✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मदर्स डे..!!

प
प्राजु यांनी
Mon, 05/18/2009 - 03:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7800 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

सुंदर!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 05/18/2009 - 03:25 नवीन
सुंदर मुक्तक. खूप आठवणी जागवल्यास. वाचताना मजा आली. माझ्या पहिल्या मुलीला पहिल्यांदा पाहिलं आणि स्पर्श केला तो क्षण माझ्या स्मृतीत अगदी 'फोटोग्राफिक' म्हणतात तसा बसला आहे. त्याक्षणी काय वाटले, आजूबाजूला काय होते, कोण होते, सगळे अगदी घट्ट आहे डोक्यात. तो एक विलक्षण क्षण असतो हे खरेच, विशेषतः पहिल्या अपत्यावेळी. बाकी बाळलीला तर काय वर्णाव्या? मोठी होईपर्यंत नक्को जीव करतात कार्टी.... पण मोठी झाली की "मोठी का झालीस? अशी लहानच गोडुली का नाही राहिलीस?" असं वाटतं. खूप काही शिकवून जातात मुलं. उगाच नाही 'चाइल्ड इज फादर ऑफ मॅन' असं म्हणत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्त....

पोलिसकाका_जयहिन्द
Mon, 05/18/2009 - 04:37 नवीन
अजून अनुभव घेतला नाही पिलूचा पण वाचताना मनाला गोड स्पर्श झाला... काय-द्याच बोला.....
  • Log in or register to post comments

ह्म्म

पर्नल नेने मराठे
Mon, 05/18/2009 - 13:19 नवीन
सेम हियर.... छान वाट्ले वाचताना. चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोलिसकाका_जयहिन्द

लईच खास!!

बहुगुणी
Mon, 05/18/2009 - 04:57 नवीन
खूप खूप आठवणी चाळवल्या आमच्या चिरंजीवांच्या बाळपणाच्या. आणि 'प्रत्येकाच्याच आयुष्यात या सगळ्या गोष्टी होत असतात' हे जरी खरं असलं तरीही जन्माला येणार्‍या प्रत्येक बाळाच्या बाबतीत या गोष्टी अशाच/याच क्रमाने होतात असं नव्हे, तेंव्हा यातलं नाविन्य कधी संपेल असं वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या बाळलीलांची अशी बखर मधून-मधून ठेवता आली तर जरूर ठेवावी, म्हणजे मुलं भराभर वाढत जातांना ती अशी "मोठी का होतात? ..लहानच का नाही रहात" असं जेंव्हा वाटतं, ते क्षण पकडून ठेवावेसे जेंव्हा वाटतं, तेंव्हा आपल्या समाधानासाठी, आणि तितकंच महत्वाचं, ती मोठी झाल्यावर त्यांच्यावर आई-बाप व्हायची वेळ येईल तेंव्हा त्यांच्या मुलांना सांगण्यासाठी, हा ठेवा महत्वाचाच!
  • Log in or register to post comments

सुंदर

नंदन
Mon, 05/18/2009 - 05:05 नवीन
लेख, खरं तर छान/सुरेख म्हणण्यापलीकडचा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

उच्च उच्च हुच्च

सहज
Mon, 05/18/2009 - 07:03 नवीन
अतिशय म्हणजे अतिशयच उच्च. फार्फार आवडला.
  • Log in or register to post comments

काय लिहु ?

अवलिया
Mon, 05/18/2009 - 07:06 नवीन
काय लिहु ? शब्दच नाहीत ! --अवलिया
  • Log in or register to post comments

आईपणाचं

रेवती
Mon, 05/18/2009 - 07:46 नवीन
आईपणाचं चांगलं वर्णन केलयस. पुर्वीच्या काळी सात आठ मुलं असायची तेंव्हा कसं सहन करत असतील बायका असं वाटून गेलं. एकटाकी लिहिलेलं दिसतयं....छान वाटलं वाचून. रेवती
  • Log in or register to post comments

झाले आई!

आनंद घारे
Mon, 05/18/2009 - 08:54 नवीन
"तुझ्यामुळे मी झाले आई" यातल्या आई होण्यात काय काय आणि किती सामावलेले असते याची एक सुरेख झलक वाचायला मिळाली. अप्रतिम लेख! आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान लिहिलं

यशोधरा
Mon, 05/18/2009 - 09:01 नवीन
छान लिहिलं आहे!
  • Log in or register to post comments

म्हणूनच

विसोबा खेचर
Mon, 05/18/2009 - 09:17 नवीन
म्हणूनच मातृदेवो भव असं म्हणत असावेत..कारण आई म्हणजे.. श्वासाची लय असते विश्वासाचे आलय असते अशुभाला भय असते वात्सल्याची सय असते..... हो ना? लाख मोलाची बात अन् सुरेख लेख.. जियो.. आपला, (मातृभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments

हृदयस्पर्शी

धनंजय
Mon, 05/18/2009 - 09:34 नवीन
खेलकर आणि आनंदी लेख. मातृदिनाच्या शुभेच्छा तुम्हाला दररोज. :-)
  • Log in or register to post comments

खरच..

समिधा
Mon, 05/18/2009 - 09:35 नवीन
खुप छान लिहीलयस.माझे अनुभव अगदी सारखे आहेतम्हणजे तिने लवकर जन्माला येण्यापासुन ते अगदी उम्म्मा सकट.... :)(ती पण उम्माच म्हणते) मी पण लेकीला पहील्यांदा ३ दिवसांनी मांडीवर घेतल त्या वेळी काय काय वाटल नाही सांगु शकत मी शब्दात. पण माझ्या देवघरातले देव तेवढे कधी हालले नाहीत आणि ती बाबांना सोडून कधी राहीली नाही.(४ दिवसाच्या वर बाबा दिसले नाहीत तर ५व्या दिवशी जेवण सोडतात आमच्या बाईसाहेब) प्लेग्रुप चा अनुभव थोडा वेगळा मी शाळेत बसत होते पण दर दोन मिनीटांनी बाबा पण हवे असायचे शाळेत खुप रडली यासाठी. पण अजुन मोठ्या शाळेचा अनुभव यायचा आहे. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

खुपच मस्त

कलिका
Mon, 05/18/2009 - 09:46 नवीन
प्राजु तु नेहमिच मस्त लिहितेस, बाकि आइ होन्यात काय धन्यता आहे ते आइ झल्यावर्च समजते!
  • Log in or register to post comments

व्वा.सुंदर

मदनबाण
Mon, 05/18/2009 - 10:00 नवीन
व्वा.सुंदर लेख... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

वॉव..जबरी

भाग्यश्री
Mon, 05/18/2009 - 10:25 नवीन
वॉव..जबरी आवडला लेख...:) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments

खूपच सुरेख लेख....

मनिष
Mon, 05/18/2009 - 10:55 नवीन
प्राजू! तुझा लेख अगदी मनापासून भावला...खूप, खूप छान झाला आहे! :)
  • Log in or register to post comments

छान..

स्वाती दिनेश
Mon, 05/18/2009 - 11:17 नवीन
प्राजु, सुंदर लिहिले आहेस. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त

परिकथेतील राजकुमार
Mon, 05/18/2009 - 11:21 नवीन
मस्त लेख. मनापासुन लिहिलय आणी आम्हाला मनापासुन आवडलय. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

+१

अमोल खरे
Mon, 05/18/2009 - 12:31 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 05/18/2009 - 11:51 नवीन
काहिच्या काहीच भारी. अप्रतीम. अफाट.
  • Log in or register to post comments

प्रचंड छान....

बबलु
Mon, 05/18/2009 - 12:13 नवीन
....अप्रतिम उतरलाय लेख. (स्वगत -- देव पण काय एकेकाला सुंदर लिहिण्याचं Skill देतो राव). ....बबलु
  • Log in or register to post comments

अस्सेच बोलतो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/18/2009 - 14:00 नवीन
...अप्रतिम उतरलाय लेख. (स्वगत -- देव पण काय एकेकाला सुंदर लिहिण्याचं Skill देतो राव).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

मस्तच!!

अश्विनि३३७९
Mon, 05/18/2009 - 12:51 नवीन
खरचं तुम्ही अप्रतिम लिहिता.. धन्यवाद आठ्वणी जाग्या केल्यात ..
  • Log in or register to post comments

सुरेख

भिंगरि
Mon, 05/18/2009 - 12:54 नवीन
लेख खुप आवडला, नुकतइच आइ झालेय त्यामुळे पहिल्या परिछ्छेद एकदम दे जा वु मध्ये घेउन गेला.
  • Log in or register to post comments

सुरेख !

शाल्मली
Mon, 05/18/2009 - 13:50 नवीन
प्राजु, नेहमीप्रमाणेच छान लिहिले आहेस. आवडले. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

ज ह ब ह र्‍या!!!

धमाल मुलगा
Mon, 05/18/2009 - 14:17 नवीन
प्राजुताई, एक नंबर लिहिलयस. लय लय खास :) एक गंमत सांगू? ह्या लेखाची एक प्रिंट काढ आणि ज्यावेळी लेक मराठी छान वाचायला, आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी नीट कळायला लागतील अशा वयात त्याला हे "रिटर्न गिफ्ट" दे. बघ कसा कै च्या कै खुश होऊन जाईल :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

सुन्दर

Meghana
Mon, 05/18/2009 - 15:01 नवीन
खरचं तुम्ही अप्रतिम लिहिता.. सध्या हाच सर्व अनुभव घेत आहोत आम्ही पण.....
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम!

अनंता
Mon, 05/18/2009 - 15:09 नवीन
शब्दवत्सल कुटूंबवत्सल प्राजुताई!!! वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments

मस्त लेख..

स्वाती राजेश
Mon, 05/18/2009 - 17:34 नवीन
प्राजु, नेहमीप्रमाणे सुंदर लिखाण...:) आठवणींचे वर्णन छान केले आहेस... श्वासाची लय असते विश्वासाचे आलय असते अशुभाला भय असते वात्सल्याची सय असते..... मस्त ओळी आहेत..
  • Log in or register to post comments

मस्त

मीनल
Mon, 05/18/2009 - 17:48 नवीन
(प्रत्येकाच्याच आयुष्यात या सगळ्या गोष्टी होत असतात.... यात नविन काही नाही.) म्हणूनच त्या स्वतःच्या वाटतात. आपलच मन मोकळ झाल आहे अस वाटत. मीनल.
  • Log in or register to post comments

मस्त

दशानन
Mon, 05/18/2009 - 18:03 नवीन
मस्त ! सुंदर लिहले आहे. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

सुंदर,

अनामिक
Mon, 05/18/2009 - 19:03 नवीन
सुंदर, हृदयस्पर्शी लिखाण. -अनामिक
  • Log in or register to post comments

अप्रतिम...!

चंद्रशेखर महामुनी
Mon, 05/18/2009 - 22:43 नवीन
वा...! प्राजु...! आई दिसलि... पुर्ण पणे....
  • Log in or register to post comments

सर्वांचे

प्राजु
Mon, 05/18/2009 - 22:55 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

शब्द हरवले!

क्रान्ति
Tue, 05/19/2009 - 08:47 नवीन
जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला तुझा लेख वाचून. सगळे शब्द कमी पडतील प्रतिसादासाठी इतका अप्रतिम लेख! शेवटची चारोळी तर आईपणाचं सार! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments

लय भारी

मिसळभोक्ता
Tue, 05/19/2009 - 14:40 नवीन
मला मदर्स डेला टी शर्ट मिळाला. तुला काय मिळाल? -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
  • Log in or register to post comments

सगळ्यांना

काजुकतली
Tue, 05/19/2009 - 23:02 नवीन
सगळ्यांना त्या पहिल्या क्षणाच्या सुखद आठवणी आहेत. पण माझी आठवण थोडी वेगळी आहे. मुलीच्या वेळी डॉक्टरांना वाटलेले हेल्दी बेबी असणार. पण ऑपरेशनच्या वेळी 'वाटलं त्या मानाने बा़ळ बरेच बारीक आहे' हे वाक्य शेवटचे ऐकले. मग जाग आली ती थेट बेडवर. थोड्या वेळाने नर्सने बाळाला आणुन कुशीत ठेवलं. मी त्याआधी कधीच नुकतंच जन्मलेलं मुल पाहिलं नव्हतं. शेजा-यापाजा-यांची मुले ५-६ महिन्यांची होईपर्यंत मी चार हात दुरुनच त्यांना पहायचे. माझ्या फॅमिलीत मीच सगळ्यात मोठी. त्यामुळे नुकतेच जन्मलेले मुल पाहायचा चान्स माझ्याच मुलीने मला दिला. तिला पाहताच पहिला विचार मनात आला - देवा, हे माकडाचं पोर कुठुन माझ्या पदरात टाकलंस?' तिच्या अंगावर आणि चेह-यावर काळी लव होती, शिवाय जन्मताच मुलाचे डोळे, नाक वगैरेचा शेपही ठिक नसतो. मी ५-६ महिन्यांची मोठी मुले पाहिलेली, जी अगदी व्यवस्थित असतात, त्यामुळे हिला पाहुन मला थोडाफार धक्का बसला. पण तिचे डोळे एकदम चमकत होते. मला तर चक्क ती माझ्याकडे पाहुन हसल्याचाही भास झाला. मी हरखुनच गेले. मग नंतर तासनतास पहात बसायचे तिच्याकडे. मालीशने अंगावरची लवही हळुहळु गेली. नाक, डोळे व्यवस्थित झाले. आणि मग ३-४ महिन्यात माझ्या मुलीपेक्षा जास्त छान बेबी कोणाची असेल यावर माझा विश्वास बसेनासा झाला. साधना
  • Log in or register to post comments

अप्रतिम....

वात्रट
Wed, 05/20/2009 - 04:35 नवीन
प्राजु ताई .. शेवटच्या चार ओळी तर खुपच सुरेख.. डोळ्यातुन पाणी आल अलगदपणे.....
  • Log in or register to post comments

आठवणी

चित्रा
Wed, 05/20/2009 - 07:46 नवीन
आठवणी छानच. मुलांसोबत असताना आपल्याला आपलीच एक ओळख नव्याने होते, नाही? मुलगी जवळजवळ तीन-सव्वातीन वर्षांची होईपर्यंत मी एकीकडे शिकत होते, त्यामुळे दिवसारात्री जमेल तेव्हा माझे काम करत असे. ती बाळ असतानाचा आनंद घेतला पण शांतपणे घेता आला नाही असे आता वाटते. ती तीन वर्षांची होऊन शाळेला गेली की आपल्याला आपले काम छान करता येईल असे कधीतरी वाटे. प्रत्यक्षात ती शाळेला गेली आणि मला काही सुचेना. इतक्या शांततेची सवय राहिली नव्हती. या तुझ्या लेखाने परत तिचे खूप लहान असतानाचे दिवस आठवले.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा