बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा
====================
मंडळी,
नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
या खेपेला युयुत्सुनेट चुकलं की बरोबर ठरलं हे ठरवणं मला अवघड जातंय. कारण मला ज्या पातळीपासून बाजार उलट फिरेल असं वाटत होते, ती पातळी झुगारून २३८६९ ला जाऊन उलट फिरलं (हा उलट फिरण्याचा भाग खरा ठरला कारण युयुत्सुनेटला तेव्हढेच म्ह० पुढची दिशा ओळखायला शिकवले आहे). पण रेंजच्या बाबतीत हुलकावणी दिली. आठवडा अखेरीस बंद होताना आठवड्याच्या ओपन जवळच बाजार बंद झाला आहे.
माझ्यामते ही त्रुटी "क्षम्य" आहे कारण पातळीचा अंदाज माझा होता, युयुत्सुनेटचा नव्हता. पण इतरांनी ही त्रुटी माफ करावी असा माझा आग्रह नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आधार आणि विरोध पातळ्यांजवळ कोणत्याही मॉडेलचा गोंधळ उडू शकतो. माणसे पण महत्त्वाच्या टप्प्याजवळ आली की पुढची योग्य दिशा घेताना गडबडू शकतात.
आकृती -१ निफ्टीच्या साप्ताहिक आलेखामध्ये निळ्या वर्तूळातील मेणबत्तीची लांब वात बाजार माघारी फिरल्यावर शिक्का मोर्तब करते.
आकृती -२ बाजार वर/खाली जायची शक्यता ५%/९५%
आकृती -३ सोने वर/खाली जायची शक्यता ३०%/७०%
आकृती -४ युयुत्सुनेट म्हणते बाजार खाली येईल.
मागिल भाकीताचा दुवा - https://www.misalpav.com/node/52807
वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.

वाचने
1744
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मंडळी,
आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक
In reply to मंडळी, by युयुत्सु
कामाचे दिवस
पण ते जाऊ दे... समजा यामूळे
In reply to कामाचे दिवस by वामन देशमुख
<तुमच्या prediction (अंदाज?)
आज शेवटचा दिवस आहे. बाजार
In reply to <तुमच्या prediction (अंदाज?) by युयुत्सु
प्रतिसादाबद्दल आभार आणि
In reply to आज शेवटचा दिवस आहे. बाजार by वामन देशमुख
अहो देशमुखशेठ ...
In reply to आज शेवटचा दिवस आहे. बाजार by वामन देशमुख