✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्वतःचे घर की भाड्याचे घर?

अ
अमरेंद्र बाहुबली यांनी
Sat, 08/16/2025 - 12:28  ·  लेख
लेख
- पर्याय 1: घर खरेदी घर किंमत: ₹1 कोटी डाउन पेमेंट: ₹50 लाख कर्ज: ₹50 लाख, 20 वर्षे, 8.5% ROI EMI: ~₹43,400/महिना एकूण व्याज: ~₹54 लाख एकूण भरणा: ₹1.04 कोटी (50L + EMI व्याज) अतिरिक्त खर्च: प्रॉपर्टी टॅक्स: 20 वर्षांत ~₹14.4 लाख सोसायटी मेंटेनन्स: 20 वर्षांत ~₹7.2 लाख एकूण अतिरिक्त: ~₹21.6 लाख - म्हणजे 20 वर्षांत एकूण खर्च = ₹1.04 कोटी + ₹21.6 लाख ≈ ₹1.26 कोटी 20 वर्षांनी घराची किंमत (6% वाढ धरली तर) = ~₹3.21 कोटी पर्याय 2: भाड्याने राहणे + गुंतवणूक प्रारंभिक गुंतवणूक: ₹50 लाख SIP: ₹40k/महिना + 10% वार्षिक टॉप-अप, 20 वर्षे CAGR: 12% परिणाम: एकरकमी ₹50L → ~₹4.83 कोटी SIP → ~₹5.2 कोटी एकूण गुंतवणूक मूल्य: ~₹10.03 कोटी भाडे खर्च: सुरुवातीला ₹25k/महिना, दरवर्षी 10% वाढ 20 वर्षांत एकूण भाडे = ~₹1.9 कोटी 20 वर्षांनंतर निव्वळ संपत्ती = ₹10.03 – ₹1.9 = ~₹8.13 कोटी -अंतिम तुलना घटक घर खरेदी भाडे + MF एकूण खर्च (20 वर्षांत) ₹1.26 कोटी ₹1.9 कोटी 20 वर्षांनी मालमत्ता ~₹3.21 कोटी ~₹8.13 कोटी तरलता (Liquidity) कमी खूप जास्त स्थैर्य जास्त (स्वतःचं घर) कमी (भाडे वाढतं, स्थिरता कमी) जोखीम प्रॉपर्टी मार्केट इक्विटी मार्केट निष्कर्ष फक्त आकडेवारीनुसार: "भाडे + MF गुंतवणूक" हा पर्याय अजूनही प्रचंड फायदेशीर (८ कोटी विरुद्ध ३.२ कोटी). पण: घर खरेदी म्हणजे मानसिक सुरक्षितता, भाड्याचा त्रास नाही.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12240 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

आजकाल १ bhk हे पूर्वीच्या १

NiluMP
Wed, 08/20/2025 - 01:31 नवीन
आजकाल १ bhk हे पूर्वीच्या १ RK च्या साईज चे झालेत. +१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

माझी एक बहीण पुण्यामध्ये

नचिकेत जवखेडकर
Tue, 08/19/2025 - 18:58 नवीन
माझी एक बहीण पुण्यामध्ये भाड्याच्या घरात राहत होती. दर ११ महिन्यांनी जागा सोडावी लागायची. आता तरुण असताना दर ११ महिने, १ वर्षांनी जागा सोडून नवीन घर बसवा वगैरे उद्योग परवडतील अथवा झेपतील. लहान मुले असताना, थोडं वय झालं, की या गोष्टी खरंच झेपणार आहेत का याचा विचार केलेला बरा. हा ११ महिन्यांचा करार सगळीकडे असतो का माहित नाही पण हे मी प्रत्यक्ष बघितलेले आहे त्यामुळे आयुष्यभर भाड्याच्या घरात राहायला मी तरी नक्कीच विचार करीन. किती कोटी मिळतील अथवा वाचतील हा मुद्दा नंतरचा. अर्थात हा माझा वैयक्तिक मुद्दा आहे. प्राधान्यक्रम प्रत्येकाचा वेगळा असू शकतो.
  • Log in or register to post comments

आजकाल १ bhk हे पूर्वीच्या १

NiluMP
Wed, 08/20/2025 - 01:30 नवीन
आजकाल १ bhk हे पूर्वीच्या १ RK च्या साईज चे झालेत. +१०००
  • Log in or register to post comments

गंडलेला हिशोब आहे.

कपिलमुनी
Wed, 08/20/2025 - 19:43 नवीन
आकडे फेकून अक्कल येत नाही .. हे असे आकडे नेटवर्क मार्केटिंग वाले पण फेकतात.. उद्या सविस्तर लिहितो..
  • Log in or register to post comments

घर घेणं आजकाल सोपे राहीलेले

पाषाणभेद
Wed, 08/20/2025 - 19:51 नवीन
घर घेणं आजकाल सोपे राहीलेले नाही.
  • Log in or register to post comments

सध्याच्या

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 08/20/2025 - 23:15 नवीन
"घर खरेदी म्हणजे मानसिक सुरक्षितता, भाड्याचा त्रास नाही." बरोब्बर. घर खरेदीमागचे हेच कारण असते."आपल्याला इकडुन कोणीच 'जा' म्हणून सांगू शकत नाही हे समाधान असते. स्वतःचे घर्,स्व्तःची गाडी असणे, ते ही एका वयात ह्यात समाधान असतेच. ७० व्या वर्षी एस.यु.व्ही.घेण्यात समाधान नसेल तसेच त्या वयात स्वतःचे घर घेण्यातही समाधान नसणार.
  • Log in or register to post comments

सगळंच गणित गंडलेलं आहे.

साहना
गुरुवार, 08/21/2025 - 03:11 नवीन
सगळंच गणित गंडलेलं आहे. असंख्य चुकीची गृहीतके आहे. कृपया लोकांना आर्थिक सल्ले नका देऊ. त्याशिवाय आपले आर्थिक निर्णय सुद्धा आपल्यापेक्षा चतुर लोकांना हाताला धरून घ्या
  • Log in or register to post comments

सगळंच गणित गंडलेलं आहे. नाही गणित बरोबरच आहे.

कर्नलतपस्वी
गुरुवार, 08/21/2025 - 05:49 नवीन
चार दिवसात सोळाशे टिकल्या,छप्सपन्रान प्रतिसाद. री चारशे वाचक, चौदा प्रतिसाद. स्वताचे पत्ते ओपन न करता मोघम लिखाण. लेख लिहून स्वता पाॅपकाॅर्न घेऊन बसलेत. घर घ्यायचेच नाही. मिपाकरांना कामाला लावण्यात लेखक यशस्वी. लेखकाचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

टंकाळ्याचा रंकाळा झाला.दुरूस्ती.

कर्नलतपस्वी
गुरुवार, 08/21/2025 - 05:52 नवीन
चार दिवसात सोळाशे टिकल्या,छप्पन प्रतिसाद. सरासरी चारशे वाचक, चौदा प्रतिसाद. स्वताचे पत्ते ओपन न करता मोघम लिखाण. घर घ्यायचेच नाही. लेख लिहून स्वता पाॅपकाॅर्न घेऊन बसलेत. मिपाकरांना कामाला लावण्यात लेखक यशस्वी. लेखकाचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

हा हा , बरोबर कर्नल काका!

Bhakti
गुरुवार, 08/21/2025 - 12:26 नवीन
हा हा , बरोबर कर्नल काका!
मिपाकरांना कामाला लावण्यात लेखक यशस्वी.
लेखक कोपऱ्यात बसून पॉपकॉर्न खात आहेत ;) लेखकाचा हा धागा आठवतोय का ? मस्त जुळतं आमचं https://www.misalpav.com/node/52802 सर्व मिपाकरांना टेन्शन आणलं होतं! सगळ्यांना समजावं लागेल. मला तर वाटलं माझ्या भावाचं पाऊल वाकडं पडतं काय.. लेखकं सर्वात लहान म्हणून त्यांना सर्व माफ असतयं ,हा हा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

लेखक कोपऱ्यात बसून पॉपकॉर्न

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/21/2025 - 13:01 नवीन
लेखक कोपऱ्यात बसून पॉपकॉर्न खात आहेत ;) नाही ताई! वाचतो आहे, बहुमूल्य मार्गदर्शन मिळत आहे, घर घेऊ नये हा विचारही पक्का होतो आहे! सर्व मिपाकरांना टेन्शन आणलं होतं! सगळ्यांना समजावं लागेल. :) ताई पण तुम्हा सर्वांच्या समजावण्याने काहीही फरक पडलेला नाही, गाडी सुसाट सुटलीय! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

हे राम!

Bhakti
गुरुवार, 08/21/2025 - 13:13 नवीन
हे राम! जाऊ दे जास्त सांगत नाही.नाहीतर मी विषयांतर करणारी असा ठपका परत बसेल ;) -I am not robot
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

सर्व मंडळी उन्नयनी (लिफ्ट)

साहना
Fri, 08/22/2025 - 03:08 नवीन
सर्व मंडळी उन्नयनी (लिफ्ट) मधून पहिल्या मजल्यावरून ५० व्या मजल्यावर जात असताना आपण २ ऱ्या मजल्यावर अवफःक्षेपण (पाद मारून) करून ३र्या मजल्यावर उतरावे आणि इतर सर्वाना त्या घाणीत राहण्यास भाग पाडावे हे गणित असेल तर बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

डॉ. साहेब नमस्कार!

गणेशा
गुरुवार, 08/21/2025 - 08:42 नवीन
डॉ. साहेब नमस्कार! तुमचे मुद्दे पटले आहेत..आणि तुमच्या प्रत्येक प्रतिसादाचा निष्कर्ष एकच असला तरी तो मनाला पटतो आहेच.. जश्या नाण्याला दोन बाजू असतात.. तसे या दोन्ही बाजूच्या काही फायदेशीर गोष्टी आहेत.. परंतु हे फायदे तोटे हे व्यक्ती सापेक्ष असल्याने प्रत्येकाच्या जगण्याच्या priority नुसार हेच अगदी बरोबर हे ठरवता येत नाही.. तुमचे मुद्दे हे प्रामाणिक आहेतच आणि तुमच्या स्वानुभवाचे आहेत, आणि त्यातील फायदे तोटे त्यामुळे तुम्ही येथे सांगू शकला आहात.. त्याला उत्तर general पणेदेता येईनात, आणि ते दिले तरी तुम्ही पुन्हा तुमचे अनुभव त्या पेक्षा बरोबर आहेत हे दर्शवीत असल्याने त्याच्या मध्ये तितक्याच प्रामाणिक पणे आणि स्वानुभवाचे इतर मुद्दे लिहिले पाहिजेत, येथे तुमच्या मुद्द्याला खोडण्याचा नक्कीच प्रयत्न नाहीये, ते त्या जागेवर योग्यच आहेत .. जसे तुम्ही म्हणाला, भाड्याच्या घरात राहण्याचा काय अनुभव आहे काय, तर हा मुद्दा प्रामाणिक पणे मी मान्य करतो, जरी १५ वर्षे एकटा मी भाड्याने राहिलो असलो तरी पूर्ण family बरोबर मी भाड्याच्या घरात कधी राहिलो नाही, त्यामुळे टी अड्जसमेंट मी अनुभवली नाही... परंतु लग्नाच्या आधी माझे घर असावे आणि आई वडिलांच्या गावाकडील वास्तव्या मुळे ते जमिनीवरच असल्यावर किती त्यांना हि भारी होईल ह्याच मुद्द्याने मी या भावनिक म्हणा किंवा गरजेचे म्हणा मी लग्ना आधी २ वर्षे घर घेतले...(घर घेताना आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या निदान महत्वाच्या सोई बघूनच घर घेतले जाते हे गृहीत धरलेले आहे) परंतु याची कसरत करताना तेंव्हाच्या पगारातुन जेंव्हा हप्ता जायला लागला तेंव्हा कळाले नुसते घर चार भितींचे नसते, तेथे रहायचे असल्याने गरजेनुसार आपण तेथे गोष्टी बदलतो.. विकत घेतो.. अगदीच तुम्ही म्हणाला तसा साउंड प्रूफ पण करतो.. त्यामुळे साहजिकच पूर्ण family members च्या म्हणण्या नुसार त्यात गोष्टी अधिक करण्यात आणखीन पैसा गेला... (आणि नंतर लग्न. त्या नंतरच्या घरातील गोष्टी.. ह्या पण नंतर लागल्याच) या सर्वा मध्ये खूप ओढातान होत राहिली कारण पगार जास्त वाढला नाही पण emi.. अधिकचे घरातील गोष्टी मुळे घेतलेल्या PL च्या load मुळे घर खर्चाला पैसे कमी पडू लागले... (बायको कमावती असावी कि नसावी हे तर वयक्तिक मानू, आणि येथे ती नंतर home maker आहे असे समजा) आणि या विवंचनेतून, मग पैसे नसल्याने गृह कलह (भांडणे असे नाही) पण बऱ्याच गोष्टीत तडजोडी कराव्या लागत होत्या.. आणि अश्यातच जॉब सोडावा लागला... नविन जॉब मिळे पर्यंत हप्ते भरता येईनात.. मग कळाले हे घर माझे आहे हे जे मी म्हणतो तो दिखावा आहे.. हे घर भाड्याचे नाहीये.. परंतु हे घर बँकेचे आहे, आणि असेच हप्ते नाही भरले तर ते ते घर आपल्या पासून हिरावून घेणार... मग चालू झाली पैसे जुळवा जुळव.. इकडून तिकडून.. मग घे ह्याच्या कडून त्याच्या कडून...पार सावकाराच्या दारात जावे लागले...आणि जरासा चांगला जॉब मिळाला पण तो मुंबईत, त्यात लग्न झाले, लग्ना नंतरचा काळ मस्त फिरत आनंदाने काढता यावा हे प्रत्येकाला वाटत असतेच.. पण याच वेळेस आर्थिक नियोजन बिघडल्याने, किराणा आणायला पण पैसे नसल्याने cr card मारावे लागली... त्या नंतर असे काही खर्च येत कि साठवले पैसे कि उडलेच पाहिजेत...मग बायको आणि फॅमिली पुण्यात घर आपल आहे त्यात.. आणि मी मुंबईत भाड्याच्या घरात रहावे लागले..पुन्हा हि तडजोड च होती.. नंतर ज्यांचे पैसे घेतलेले त्यांचे देणे आले, कि पगार आहे घे लोन देऊन टाक करत करत पुन्हा आर्थिक चंचण...पुनः cr card चे हप्ते.. पुन्हा हे सर्व करत करत दहा वर्षे लोटली... आणि मग कळाले प्रत्येकाच्या अनुभवाने हे च कसे बरोबर असे दरवेळेस नसते... माझे तर असे आहे हा अनुभव माझा मला आवडला नाही, त्यामुळे माझ्या सारख्या माणसांने या emi च्या आणि cr card च्या चक्रात अडकू नये असे वाटले.. त्यामुळे अनुभव हा बरोबर असतो तसा तो चुकीचा हि असतो आणि माझ्या बाबतीत तो चुकीचा ठरला.. मग या ऐवजी कसे आर्थिक नियोजन केले पाहिजे होते.. कसे केले पाहिजे होते हे मी येथे देत नाही.. मी माझ्या आर्थिक नियोजन का share मार्केट च्या धाग्यात दिले आहे.) आता कदाचित मी यशस्वी म्हणता येणार नाही परंतु आर्थिक नियोजन योग्य करून जास्तचे पैसे कमवून पार vw मध्ये फिरत असून आणि कसे हि खर्च करत असलो तरी हे २०२० नंतरची आर्थिक नियोजना मुळे करता आले हे मी विसरत नाही.. आणि या मज्जेला अशी काळी किनार आहेच.. वरती लिहिलेले असे समजू नये कि मी खूप पिचलेला होतो.. कारण समाजात राहताना माणसाला स्वतःची इमेज संभाळावी लागते, नाहीतर समाज त्याच्या आर्थिक स्तिथी वरुन त्याची लायकी काढायला मोकळा असतो, ती इमेज हि मी जपलेली आहे. मग ह्यात माझे निर्णय कसे चुकीचे हे शोधने सोप्पे असले तरी माझ्या सारखा एक जरी असेल तर त्याने या गरतेत येण्या अगोदर घर घेण्याची घाई न करता निदान १० वर्षे पैसे जमवावे, ते invest करावेत हा सल्ला द्यायला मला भाड्याच्याच घरात राहण्याची गरज आहे का? आणि हा सल्ला भाड्याच्या घरात राहत नसल्याने फुकाचा होतो काय? - गणेशा...
  • Log in or register to post comments

मग ह्यात माझे निर्णय कसे

सुबोध खरे
गुरुवार, 08/21/2025 - 10:14 नवीन
मग ह्यात माझे निर्णय कसे चुकीचे हे शोधने सोप्पे असले तरी माझ्या सारखा एक जरी असेल तर त्याने या गरतेत येण्या अगोदर घर घेण्याची घाई न करता निदान १० वर्षे पैसे जमवावे, ते invest करावेत हा सल्ला द्यायला मला भाड्याच्याच घरात राहण्याची गरज आहे का? आणि हा सल्ला भाड्याच्या घरात राहत नसल्याने फुकाचा होतो काय? कुणाचाही सल्ला बरोबर किंवा चूक असतो हे काळ सापेक्ष आहे. त्यातून प्रत्येक अनुभव आपणच घेणे म्हणजे रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यातून आपणच जाणे हे असते. पुढचा खड्ड्यात पडला तर आपणही त्या खड्ड्यात जाऊ नये एवढाच दुसऱ्याच्या अनुभवाचा फायदा असू शकतो. आपण म्हणताय त्याचा उलट अनुभव मला आहे. २००३ मध्ये जेंव्हा मी माझे पहिले घर विकत घेतले तेंव्हा मुलुंडला भाव एक चौरस फुटाला ३००० होता तेंव्हा मी ते घर १८ लाखाला घेतले (मुद्रांक शुल्क आणि इतर सर्व खर्च धरून). (लष्करात असल्यामुळे माझ्याकडे काळा पैसा नव्हताच सर्व व्यवहार हा चेकनेच झाला होता) हेच घर पुढच्या १० वर्षात सव्वा कोटी रुपयाला माझ्या शेजाऱ्याने विकले.म्हणजेच दहा वर्षात हा भाव सरासरी १९ टक्क्याने वाढला होता. त्यामुळे मी जर त्यावेळेस थांबलो असतो तर हे घर मला परत केंव्हा घेता आले असते हे सांगता येणार नाही. एक त्तर माझ्याकडे १८ लाख नव्हते माझे ३ लाख आणि १५ लाखाचे कर्ज असा तो हिशेब होता. त्यातून त्याचा हप्ता १४३०० होता त्यापैकी मला ४३०० रुपये ( ३० %) करातुन वजावट मिळत होती मी तेंव्हा हे तीन लाख बाजारात गुंतवले असते आणि दरमहा १० हजार ( माझा इ एम आय) एस आय पी केली असती तर याच्या निम्माने सुद्धा परतावा मिळाला नसता. आणि मी फार लांब काळपर्यंत घर घेण्यापासून वंचित राहिलो असतो. संधीची किंमत हि अशी असू शकते.
  • Log in or register to post comments

ह्या काळात

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 08/21/2025 - 11:54 नवीन
"२००३ मध्ये जेंव्हा मी माझे पहिले घर विकत घेतले " २००२-२००३ ह्या काळात ज्यानी मोठ्या शहरांमध्ये घरे घेतली होती ते नशिबवान ठरले आहेत.. असे माझे निरिक्षण आहे. (अर्थात घर विकल्यावर , चांगली किंमत मिळाल्यावरच हे म्हणता येते). घर राहण्यासाठीच घ्यायचे असेल तर घराची भविष्यातील किंमत किती..हा प्रश्न पडु नये. तसेच करोना आधी(२०१६-२०१८) ज्यानी फ्लॅट्स घेतले त्यांच्या घराची किंमतही बरीच वाढली आहे असे दिसले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्यातून प्रत्येक अनुभव आपणच

गणेशा
गुरुवार, 08/21/2025 - 12:49 नवीन
त्यातून प्रत्येक अनुभव आपणच घेणे म्हणजे रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यातून आपणच जाणे हे असते.
तुमचा अनुभव आणि माझा अनुभव हा वेगळा आहे, म्हणजे आपला दोघांचा दृष्टिकोन हा व्यक्ती सापेक्ष आहे, आणि त्या नुसार आपण वागत किंवा बोलत आहोत, दोघे हि चूक नाहीच..
कुणाचाही सल्ला बरोबर किंवा चूक असतो हे काळ सापेक्ष आहे.
नाही... वाक्य असे असावे लागेल सल्ल्याचे मोजमाप हे योग्य अयोग्य ने नाही जर काळाने होत असेल तर सल्ला हा सत्यच नाही, तो तर फक्त त्या वेळचा दृष्टीकोन असेल. आणि तो दृष्टीकोन हा व्यक्ती सापेक्ष असेल म्हणून माझे फक्त एव्हडेच म्हणणे आहे, प्रत्येक गोष्टीला आपल्याच दृष्टिकोनातून नाही पाहता येणार.. नाही तर आपल्या ला इतरांचा दृष्टिकोन कायम चूक वाटत राहिल आणि त्यातून तुम्ही भाड्याच्या घरात राहिला नाही त्यामुळे आर्थिक सल्ला द्यायला काही लागत नाही हे म्हणणे पुढे येत राहिल.कारण प्रत्येकाच्या दृष्टीकोनाला परिस्थिती वेगळी आहे. सारांश: सल्ला हा दृष्टीकोन + परिस्थिती + काळ या नुसार ठरत असला तरी त्या वर निर्णय घेण्याची जबाबदारी स्वतःवरच असते आणि त्यावेळेस स्वतःचा दृष्टीकोन + परिस्थिती हि सल्ला देणाऱ्या पेक्षा वेगळी असू शकते. - गणेशा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी आपला सल्ला/ अनुभव चूक आहे

सुबोध खरे
गुरुवार, 08/21/2025 - 19:53 नवीन
मी आपला सल्ला/ अनुभव चूक आहे असं कधीच म्हटलेलं नाही. मी फक्त दुसरी बाजू दाखवली एवढाच. प्रत्येकाने आपली परिस्थिती आणि आर्थिक स्थिती पाहूनच निर्णय घ्यायचा असतो. गुंतवणूकीचा सल्ला --मग तो शेअर असो कि डेरिव्हेटीव्ह / म्युच्युअल फंड किंवा सोनं वा स्थावर मालमत्ता-- हा ज्याचा त्याने पारखूनच घ्यावा. दुसऱ्याच्या अनुभवाचा फार फायदा होईल असे नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

घराचा निर्णय

कपिलमुनी
गुरुवार, 08/21/2025 - 10:28 नवीन
घर सोय असावी कि लक्झरी ? मि २०१४ ला रावेत येथे ४० लाखात घर घेतले ..२०२५ त्याची किंमत ७५-८० लाख आहे .. १० लाख डाउन पेमेंट ३० लाखाचा हप्ता धरला तर ते मि १० वर्षात फेडले.. त्याच वेळी मी पिंपळे सौदागर मध्ये घर घेतले असते तर तेव्हच ते ६५ लाखाला होते आता १ कोटीला आहे .. आता हिशोब बघू व्याज मुद्दल धारून 45,62,400 फेडले ,, सुरुवातीचे १० लाख दाम दुप्पट झाले असे गृहीत धारू (२० लाख) -- असे ६५ लाख एकूण खर्च आला .. --------------- २०१४ साली १५,००० भाडे होते आता २५-२७ हजार आहे. सो ५% वाढ होत आहे . मि एव्ढ्या वर्शात ₹25.6 lakh भाडे दिले असते . सध्या घराची किंमत आणि भाडे मिळून १ कोटी च्या आसपास आहे ... इंडेक्स फंड मध्ये १ कोटी ३० लाख वगैरे झाले असते .. पण इथून पुढे पण माझे भाडे वाचणार .. आणि प्रोपर्ती किंमत वढणार आहे ,
  • Log in or register to post comments

खूप काही शिकायला मिळत आहे ज्येष्ठ मिपाकरांकडुन

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 08/21/2025 - 12:47 नवीन
रोज धाग्यावर एक तरी चक्कर होतेच. येउंद्या अजुन. माझ्यासारख्याला उपयोग होईल.
  • Log in or register to post comments

अनेक जण घर घेऊन नफा कमवला असे

विअर्ड विक्स
Fri, 08/22/2025 - 10:51 नवीन
अनेक जण घर घेऊन नफा कमवला असे उदाहरणे देत आहेत , त्यासाठी पुढील मुद्दे महत्वाचे आहेत . १. घराचे ठिकाण - जी नव उगवती क्षेत्रे आहेत तेथे तुम्हाला वाढीव भाव मिळेल पण हाच तर्क जे आधीच सुबत्ता असलेल्या ठिकाणाला वा उपनगराला लागू होईल असे नाही २. मुळात राहण्यासाठी घेतलेले घर कोणी भविष्यात काय किंमत होईल या हिशेबाने घेत नाही तर आजू बाजू ला असणाऱ्या सोयी सुविधा , शाळा व आपले बजेट या हिशेबाने घेतात. ३. रेरा , नोटबंदी , कोविड आणि मनमोहन सरकारात अवाजवी वाढलेला फुगा यामुळे रिअल इस्टेट मध्ये असणारे परताव्याचे प्रमाण कमी झाले आहे. अपवाद अजूनसुद्धा काही परिसर शहरात असे आहेत ( ठाणे माजिवडा वा वाकड इ ) जेथे २-३ वर्षात उत्तम परतावा मिळतो म्हणजे फॉउंडेशन ते हॅन्डओवर पर्यंत उत्तम वाढ होते . परंतु अंडर construction घर घेणे हे मला पटत नाही कारण कितीही नामचीन बिल्डर असले तरी प्रोजेक्ट रखडला कि कोणी वाली नसतो . आजकाल fractional रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट पण चालू आहे पण माझा त्यात अनुभव नाही कारण जी इन्व्हेस्टमेंट मध्ये रिस्क आहे ( शेअर मार्केट सोडून कारण जे काही आहे ते माझ्या डोळ्यासमोर होते ) असे ठिकाणी गुंतवणूक मी टाळतोय . ( DSK डिबेंचर आणि P२P मध्ये हात पोळले आहेत )
  • Log in or register to post comments

बाडीस

सुबोध खरे
Fri, 08/22/2025 - 11:08 नवीन
बाडीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

Best प्रतिसाद

गणेशा
Fri, 08/22/2025 - 15:00 नवीन
Best प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

मी स्वतः कामानिमित्त बराच काळ

कानडाऊ योगेशु
Fri, 08/22/2025 - 13:50 नवीन
मी स्वतः कामानिमित्त बराच काळ भाड्याच्याच घरात राहत आलो आहे. कुटुंबासहीत. घरमालकाचे खरे रंग घर सोडताना कळतात. ह्यावर मागे एक धागा सुध्दा काढला होता. उज्जैनमध्ये राहत असताना घरमालक खालच्या मजल्यावर व आमचे कुटुंब वरच्या मजल्यावर राहत होते.त्याने हे घर आधी स्वतः च्या मुलांसाठी दुमजली असे बनवले होते.त्यामुळे टाईल्स वगैरे महागड्या लावल्या होत्या. तेव्हा सामान शिफ्ट करताना अगदी डोळ्यात तेल लावुन टाईल्स वर ओरखडे पडणार नाहीत ह्याच्या सूचना देत होता. तसेच कन्या कथ्थक करताना पायांचा जास्त आवाज आला तर खालुन विचारणा केली जायची. बाकिच्या बाबतीत तसा काही त्रास नव्हता पण स्वतःच्याच घरात (भाड्याने का असेना) चोरपावलांनी फिरावे लागे. भाड्याच्या घरात तुम्हाला नेहेमी दुय्यम नागरिक म्हणुनच राहावे लागते.
  • Log in or register to post comments

सत्य वचन

कपिलमुनी
Fri, 08/22/2025 - 15:55 नवीन
१. दुय्यम नागरिक म्हणून सोसयटी मध्ये वागणूक २. सतत घर बदलल्ले कि मुलांचे मित्र बदलतात , त्यांना अ‍ॅडजस्ट करायल खुप वेळ जातो . मित्र होत नाहीत .. -- हा ड्रॉबॅक मोठा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

फरक

अभ्या..
Fri, 08/22/2025 - 16:17 नवीन
भाड्याच्या घरात तुम्हाला नेहेमी दुय्यम नागरिक म्हणुनच राहावे लागते. हे एका अंशी बरोबर आहेच. मला तर अशा खूप परिस्थितींचा अनुभव आहे. लहानपणी स्वतःचे मोट्ठे घर ते किशोरावास्थेत लहानसे भाड्याचे घर, त्यानंतर परत घरे आणि गांवे बदलत बदलत नातेवाईकांच्या घरातही राहणे, त्यानंतर स्वतःचे भाड्याचे घर, त्यात कित्येक बदल, अगदी स्वतःचे घर घ्यायचेच असे होऊनही परिस्थितीनुसार घेतलेली माघार, असा प्रवास झालेला आहे. लग्नानंतर चार भाड्याचे घरे झाली पुण्यात. पहिल्या सोसायटीत वन बीएच्के मग तिथेच टू बीएच के, ते बदलून मग ज्या सोसायटीत भाड्याने राहायला आलो ती आवडली आणि तेथेच बिल्डरने प्रमोटर्स साठी राखून ठेवलेला फ्लॅट मिळवला. त्यामुळे एकाच सोसायटीत भाड्याने राहत असताना आणि तिथेच मालक झाल्यावर मेंबराकडून कशी वागणूक मिळते आणि आपल्याला काय फरक पडतो ह्याचा चांगलाच अनुभव आहे. कोविडोत्तर खरेदी असली तरी चांगल्या एरियात चांगल्या लोकेशनला फ्लॅट असल्याने किंमतीत वाढ समाधानकारक आहे पण हेही घर सोडून आता परत भाड्याने राहावे लागतेय तेंव्हा अ‍ॅज अ घरमालक आणि भाडेकरु असे दोन्ही रोल एकाच वेळी पार पाडावे लागत आहेत. ज्या अपेक्षा आपण भाडेकरुकडून करतो त्याच पध्दतीने आपण स्वतः राहायचे (थोडे जास्तच जाचक नियम आणि वातावरण असताना) ही तारेवरची कसरत चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

सर्वात मोठा तोटा

स्वधर्म
Fri, 08/22/2025 - 17:25 नवीन
भाड्याच्या घरात सर्वात मोठा तोटा हा की मालक कधीही तुंम्हाला घर सोडून जा असे सांगू शकतात आणि त्या एक महिन्यात दुसरे पसंतीचे वाजवी घर मिळेलच असे नाही. तो ११ वा महिना खूप बेक्कार जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

सध्या ह्याच निर्णयावर विचार चालू आहे...

चिखलू
Sun, 08/24/2025 - 23:51 नवीन
नविन धागा सुरु करु की इथेच लिहु तेव्हडे सांगा. थोड्क्यात म्हणजे वर जी काही चर्चा झाली आहे त्या सगळ्यांची मिळुन एक खिचडि आहे माझ्याकडे सद्ध्या.उद्या ह्या वेळेच्या आसपास लिहुन टाकायचा प्रयन्त करेन.
  • Log in or register to post comments

स्वतचे घर, कर्ज आणि इतर...

चिखलू
Tue, 08/26/2025 - 00:46 नवीन
नविनच चर्चा सुरु करतो. जमल्यास आपले विचार मान्डावेत ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिखलू

आपला देह हेच एक भाड्याचे घर आहे.

धर्मराजमुटके
Mon, 08/25/2025 - 09:25 नवीन
आपला देह हेच एक भाड्याचे घर आहे. मालकांनी बोलावल्यावर लगेच सोडून जावे लागते. नोटीस मिळत नाही. अचानक जावे लागते त्यापेक्षा इथे ११ महिन्याच्या करारावर भाड्याने राहिलेले चांगले. बाहुबली साहेब तुम्ही नक्की भाड्याच्या घरात रहा. तुमच्या निर्णयास माझे अनुमोदन आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/25/2025 - 09:39 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा