एक देणे... शिवी...
एक देणे... शिवी...
अनेक प्रसंगी चर्चा रंगत जाते. मग पूर्वीच्या काळात पाणी भरायच्या जागा असतील, नंतरच्या काळात वार्षिक सर्वसाधारण भाग धारकांच्या सभा, राजकारणातील चढाओढ वगैरे असतील हमखास देण्या घेण्याच्या जागा मान्यता मिळवून आहेत. सिनेमातील संगीत, गाण्यातून बरेचदा खूप बोलून न जमणारे कथन, थोडक्यात मन मोकळे करायची सोय आहे. तसेच काहीसे भावनिक आवेश शांत बसू देत नाही अशा वेळी आपसूक असे बोल बाहेर पडतात... त्या दिलेल्या शब्द संचयाला आपण सभ्य भाषेत शिवी देणे म्हणतो. ती द्यावी का नाही ते वेळ, काळ, स्थळ आणि सामाजिक मान यावरून ठरवले जाते. माझे म्हणणे वेगळे आहे. या शिव्या म्हणजे शब्द, शब्द समूह यांच्या उगमस्थानाचा शोध घेतला जाईल का? प्रत्येक भाषेत शिवी दिली जात असणार. त्यावर काही शोध कार्य केले असेल तर ते समजून घ्यायला आवडेल. सौजन्याने दिलेली दूषणे, सौम्य शब्द रचना, आवाजाची वाढती श्रेणी, शब्द फेक यावर प्रकाश टाकला जावा. जास्त तिखट वेळ पडल्यास हातघाईच्या काळात तोंडाचा पट्टा चालू ठेवणे कमकुवत शरीरयष्टीच्या लोकांना बरे पडते असे म्हटले जाते. यावर आधारित काही मार्मिक शिव्यांची उदाहरणे दिली तर चालेल. स्त्री समाज लोक लाजेकाजेस्तव गाली प्रदान अभियानांतर्गत जरा कमी सहभागी होत असेल असे भाबड्या पुरुषांना वाटते का? सासू म्हणजे (सारख्या सूचना) तर सून म्हणजे (सूचना नकोत) असे नाते संबंध फार प्राचीन काळापासून चालत असतील तर भावजयांत, बायकोच्या भावा- बहिणीची साला-ली म्हणून जी शाब्दिक आरती गायली जाते. याची आठवण या निमित्ताने हटकून होते. विषय तसा चुरचुरीत आहे. या शिवी शब्दाला न देण्याची हिम्मत कोणाला आहे? जसे सर्वसूखी या जगात असू शकत नाही तसाच काहीसा मान शिवीला न देणाऱ्याचा आहे हे मान्य केले पाहिजे! यावर आपले विचार जाणून घ्यायला आवडेल. टोन हलका फुलका, चेष्टेने घ्यायला हवा. नाहीतर या ठिकाणी लोकांना चेहरा कृद्ध करून शिव्यांची लाखोली वाहिली जायची! आपले काय म्हणणे आहे ?
वर्गीकरण
कुकरची शिट्टी
काही वेळेस आपले म्हणणे जास्त
In reply to काही वेळेस आपले म्हणणे जास्त by सुबोध खरे
खरे आहे
शिव्या देणे ही शाब्दिक हिंसा
शिव्या देणे ही शाब्दिक हिंसा
माणूस इथून तिथून सारखाच
पुचाट लेकाचा
विशिष्ट प्रसंगी विशिष्ट शिवी आपसूकच येते...
In reply to विशिष्ट प्रसंगी विशिष्ट शिवी आपसूकच येते... by चित्रगुप्त
पुचाट लेकाचा
शिव्या हे एक देणगी आहे.