द्यायचा. यात सुद्धा बनावट मतपत्रिका, बूथ कॅप्च्युअरीन्ग पासून सर्व गोष्टींसाठी सुरक्षा पुरवायची आणि हे कशासाठी तर एक बेजबाबदार बिनडोक राजपुत्र जिंकू शकत नाही म्हणून बेफाट वक्तव्य करतो आणि त्याच्या साठी साऱ्या जनतेने त्याच्या तालावर नाचायचे. आणि आजतागायत त्याने आरोप केलेला कोणताही प्रश्न धसास लावलेला नाही किंवा सिद्ध झालेला नाही मुळात इ व्ही एम मुले निवडणूका करण्याचा खर्चच १लाख ३५ हजार कोटी आहे तो किमान पाचपट होईल. मेरा भारत महान चालू द्या

In reply to by सुबोध खरे

निवडणूक आयोगाने वोट चोरीवर उपाय सुरू केले हे उगाचच का? राहुल गांधींमुळे झाले हे पचनी पडत नाही वाटतं.

In reply to by सुबोध खरे

हे कशासाठी तर एक बेजबाबदार बिनडोक राजपुत्र जिंकू शकत नाही म्हणून बेफाट वक्तव्य करतो आणि त्याच्या साठी साऱ्या जनतेने त्याच्या तालावर नाचायचे. हे कशासाठी करू नये तर एक व्यक्ती ज्याची पदवी खरी की खोटी हे बाहेर जाऊ नये म्हणून कोर्टात जातो… तो जिंकावा म्हणून?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तो जिंकतोच आहे आणि जिंकणारच आहे. कारण सामान्य माणसांचा त्याला पाठिंबा आहे. तुम्ही विचार न करता हवे ते आरोप करा काहीही होणार नाही तुमची फडफड, जळजळ आणि चिडचिड चालू द्या

In reply to by सुबोध खरे

सामन्यांचा? खिक्क? निवडणूक आयोग, अडाणी, अंबानी, इडी, सीबीआय, असे सगळे सामान्य मिळून घोळ घालून जिंकवतात!

In reply to by सुबोध खरे

>> बेजबाबदार बिनडोक राजपुत्र खरोखरच केवढा हा द्वेष! आणि आपण इतरांना 'मोदी द्वेषाची कावीळ' झालीय असे म्हणता? भाजपच्या इतर क्षमतांबद्दल काही सांगता यायचे नाही पण एखाद्या धर्म, संस्था वा व्यक्ती बद्दल आपल्या समर्थकांच्या मनात एवढा अफाट द्वेष निर्माण करण्याची क्षमता इतर कोणाही नेत्यात वा पक्षात नाही! बाकी एकेका मुद्द्यावर बोलत बसलो तर वेळ लागेल, पण याचा अर्थ असा नाही की तुमचे इतर मुद्दे वादातीत आहेत.

In reply to by स्वधर्म

+१ सार्वजनिक न्यासावर खालच्या पातळीवर टीका करणं हे अत्यन्त हीन मनोवृत्ती दाखवतं. असे स्वत डॉक्टर खरेच म्हणून गेलेत!

इविएम घोटाळ्यावर संशय असणाऱ्यांना मात्र त्यांचा झालेला विजय नि:संशय पाक असल्याबद्दल खात्री वाटते हे विशेष.

जाऊ द्या हो कर्नाटक, बंगाल, तामिळनाडू, बिहार येथे इ व्ही एम का हॅक होत नाहीत याचं उत्तर द्यायच नाही. आणि बाकी ठिकाणी जेथे भाजप जिंकतंय तेथेच फक्त इ व्ही एम हॅक केलं जातंय. वरच्या सारख्या राज्यात सुद्धा इ व्ही एम हॅक करून ३/४ बहुमत मिळवता येईल कि. हे असं का कोणी बोलत नाही? आकाशातील ग्रहांची शांती करता येते दुराग्रहाची नाही.

In reply to by सुबोध खरे

आकाशातील ग्रहांची शांती करता येईल "कदाचित"! पण मोदिळ झालेल्या दुराग्रह्यांची नाही.

मुळात राहुल गांधी ने उचलले ला वोट चोरी चा मुद्दा रास्त होता.. मुद्दामून एका नावाचे किंवा खोटे मतदार दाखवून मते फिरवली जातात.. मुद्दामून काही नावे add तर काही नावे गहाळ केली जातात, आणि त्या गहाळ जागेवर नविन नावे add केली जातात.. आणि खोटेच मतदार उभे केले जातात. वगैरे वगैरे.. तो मुद्दा बरोबर आहे का चूक हे न्यायालय ठरवेल.. परंतु त्या नंतर वरती मूळ लेखात तरुणांने उचललेला evm चा मुद्दा विनाकारण राहुल गांधीच्या मुद्द्याला दाबण्याचा प्रयत्न वाटतो आहे.. आणि Evm बद्दल काही बोलून उपयोग नाही.. बदलणार नाही.. नशीब लाल कृष्ण अडवाणी यांनी evm हॅक चा पहिला आरोप केला होता.. Evm हॅक नसेल होत, तर evm चोरून हॉटेल वर सापडणे, वगैरे का गेले जात असावेत? मागे वाचलेले राजस्थान निवडणुकी वेळेस.. असो.. मोदीजी आणि भाजप धुतल्या तांदळा सारखे साफ आहेत, त्यामुळे evm वर शंका घेणे किंवा वोट चोरी वर बोलणे म्हणजे सूर्या वर थुंकण्या सारखे आहे महाराष्ट्रा पुरते बोलायचे झाले तर शिंदे मार्फत सेना आणि अजित पवार मार्फत राष्ट्रवादी यांची सांगड झालीच आहे.. मग भ्रष्ट कोण तर जे bjp मध्ये आले नाहीत ते?

Evm हॅक नसेल होत, तर evm चोरून हॉटेल वर सापडणे, वगैरे का गेले जात असावेत? मागे वाचलेले राजस्थान निवडणुकी वेळेस.. जिथे ईव्हीएम असते तिथे टाळे आणि सील लागलेली असते. बाहेर प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते असतात. अर्थात हे होणे शक्य नाही. या फक्त अफवाह असतात. राहूल गांधीला हा विवाद न्यायालयात न्यायचाच नाही. कारण आधीच अनेकदा कोर्टात ते माफी मागून चुकले आहे. योगेन्द्र यादव अनुसार मुद्दा फक्त निवडणूक आयोगावर विश्वास उडविण्याचा आहे. त्याच साठी राहूल गांधी हे करत आहे. त्यात त्यांना काही सफलता ही मिळत आहे.

विरोधी पक्षाचे कार्यकर्ते एवढे दयाळू का आहेत? मी जर सक्रिय सहभाग घेत असतो तर आशा लोकांची उचलबांगडी थेट पोलीस ठाण्यात केली असती. जर पोलीस सरकारभिमुख असतील तर सार्वजनिक रूपाने त्यांचे पितळ उघड पाडले असते.

In reply to by कर्नलतपस्वी

खिक्क! पोलीस गृह मंत्रालयाच्या अंडर काम करतात हे माईत असेलच तुम्हाला, त्यामुळे प्रकरण दाबले जाणारच! नाही का?

बी बी सी ची या विषयातील शोधपत्रकारिता दुवा: निवडणूक आयोग आणि पोलिसांची कारवाई कुठवर? बीबीसीनुसार बोगस मतदार वाढवले गेले हे सत्य आहे. निवडणूक आयोगाकडेही ही तक्रार आहे. पोलीसांकडे गेले ११ महिने हे प्रकरण पडून आहे. रागा यांच्या म्हणण्यात तथ्य आहे असे बीबीसी च्या बातमीचा एकंदर सूर आहे. वरती कर्नल साहेब पोलिसांकडे जा असे म्हणत आहेत, तर त्याबाबत परिस्थिती ही अशी आहे. बाकी धागाकर्ते पटाईत काका यांच्या मतात फरक पडेल असे नाही, पण ज्यांना निष्पक्ष विचार करायचा आहे त्यांच्यासाठी दुवा दिला आहे.

In reply to by स्वधर्म

बोगस मतदार कमी करण्यासाठी सर प्रक्रिया राबवली जाते. आज पर्यन्त 13 वेळा राबवली आहे. बिहार मध्ये 43 लाख मते कमी झाली. बाकी बोगस मते कमी होण्याचे दुख कोणत्या पक्षांना आहे. हे सांगण्याची गरज नाही. बाकी तुम्ही निवडणूकीत मतदान केले असेल किंवा निवडणूक ड्यूटी केली असेल( मी अनेकदा केलेली आहे) तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे. प्रत्येक एजेंट जवळ मतदाता सूची असते. बोगस मतदार असेल तर त्याला टोकता येते. निवडणूक संपल्या वर त्याला हस्ताक्षर ही करायचे असते. या शिवाय निवडणूकीच्या तीन महिन्यापर्यंत निवडणूक आयोग आणि कोर्टात ही जाता येते. बाकी कितीही प्रयत्न केला तरी बोगस मते टाकण्याचे पक्ष विशेषकर ज्यांना बांगलादेशी मते पाहिजे. बाकी रागा एका ही केस मध्ये कोर्टात गेलेले नाही. त्यामुळे त्यांच्या म्हणयात किती सत्याचा अंश असतो असता तर त्यांनी अनेकदा कोर्टात माफी मागितली नसती. एवढेच नव्हे बिहार मध्ये सर झाले, कोर्टा समोर ही प्रमाण प्रस्तुत करू शकले नाही.