✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दिल्ली विधानसभा निवडणूक

व
विवेकपटाईत यांनी
Wed, 01/22/2025 - 12:04  ·  लेख
लेख
दिल्लीत येत्या पाच फेब्रुवारीला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार. दिल्लीत भाजप आप आणि कांग्रेस मध्ये तिरंगी लढत आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे ठरविण्यासाठी तिन्ही पक्षांची निवडानूकीसाठी किती तैयारी आहे हे पाहण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. कांग्रेस दिल्लीत पंधरावर्ष सत्तेत होती. अल्पसंख्यक, दलित आणि पूर्वांचली हा कांग्रेसचा वोट बँक होता. आज ही दिल्लीत 8-10 टक्के निष्ठावंत मतदाता कांग्रेसपाशी आहे. इतर राज्यांप्रमाणे दिल्लीत ही अल्पसंख्यक समुदाय भाजपा विरोधातात असलेल्या प्रमुख पक्षाला एक गठ्ठा मतदान करतात. जर दिल्लीत अल्पसंख्यक मतदार तेलंगना प्रमाणे कांग्रेसकडे वळविण्यात कांग्रेस नेतृत्व यशस्वी झाले असते तर आप पार्टीचे अस्तित्व बर्‍यापैकी संपविण्यास कांग्रेस यशस्वी झाली असती. पण तसा काही प्रयत्न काँग्रेसने गेल्या सहा महिन्यात केला नाही. या वेळी ही जास्तीस्जास्त 5 ते 10 जागांवर कांग्रेस लढताना दिसेल. बाकी जागांवर भाजपाची मते कापण्याचा प्रयत्न करेल. बहुतेक यामुळेच माननीय केजरीवाल एका भाषणात म्हणाले दिल्ली निवडणूकीच्या काळात ते माननीय राहुल गांधींची निंदा करणार नाही. आप पार्टीला दिल्लीत अल्पसंख्यक समुदायाचे समर्थन आहे. दुसर्‍या शब्दांत मतदान टक्का कितीही असला तरी मतदानपूर्वीच +10 मतांची लीड त्यांच्या पाशी आहे. दिल्लीत डीटीसी बसेस मध्ये महिलाना तिकीट घ्यायची गरज नाही. रोज किमान दहा ते पंधरा लाख महिला डीटीसी बसेस मधून प्रवास करतात. या शिवाय वीज, पाणी अनेक फ्री बी आहेत. एका वर एक बाटली फ्रीचा लाभ आप पक्षाला मिळणार. या शिवाय निवडणूकीची तैयारी कशी केली जाते हे आप पार्टी कडून शिकण्यासारखे आहे. विधानसभा निवडणूकीसाठी डिसेंबर महिन्यात आपने आपले उमेदवार जाहिर करून टाकले होते. पण अधिकान्श जागांवर तीन महीने आधीच अनौपचारिक रीतीने उमेदवार निश्चित झाले होते. त्यांनी प्रचार ही सुरू केला, विशेषकरून ज्या भागांत लोकसभेत आपला कमी मते मिळाली होती. निवडणूकीच्या घोषणे पूर्वी केलेली सेवा आचार संहितेत येत नाही. याचा लाभ आप पक्षाने पूर्णपणे घेतला. त्यात काहीही गैर नाही. बाकी आमच्या उत्तम नगर भागातील निवर्तमान विधायक बल्यान साहेब पुण्यकर्म करून तिहाड तीर्थ क्षेत्री विश्राम करत असल्याने त्यांच्या श्रीमतीला तिकीट मिळाले आहे आणि तिचा प्रचार जोरदार सुरू आहे. भाजप लोकसभा निवडणूकीत तिसर्‍यांदा विजयी झाली आणि बहुतेक तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूकीत मार खाणार. सध्या तरी तीच परिस्थिति दिसत आहे. लोकसभा निवडणूकी नंतर एक भाजप कार्यकर्ता मला म्हणाला होता. जर भाजपने मुख्यमंत्री चेहरा देऊन दोन महीने आधी उमेदवार घोषित केले तर भाजप विधानसभा निवडणूक जिंकू शकते. पक्षाचा उमेदवारला विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक भागातील प्रधानांना, छूटभैये नेत्यांना पक्षाशी पुन्हा जोडायचे असेल तर एवढा वेळ पाहिजे. पण भाजप ने मुख्यमंत्रीचा चेहरा ही दिला नाही आणि नॉमिनेशन सुरू झाले तरीही भाजपचे सर्व उमेदवार निश्चित झाले नव्हते. अनेकांना वाटते भाजपच्या शीर्ष नेतृत्वाची इच्छा दिल्ली जिंकण्याची नाही. बहुतेक विधानसभेत आप आणि लोकसभेत भाजपा हे समीकरण भाजप शीर्ष नेतृत्वाला जास्त योग्य वाटते. भाजप विधानसभा जिंकली तर कांग्रेस दिल्लीत पुन्हा प्रबळ होईल. बहुतेक भाजपला ते नको. भाजप चुकून विधानसभा जिंकली तर त्याचे श्रेय फक्त दिल्लीच्या जनतेला जाईल. भाजप नेतृत्वाला नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
12389 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

हा हा हा

प्रसाद गोडबोले
Mon, 02/10/2025 - 19:08 नवीन
हा हा हा मी अशा धाग्यांवर केवळ बिरुटे सरांच्या प्रतिक्रिया पहायाला येतो ! मिपाकर असल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते ! २०२९ पर्यंत अशीच मजा मजा राहणार मिपावर ह्या विचाराने अगदी गुदगुल्या होतात ! =))))
  • Log in or register to post comments

तुम्ही भुजबळांना विसरलात.

सुबोध खरे
Tue, 02/11/2025 - 19:32 नवीन
तुम्ही भुजबळांना विसरलात. त्यांच्या इतके मनोरंजक प्रतिसाद तर बिरुटे सरांचे सुद्धा नसतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मोदी विरोधकांची खरंच कीव येते

रात्रीचे चांदणे
Tue, 02/11/2025 - 20:14 नवीन
मोदी विरोधकांची खरंच कीव येते. २०१४ पासून एक गोष्ट मनापासून घडत नाही. मध्यंतरी उभाटा सरकार उन्हाळ्यातील थंड वाऱ्याच्या झुळके सारखे आले आणि तसच निघूनही गेले. मग २०२४ ला मोदी सरकार जिंकूनही हरलय अस स्वत ची समजूत करून घेऊन खोटा का असेना पण आनंद व्यक्त करता येत होता. पण महाराष्ट्र निवडणुकीने तो आनंदही हिसकावून घेतला. केजरी कसे का असेना पण मोदी विरोधक आहेत ते काहीतरी करतील वाटत असतानाच ते पाचोळ्या सारखे उडून गेले. त्यात त्यांनी EVM ला दोषही दिला नाही. आत्ता शेवटची आशा म्हणजे बंगालची वाघीण. पण त्यालाही भरपूर वेळ आहे.
  • Log in or register to post comments

चंदिगड महापौर निवडणुकीत

आग्या१९९०
Tue, 02/11/2025 - 21:30 नवीन
चंदिगड महापौर निवडणुकीत बीजेपीने दाखवून दिले ,मतदान कोणत्याही पद्धतीने घ्या, आम्ही त्यात फेरफार करू शकतो. EVM हॅक करून झाले , खोटे मतदार वाढवून झाले, मतदार यादीतून नावे कमी करून झाले. इतकेही करून निवडून आले नाही तर ED चा धाक दाखवून पूर्ण पक्ष फोडून झाले. आता तर कुठल्याच निवडणुकीवर विश्वास राहीला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

आता तर कुठल्याच निवडणुकीवर

अमरेंद्र बाहुबली
Tue, 02/11/2025 - 21:32 नवीन
आता तर कुठल्याच निवडणुकीवर विश्वास राहीला नाही. जो पर्यंत भारतात पुन्हा प्रामाणिक निवडणूक यंत्रणा येत नाही तो पर्यंत हीच लोक सत्तेत राहणार! आपण फक्त लोकशाहीला श्रद्धांजली वाहू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Wed, 02/12/2025 - 06:34 नवीन
आपण कोर्टात जाऊ शकता. इथे बोंबाबोंब करून काय फायदा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कालच उठा म्हणाले की दिल्लीत व

श्रीगुरुजी
Tue, 02/11/2025 - 21:34 नवीन
कालच उठा म्हणाले की दिल्लीत व महाराष्ट्रात भाजप जिंकला हे मी मानतच नाही. शिक्षण, आरोग्य अश्या क्षेत्रात प्रचंड काम केलेले केजरीवाल हरतीलच कसे? रूग्णवाहिका, रक्तदान अशी अनेक लोकोपयोगी कामे केलेली शिवसेना हरेलच कशी? विधानसभेचा निकाल हा खोटा पराभव आहे. काहीतरी गडबड घोटाळा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

गेल्यावर्षी चंदीगड महापौर

आग्या१९९०
Tue, 02/11/2025 - 21:52 नवीन
गेल्यावर्षी चंदीगड महापौर निवडणुकीत बीजेपीने गडबड केली तेव्हापासून खात्रीच झाली ह्यांनी निवडणूक जिंकण्याचे तंत्र अवगत केले आहे. त्यामुळे शंका येणे साहजिकच आहे. निवडणूक आयोग फक्त दावे फेटाळण्यासाठी बसले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

महापौर निवडणूक मतपत्रिकांवर

श्रीगुरुजी
Tue, 02/11/2025 - 22:27 नवीन
महापौर निवडणूक मतपत्रिकांवर झाली होती. त्यामुळे गडबड होणारच. मतपत्रिका पद्धत असताना गडबड झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. तसेच न्यायालयाने ती निवडणूक रद्द केली होती. दिल्ली व महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतयंत्राद्वारे झाल्याने गडबडीची शक्यताच नाही. तरीही विश्वास नसल्यास न्यायालयात दाद मागता येईल व मतयंत्रात गडबड केली हे न्यायालयाने मान्य केले तर निवडणूक रद्द होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

महापौर निवडणूक मतपत्रिकांवर

आग्या१९९०
Tue, 02/11/2025 - 23:14 नवीन
महापौर निवडणूक मतपत्रिकांवर झाली होती. त्यामुळे गडबड होणारच. कसं बोललात? अशी गरज का पडली बीजेपीला? ह्याचा अर्थ निवडणूक जिंकण्यासाठी ते अनेक गैरप्रकार करण्यास मागेपुढे करत नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या किंवा निवडणूक आयोगाच्या EVM तक्रारीच्या अटी बघितल्या तर त्यांना ह्यातील अनेक तांत्रिक माहिती आहे की नाही ह्याची शंका येते. दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकांचाच उमेदवार तक्रार करू शकतो ही अटच हास्यास्पद आहे. पुढच्या क्रमांकाची मते वळवली की नाही हे कसे कळणार? निवडणूक आयोग मतदार आणि मतदानाची संख्या आकडेवारीत द्यायला का टाळते आहे? कुठलेही इलेक्ट्रॉनिक मशीन अंतर्गत प्रोग्राम करून किंवा दुरूनही रिमोट द्वारे नियंत्रित करता येऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

महापौर निवडणूक, राज्यसभा

श्रीगुरुजी
Tue, 02/11/2025 - 23:33 नवीन
महापौर निवडणूक, राज्यसभा निवडणूक, विधानपरीषद निवडणूक मतपत्रिकांवरच असते. मतयंत्रात गडबड करून दाखवा हे निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारण्यास एकही पक्ष पुढे आला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

मशीनला खोलल्याशिवाय कसे कळणार

आग्या१९९०
Wed, 02/12/2025 - 00:12 नवीन
मशीनला खोलल्याशिवाय कसे कळणार आत काय गडबड केली ते, ज्यास निवडणूक आयोग तयार नाही. ह्यापेक्षा मतदार संख्या आणि प्रत्यक्ष मतदान, मतदानाचे ( मतदार रांगेचे ) व्हिडिओ ,१००% VVPAT मोजणी,निवडणूक आयोगाने ह्या मागण्या मान्य कराव्यात , जे सहज शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अरे जर समजतच नसेल की गडबड कशी

राघव
Wed, 02/12/2025 - 01:48 नवीन
अरे जर समजतच नसेल की गडबड कशी केली.. तर नक्की काय केल्यानं गडबड होते हेच माहीत नाही असा अर्थ होत नाही का? तसं जर असेल तर कुणालाही गडबड करताच कशी येणार? अन् भाजपवर जर एवढी शंका असेल की त्यांना मशीन उघडायला दिली असेल.. तर जावं की तात्पुरतं भाजपमधे आणि लावावा जोर मशीन हाताळायला मिळावी म्हणून..! अरे ज्याला इंटरनेट कनेक्शन नाही, वायर्ड नेटवर्क कनेक्शन नाही, अगदी सिमकार्ड सुद्धा नाही.. ते स्टँडअलोन डेटाबेस वर आहे हे उघड आहे. केवळ दोन वायर्स त्याला जोडता येतात, एक पॉवर केबल आणि एक प्रिंटर केबल. मतमोजणीच्या दरम्यान सर्व पक्षप्रतिनिधी उपस्थित असतात. त्यांच्या समोर जर गैरप्रकार झालेत तर ते बोंब मारणार नाहीत काय? विरोधी पक्षाचा दावा हा आहे की ईव्हीएम हॅक होतात.. निवडणूक आयोग म्हणतंय कसं होईल? मी म्हणतो की हे प्रश्नच चुकीचे आहेत. प्रश्न आयोगानं विचारले पाहिजेत.. की बॅलेट पेपरनं गैरप्रकार कसे रोखता येतील ते सिद्ध करावं विरोधी पक्षांनी. सोबत बॅलेटपेपरचा वापर जास्त सोपा हे देखील सिद्ध करावं. आणिकही अनेक प्रश्न आणि उपप्रश्न आहेत.. चांगला घोळ घालावा ४०-५० वर्ष.. तोवर कदाचित आणिक उजवं एखादं तंत्रज्ञान आलेलं असेल ईव्हीएम पेक्षा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

+१

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/12/2025 - 08:30 नवीन
+१ अचानक वाढलेले मतदार? मुस्लिम एरियातून भाजपला बहुमत,जितके मुस्लिम वोटर नाहीत त्याहून जास्त mim ला मतदान, निवडणूक आयोगाची लपवा छपवी, एखाद्या जिल्ह्यात एकसारखी मते पडणे उदा. १lakh १५ हजार ७८०, बाजूच्याच मतदार संघात १ लाख १५ हजार ८६४ वगैरे, मतदान यंत्राच्या आत काय हे पाहू ना देता नी मतदान यंत्राला हात न लावता हॅक करून दाखवा म्हणून छाती पिटणे, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की भाजप नेत्यांनी सारवा सारव करणे, निवडणूक आयोगात आपली लोक बसवणे, चंदीगड पॅटर्न राबवणे, मतदान यंत्रे गुजरात मधूनच आणणे, मतदान यंत्र बनवणाऱ्या कंपनीत चार भाजपेयी गुजराथी डायरेक्टर म्हणून घुसणे. (मतदान यंत्रात गडबड करता येत नाही तर हे भाजपेयी मतदान यंत्रे बनवणाऱ्या कंपनीत का घुसले? ) एवढं सगळं उघ उघड होत असताना देशात लोकशाही आहे नी निवडणुका प्रामाणिकपणे होतात असे म्हणणाऱ्या भाजपेयींवर हसू येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

महापौर निवडणूक मतपत्रिकांवर

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/12/2025 - 08:35 नवीन
महापौर निवडणूक मतपत्रिकांवर झाली होती. त्यामुळे गडबड होणारच. गिरीष बापट वारल्यानंतर पुण्यात भाजप हरेल ह्या भीतीने निवडणूक आयोगाने वर्षभर पुण्यात लोकसभेची निवडणूकच घेतली नाही. त्याचवेळी पंजाबात मात्र लोकसभा निवडणूक घेतली होती. निवडणूक आयोग भाजपसाठी असा खुलेआम काम करत असताना निवडणुका प्रामाणिकपणे होतात असे म्हणणे हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

मग निवडणूक आयोगाविरूद्ध जा

श्रीगुरुजी
Wed, 02/12/2025 - 09:10 नवीन
मग निवडणूक आयोगाविरूद्ध जा न्यायालयात. ते जमत नसेल तर २०११ मधील देशव्यापी आंदोलनासारखे आंदोलन करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

न्यायमूर्ती लोया ह्यांचे नाव

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/12/2025 - 09:16 नवीन
न्यायमूर्ती लोया ह्यांचे नाव ऐकले आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आयोग भाजप धार्जिणी भूमिका

रात्रीचे चांदणे
Wed, 02/12/2025 - 09:23 नवीन
आयोग भाजप धार्जिणी भूमिका घेतो हे उघड आहे. त्यामुळे भाजपाला फायदाही होत आहे. पण EVM हॅक करून निकाल बदलले जातात ह्यात काहीही तथ्य वाटत नाही. महाराष्ट्रात आणि दिल्लीत राहुल गांधींनी ४ - ४ सभा घेतल्या. मोदी पंतप्रधान असून जास्त घेतल्या असतील. म्हणजे काहीही कष्ट न करता सत्ता पाहिजे. चुकून मिळाली तर लोकशाही जिंकली हरलो तर EVM आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आयोग भाजप धार्जिणी भूमिका

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/12/2025 - 09:30 नवीन
आयोग भाजप धार्जिणी भूमिका घेतो हे उघड आहे. त्यामुळे भाजपाला फायदाही होत आहे. चला, इथपर्यंत प्रगती झाली हेही नसे थोडके. पण EVM हॅक करून निकाल बदलले जातात ह्यात काहीही तथ्य वाटत नाही. ईव्हीएम हॅकच करावे असे गरजेचे नाही. मनुपुलेत ही करता येते किंवा बदलताही येते यंत्रणा आणी अधिकारी हाताशी असेल तर. आता निवडणूक आयोगच सोबत असल्यावर भीती ती कुणाची विधानसभेला जितेंद्र आव्हाड ह्यांनी पदोपदी ईव्हीएम वर लक्ष ठेवले त्यांचा निकाल पहा कसा लागलाय. (त्यांनी ट्विट करून ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली) पण सगळेच असे करू शकतात का? आणी का करावे? आणी केले तरी आयोग नी भाजप मिळून काहीतरी नवा मार्ग शोधतील. नाहीतरी चार गुजराती भाजपेयी डायरेक्टर म्हणून ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत घुसवून ठेवलेत ते कशासाठी? सो देशात लोकशाही आहे नी निवडणुका प्रामाणिकपणे होतात असे रडगाणे भाजपेयींनी आता बंद करायला हवे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

आयोग भाजप धार्जिणी भूमिका

श्रीगुरुजी
Wed, 02/12/2025 - 09:41 नवीन
आयोग भाजप धार्जिणी भूमिका घेतो हे उघड आहे. त्यामुळे भाजपाला फायदाही होत आहे तसे असेल तर कॉंग्रेस काळात आयोग तटस्थ होता का? मी खाली एक उदाहरण दिले आहे. अशी असंख्य उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

मुळात ज्यावर प्रत्यक्ष किंवा

रात्रीचे चांदणे
Wed, 02/12/2025 - 10:11 नवीन
मुळात ज्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सरकारी नियंत्रण आहे आस कोणताही सरकारी खात तटस्थ नसणारच. आयोग घटनात्मक संस्था असूनही सरकारच्या कलानेच काम करणार.त्यात निवडणूक आयुक्तांची निवड कमिटी मध्येच सरकारी पक्षच बहुमत आहे. त्यामुळे लहान सहान बाबतीत सरकारी पक्षाला साजेशी भूमिका घेणारच. ह्यात सत्तेत काँग्रेस असो की भाजपा ह्याने काहीही फरक पडणार नाही. आव्हाडच मताधिक्य २०१९ च्या तुलनेत घटलेले आहे. आणि असेच हवेत राहिले तर २०२९ साली हरतील आणि त्यावेळी तेच EVM ला दोष देत बसतील. उभाटा असेच हवेत राहिले होते आणि आपटले. मुळात आव्हाडांना फडणवीसांनी वाचवले आहे. नाहीतर ते जेल मध्ये पाहिजे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आव्हाडांना फडणवीसांनी वाचवले

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/12/2025 - 10:47 नवीन
आव्हाडांना फडणवीसांनी वाचवले आहे. नाहीतर ते जेल मध्ये पाहिजे होते. मोदीना सोनिया गांधीनी वाचवले नहीतर ते आता जेल मधे पाहिजे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

मुस्तफाबाद का नाम बदलकर शिव पुरी या शिव विहार रखेंगे…’, दिल्ली म

मुक्त विहारि
Wed, 02/12/2025 - 07:26 नवीन
मुस्तफाबाद का नाम बदलकर शिव पुरी या शिव विहार रखेंगे…’, दिल्ली में चुनाव जीतते ही BJP के दिग्गज विधायक का बड़ा बयान https://www.jansatta.com/rajya/will-rename-mustafabad-to-shiv-puri-delhi-bjp-mla-mohan-singh-bisht-big-announcement/3822117/ ------
  • Log in or register to post comments

२००९ मध्ये नवीन चावला नामक

श्रीगुरुजी
Wed, 02/12/2025 - 09:39 नवीन
२००९ मध्ये नवीन चावला नामक मुख्य निवडणूक आयुक्त होते. तेव्हा महाराष्ट्रातील ३ राज्यसभा खासदारांची व झारखंडमधील २ राज्यसभा खासदारांची निवडणूक होती. संख्याबळाप्रमाणे महाराष्ट्रात भाजन-सेना युतीचा १ व कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीचे २ खासदार आरामात निवडून येऊ शकत होते. झारखंडमध्ये सुद्धा भाजपचा १ व झामुमो-कॉंग्रेस युतीचा १ खासदार आरामात निवडून येऊ शकत नव्हता. पण नवीन चावलांनी महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीसाठी ३ वेगळ्या अधिसूचना काढल्या व झारखंडसाठी २ वेगळ्या अधिसूचना काढल्या. त्यामुळे महाराष्ट्रात प्रत्येक जागेसाठी एकदा अशी ३ वेळा निवडणूक झाली व झारखंडमध्ये २ वेळा निवडणूक झाली. परिणामी महाराष्ट्रातील तीनही जागांवर व झारखंडमध्ये दोनही जागांवर भाजपचा उमेदवार हरलो. एकच अधिसूचना असती तर भाजपचे २ खासदार राज्यसभेत निवडून आले असते. पण नवीन चावला या गांधीघराणेनिष्ठ निवडणूक आयुक्तामुळे भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही.
  • Log in or register to post comments

निवडणूक आयोगाने भविष्यात

आग्या१९९०
Wed, 02/12/2025 - 09:47 नवीन
निवडणूक आयोगाने भविष्यात तटस्थ रहावे असे वाटणे चुकीचे आहे का? त्यासाठी सर्वांनी प्रयत्न का करू नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नक्कीच. सर्वच यंत्रणा

श्रीगुरुजी
Wed, 02/12/2025 - 12:22 नवीन
नक्कीच. सर्वच यंत्रणा (निवडणूक आयोग, राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्व संसदीय व विधिमंडळाचे सभापती व उपसभापती, . . .) तटस्थ हव्या. परंतु आजवर कधीही तसे झाले नाही. कोणत्याही पक्षाच्या राजवटीत या यंत्रणा तटस्थ नव्हत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

आधी कुठल्या राज्यपालाने

अमरेंद्र बाहुबली
Wed, 02/12/2025 - 12:52 नवीन
आधी कुठल्या राज्यपालाने “हिंदुत्व सोडले का? वगैरे फुसकुल्या सोडल्या होत्या? कोणता राष्ट्रपती फॉर्म भरायच्या वेळेस उभा होता? नी पंतप्रधान बसून होता? कोणत्या राष्ट्रपतीने विशिष्ट पक्षाची सत्ता यावी म्हणून रात्री २ वाजता उठून सह्या करून राष्ट्रपती राजवट उठवली होती? alआधी निदान जनाची नाहियात्र मनाची लाक तरी होती आता तर भाजप हार म्हणून निवडणूकच घेत नाहीत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Wed, 02/12/2025 - 14:56 नवीन
आणीबाणी आठवा.... आणि "आता तर भाजप हार म्हणून निवडणूकच घेत नाहीत!" हा तर प्रचंड मनोरंजक प्रतिसाद आहे... मग आत्ता दिल्लीत काय झाले होते? लिलाव होता की निवडणूक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा