जॉन अब्राहम (अंतिम भाग ६)
जॉन अब्राहम (भाग १) >>> जॉन अब्राहम (भाग २) >>> जॉन अब्राहम (भाग ३) >>> जॉन अब्राहम (भाग ४) >>> जॉन अब्राहम (भाग ५)
शेवटी २६ एप्रिलला व्हर्जिन्यातील एका शेतघरात तपास अधिकार्यांना बूथ व हेरॉल्ड सापडले.
ते एका गवताच्या गंजीत लपले असल्याचे लक्षात आल्यानंतर बाहेर येऊन पोलिसांच्या स्वाधीन व्हावे असे वारंवार सांगूनही ते बाहेर येण्यास तयार नव्हते. शेवटी गवताची गंजी पेटवून देण्याचा इशारा दिल्यानंतर हेरॉल्ड बाहेर येऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला. परंतु बूथ बाहेर येण्यास तयार नव्हता. नंतर बूथ गोळी लागून मेल्याचे दिसले. त्याने स्वतःला गोळी मारून घेतली की पोलिसांच्या गोळीने तो मेला हे समजले नाही. प्परंतु गोळीने मेलेला बूथ नसून कोणीतरी दुसराच होता अशी काही काळ अफवा पसरली होती . . .
नंतर कटात सहभागी असलेल्या ८ आरोपींवर लष्करी न्यायालयात खटला चालविला गेला. एकूण ३६६ साक्षीदारांची साक्ष झाली. ३० जून १८६५ या दिवशी खटल्याचा निकाल लागून सर्वांना दोषी जाहीर करण्यात आले. हेरॉल्ड, पॉवेल, आट्झेरॉट आणि मेरी सरॅट (ही महिला वॉशिंग्टन डी सी मध्ये एक खाणावळ चालवित होती ज्यात कायम अनेक भूमिगत सरकारविरोधी जेवायला जात होते) यांना दोषी जाहीर करून मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी ७ जुलै १८६५ या दिवशी करण्यात आली. याव्यतिरिक्त डॉ. मड, मायकेल ओ'लॉकलन आणि सॅम्युअल अर्नॉऑल्ड यांना जन्मठेपेची व एडमन स्पँगलरला ६ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली. कटातील अजून एक आरोपी, जॉन सरॅट देश सोडून पळाला होता. त्याला नंतर पकडून खटला चालविला गेला, पण तो निर्दोष सुटला.
================================================================================
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
================================================================================
वॉरन आयोगाने १० महिने संपूर्ण प्रकरणाचा तपास केला, अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदरांशी बोलले, केनेडींच्या शवविच्छेदनाचा अहवाल तपासला, गोळी झाडतानाचे चित्रीकरण अनेक वेळा बघितले, सर्व उपलब्ध पुरावे तपासले आणि अनेक तज्ज्ञांशी चर्चा करून शेवटी निष्कर्ष काढला की ओस्वाल्ड हा एकटाच या खुनात सामील होता व त्याने एकट्यानेच केनेडींच्या हत्येची पूर्ण योजना आखली होती.
केनेडींच्या हत्येसंदर्भात काही अंदाज -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येबाबत अनेक सिद्धांत समोर आले. मात्र, त्यांची हत्या का करण्यात आली याबाबत अद्याप काहीच माहिती समोल आली नाहीय. त्यामुळं त्याच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पहिला अंदाज - अमेरिकन एजन्सी एफबीआयनं केनेडी यांच्या मारेकऱ्याचा शोध घेतला तेव्हा त्यांना एक महिला छायाचित्रकार दिसली. हत्येच्या वेळी ती महिला छायाचित्रे काढत होती. या महिलेचं नाव द बाबुष्का लेडी असे होते. केनेडींची हत्या याच महिलेने आपल्या कॅमेर्यात पिस्तुल लपवून आणून केल्याची चर्चा होती. परंतु या महिलेची कधीच ओळख पटली नाही. तसंच तिच्या विरोधात कोणताही पुरावा मिळाला नाही. यानंतर केनेडी यांची हत्या कोणी केली, ती महिला त्यांच्यासोबत होती का अशी चर्चा सुरू झाली.
दुसरा अंदाज - या हत्येच्या वेळी अमेरिका तसंच रशियामध्ये शीतयुद्ध सुरू होतं. अवघ्या वर्षभरापूर्वी रशियाने अमेरिकेच्या शेजारचा देश क्युबामध्ये अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रे तैनात केली होती. जगात तिसरं महायुद्ध पेटणार असे वाटायला लागले होते. परंतु केनेडींनी रशियाशी करार करून हे संभाव्य युद्ध टाळले. त्यामुळं केवळ अमेरिकेतच नव्हे तर रशियातही केनेडींची प्रशंसा झाली. त्यामुळं चिडून रशियाचं नेते ख्रुश्चेव्ह यांनी केजीबी या गुप्तचर संस्थेच्या सहकार्यानं केनेडी यांची हत्या घडवून आणल्याचे सांगण्यात आले. मात्र या आरोपाबाबतही ठोस पुरावे मिळू शकले नाहीत.
तिसरा अंदाज - अमेरिकन माफियांनी क्युबामध्ये खूप पैसा गुंतवला होता असे सांगण्यात येत होते. अमेरिकेच्या क्युबासोबतच्या संबंधात आलेल्या कटुतेमुळं त्यांची मोठी हानी झाली व त्यामुळं अमेरिका तसेच क्युबाच्या माफियांनी मिळून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हत्या केली असा अजून एक अंदाज व्यक्ते करण्यात आला. मात्र या प्रकरणातही अमेरिकन एजन्सीकडून तपासात फारशी मदत मिळाली नाही.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
जॉन केनेडी व अब्राहम लिंकन हे दोघेही पूर्ण वेगळ्या आव्हानात्मक काळात राष्ट्राध्यक्ष झाले होते. केनेडींच्या तुलनेत लिंकनचा काळ खूपच कठीण होता. केनेडींच्या काळात रशियाचा धोका होता पण तो बाहेरून होता, पण लिंकनच्या काळात देश तुटायला आला होता व आपल्याच नागरिकांशी युद्ध करून लिंकननी देश एकसंध ठेवला. दुर्दैवाने काही प्रभावशाली व्यक्तींचे हितसंबंध दुखविले गेल्याने पूर्वनियोजित कटानुसार त्यांची हत्या करण्यात आली. परंतु या दोन्ही हत्याकांडातून अमेरिका सावरली व पुढे जात राहिली.
एकंदरीत अब्राहम लिंकन व जॉन केनेडी या दोघांचीही हत्या पूर्वनियोजित कटानुसार करण्यात आली. अनेक बडी धेंडे यामागे होती असा शेवटपर्यंत संशय होता, परंतु ते सिद्ध करणारे सबळ पुरावे मिळविण्यात तपास संस्थांना अपयश आले. प्राथमिक तपासानंतर जे मारेकरी व साथीदार सापडले तेवढेच पकडले गेले व त्यांना शिक्षा झाली. परंतु या कटामागील मुख्य सूत्रधार शेवटपर्यंत नानानिराळे राहिले असे सर्वसामान्य जनतेला वाटत राहिले. या हत्या या केवळ तात्कालिक संताप यातून एकट्या दुकट्या माथेफिरूने केलेले कृत्य नसून त्यामागे अनेक प्रभावी व्यक्ती व दीर्घकालीन योजना होती यावर बहुसंख्य जनतेचा विश्वास होता. ज्याप्रमाणे धाकटे मर्टिन ल्युथर किंग यांच्या हत्येसाठी पकडलेला एक बळीचा बकरा होता व प्रत्यक्षात त्यामागे वेगळीच प्रभावी माणसे होती व ती माणसे कधीही पकडली गेली नाहीत यावर बहुसंख्य अमेरिकनांचा विश्वास होता, त्याप्रमाणे लिंकन केनेडी यांच्या हत्येसाठी केवळ बळीचे बकरे पकडले व मुख्य सूत्रधार सुरक्षित राहिले असे बहुसंख्य अमेरिकनांना अनेक वर्षे वाटत होते.
अमेरिकेच्या इतिहासातील जवळ्पास १०० वर्षांच्या अंतराने घडलेली व अत्यंत गाजलेली ही दोन प्रकरणे लेखमालिका स्वरूपात मांडण्याचा रयत्न केला. यामागे माझे कोणतेही संशोधन नाही. आंतरजाल , काही लेख व काही पुस्तके वाचून मी केवळ सर्व माहिती एकत्रित स्वरूपात समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
(इति लेखनसीमा)
__________________________________________________________________________________________________________________
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
एक कॉन्स्पिरसी थिअरी
असे बरेच अंदाज व्यक्त झाले.
छान झाली लेखमाला
धन्यवाद! लिंकनच्या हत्येची
छान लेखमाला! केनेडी आणी
दोघेही वर्तमान अध्यक्ष होते व
धन्यवाद!
काहीकाही साम्ये
आंतरजालावर खालील साम्य आढळले.
ट्रंप प्रशासनाने केनेडी हत्या
माहितीपूर्ण लेखमालेबद्दल
माहितीपूर्ण लेखमाला आणि
सर्व वाचकांना व प्रतिसादकांना