✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?

उ
उपयोजक यांनी
गुरुवार, 04/03/2025 - 13:20  ·  लेख
लेख
वक्फ सुधारणा विधेयक संसदेत सादर झाले. इतकी मोठी जमीन हिंदूंच्या देशाची मालमत्ता. ती काँग्रेस नामक महापापी पक्षाने वक्फ नामक संघटनेला अशीच देऊन टाकली. बदल्यात मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची बेजमी करुन घेतली. भाजप सत्तेत येताच वक्फवर उधळलेल्या जमीनी भाजप परत घेईल असे भाजपला मतदान करणार्‍या हिंदुत्ववादी मतदारांना वाटले. हिंदुत्ववादी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांच्या अपेक्षा फलद्रुप झाल्या का? वास्तविक ९५ च्या कायद्यात फारसे मोठे बदल केलेले नाहीत,याचा फायदा मुस्लिम गोरगरीब लोकांना होईल. नवीन सुधारणा कायद्याने वक्फ बोर्डकडे असलेली जमीन (साधारण ९ लाख कोटी + एकर) त्यांच्याच कडे राहील.त्यात कोणताही बदल होणार नाही. भाजपने हिंदूंसाठी हे केले. आख्ख्या देशाला लागलेल्या कॅन्सरला खिळखिळा करायची संधी भाजपने घालवली. आपल्याला काय वाटते याबद्दल?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9388 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

भाजप हिंदुहितैषी पक्ष कधी होता का?

वामन देशमुख
गुरुवार, 04/03/2025 - 13:29 नवीन
भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?
भाजप हिंदुहितैषी पक्ष कधी होता का? -- याआधीही लिहीलेले पुन्हा लिहीतो - अकरा वर्षे झाली. हिंदुत्वाच्या नावाने, हिंदूंच्या मतावर बहुमत मिळवलेल्या सरकारने - १. हिंदूंच्या फायद्याचा एकतरी नवीन कायदा आणि त्याची अंमलबजावणी केली आहे का? २. हिंदूंचे नुकसान थांबेल असा एकतरी जुना कायदा रद्द केला आहे का? माझ्या माहितीनुसार आणि समजुतीनुसार एकही नाही. --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही. याउलट, पूर्वीच्या मुस्लिमहितवादी सरकारात, "या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे" हे ठणकावून सांगण्याची आणि तशी प्रत्यक्ष कृती करण्याची धमक होती. --- संघही फारसा वेगळा नाही. "डीएनए एकच आहे" असा गोंधळ उडवून दिला होता त्यांनी तर!
  • Log in or register to post comments

हम्म

उपयोजक
गुरुवार, 04/03/2025 - 18:26 नवीन
संघाचं हे गांधीछाप हिंदुत्त्व 'भोंदुत्व' वाटतंय खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

नवीन सुधारणा कायद्याने वक्फ

आग्या१९९०
गुरुवार, 04/03/2025 - 13:36 नवीन
नवीन सुधारणा कायद्याने वक्फ बोर्डकडे असलेली जमीन (साधारण ९ लाख कोटी + एकर) त्यांच्याच कडे राहील.त्यात कोणताही बदल होणार नाही. बदल नक्कीच होणार. वक्फ जमिनी आता मित्रांच्या उद्योगांना मिळणार. वक्फने दावा केला तरी वर्षानुवर्षे निकाल लागणार नाही. सरकार वक्फ बोर्डाला अधिक भ्रष्ट करेल. मुस्लिम समाजाला काडीचा फायदा होणार नाही.
  • Log in or register to post comments

टाळ्या. असे होणार असेल तर खूप

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 13:46 नवीन
टाळ्या. असे होणार असेल तर खूप आनंद वाटेल व त्यासाठी मोदी सरकार अभिनंदनास पात्र असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

खूप नाचा आता. तुम्हालाही

आग्या१९९०
गुरुवार, 04/03/2025 - 13:59 नवीन
खूप नाचा आता. तुम्हालाही काडीचा फायदा होणार नाही आणि सरकारलाही फूटी कवडी मिळणार नाही. आता हा भ्रष्ट पैसा नष्ट करण्याकरात परत देशाला वेठीस धरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जसा काही या विधेयकापूर्वी

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 14:13 नवीन
जसा काही या विधेयकापूर्वी आमच्या व तुमच्या घरात धनाचा झरा खळखळून वाहत होता आणि आता तो झरा आटणार. अदानीकडे जमीन जाऊ दे वा अंबानीकडे, वफ्फकडून जमीन सुटणार असेल तर यापेक्षा अधिक आनंद दुसरा तो काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

माझे तरी आर्थिक झरे कायम

आग्या१९९०
गुरुवार, 04/03/2025 - 14:39 नवीन
माझे तरी आर्थिक झरे कायम खळखळून वाहत होते आणि वाहत आहेत, तुमचे तुम्हालाच ठाऊक. ह्या विधेयकामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसणार हे नक्की. परंतू शेटने दिलेल्या अफूच्या गोळीमुळे तुम्हाला ते जाणवणार नाही. आणि तुम्हाला जाणवले तरी कुठल्या तोंडाने बोंब मारणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ह्या विधेयकामुळे तुम्हाला

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 14:51 नवीन
ह्या विधेयकामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसणार हे नक्की. काय सांगताय काय. असेल बोवा. माझ्यासारख्या हिंदुत्ववादी भाजप समर्थकाला आर्थिक फटका बसणार असेल तर तुमच्यासारख्या मुस्लिमप्रेमींनी आनंदाने नाचत शिरकुर्मा आणि खजूर वाटले पाहिजे. परंतू शेटने दिलेल्या अफूच्या गोळीमुळे तुम्हाला ते जाणवणार नाही. आणि तुम्हाला जाणवले तरी कुठल्या तोंडाने बोंब मारणार? ही अफूची गोळी इतकी प्रभावी आहे की हिंदूंना आर्थिक फटका बसणार असूनही मुस्लिमप्रेमीच रडत बसलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

रडत नाही हो, तुमच्या

आग्या१९९०
गुरुवार, 04/03/2025 - 15:08 नवीन
रडत नाही हो, तुमच्या बालबुद्धीला हसत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अजून हसा. आम्हाला बघायला

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 15:16 नवीन
अजून हसा. आम्हाला बघायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

फोडलेली हिंदू मंदिरे , लाटलेल्या जागा , जबरदस्तीने मुसलमान बनवणे

उपयोजक
गुरुवार, 04/03/2025 - 18:30 नवीन
ही शांतिप्रिय समाजाच्या पूर्वजांची सदाचारी कृत्ये बघता ही शिक्षा कमीच वाटते. शिवाय उद्योगांना जमीनी दिल्या तर काही लोकांना रोजगार तरी नक्की मिळेल. दहशतवादी कृत्यांसाठी त्या जमीनींचा वापर होणार नाही इतकं नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

निव्रुत्त

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/03/2025 - 15:19 नवीन
"While addressing the Lok Sabha over the Waqf Amendment Bill, ..Amit Shah clarified that the non-Muslim members will be included in the council and Waqf Board, but would only look after the administration of property donated by someone under Waqf Law." मर्जीतले निवृत्त होयबा आ ए एस अधिकारी नेमायचे आणि जी व्यक्ती/संस्था जमीन देणार आहे, त्याची माहिती राजकीय बॉसना द्यायची. हे कामाचे स्वरूप असणार आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/why-will-non-muslims-be-part-of-waqf-board-amit-shah-clarifies/articleshow/119910275.cms
  • Log in or register to post comments

उत्तम निर्णय. आवडला.

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 15:20 नवीन
उत्तम निर्णय. आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

जमीन

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/03/2025 - 15:27 नवीन
जमीन दान देणार्यानी मग ई.डी.ची नोटीस आल्यावर सत्ताधारी पक्षाला देणगी दिली की ते देशप्रेमी अन्यथा ते मुस्लिमधार्जिणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ह्या देणगीतून गुंड, भ्रष्ट,

आग्या१९९०
गुरुवार, 04/03/2025 - 16:10 नवीन
ह्या देणगीतून गुंड, भ्रष्ट, नेते विकत घ्यायचे आणि पक्ष मजबूत करायचा. आमचा पक्ष पूर्वीचा राहिला नाही असे म्हणत अंधभक्त बसतात विव्हळत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

आमचा देश , आमचा धर्म

उपयोजक
गुरुवार, 04/03/2025 - 18:32 नवीन
आणि आमच्याच जमिनी. कुणा परदेशातून आलरल्या धर्माच्या नव्हेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

आदिवासी हे इथले मूळचे नागरिक.

आग्या१९९०
गुरुवार, 04/03/2025 - 19:08 नवीन
आदिवासी हे इथले मूळचे नागरिक. त्यांच्या जमिनी शाबुत आहेत. अर्थात वक्फ ही सुरुवात आहे, पुढचा घाला आदिवासींच्या जमिनींवर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

आधी वफ्फच्या हातातली लाखो एकर

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 19:27 नवीन
आधी वफ्फच्या हातातली लाखो एकर जमिनीची व्यवस्था लागू दे. नंतर आदिवासींसाठी गळे काढा. दरम्यान अलिबागमध्ये १९० घरे होतील आणि मातोश्री-१०० होईलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

प्रथम आदिवासींचा गळा घोटला

आग्या१९९०
गुरुवार, 04/03/2025 - 20:16 नवीन
प्रथम आदिवासींचा गळा घोटला जाईल. वक्फ जमिनी बळकावण्याचा प्रयत्न अंगाशी येऊ शकतो, तसे आदिवासींच्या बाबतीत होणार नाही. अर्थात तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही. तेव्हडा तुमचा अभ्यासही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

वचने किं दरिद्रता ।

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 20:27 नवीन
वचने किं दरिद्रता ।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

बाकी अभ्यासाचं म्हणाल तर

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 20:30 नवीन
बाकी अभ्यासाचं म्हणाल तर नेपाळ्यांना बेड्या न घालता अमेरिकेने परत पाठविले या गुप्त बातमीतून तुमचा सखोल अभ्यास सर्वांना समजला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

खरड फळ्यावर तुमचा अभ्यास

आग्या१९९०
गुरुवार, 04/03/2025 - 20:51 नवीन
खरड फळ्यावर तुमचा अभ्यास दिसला. माझ्यामुळे तेथून पळ काढावा लागला तुम्हाला. इथूनही लवकरच पळाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी कोठूनही पळ काढत नसतो. मी

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 21:28 नवीन
मी कोठूनही पळ काढत नसतो. मी तुमच्या आणि काही इतरांच्या पुड्या उघडकीला आणून त्यांचघ थापेबाजी उघडकीस आणतो. तुमची नेपाळ्यांची थाप मीच उघडकीस आणली होती याचे सोयिस्कर विस्मरण झालेलं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

या आरोपामागे काही आधार की

टीपीके
गुरुवार, 04/03/2025 - 22:37 नवीन
या आरोपामागे काही आधार की फक्त नेहमीप्रमाणे फक्त हिंदू द्वेष?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

सर तुम्हाला मनुवादी द्वेष

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/03/2025 - 22:41 नवीन
सर तुम्हाला मनुवादी द्वेष म्हणायचंय का? कारण आदिवासी देखील हिंदू असतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

आदिवासी नव्हे वनवासी म्हणा,

आग्या१९९०
गुरुवार, 04/03/2025 - 22:48 नवीन
आदिवासी नव्हे वनवासी म्हणा, लगेच त्यांना कळेल अर्थ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खिक्क! काळी टोपी नी तसेच

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/03/2025 - 23:03 नवीन
खिक्क! काळी टोपी नी तसेच विचार! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

शब्दच्छल नंतर करा आधी

टीपीके
गुरुवार, 04/03/2025 - 22:50 नवीन
शब्दच्छल नंतर करा आधी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ते येणार नाही.

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 22:57 नवीन
ते येणार नाही. असत्यातुराणाम् ना भयम् न लज्जा ।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

शब्दच्छल नाही. ह्यातच उत्तर

आग्या१९९०
गुरुवार, 04/03/2025 - 23:04 नवीन
शब्दच्छल नाही. ह्यातच उत्तर दडले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

काहीही, जरा सविस्तर उत्तर

टीपीके
गुरुवार, 04/03/2025 - 23:09 नवीन
काहीही, जरा सविस्तर उत्तर द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

वेड पांघरूण पेडगावला जाऊ नका.

आग्या१९९०
गुरुवार, 04/03/2025 - 23:18 नवीन
वेड पांघरूण पेडगावला जाऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

अहो खरंच माहीत नाही. जे माहीत

टीपीके
Fri, 04/04/2025 - 00:15 नवीन
अहो खरंच माहीत नाही. जे माहीत नाही ते महती आहे हे दाखवायला मी पुढारी नाही. एकूण ही नक्षलवाद्यांची नवीन लोणकढी थाप दिसते आहे, म्हणून तुम्ही काहीच सांगू शकत नाहीये. द्वेष द्वेष आणि द्वेष या द्वेषापायी घर संसार उघडे पडतात, राज्य / राष्ट्र नेस्तनाबूत होतात, इतकेच काय समाज आणि संस्कृतीही लयाला जाऊ शकते. अर्थात तुम्ही यशस्वी होउ शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

अहो खरंच माहीत नाही.

आग्या१९९०
Fri, 04/04/2025 - 00:36 नवीन
अहो खरंच माहीत नाही. ओके. The Forest Rights Act (FRA), 2006 ला सौम्य करण्याचे प्रयत्न कोण आणि कधीपासून आणि का करत आहेt ह्याचा अभ्यास करा. आदिवासी ते वनवासी मागील षडयंत्र काय आहे हे समजून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

या बद्दल एकही बातमी, लेख

टीपीके
Fri, 04/04/2025 - 08:29 नवीन
या बद्दल एकही बातमी, लेख वाचल्याचे स्मरत नाही. विरोधी पक्षही आवाज उठवताना दिसत नाही. पडद्यामागे काही घडतंय का? नक्की काय बदल होणार आहेत? त्या मुळे कोणाचा कोणता फायदा आणि कोणाचे कोणते नुकसान होणार आहे? तुम्ही फार सविस्तर नाही पण संक्षिप्त मधे सांगितलं तरी चालेल. माहितीचा स्त्रोत काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

उत्तर नसल्यावर देणार कसे?

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 23:30 नवीन
उत्तर नसल्यावर देणार कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

<मातोश्री...>

रामचंद्र
गुरुवार, 04/03/2025 - 22:50 नवीन
<मातोश्री...> या बाबतीत मुख्यमंत्र्यांची एरवीची कार्यक्षमता अजून तरी दिसली नाही. काहीतरी दीर्घसूत्री कार्यक्रम दिसतोय. की छुपी हातमिळवणी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

छुपी कसली, उघड हातमिळवणी आहे.

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/03/2025 - 22:56 नवीन
छुपी कसली, उघड हातमिळवणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

या बद्दल एकही बातमी, लेख

आग्या१९९०
Fri, 04/04/2025 - 08:45 नवीन
या बद्दल एकही बातमी, लेख वाचल्याचे स्मरत नाही त्याला मी काहीही करू शकत नाही. सध्या विरोधकांच्या बातम्या माध्यमांनी दाखवणे जवळजवळ बंद केले आहेत. शोधले तर सापडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

सध्या विरोधकांच्या बातम्या

वामन देशमुख
Fri, 04/04/2025 - 09:57 नवीन
सध्या विरोधकांच्या बातम्या माध्यमांनी दाखवणे जवळजवळ बंद केले आहेत. शोधले तर सापडेल.
आत्ताच मीही संबंधित बातम्या शोधून काढायचा प्रयत्न केला पण काही सापडले नाही. तुमच्याकडे काही sources असतील तर ते पाहायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/03/2025 - 16:37 नवीन
भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का? अहो, आज भाजीपाला ताजा राहिला नाही, माणसात माणुसकी राहिली नाही, जमिनीत पोत राहिली नाही, पाण्यात गोडवा राहिला नाही, शब्दात धार राहिली नाही, राजकारणात निष्ठा राहिली नाही, भाषणात खरेपना राहिला नाही, सत्तेत पवार राहिले नाहीत पुण्यात संस्कृती राहिली नाही, मिपावर डूआयड्या राहिल्या नाहीत! आणी तुम्ही भाजपचे घेऊन बसलात? ख्या ख्या! ख्या ख्या!
  • Log in or register to post comments

भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/03/2025 - 17:34 नवीन
भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का? कधी होता? Ans to this questions like that भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का? -ताजमहाल मध्ये पुन्हा नमाज पठनाला परवानगी कुणी दिली? - कंदाहार ला जाऊन अतिरेकी कुणी सोडले? - ⁠लाख सैन्य मेले तरीही चालतील पण सीमा ओलांडायची नाही, असा ताठर बना ठेवून कारगिलवेळी सैन्याला सीमा कुणी ओलांडू दिली नाही? - ⁠कट्टर हिंदुत्ववादी पक्ष शिवसेना फोडून संपवायचा प्रयत्न कुणी केला? - ⁠ वक्फ बोर्डाला लोकसभा निवडणुकीनंतर १० कोटी देऊन दौलतजादा कुणी केली? - ⁠कितीही सैनिक मेले तरीही “कडी निंदा” म्हणून थंड पडणारे नेते कोणत्या पक्षात आहेत? - हिंदूंच्या अपूर्ण राममंदिराच्या उद्घाटनाचा इवेंट करून मते खायचं प्रयत्न कुणी केला? - काश्मिरी ब्राह्मणांचा प्रश्न सोडवला का? - सौगात ए मोदी किट वाटून कूरवाळण्याचा प्रयत्न कुणी केला? ह्या प्रश्नांचे उत्तरे मिळवायचा प्रयत्न करा, हिंदुत्वाशी ० संबंध असलेल्या भाजप सारख्या पक्षांना हिंदूहीतैशी म्हणणे थांबवा!
  • Log in or register to post comments

मग द्या मुस्लिम लीगला मते

चंद्रसूर्यकुमार
Fri, 04/04/2025 - 10:53 नवीन
भाजप सत्तेत येताच वक्फवर उधळलेल्या जमीनी भाजप परत घेईल असे भाजपला मतदान करणार्‍या हिंदुत्ववादी मतदारांना वाटले. हिंदुत्ववादी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांच्या अपेक्षा फलद्रुप झाल्या का?
नाही झाली असे वाटत आहे का? मग पुढच्या वेळेस मतदान करताना पुढील पैकी एका पर्यायाला मत द्या- Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. मोदी सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात पुरेसा बदल केला नाही म्हणून हिंदुत्ववादी नाराज झाले आणि मोदींना धडा शिकवायचा या उद्देशाने वक्फ बोर्डाला कोणाच्याही जमिनी आणि घरे हडप करायची अमर्याद ताकद देणार्‍यांनाच मते देऊन परत आले. आपल्या लोकांकडे सारासार विचार करायची कुवत का नसते समजत नाही. मोदींना अजिबात सोने लागलेले नाही. जर मोदी अपेक्षेइतके काम करत नसतील तर ते काम करायची अधिक शक्यता असेल त्याला मत द्यायचे सोडून मोदींपेक्षा हजार पटींनी वाईट पर्यायांना मते देऊन आपल्याच पायावर धोंडा पाडून का घेतात समजत नाही. पर्याय शोधायचा असेल तर आता उपलब्ध असलेल्यांपेक्षा तो पर्याय अधिक चांगला हवा- वाईट नाही एवढी अक्कल आपल्या लोकांना नसते? मागच्या वर्षी आपल्या लोकांनी तोच गाढवपणा केला. ४ जूनला थोडक्यात बचावलो. जर ओरिसा, आंध्र प्रदेश अशा काही राज्यांनी पण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश अशा राज्यातील मतदारांप्रमाणे गाढवपणा केला असता तर काय झाले असते त्याचा विचार करूनही जीवाचा थरकाप होतो. अगदी आताआतापर्यंत उबाठाचे लोक 'आम्ही १९९२-९३ मध्ये मुंबई वाचवली' असा दावा करत असतात. वाचवली असा दावा असेल तर तो किती खराखोटा हा पुढचा प्रश्न झाला पण वाचवली ती कोणापासून वाचवली? त्याच मतदारांनी २०२४ मध्ये केवळ आणि केवळ मोदींच्या विरोधात म्हणून उबाठाला एकगठ्ठा मते दिली- आणि आपले बिनडोक मतदार- मोदींनी हिंदूंसाठी पाहिजे तितके केले नाही म्हणून, किंवा स्थानिक उमेदवार आवडला नाही म्हणून किंवा अजित पवार बरोबर आलेले आवडले नाही म्हणून किंवा अन्य काही कारणांनी त्याच हिरव्यांबरोबर मत देऊन परत आले. एवढी साधी गोष्ट आपल्या लोकांना का कळत नाही हे न उलगडलेले कोडे आहे. असो.
  • Log in or register to post comments

+1

टीपीके
Fri, 04/04/2025 - 11:18 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

"मरतुकड्या सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे"

वामन देशमुख
Fri, 04/04/2025 - 11:52 नवीन
... एवढी साधी गोष्ट आपल्या लोकांना का कळत नाही हे न उलगडलेले कोडे आहे.
साधी गोष्ट आहे. मोदी-संघ-भाजप यांनी कितीही गुंढण आपटून घेतले तरी त्यांना हिंदवेतर मते मिळणार नाहीतच. त्याउलट, सबका साथ सबका विकास, एकच डीएनए, एक हाथ में कुराण एक हाथ में कम्पूटर, वक्फ कायद्यात केवळ धूळफेक करण्याचे बदल, आम्ही काही बाबरी पाडली नाही, कोण पाडली माहित नाही अशी डांगू भूमिका, नुपूर शर्मा प्रकरणात जीव गमावलेले असंख्य हिंदू, पाठ्यपुस्तकात अजूनही होत असलेला मोघलांचा गौरव, श्रीमंत हिंदू मंदिरे अजूनही सरकारी ताब्यात, शिक्षण हक्क कायद्याखाली होणारी हिंदू संस्थांची गळचेपी, सिनेमासारख्या माध्यमांतून वाढत्या प्रमाणात होत असलेली हिंदू श्रद्धेची विटंबना... या सगळ्यामुळे हिंदुंची मते मात्र दुरावली आहेत. "मरतुकड्या सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे" अशी हिंदूंची मनोधारणा झालेली आहे आणि २०२४ च्या निवडणुकीत ती काही अंशी प्रतिबिंबित झालेली आहे. ज्याप्रमाणे केजरीवालांनी मध्यमवर्गीयांना भ्रष्टाचारमुक्त राजकारणाचे खोटे स्वप्न दाखवून स्वतः मात्र त्यातच अभूतपूर्व कामगिरी केली त्याप्रमाणे संघप्रणीत मोदींनी हिंदूंना "अच्छे दिन आने वाले हैं" असे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात मात्र "सौगात-ए-मोदी" दिली आहे. --- मोदी व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे पूर्ण करत नाहीत म्हणून हिंदूंनी ममता-अखिलेश यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला असे नव्हे. मोदींनीच त्यांनी स्वतः दिलेली वचने, दाखविलेली स्वप्ने, ठेवलेली उद्दिष्टे पूर्ण करावीत ही हिंदूंची अपेक्षा आहे. मतदात्या हिंदूंना मुर्खात काढून काय साध्य होणार आहे? --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही. याउलट, पूर्वीच्या मुस्लिमहितवादी सरकारात, "या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे" हे ठणकावून सांगण्याची आणि तशी प्रत्यक्ष कृती करण्याची धमक होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

?

चंद्रसूर्यकुमार
Fri, 04/04/2025 - 12:02 नवीन
मतदात्या हिंदूंना मुर्खात काढून काय साध्य होणार आहे?
समजा मोदी मतदारांना मूर्खात काढत असतील तर त्यांना शिक्षा करायला म्हणून हे मतदार ज्यांना मत देतात ते दहापटींनी अधिक मूर्खात काढतात एवढेही समजू नये? या बाबतीत हिरव्यांना मानले. १९९८ पासून सहा वेळा बंगालमध्ये अधीररंजन चौधरी लोकसभेवर निवडून गेले होते. पण २०२४ मध्ये युसूफ पठाण हा उमेदवार तृणमूलने दिल्यावर हिरव्यांनी अधीररंजन चौधरींना दिले सोडून आणि युसूफ पठाणला भरभरून मते दिली. अधीररंजन चौधरी हिरव्यांसाठी जे काही करत होते ते त्यांची अपेक्षा पूर्ण करणारे असेल असे वाटत नाही. मात्र चौधरी आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत म्हणून ते मतदार त्याच्याविरूध्द बाजूला म्हणजे भाजपला मत द्यालला नाही लागले. आपल्याला अधिक चांगला उमेदवार मिळायची वाट बघत राहिले आणि तो मिळाल्यावर दिले चौधरींना ढकलून. वाजपेयींच्या काळात जे प्रकार चालू होते त्यापेक्षा नक्कीच परिस्थिती अधिक चांगली आहे असे म्हणायला जागा आहे. २००४ मध्ये वाजपेयींनी हिंदूंसाठी पुरेसे केले नाही म्हणून आपल्याच लोकांनी युपीए सरकार नावाचा कलंक दहा वर्षे देशावर आणला. तो अनुभव पुरेसा झाला नाही का? वाजपेयींनंतर अधिक कडक असे मोदी आले तसे भविष्यात आणखी कोणी येईलही. तसे झाल्यास देऊ मोदींना ढकलून आणि देऊ त्या दुसर्‍या नेत्याला भरभरून मते. पण मोदी पाहिजे तितके कडक नाहीत म्हणून उध्दव ठाकरे, रागा असल्या दुर्गंधीला मत द्यायचा विचारही मी तरी करणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

हेही लिहीलं आहे -

वामन देशमुख
Fri, 04/04/2025 - 12:09 नवीन
मोदी व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे पूर्ण करत नाहीत म्हणून हिंदूंनी ममता-अखिलेश यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला असे नव्हे. मोदींनीच त्यांनी स्वतः दिलेली वचने, दाखविलेली स्वप्ने, ठेवलेली उद्दिष्टे पूर्ण करावीत ही हिंदूंची अपेक्षा आहे. मतदात्या हिंदूंना मुर्खात काढून काय साध्य होणार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

आम्ही १९९२-९३ मध्ये मुंबई

श्रीगुरुजी
Fri, 04/04/2025 - 13:01 नवीन
आम्ही १९९२-९३ मध्ये मुंबई वाचवली' असा दावा करत असतात. वाचवली असा दावा असेल तर तो किती खराखोटा हा पुढचा प्रश्न झाला पण वाचवली ती कोणापासून वाचवली? सगळ्या थापा. बाबरी पाडताना, त्यापूर्वी कारसेवा करताना, मुंबई दंगलीत हे सर्व घरात लपले होते व मुंबई वाचवली ती श्रीकांत बापटांसारख्या शूर पोलिस आयुक्ताने, पोलिसांनी आणि लष्कराने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी

वामन देशमुख
Fri, 04/04/2025 - 12:07 नवीन
भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कदाचीत या माहीतीचा उपयोग होईल - महामार्ग ४४, महामार्ग ६५, महामारी ४८ यांवर मी अनेकदा प्रवास करतो. मागच्या दहा-अकरा वर्षांत जवळजवळ प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी, वळणावर, उंचावर, वगैरे रस्त्याला खेटून नव्या-कोऱ्या मशिदी उभ्या राहिल्या आहेत. शक्तीपीठ महामार्गावर, अजून पुरेसा बांधूनही झालेला नाही तर अनेक मशिदीची बांधकामे सुरु झाली आहेत. हे सौगात ए मोदी आहे, नाही का? (सिद्धीविनायकसारखी प्रचंड संपत्ती असलेली मंदिरे मात्र अजूनही सेक्युलर सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत.)
  • Log in or register to post comments

वामन देशमुख

उपयोजक
Fri, 04/04/2025 - 12:26 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा