दिल्लीत येत्या पाच फेब्रुवारीला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार. दिल्लीत भाजप आप आणि कांग्रेस मध्ये तिरंगी लढत आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे ठरविण्यासाठी तिन्ही पक्षांची निवडानूकीसाठी किती तैयारी आहे हे पाहण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
कांग्रेस दिल्लीत पंधरावर्ष सत्तेत होती. अल्पसंख्यक, दलित आणि पूर्वांचली हा कांग्रेसचा वोट बँक होता. आज ही दिल्लीत 8-10 टक्के निष्ठावंत मतदाता कांग्रेसपाशी आहे. इतर राज्यांप्रमाणे दिल्लीत ही अल्पसंख्यक समुदाय भाजपा विरोधातात असलेल्या प्रमुख पक्षाला एक गठ्ठा मतदान करतात. जर दिल्लीत अल्पसंख्यक मतदार तेलंगना प्रमाणे कांग्रेसकडे वळविण्यात कांग्रेस नेतृत्व यशस्वी झाले असते तर आप पार्टीचे अस्तित्व बर्यापैकी संपविण्यास कांग्रेस यशस्वी झाली असती. पण तसा काही प्रयत्न काँग्रेसने गेल्या सहा महिन्यात केला नाही. या वेळी ही जास्तीस्जास्त 5 ते 10 जागांवर कांग्रेस लढताना दिसेल. बाकी जागांवर भाजपाची मते कापण्याचा प्रयत्न करेल. बहुतेक यामुळेच माननीय केजरीवाल एका भाषणात म्हणाले दिल्ली निवडणूकीच्या काळात ते माननीय राहुल गांधींची निंदा करणार नाही.
आप पार्टीला दिल्लीत अल्पसंख्यक समुदायाचे समर्थन आहे. दुसर्या शब्दांत मतदान टक्का कितीही असला तरी मतदानपूर्वीच +10 मतांची लीड त्यांच्या पाशी आहे. दिल्लीत डीटीसी बसेस मध्ये महिलाना तिकीट घ्यायची गरज नाही. रोज किमान दहा ते पंधरा लाख महिला डीटीसी बसेस मधून प्रवास करतात. या शिवाय वीज, पाणी अनेक फ्री बी आहेत. एका वर एक बाटली फ्रीचा लाभ आप पक्षाला मिळणार. या शिवाय निवडणूकीची तैयारी कशी केली जाते हे आप पार्टी कडून शिकण्यासारखे आहे. विधानसभा निवडणूकीसाठी डिसेंबर महिन्यात आपने आपले उमेदवार जाहिर करून टाकले होते. पण अधिकान्श जागांवर तीन महीने आधीच अनौपचारिक रीतीने उमेदवार निश्चित झाले होते. त्यांनी प्रचार ही सुरू केला, विशेषकरून ज्या भागांत लोकसभेत आपला कमी मते मिळाली होती. निवडणूकीच्या घोषणे पूर्वी केलेली सेवा आचार संहितेत येत नाही. याचा लाभ आप पक्षाने पूर्णपणे घेतला. त्यात काहीही गैर नाही. बाकी आमच्या उत्तम नगर भागातील निवर्तमान विधायक बल्यान साहेब पुण्यकर्म करून तिहाड तीर्थ क्षेत्री विश्राम करत असल्याने त्यांच्या श्रीमतीला तिकीट मिळाले आहे आणि तिचा प्रचार जोरदार सुरू आहे.
भाजप लोकसभा निवडणूकीत तिसर्यांदा विजयी झाली आणि बहुतेक तिसर्यांदा विधानसभा निवडणूकीत मार खाणार. सध्या तरी तीच परिस्थिति दिसत आहे. लोकसभा निवडणूकी नंतर एक भाजप कार्यकर्ता मला म्हणाला होता. जर भाजपने मुख्यमंत्री चेहरा देऊन दोन महीने आधी उमेदवार घोषित केले तर भाजप विधानसभा निवडणूक जिंकू शकते. पक्षाचा उमेदवारला विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक भागातील प्रधानांना, छूटभैये नेत्यांना पक्षाशी पुन्हा जोडायचे असेल तर एवढा वेळ पाहिजे. पण भाजप ने मुख्यमंत्रीचा चेहरा ही दिला नाही आणि नॉमिनेशन सुरू झाले तरीही भाजपचे सर्व उमेदवार निश्चित झाले नव्हते. अनेकांना वाटते भाजपच्या शीर्ष नेतृत्वाची इच्छा दिल्ली जिंकण्याची नाही. बहुतेक विधानसभेत आप आणि लोकसभेत भाजपा हे समीकरण भाजप शीर्ष नेतृत्वाला जास्त योग्य वाटते. भाजप विधानसभा जिंकली तर कांग्रेस दिल्लीत पुन्हा प्रबळ होईल. बहुतेक भाजपला ते नको. भाजप चुकून विधानसभा जिंकली तर त्याचे श्रेय फक्त दिल्लीच्या जनतेला जाईल. भाजप नेतृत्वाला नाही.
वाचने
12615
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाजप चुकून विधानसभा जिंकली तर त्याचे श्रेय फक्त दिल्लीच्या जनतेल
काहीही झाले तरी भाजपाला मत
भाजप लोकसभा निवडणूकीत तिसर्
भाजप लोकसभा निवडणूकीत तिसर्यांदा विजयी झाली आणि बहुतेक तिसर्यांदा विधानसभा निवडणूकीत मार खाणार.आआपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे अवघड आहे. भाजपच्या जागा ७ वरून नक्की वाढतील, पण ३६ पर्यंत जाण्याची शक्यता खूप कमी वाटते. अर्थात आआप हरून भाजपला बहुमत मिळावे हीच इच्छा आहे. भविष्यात रेवड्या वाटण्याचे आश्वासन देणाऱ्या पक्षापेक्षा वर्तमानात रेवड्या वाटणारा पक्ष मतदारांना अधिक जवळचा वाटतो हे कर्नाटक, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सिद्ध झाले आहे.बहुसंख्य संस्थांनी मतदानोत्तर
दिल्लीत झालेल्या मतदानात.
Axis India Exit Poll
Axis My India, Pmarq आणि Poll
In reply to Axis India Exit Poll by श्रीगुरुजी
भाजप विक्रम करणार?
काय समजलात?
आताची स्थिती -
आताची स्थिती -
बरोबर ३५-३५ असे झाले तर काय
गोवा
In reply to बरोबर ३५-३५ असे झाले तर काय by गवि
धन्यवाद. नीट लक्षात आले.
In reply to गोवा by चंद्रसूर्यकुमार
बरोबर ३५-३५ अस होताना दिसत
आप मधल्यांना फोडणे हा एकमेव
In reply to बरोबर ३५-३५ अस होताना दिसत by रात्रीचे चांदणे
आताची स्थिती -
सिसोदिया पराभूत झाल्याची
६०० मतांच्या अंतराने सिसोदिया
आतिशी विजयी.
आआपचा सत्येंद्र जैन पराभूत.
पाताळविजयन
अगदी सहमत
In reply to पाताळविजयन by चंद्रसूर्यकुमार
दिल्लीकरांच्या दुःखात सहभागी
ईवीएम हो ईवीएम. सगळे ईवीएम
In reply to दिल्लीकरांच्या दुःखात सहभागी by अमरेंद्र बाहुबली
+१ हेच रडगाणे गातील आता :)
In reply to ईवीएम हो ईवीएम. सगळे ईवीएम by सुक्या
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to दिल्लीकरांच्या दुःखात सहभागी by अमरेंद्र बाहुबली
https://www.newindianexpress
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
काही लोकांना इतके सविस्तर उत्तर देण्याची गरज नाही....
In reply to https://www.newindianexpress by सुबोध खरे
पक्या इमारतीत कमी भाड्यावर
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
दिल्लीत आले असते तर सत्य
In reply to दिल्लीकरांच्या दुःखात सहभागी by अमरेंद्र बाहुबली
आआपची बंद दाराआड बैठक सुरू
दिल्ली विजय.
काय बिरुटे सर?
In reply to दिल्ली विजय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोबरभक्तांना...
In reply to काय बिरुटे सर? by सुबोध खरे
आमचं काम अन्यायी व्यवस्थेशी
In reply to गोबरभक्तांना... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुभेच्छा.
In reply to आमचं काम अन्यायी व्यवस्थेशी by सुबोध खरे
आपल्या कडून हीच अपेक्षा होती
In reply to शुभेच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Delhi discoms in crisis: Debt
In reply to आपल्या कडून हीच अपेक्षा होती by सुबोध खरे
नवं सरकार नवी आश्वासने.
In reply to Delhi discoms in crisis: Debt by सुबोध खरे
रेवडी कल्चर
In reply to नवं सरकार नवी आश्वासने. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रेवड्या हा रोग च आहे. मग तो
In reply to नवं सरकार नवी आश्वासने. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोबर आहे. रोज मरे त्याला कोण
In reply to गोबरभक्तांना... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिल्लीतील सध्याचे निकाल पाहता
In reply to दिल्ली विजय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिल्लीतील सध्याचे निकाल पाहता, भाजपच्या विजयी उमेदवारांनी निर्वीवाद विजय मिळाला असे म्हणता येत नाही. कॉंग्रेस उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका आपच्या उमेदवारांना आणि त्याचा फायदा भाजपाला झालेला दिसत आहेसमजा कॉंग्रेसचे उमेदवार नसते तरीही भाजपच्या विजयी उमेदवारांनी निर्विवाद विजय मिळाला असे म्हणता येणार नाही असे म्हणता आले असते कारण अपक्ष, एमआयएम वगैरेंनी घेतलेल्या मतांचा फटका आआपला बसला असे म्हणता आले असते.तरीही, विजय विजयच असतो. रेवडी-खैरातीत, लाडक्या बहीणींना २५०० रुपये. पाच रुपयात जेवण, पाचशे रुपयात सिलेंडर, मेट्रोत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, पन्नास हजार नौक-या यालाही मतदार भुललेला दिसतो.२०१३ ते २०२५ या वर्षात फुकट वीज, फुकट पाणी या रेवड्यांना दिल्लीकर भुलला नव्हता का?सहमत आहे ...
In reply to दिल्लीतील सध्याचे निकाल पाहता by श्रीगुरुजी
कोंग्रेस आणि आपची युती झाली
In reply to दिल्लीतील सध्याचे निकाल पाहता by श्रीगुरुजी
एक चांगलं सुशासन देण्याचा
In reply to दिल्ली विजय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(No subject)
अण्णा हजारे यांनी व्यक्त केलेले मनोगत......
अरविंद केजरीवालांच्या गुरुची मार्मिक प्रतिक्रिया, अण्णा हजारे म्
In reply to अण्णा हजारे यांनी व्यक्त केलेले मनोगत...... by मुक्त विहारि
हा हा हा
तुम्ही भुजबळांना विसरलात.
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
मोदी विरोधकांची खरंच कीव येते
चंदिगड महापौर निवडणुकीत
In reply to मोदी विरोधकांची खरंच कीव येते by रात्रीचे चांदणे
आता तर कुठल्याच निवडणुकीवर
In reply to चंदिगड महापौर निवडणुकीत by आग्या१९९०
आता तर कुठल्याच निवडणुकीवर विश्वास राहीला नाही.जो पर्यंत भारतात पुन्हा प्रामाणिक निवडणूक यंत्रणा येत नाही तो पर्यंत हीच लोक सत्तेत राहणार! आपण फक्त लोकशाहीला श्रद्धांजली वाहू शकतो.मनोरंजक प्रतिसाद....
In reply to आता तर कुठल्याच निवडणुकीवर by अमरेंद्र बाहुबली
कालच उठा म्हणाले की दिल्लीत व
In reply to मोदी विरोधकांची खरंच कीव येते by रात्रीचे चांदणे
गेल्यावर्षी चंदीगड महापौर
In reply to कालच उठा म्हणाले की दिल्लीत व by श्रीगुरुजी
महापौर निवडणूक मतपत्रिकांवर
In reply to गेल्यावर्षी चंदीगड महापौर by आग्या१९९०
महापौर निवडणूक मतपत्रिकांवर
In reply to महापौर निवडणूक मतपत्रिकांवर by श्रीगुरुजी
महापौर निवडणूक, राज्यसभा
In reply to महापौर निवडणूक मतपत्रिकांवर by आग्या१९९०
मशीनला खोलल्याशिवाय कसे कळणार
In reply to महापौर निवडणूक, राज्यसभा by श्रीगुरुजी
अरे जर समजतच नसेल की गडबड कशी
In reply to मशीनला खोलल्याशिवाय कसे कळणार by आग्या१९९०
+१
In reply to मशीनला खोलल्याशिवाय कसे कळणार by आग्या१९९०
महापौर निवडणूक मतपत्रिकांवर
In reply to महापौर निवडणूक मतपत्रिकांवर by आग्या१९९०
महापौर निवडणूक मतपत्रिकांवर झाली होती. त्यामुळे गडबड होणारच.गिरीष बापट वारल्यानंतर पुण्यात भाजप हरेल ह्या भीतीने निवडणूक आयोगाने वर्षभर पुण्यात लोकसभेची निवडणूकच घेतली नाही. त्याचवेळी पंजाबात मात्र लोकसभा निवडणूक घेतली होती. निवडणूक आयोग भाजपसाठी असा खुलेआम काम करत असताना निवडणुका प्रामाणिकपणे होतात असे म्हणणे हास्यास्पद आहे.मग निवडणूक आयोगाविरूद्ध जा
In reply to महापौर निवडणूक मतपत्रिकांवर by अमरेंद्र बाहुबली
न्यायमूर्ती लोया ह्यांचे नाव
In reply to मग निवडणूक आयोगाविरूद्ध जा by श्रीगुरुजी
आयोग भाजप धार्जिणी भूमिका
In reply to महापौर निवडणूक मतपत्रिकांवर by अमरेंद्र बाहुबली
आयोग भाजप धार्जिणी भूमिका
In reply to आयोग भाजप धार्जिणी भूमिका by रात्रीचे चांदणे
आयोग भाजप धार्जिणी भूमिका घेतो हे उघड आहे. त्यामुळे भाजपाला फायदाही होत आहे.चला, इथपर्यंत प्रगती झाली हेही नसे थोडके.पण EVM हॅक करून निकाल बदलले जातात ह्यात काहीही तथ्य वाटत नाही.ईव्हीएम हॅकच करावे असे गरजेचे नाही. मनुपुलेत ही करता येते किंवा बदलताही येते यंत्रणा आणी अधिकारी हाताशी असेल तर. आता निवडणूक आयोगच सोबत असल्यावर भीती ती कुणाची विधानसभेला जितेंद्र आव्हाड ह्यांनी पदोपदी ईव्हीएम वर लक्ष ठेवले त्यांचा निकाल पहा कसा लागलाय. (त्यांनी ट्विट करून ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली) पण सगळेच असे करू शकतात का? आणी का करावे? आणी केले तरी आयोग नी भाजप मिळून काहीतरी नवा मार्ग शोधतील. नाहीतरी चार गुजराती भाजपेयी डायरेक्टर म्हणून ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत घुसवून ठेवलेत ते कशासाठी? सो देशात लोकशाही आहे नी निवडणुका प्रामाणिकपणे होतात असे रडगाणे भाजपेयींनी आता बंद करायला हवे!आयोग भाजप धार्जिणी भूमिका
In reply to आयोग भाजप धार्जिणी भूमिका by रात्रीचे चांदणे
आयोग भाजप धार्जिणी भूमिका घेतो हे उघड आहे. त्यामुळे भाजपाला फायदाही होत आहेतसे असेल तर कॉंग्रेस काळात आयोग तटस्थ होता का? मी खाली एक उदाहरण दिले आहे. अशी असंख्य उदाहरणे आहेत.