Skip to main content

भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 03/04/2025 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
वक्फ सुधारणा विधेयक संसदेत सादर झाले. इतकी मोठी जमीन हिंदूंच्या देशाची मालमत्ता. ती काँग्रेस नामक महापापी पक्षाने वक्फ नामक संघटनेला अशीच देऊन टाकली. बदल्यात मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची बेजमी करुन घेतली. भाजप सत्तेत येताच वक्फवर उधळलेल्या जमीनी भाजप परत घेईल असे भाजपला मतदान करणार्‍या हिंदुत्ववादी मतदारांना वाटले. हिंदुत्ववादी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांच्या अपेक्षा फलद्रुप झाल्या का? वास्तविक ९५ च्या कायद्यात फारसे मोठे बदल केलेले नाहीत,याचा फायदा मुस्लिम गोरगरीब लोकांना होईल. नवीन सुधारणा कायद्याने वक्फ बोर्डकडे असलेली जमीन (साधारण ९ लाख कोटी + एकर) त्यांच्याच कडे राहील.त्यात कोणताही बदल होणार नाही. भाजपने हिंदूंसाठी हे केले. आख्ख्या देशाला लागलेल्या कॅन्सरला खिळखिळा करायची संधी भाजपने घालवली. आपल्याला काय वाटते याबद्दल?

वाचने 9481
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

In reply to by सुक्या

"आधी तुमच्या घरातली घाण साफ करा, गल्लीतली घाण साफ करा मग मला माझ्या घरातली घाण साफ करायला सांगा" असला तद्दन टुकार युक्तीवाद त्यापेक्षा भिकारचोट युक्तिवाद म्हणजे कचरा का असेना, आमचं घर भरलेलं दिसतंय आणि आमचं भरलेलं घर बघवत नाही यांना. आमच्या भरल्या घराचा मत्सर वाटतो यांना.

"ह्या आजाराला काय नाव द्यावे बरे ?" दुसर्या धर्माबद्दल कमालीचा द्वेष पसरवुन उत्तर भारतीय्/मराठी लोकांची डोकी भडकावणे आणि जमीनी काबीज करुन एका मर्जीतल्या उद्योगपतींच्या घशात घालणे... एका संघटनेने पसरवलेला हा गंभीर आजार आहे. ह्या आजाराचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. अन्यथा उद्या अब्दुल कलाम ह्यांचे पुतळे फोडायलाही हे लोक कमी करणार नाहीत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईडे, तुझ्यात 'इंडियन "माई"ल्ड सिंड्रोम'ची लक्षणे तीव्र होताहेत. तात्काळ उपचार सुरू कर. ह्या आजाराचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे.