Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 04/19/2025 - 14:10
सध्या महाराष्ट्रात, पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या विरोधात अनेक मराठी प्रेमी नी महाराष्ट्राचे हित चिंतनाऱ्या संघटना विरोधात उतरल्या आहेत! -महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे का? - उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का? - ⁠२२ अधिकृत भाषांमधली एक भाषा हिंदी लादण्यामागे भाजपाचे कारस्थान काय? - ⁠हिंदीचा नी महाराष्ट्राचा संबंध काय? - ⁠हिंदी भाषकांच्या सोयीसाठी १ लितील कोवळ्या जीवाना हिंदी लादून त्रास द्यायचा का? संघटनांच्या मागण्या:- १. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती केवळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच एक राज्यभाषा असून तिची सक्ती करणे अयोग्य आहे. २. राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात: महाराष्ट्राची ओळख ही स्वतंत्र मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व परंपरेशी निगडित आहे. अन्य राज्यातील भाषा लादणे हे सांस्कृतिक आक्रमणच म्हणावे लागेल. ३. शिक्षणाचे ओझे वाढवणारा निर्णय: पहिलीपासूनच तीन भाषा सक्तीने शिकविणे बालकांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी अयोग्य व अन्यायकारक ठरेल. ४. मराठीतील बोलीभाषांना सरकारकडून प्रोत्साहन नाही: मराठीच्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासन काहीही प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैवी आहे. ५. स्थानिक विद्यार्थ्यांवर स्थलांतरितांचे भाषिक वर्चस्व लादले जात आहे, ज्यामुळे स्थानिक भाषिक विद्यार्थ्यांचा अधिकार आणि संधी हिरावली जाऊ शकते. ६. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा चुकीचा अर्थ: त्रिभाषा सूत्र हा प्रशासनापुरता मार्गदर्शक आहे; त्याची सक्ती शालेय शिक्षणात लादणे अन्यायकारक आहे. ७. भाषिक स्वायत्ततेचा संपूर्ण अभाव: प्रत्येक राज्याला त्याच्या भाषिक गरजेनुसार शिक्षण धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या दबावाखाली घेतलेला निर्णय हे राज्याच्या स्वायत्ततेचे उल्लंघन आहे. त्यामुळे, आम्ही खालील मागण्या आपल्यास सादर करीत आहोत – १. राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा. २. या निर्णयाच्या रद्दबाबत तात्काळ शासन आदेश किंवा स्पष्ट परिपत्रक निर्गमित करावे. ३. सदर बाबीबाबत शालेय शिक्षण संचालनालय, शिक्षण आयुक्त, शिक्षण मंडळ, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या यांना स्पष्ट सूचना द्याव्यात. ४. बालभारतीसह इतर सर्व पुस्तक छपाई केंद्रे व मुद्रण विभागांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हिंदी सक्तीबाबत कोणतीही योजना राबवू नये, याबाबत स्पष्ट लेखी सूचना द्याव्यात. ५. यापुढील अभ्यासक्रम नियोजन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना तृतीय भाषा निवडीचा संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावा, कोणतीही सक्ती करू नये. ६. त्रिभाषा सूत्राचे पालन हे राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने व ऐच्छिक स्वरूपात मर्यादित ठेवावे. ७. राज्यातील मराठी बोलीभाषा, लोकपरंपरा व स्थानिक संस्कृती यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करून स्थानिकतेला प्राधान्य द्यावे. ८. सदर निर्णयामुळे निर्माण होणारा संभ्रम, असंतोष आणि प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी त्वरित ठोस कृती करण्यात यावी.
  • Log in or register to post comments
  • 11957 views

प्रतिक्रिया

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 04/20/2025 - 11:29

Permalink

हिंदी भयंकर प्रकारे लादली

हिंदी भयंकर प्रकारे लादली जातेय, प्ले ग्रुप मधे जाणाऱ्या माझ्या ३ वर्षाच्या मुलाला मी येरे येरे पावसा शिकवू लागलो तर मला थांबवून तो बारीश आई बारिश आई म्हणायला सांगतो, छोटा ए, बडा ए म्हणतो, रुको, बचाओ, भागो, असे शब्द उच्चारतोय, प्ले ग्रुपमध्ये ८० टक्के मुले मराठी आहेत, पण २० टक्के उत्तर भारतीय मुलांसाठी हिंदीत शिकवले जातेय. शिक्षिका मराठी आहेत तरीही, घरातले लोक ऐकत नाही तरीही प्ले ग्रुप लवकरच बदलनार आहे, आता उन्हाळी सुट्या आहेत पण दुसऱ्या प्ले ग्रुपला वेगळी अवस्था असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Sun, 04/20/2025 - 12:17

Permalink

त्रिभाषा सुत्र

त्रिभाषा सुत्र जर देशभर लागू करणार असतील तर युपी, बिहार मधे मराठी हा तिसरा पर्याय दिला आहे काय शिकायला ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 04/20/2025 - 13:08

In reply to त्रिभाषा सुत्र by धर्मराजमुटके

Permalink

तिसरा पर्याय राष्ट्रभाषा

तिसरा पर्याय राष्ट्रभाषा शिकण्यासाठी आहे. हिंदी पट्ट्यात तिसऱ्या भाषेची गरज नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Sun, 04/20/2025 - 13:14

In reply to तिसरा पर्याय राष्ट्रभाषा by श्रीगुरुजी

Permalink

मग

हिंदी शिकण्याची भलेही गरज नसेल पण जसे इथे मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे तीन पर्याय दिले आहेत तसे तिकडे पण कोणतेतरी तीन पर्याय असायला हवेत. मला वाटते युपी बिहार मधे मराठी / गुजराती / कन्नडा / तमिळ /तेलुगू यापैकी एक भाषा तरी पहिलीपासून सक्तीचे करावी कारण तिकडची जनता याच भाषा बोलणार्‍या राज्यांत कामासाठी जात असते. फारच वाटले तर याला राष्ट्रभक्तीचा मुलामा चढवावा म्हणजे बघा उत्तरेतून येऊन कशी दक्षिणवासियांची मने जिंकली वगैरे. या सगळ्या भाषा शिकल्या तर उत्तरेच्या राजकीय पक्षांना देखील दक्षिण मधे प्रवेश करायला मदत होईल. मार्ग थोडा अवघड आहे पण पहिलीपासूनच ब्रेनवॉश केला तर जमून जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 04/20/2025 - 22:56

In reply to तिसरा पर्याय राष्ट्रभाषा by श्रीगुरुजी

Permalink

इथे महत्वाचा प्रॉब्लेम आहे

तिसरा पर्याय राष्ट्रभाषा शिकण्यासाठी आहे. हिंदी पट्ट्यात तिसऱ्या भाषेची गरज नाही. इथे महत्वाचा प्रॉब्लेम आहे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 04/20/2025 - 23:07

In reply to इथे महत्वाचा प्रॉब्लेम आहे by माहितगार

Permalink

राष्ट्रभाषा?

राष्ट्रभाषा?
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Sun, 04/20/2025 - 13:15

Permalink

पुरवणी प्रश्न

भारतातील अन्य राज्यात नोकरी करणारे/ तिकडे स्थायिक झालेले महाराष्ट्रातले लोक तेथील स्थानिक भाषा (गुजराती, तेलगू, तमिळ, केरळी वगैरे) शिकतात का? ठराविक वय ओलांडल्यावर नवीन भाषा शिकणे सोपे नसते. त्यामुळे भारतातल्या एखाद्या राज्यातला नागरिक अन्य राज्यात नोकरी/ उद्योग करू लागल्यास स्थानिक भाषा शिकण्यासाठी त्याला नोकरी देत असलेल्या संस्थेने तशी तयारी करून घ्यावी, व ठरलेल्या कालावधीत एखादी परीक्षा घेण्यात यावी हा एक व्यावहारिक पर्याय आहे. या बाबतीत काही कायदा अस्तित्वात आहे का? स्थानिक भाषा न शिकलेल्या मराठी माणसाला अन्य राज्यांमधे मारहाण होणे, त्याला अपमानास्पद पद्धतीने स्थानिकांनी हिसका दाखवणे रास्त आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Sun, 04/20/2025 - 13:47

In reply to पुरवणी प्रश्न by मूकवाचक

Permalink

ठराविक वय ओलांडल्यावर नवीन भाषा शिकणे सोपे नसते

ठराविक वय ओलांडल्यावर नवीन भाषा शिकणे सोपे नसते
म्हणूनच युपी / बिहार इथे पहिलीपासून मराठी / गुजराती / कन्नड / तामिळ / तेलुगू यापैकी एक भाषा सक्तीची करावी. म्हणजे त्यांना दुसृया राज्यात जाऊन पोट भरण्याची सोय होईल आणि अपमान देखील होणार नाही. बिहार मधील मुले खूप हुशार असतात. बरेचसे सरकारी नोकर तिथूनच येतात. एवढ्या हुशार जनतेला एखादी भाषा शिकता येणे अवघड जाणार नाही.
स्थानिक भाषा न शिकलेल्या मराठी माणसाला अन्य राज्यांमधे मारहाण होणे, त्याला अपमानास्पद पद्धतीने स्थानिकांनी हिसका दाखवणे रास्त आहे का?
नाही. पण मराठी माणसाला अन्य राज्यात मारहाण झाल्याची फारशी उदाहरणे पाहण्यात आलेली नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Sun, 04/20/2025 - 20:42

In reply to ठराविक वय ओलांडल्यावर नवीन भाषा शिकणे सोपे नसते by धर्मराजमुटके

Permalink

आपण

"पण मराठी माणसाला अन्य राज्यात मारहाण झाल्याची फारशी उदाहरणे पाहण्यात आलेली नाहीत." दक्षिणेतील राज्यांत दुसर्याला झोडपणे, जाहीर सभांमध्ये दुसर्या भाषेची/संस्क्रुतीची खिल्ली उडवणे हे प्रकार होत नाहीत."तू आमची भाषा का नाही बोलत" असले प्रश्नही विचारले जात नाहीत. तामिळनाडुचे उदाहरण घ्या. मारवाडी/बिहारी तामिळनाडुत गेले ५० हुन अनेक वर्षे आहेत. राजकीय पक्ष भाषेबद्दल खूप जागरूक असतात पण मारहाण झाल्याचे कधी ऐकले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चावटमेला on Sun, 04/20/2025 - 13:19

Permalink

घृणास्पद निर्णय. राक्षसी

घृणास्पद निर्णय. राक्षसी बहुमताचा माज आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 04/20/2025 - 15:19

Permalink

अजून एक नालायक

Image removed. अजून एक नालायक
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 04/20/2025 - 15:21

In reply to अजून एक नालायक by श्रीगुरुजी

Permalink

या राज्यात जो राहील त्याला

या राज्यात जो राहील त्याला मराठी यायलाच हवी असैल तर निर्लज्जपणे वाहिन्यांसमोर हिंदीत का बोलता? वाहिन्यांना मराठी यायला नको का?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 04/20/2025 - 15:54

In reply to या राज्यात जो राहील त्याला by श्रीगुरुजी

Permalink

भाजपेयीनी सगळी लाजलज्जा

भाजपेयीनी सगळी लाजलज्जा सोडलीय, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे खोटे सांगून महाराष्ट्रावर हिंदी लादत आहेत, दोन्ही ठाकरेंनी ह्या निर्णयाला विरोध केलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Sun, 04/20/2025 - 20:33

Permalink

काही वर्षापुर्वीचे

" प्ले ग्रुप मधे जाणाऱ्या माझ्या ३ वर्षाच्या मुलाला मी येरे येरे पावसा शिकवू लागलो तर मला थांबवून तो बारीश आई बारिश आई म्हणायला सांगतो, छोटा ए, बडा ए म्हणतो, रुको, बचाओ, भागो, असे शब्द उच्चारतोय" काही वर्षापुर्वीचे एक उदाहरण आठवले. ए आर रेहमान तामिळ चॅनेलवर बोलत असताना मध्येच हिंदीत बोलू लागला. मुलाखतकर्त्याने त्याला तिथेच थांबवुन 'हा तामिळ चॅनेल आहे" असे सांगितले. उगीच 'आमचा जगप्रसिद्ध रेहमान, बोलु देऊ या' असले लाड नाहीत. नाहीतर आमचे बॉलिवुडमधील मराठी कलाकार? उर्दु शायरीपासुन हिंदी कविता.. मराठी चॅनेलवर ओतत असतात. मराठी चॅनेलही बॉलिवूडवाल्यांना तासाभराच्या मुलाखतीसाठी कट्ट्या-फट्ट्यावर बोलावतात. थोर-थोर म्हणून नावाजले गेलेले मराठी कलाकार- बॉलिवुडमधील कलाकारांचे कौतुक केल्याशिवाय, ह्यांची मुलाखत संपत नाही. गेले २५-३० वर्षे दोन-तीन पिढ्या हेच टी.व्ही.वर बघत आल्या आहेत.तीशीतल्या-चाळीशीतल्या १० मराठी तरूणांना तुझे आवडते ४ गायक सांग असे विचारा आणि 'किशोर्,लता,आशा,अरिजीत, अरिजीत घोशाल' ह्यापैकी नावे आली नाहीत तर सांगा. तामिळ्,तेलुगु,कन्नड्,बंगाली लोकांना विचारा- खात्री आहे की त्यांच्या राज्यातील ४ पैकी २ नावे येतील. हिंदीचा प्रभाव हा असा गेले ५० वर्षे होतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 04/20/2025 - 21:02

In reply to काही वर्षापुर्वीचे by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

माईडे,

माईडे, तुला आणि तुझ्या ' ह्यां'ना आवडते गायक/गायिका विचारले तर गजाननबुवा वाटवे, बबनराव नावडीकर, दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, शांता आपटे, ज्योत्स्ना भोळे ही नावे सांगतील.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Sun, 04/20/2025 - 22:55

In reply to माईडे, by श्रीगुरुजी

Permalink

नक्कीच

नक्कीच रे गुरुजी. हे तर आहेतच शिवाय सैगल्,बाबुजी,रफी,मुकेश्,शमशाद बेगम.. यादी खूप मोठी आहे. फक्त मराठी कलाकारांचे फॅन व्हा असे बिलकूल म्हणणे नाही पण दुसर्याना डोक्यावर घेण्याच्या नादात गेल्या एक-दोन पिढ्या काय करुन बसल्या आणि इथ पर्यंत वेळ आली.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 04/20/2025 - 21:57

In reply to काही वर्षापुर्वीचे by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

हरामखोर मराठी कलाकार, सिनेमा

हरामखोर मराठी कलाकार, सिनेमा आदळला की मराठी प्रेक्षकांना दोष देतील पण मराठीवर असे संकट आले की तोंडातून शब्द उच्चारणार नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 04/20/2025 - 23:14

Permalink

"मला आश्चर्य वाटते की

"मला आश्चर्य वाटते की हिंदीसारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे आपण गोडवे गातो. इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो आणि भारतीय भाषा दूरची का वाटते याचाही विचार केला पाहिजे." - देवेंद्र फडणवीस हे वाचून संताप अनावर होतोय. भाजपला मत देणाऱ्यांनी नक्की का भाजपला मत दिले होते? ही मुक्ताफळे किती भाजप समर्थकांना मान्य आहेत? नोकरी व्यवसायाची संधी इंग्लिश येत नसेल पण हिंदी येत असेल तर किती आणि इंग्लिश येत असेल पण हिंदी येत नसेल तर किती? हिंदी इतकी महत्त्वाची आहे तर हिंदीभाषिक पट्ट्यातील अनेकांना इतर राज्यात जाऊन कष्टाची कामे का करावी लागतात? इंग्लिशला हिंदी पेक्षा कमी महत्त्व असेल तर दक्षिणेतील राज्ये तुलनेने प्रगत कशी? आपल्या राष्ट्रीय राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी मराठीचा बळी द्यायला, इंग्लिशला कमी लेखून हिंदीचे कौतुक करायला जनाची नसली तरी मनाची तरी नको का? आपल्या मुलीला यांनी हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकविले की इंग्लिश माध्यमाच्या? महाराष्ट्राच्या नशिबी सातत्याने नालायकच सत्ताधारी का येत आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Sun, 04/20/2025 - 23:44

In reply to "मला आश्चर्य वाटते की by श्रीगुरुजी

Permalink

फडण्वीस

देफची पत्नी पंजाबी गाण्यावर ठेका धरते.'मूड बनालेया' म्हणते नाचते त्या घरात कसले मराठी आणि कसले हिंदी? " इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो आणि भारतीय भाषा दूरची का वाटते याचाही विचार केला पाहिजे." देफ देफला हेच वाक्य तामिळ्नाडूच्या भाजपाच्या कार्यालयात म्हणायला सांगा. रेहमानला जसे हिंदी वाक्य पुरे करू दिले नव्हते, तसेच त्याला थांबवतील. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Mon, 04/21/2025 - 01:56

In reply to फडण्वीस by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

देवेंद्र फडवणीस व त्यांच्या

देवेंद्र फडवणीस व त्यांच्या पत्नी ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. देवेंद्र फडवणीस ह्यांच्या पत्नीने कुठल्या गाण्यावर ताल / ठेका धरावा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना ते स्वातंत्र आहे. उगा त्यांना ह्यात ओढण्याची आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Mon, 04/21/2025 - 13:14

In reply to देवेंद्र फडवणीस व त्यांच्या by सुक्या

Permalink

माईंचे प्रतिसाद दर्जा सोडून होत होते

तेव्हा माइइंचे बेअरिंग सुटत चाललय असे वाटायला लागले. पण हा प्रतिसाद पाहून माईंनी आपला आयडी आणि पासवर्ड कोणा ट्रोलरला शेअर केलाय याची खातरजमा झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Mon, 04/21/2025 - 13:41

In reply to माईंचे प्रतिसाद दर्जा सोडून होत होते by अनन्त अवधुत

Permalink

अरे

अरे अनंता, ज्या घरात अशा न्रुत्याचे,गाण्याचे सराव केले जात असतील त्यांना काय मराठीबद्दल जिव्हाळा असणार आहे? तो असावा अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. भारतिय नागरिकाने कोणत्या भाषेत बोलावे,कोणत्या भाषेची गाणी गावीत्,न्रूत्य करावे.. हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण लोकांसमोर हे करत आहात ते प्रतिसाद येणारच ना?केजरीवाल ह्यांची कन्या उद्या स्पॅनिशमधुन व्हिडियो बनवु लागली,सालसा नृत्य करू लागली तर आमचे अमित मालविय आणि त्यांचा कंपू ट्रोल करेलच ना?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 04/21/2025 - 14:01

In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

माई फडणवीसांच्या मुलीला मराठी

माई फडणवीसांच्या मुलीला मराठी येत नाही, हिंदीत बोलते, ह्यावर “तिला सांभाळणारी बाई हिंदी भाषीक आहे असे उत्तर मिळाले होते” तो व्हिडिओ युट्युबवरून गायब करण्यात आलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 04/20/2025 - 23:45

In reply to "मला आश्चर्य वाटते की by श्रीगुरुजी

Permalink

+१

+१ हा माणूस मला महाराष्ट्राची वाट लावणार.
  • Log in or register to post comments

Submitted by रीडर on Mon, 04/21/2025 - 00:53

Permalink

अत्यंत वाईट निर्णय

करंटेपणाचा कळस. अत्यंत वाईट निर्णय
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 04/21/2025 - 08:05

Permalink

काहीही म्हणा

काहीही म्हणा पण आपल्या भाषेवर आक्रमण होतं आहे. आपल्यावर अन्य भाषा लादली जात आहे , ह्या विचाराने वर लोकांचा जो जीव कळवळला आहे ते पाहून भारी वाटतंय. अगदी तसेच ... जेव्हा आपल्या धर्मावर दुसऱ्या धर्माचे आक्रमण होते, आपल्यावर अन्य धर्म , अन्य संस्कृती लादली जात आहे ह्या विचाराने सनातनी लोकांचा जीव कळवळतो. आपल्या पहिलीतील लहान मुलांच्या दप्तरात मराठी पुस्तके बाजूला सारून हिंदी पुस्तके बसवली जातात तेव्हा तुम्हाला जे दुःख होतेच अगदी तसेच जेव्हा आपली मंदिरे उध्वस्त करून तिथे बसवलेली अन्य धार्मिक स्थळे पाहून , आपल्या धर्माची पुस्तके दहन केलेली पाहून सनातनी लोकांचा जीव कळवळतो. आता वरील काही प्रतिसादात लोकांनी देवेंद्र फडणवीस ह्यांच्यावर राग व्यक्त केला आहे. हेच जर कोणी फडणवीसांना " महात्मा" ही पदवी दिली तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल की नाही !! अगदी सेम टू सेम तसेच , सनातनी लोकांचा जीवाचा जळफळाट होतो जेव्हा देव देश अन् धर्माची हानी केलेल्या लोकांना "महात्मा" ही पदवी लावली जाते. जी अस्मिता तुम्हाला भाषेबद्दल वाटत आहे तीच सनातनी लोकांना देव देश अन् धर्माबाबत बाबत वाटत आहे. I hope you can understand each other better now. Image removed. - महात्मा प्रसाद गोडबोले=))))
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 04/21/2025 - 08:48

In reply to काहीही म्हणा by प्रसाद गोडबोले

Permalink

या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सरमिसळ नको. धाग्याचा विषय हिंदीची अनावश्यक सक्ती हा आहे. हिंदीचे व्यावहारिक लाभ, जागतिक पातळीवरील स्वीकारार्हता इंग्लिशच्या तुलनेत अत्यल्प आहेत. हिंदीत प्राविण्य मिळवून हिंदी राज्यात साधारण नोकरी मिळू शकेल. परंतु इंग्लिशमध्ये प्राविण्य असल्यास अनेक देशात, उच्चभ्रू स्वरूपाच्या नोकरीत संधी मिळू शकते. एकतर तीन भाषा शिकण्याची सक्तीच नको. तिसरी भाषा सक्तीने शिकवायची असेल ज्या भाषांचा ज्ञानग्रहणासाठी व व्यावहारिक उपयोग सर्वाधिक आहे त्याच भाषा शिकायला हव्या. या दोन्ही मुद्द्यांवर हिंदी निरूपयोगी आहे. अजून एक मुद्दा म्हणजे हिंदी अजिबात न शिकताही समान लिपी, समान व्याकरण, समान वाक्यरचना व अनेक समानार्थी शब्दांमुळे हिंदी समजण्यासाठी मराठी येणाऱ्यांना अत्यल्प प्रयत्न करावे लागतात. हिंदी अजिबात न शिकलेल्या वयातही हिंदी चित्रपट समजत होते. देफने स्वतःच्या मुलीला हिंदी माध्यमाच्या शाळेत न शिकवितख इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकविले होते. परदेशात गेल्यानंतर हे हिंदीत न बोलता इंग्लिशमध्ये संवाद साधतात. तरीही शहाजोगपणे विचारतात की आपल्याला देशी हिंदीपेक्षा विदेशी इंग्लिशसाठी आत्मीयता का वाटते? आपल्या राष्ट्रीय राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी हे मराठी माणसांचा बळी देताहेत. लिपी समानतेमुळे मराठी मुलांना हिंदी शिकणे सोपे जाईल हा दावा असेल तर तिसरी भाषा दॉईच, डच, फ्रेंच यापैकी शिकवा ज्यांची व इंग्लीशची लिपी समान आहे व ज्यांचा व्यावहारिक उपयोग हिंदीपेक्षा खूप जास्त आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 04/21/2025 - 18:01

In reply to या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. by श्रीगुरुजी

Permalink

सरमिसळ नाहीच.

सरमिसळ नाहीच. राममंदिर, मंदिर पुनर्संपादन आणि जीर्णोद्धार, वगैरे सर्वच बाबतीत हिंदू द्वेषी भूमिका घेणाऱ्या फुरोगामी मराठी माणसाच्या बाजूला उभे राहण्यापेक्षा सनातनी हिंदी भाषिक मला "दगडापेक्षा वीट मऊ " वाटतात. तुम्हीही मराठी मराठी म्हणून ज्यांच्या बाजूला उभे रहात आहात हे लोकं - सावरकरांना माफीवीर म्हणणारे आहेत. नाशिकच्या साहित्य संमेलनात सावरकरांचे नामोनिशाण पुसून टाकणारे लोकं आहेत हे. ज्ञानेश्वरांना धूर्त चलाख देशस्थ ज्ञानोबा म्हणणारे लोक आहेत हे. रामदासांना हे लोकं काय बोलतात हे लोकं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. लिस्ट खूप मोठ्ठी आहे. अहो , एवढं लांब चे कशाला, पंतप्रधानांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून मराठी साहित्य संमेलनासाठी मोजका वेळ काढून दिला , तर त्याचा अर्थ " मला जास्त बोलायचं नाही असा दम देण्यात आलेला आहे." असा काढणारे महाभाग आहेत हे लोकं. नुसती भाषा एक असून काय उपयोग, वृत्ती एक असली पाहिजे. कर्वे गोखले आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लढलेल्या एसएम जोशी, श्रीपाद डांगे, सीडी देशमुख, प्र के अत्रे ह्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासातून आणि सार्वजनिक इतिहासातून कशी पुसली गेली आहेत हे पहा. ह्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे . ज्यांना शिकायचे ते शिकले आहेत ! असो.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 04/21/2025 - 19:00

In reply to सरमिसळ नाहीच. by प्रसाद गोडबोले

Permalink

पुन्हा एकदा सरमिसळ झाली.

पुन्हा एकदा सरमिसळ झाली. ब्राह्मणद्वेष अनेक शतकांपासून आहे व पुढेही राहील. ब्राह्मणद्वेष सर्वभाषिक करतात. त्यात रामस्वामी नायकर होता, काशीराम होता, कांचा इलैय्या आहे, आव्हाड आहे, पार्थ पोळके आहे, कोकाटे आहे, खेडेकर आहे, देफ सुद्धा आहे, महाराष्ट्रातील अनेक तथाकथित समाजसुधारक होते, अनेक राज्यातील अनेक जण सापडतील. सांप्रत मुद्दा मराठी भाषेच्या अस्तित्वाचा आहे. मराठीला ठार मारण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी करू देत वा निधर्मांध करू देत वा परप्रांतीय करू देत वा मराठी माणसे करू देत, मी विरोधच करणार. मराठीचा बळी देऊन उभारलेले हिंदुराष्ट्र मला नको.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 04/21/2025 - 19:12

In reply to पुन्हा एकदा सरमिसळ झाली. by श्रीगुरुजी

Permalink

ह्यात सरमिसळ नाहीच आहे.

ह्यात सरमिसळ नाहीच आहे. मी तुमची गाठभेट सावरकरांना "संडासवीर " म्हणणाऱ्या काही जाज्वल्य मराठी प्रेमी लोकांशी घालून देतो, त्यांना तुम्ही सावरकरांचे मराठी भाषेतील योगदान, सावरकरांच्या कविता, नाटके, महाकाव्ये ह्यांचे महत्व पटवून दाखवा . घेता का चॅलेंज ? लावता का 100 रुपयाची पैज ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 04/21/2025 - 19:30

In reply to ह्यात सरमिसळ नाहीच आहे. by प्रसाद गोडबोले

Permalink

हिंदीची सक्ती केल्याने हे

हिंदीची सक्ती केल्याने हे सावरकरांचे कौतुक करणे सुरू करतील? हिंदी महाराष्ट्रातून हद्दपार केली तर हे सावरकरांचे कौतुक करणे सुरू करतील? ज्यांनी आयुष्यभर फक्त सावरकरद्वेष केला ते कोणत्याही परिस्थितीत द्वेषच करीत राहतील. त्यामुळे तो मुद्दाच नाही येथे. मूळ मुद्दा विनाकारण पहिलीपासून हिंदी लादणे हा आहे व त्यामुळे मराठीची मृत्यूघंटा वाजली आहे आणि त्या विरोधात सर्व मराठी माणसांनी आवाज उठवायला हवा. सावरकरद्वेष, ब्राह्मणद्वेष, हिंदुराष्ट्र हे सर्वस्वी वेगळे मुद्दे आहेत व त्या मुद्द्यांची हिंदी सक्ती या मुद्द्याबरोबर सरमिसळ नको.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 04/22/2025 - 09:06

In reply to हिंदीची सक्ती केल्याने हे by श्रीगुरुजी

Permalink

सरमिसळ नाहीये हो.

सरमिसळ नाहीये हो. तुम्ही मुद्दा लक्षात घेत नाहीये. जेव्हा पाकिस्तान मधून बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हा त्यांचा धर्म विचारधारा एकच होती, ह्यांची बंगाली अस्मिता म्हणून आपल्या देशातील बंगाली काफिरानी त्यांना सहानुभूती दाखविली. आता बांगलादेश ला दात आलेत तर कसे लगेच काफिरांना पळता भुई थोडी केली आहे पहा =)))) हेच तुम्ही करत आहात. तुम्ही मराठी मराठी म्हणून ज्यांच्या सोबत जाऊन उभे रहात आहात ना ते लोकं एक ना एक दिवस तुम्हाला "तुमची जागा " दाखवल्या शिवाय राहणार नाहीत बघा. आम्ही निरीक्षण आणि अनुमानातून धडा घेतो , तुम्ही अनुभवातून शिका. असो. आता मी काही बोलत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Tue, 04/22/2025 - 09:50

In reply to हिंदीची सक्ती केल्याने हे by श्रीगुरुजी

Permalink

मराठीची मृत्यूघंटा वाजली आहे ...

मराठीची मृत्यूघंटा वाजली आहे असे गेली कित्येक दशके कानावर पडते आहे. या समस्येमागचे मूळ कारण काही वेगळेच असावे. त्रिभाषा धोरण हा काल परवाचा विषय आहे. हे धोरण रद्द केले तरी मूळ समस्या तशीच राहणार आहे. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by रामचंद्र on Tue, 04/22/2025 - 00:33

In reply to पुन्हा एकदा सरमिसळ झाली. by श्रीगुरुजी

Permalink

<मराठीचा बळी देऊन उभारलेले

<मराठीचा बळी देऊन उभारलेले हिंदुराष्ट्र मला नको> गुरुजी, ही खरी आईच्या उपकारांची जाण ठेवणं. आपल्या सहप्रवाशांमध्येही इतकी जाज्वल्य निष्ठा निर्माण व्हावी, ही प्रार्थना.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/22/2025 - 02:55

In reply to <मराठीचा बळी देऊन उभारलेले by रामचंद्र

Permalink

खरे आहे.

खरे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 04/21/2025 - 09:11

Permalink

मी सातत्याने हिंदीत बोललो तर

मी सातत्याने हिंदीत बोललो तर हिंदीभाषिक राज्यात माझी स्वीकारार्हता वाढेल, त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात माझा प्रवेश सुलभ होईल, महाराष्ट्रातील हिंदीभाषिक मलाच मत देतील, मोदी-शहांची माझ्यावर मर्जी राहील, भविष्यात मी पंतप्रधान होईन व मराठी माणसांना हिंदुराष्ट्राच्या स्वप्नात गुंगवून त्यांचा हिंदीविरोध मोडून काढता येईल आणि आपल्या होणाऱ्या नुकसानाची त्यांना जाणीव होणार नाही . . . ही सर्व आकडेमोड करून व गणित करून हा अत्यंत स्वार्थी, संतापजनक व महाराष्ट्रघातकी निर्णय घेतलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 04/21/2025 - 10:30

In reply to मी सातत्याने हिंदीत बोललो तर by श्रीगुरुजी

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 04/21/2025 - 13:42

Permalink

पहिले दोन वर्षं ओडिओ कोर्स

पहिले दोन वर्षं ओडिओ कोर्स करून घ्यावा नवीन भाषेचा आणि नंतर लेखन वाचनाला सुरुवात करावी. यूट्यूबवर आहेत विडिओ. काही साइट्सवर ओडिओसुद्धा आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 04/21/2025 - 14:14

Permalink

मुळात समान लिपी व भाषा

मुळात समान लिपी व भाषा साधर्म्यामुळे मराठी विद्यार्थिनींंना/विद्यार्थ्यांना अजिबात न शिकताही हिंदी समजू शकते. असे असताना अभ्यासक्रमात हिंदी हा एक सक्तीचा विषय करून त्यांचा वेळ व श्रम वाया जाणार आहेत. त्याऐवजी मराठी व इंग्लिश या दोधच भाषा सक्तीच्या करून संगणक, एखादी कला, एखादे वाद्य, गायन, एखादा खेळ शिकविल्यास खरा लाभ होईल. हिंदी शिकून कोणताही व्यावहारिक लाभ नाही. सर्वात वाईट म्हणजे महाराष्ट्रात आलेले कोणीही मराठी बोलणार नाहीत. आजच एका विमा प्रतिनिधीने संपर्क केला. तिने प्रारंभ हिंदीतून केला. मला हिंदी येत नाही असे सांगितल्यानंतर तिने बऱ्यापैकी मराठीत बोलून माहिती दिली. पहिलीपासून हिंदी शिकविली तर मराठीची गरजच भासणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Tue, 04/22/2025 - 08:56

In reply to मुळात समान लिपी व भाषा by श्रीगुरुजी

Permalink

पहिलीपासून हिंदी शिकविली तर

पहिलीपासून हिंदी शिकविली तर मराठीची गरजच भासणार नाही.
एकदम बरोबर.हिंदी ही मराठीला पर्याय म्हणून वापरली जातेय.आत्ताच थांबवा नाहीतर फक्त हि़दीतच संभाषणाची अघोषित मक्तेदारी वाढेल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 04/22/2025 - 09:12

In reply to पहिलीपासून हिंदी शिकविली तर by Bhakti

Permalink

हिंदीभाषिक राज्ये, तामिळनाडू

हिंदीभाषिक राज्ये, तामिळनाडू या राज्यात दोनच भाषा शिकाव्या लागतात. हिंदीभाषिक राज्यात तीन भाषा का अभ्यासक्रमात सक्तीच्या नाहीत? हिंदी न शिकविताही तामिळनाडू इतर राज्यांच्या तुलनेत प्रगत आहे. हिंदी न शिकल्याने त्या राज्याच्या प्रगतीत कोणतेही अडथळे आले नाही. मग महाराष्ट्रालाच तीन भाषा (त्यातील एक हिंदी) सक्तीने लादण्याचा दुराग्रह का? सर्वानाच हिंदी आले तर मराठी बोलण्याची गरजच काय? हिंदीभाषिक राज्यात तुम्ही गेला तर तेथे मराठी येत नसल्याने व तुम्हाला हिंदी येत असल्याने संभाषण हिंदीत होणार आणि ते जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांना मराठी येत नसल्याने व दोघांनाही हिंदी येत असल्याने संभाषण हिंदीतच होणार. मग मराठी शिकायचीच का? हिंदी शिकली नाही तरी राज्याच्या प्रगतीत बाधा येत नाही. उलट हिंदी राज्यभाषा असलेली राज्ये अजून बरीच मागे आहेत. विनाकारण हिंदी हा निरूपयोगी विषय शिकण्यात, परीक्षा देण्यात, अभ्यास करण्यात वेळ व्यर्थ घालविण्यापेक्षा हाच वेळ एखादी कला, कौशल्य, क्रीडाप्रकार, दॉइच/फ्रेंच/डच/जपानी अश्यासारखी व्यावहारिक लाभ असलेली भाषा शिकण्यात हा वेळ वापरायला हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/22/2025 - 10:08

In reply to हिंदीभाषिक राज्ये, तामिळनाडू by श्रीगुरुजी

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by बेन१० on Mon, 04/21/2025 - 16:14

Permalink

मराठीचे हिन्दिकरण

आगोदरच मराठीचे हिंदीकरण होतच आहे, उदाहरणादखल जसे पंतप्रधानांना "प्रधानमंत्री" म्हणणे (गेल्या काही वर्षांतले राजकारण्यांचे व्हिडीओज् पाहिल्यास लक्षात येईल). मराठी बातमीदारांचे विशेष वाईट झाले आहे : निवडणूक निकालांवेळी वेळा "चुरशीची लढत" ऐवजी "कांटे की टक्कर" ऐकायला मिळतं इतरही अनेक उदाहरणे आहेत. असो, या असल्या भिकार निर्णयामुळे आपण पायावर धोंडा मारुन घेत आहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 04/21/2025 - 16:35

In reply to मराठीचे हिन्दिकरण by बेन१०

Permalink

घर "खाली" करायला सांगितलंय,

घर "खाली" करायला सांगितलंय, त्यांनी असा "सवाल" केलाय हे तर सातत्याने कानावर पडतंय. महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शनिपार चौकात फलक घेऊन आंदोलन केले तेव्हा "*** तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है", "*** तुम संघर्ष करो", "सरकार हमसे डरती है" अश्या घोषणा फलकांवर होत्या.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 04/22/2025 - 00:50

In reply to घर "खाली" करायला सांगितलंय, by श्रीगुरुजी

Permalink

पंढरीनाथ महाराज की जय.

पंढरीनाथ महाराज की जय.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Tue, 04/22/2025 - 12:04

In reply to मराठीचे हिन्दिकरण by बेन१०

Permalink

उदाहरणादखल जसे पंतप्रधानांना

उदाहरणादखल जसे पंतप्रधानांना "प्रधानमंत्री" म्हणणे त्याच बरोबर अतिरेक्यांना आतंकवादी असे म्हणणे. दुसरा चीड आणणारा वाक्यप्रयोग म्हणजे मला त्याचा गर्व आहे हा.अभिमान च्या जागी सर्रास गर्व हा शब्द वापरला जातो. त्याला मदत कर असे योग्य वाक्य आहे आणि हिंदीकरणामुळे त्याची मदत कर असे बदलले जाते. आता तर माझाही गोंधळ उडतो कि नक्की कुठला वाक्यप्रयोग बरोबर आहे. सुमार मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये अशी भेसळ फार प्रमाणात दिसुन येते आहे. आपली पिढी प्रथम भाषा मराठी असल्याने काही प्रमाणात तरी ह्या बाबती जागरुक आहे पण नंतरच्या पिढीची मराठी ही फक्त घरापुरती बोलली जाणारी भाषा (जर पालक आंग्लाळलेले नसतील तर ) उरल्याने असेच प्रकार कालांतराने रुळले जातील.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 04/21/2025 - 16:29

Permalink

भाजप हे करणार हे वाटलेच होते,

भाजप हे करणार हे वाटलेच होते, प्रादेशिक पक्ष ताकदवान असणे का महत्वाचे असते ते ह्यावरून कळते.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 04/21/2025 - 16:38

In reply to भाजप हे करणार हे वाटलेच होते, by अमरेंद्र बाहुबली

Permalink

या मुद्द्यावर महाराष्ट्रातले

या मुद्द्यावर महाराष्ट्रातले सर्व प्रादेशिक पक्ष, सर्व प्रादेशिक नेते भाजपइतकेच भिकारचोट आहेत. कोणीही अपवाद नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Mon, 04/21/2025 - 17:14

Permalink

आदित्य ठाकरे जी Bombay Scottish School

आदित्य उद्धव ठाकरे Bombay Scottish School या मराठी माध्यमाच्या प्रख्यात शाळेत शिकलेले आहेत. हे वाचून उर अभिमानाने भरून आला. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे कुठल्या शाळेत शिकले आहेत कोणास ठाऊक आहे का ? कळले तर उरलेला ऊर भरून घ्यायला किंवा बडवायला मदत होईल
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Tue, 04/22/2025 - 12:49

In reply to आदित्य ठाकरे जी Bombay Scottish School by मारवा

Permalink

तिकडेच

राज ठाकरे ह्यांची मुले बाँबे स्कॉटिशमधेच शिकली आहेत. आपली वस्ताद मीडिया/वर्तमानपत्रे अशी खाजगी नाहिती देत नाहीत पण ती अमराठी मीडियात येतेच. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/now-miscreants-target-thackeray-kids-school/articleshow/3030748.cms एकदा ह्यांच्या काकांना 'मराठीचा मुद्दा का घेतलात?" असा प्रश्न विचारल्यावर "तरूणांना सतत कोणता ना कोणता मुद्दा द्यावा लागतो. त्यांना सतत भडकावत ठेवणे गरजेचे असते" असे उत्तर दिले होते. १२ कोटी लोकांना त्यांची भाषा सांभाळण्यासाठी राजकीय पुढार्याची गरज लागते हेच आधी लज्जास्पद आहे. तसेच "तू माझी मात्रुभाषा का शिकत नाहीस?" असे विचारणे म्हणजे मातृभाषेचाच अपमान आहे असे वाटते. "मला अण्णा ऐवजी अण्णासाहेब का म्हणत नाहीस?" विचारण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com