एक खट्याळ त्रिवेणी
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
त्रिवेणीचा प्रयत्न करत आहे.. कशी वाटली जरूर सांगा :)
साबणसुखाच्या गुदगुल्यांनी खळखळले हास्य
अन् रोमांचत्वचेवर फुलला प्रणय, खळबळ टबात.
छ्या ! मॅटिनीचे चित्रपट म्हणजे कॉलेजकुमारांना नुसता त्रास !
-- लिखाळ.
वाचने
3888
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
हाहाहाहाहा =)) =)) =))
लैच भारी..
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
माजीबी योक त्रीवेनी.
इश्क ए नूर
तु माझी नूर
किती किती बाई दुर्योधन कृर...
अवांतर : माझ्यातला कवीस ( काव्य खवीस) जागा करायचे काही कारण होते का
नक्की जमेल. हीही जमली आहेच. त्यामुळं पुढचीही जमेल.
In reply to जमेल, जमेल by श्रावण मोडक
जमेल, जमेल, जमलीच आहे - असेच म्हणतो.
हा.हा.हा...लिखाळराव प्रयत्न लयं भारी हाय. :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
जाता जाता वाचले ! लय भारी त्रिवेणी बॉ !
आम्हाला स्फुरलेली ही उत्स्फूर्त दाद ! ;-)
ढेकूणचाव्यांच्या चिमट्यांनी बेजारले "अधरीय" !
अन् सांदीकोपरात्वचेवर फुलला फोड, खाजखाज नखांत .
छ्या ! मॉर्निंगशोज चे मल्लू चित्रपट म्हणजे कॉलेजकुमारांना नुसता त्रास !
In reply to लई भारी ! by मुक्तसुनीत
हा हा हा .. हे लै भारी :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! :)
बायकापोरांच्या येणाजाण्याने वैतागलेले वयस्कर !
अन् धडधडत्या मनाने धरुन ठेवलेले रिमोट, खाजखाज मनात .
छ्या ! फॅशन टिव्ही पहायचा म्हणजे हिरवटांना नुसता त्रास !
In reply to हॅ हॅ हॅ by आनंदयात्री
=)) आमच्यासारख्या कुमारांचेही हेच हाल!
In reply to हॅ हॅ हॅ by आनंदयात्री
ही ही ही
हे वाचून मला माझ्या मागच्या त्रिवेणीची आठवण झाली :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! :)
समर्थ रामदास की जय का लिखाळ?? :-)
ही घ्या अजुन एक त्रिवेणी
खरडी व्यनी करुन करुन सरसावले मैत्रीकिडे
प्रतिसादाची वाट पहात रचल्या कविता, सजवल्या खरडवह्या
छ्या! मराठी संकेतस्थळावर पोरी पटवणे म्हणजे ऑर्कूट्हून मोठे दिव्य!
त्रिवेणी चावट आहे खरी! ;)
मुसु आणि आंद्याच्या जवाबी त्रिवेण्याही मस्तच!
(खुद के साथ बातां : रंगा, कधी पुलाखाली उसासे, कधी टबातल्या फेसातली खळबळ; ह्या लिखाळाचं नेमकं काय सुरु आहे? :? :P )
चतुरंग
In reply to बहोत खूब लिखाळभाऊ! by चतुरंग
कधी पुलाखाली उसासे, कधी टबातल्या फेसातली खळबळ; ह्या लिखाळाचं नेमकं काय सुरु आहे?त्येच ना राओ ... च्यामारी ... हा लिखाळ म्हणजे अंम्मळ "हा" दिसतोय ... डेंजर आहेत रे बाबा तुझ्या डॉस्क्यातल्या कल्पना ... आजुन येउन द्या बा !!! जसे " गंजलेल्या टमरेलाची तुटलेली कडी " .. "पुलाखाली अंधार" इ.इ. - टिकाळ
लिखाळा, त्रिवेणी मस्तच! पण एक समीक्षाही होऊन जाऊ देत!
एक प्रयत्न...;)
वेड्यावाकड्या कथानकाचा तो फास
कधी येईल कधी येईल याचीच सगळ्यांना आस
छ्या ! मॉर्निंगचे चित्रपट म्हणजे कॉलेजकुमारांना नुसता त्रास !
>>>छ्या ! मॅटिनीचे चित्रपट म्हणजे कॉलेजकुमारांना नुसता त्रास !
एकदम कॉलेजच्या दिवसांची आठवण आली. सीओईपी ला असताना त्याकाळी मॉर्निंग शो ला विजयानंद, अलका, रतन (अजून आहे का?), श्रीनाथ (मंडईमागचे- आता नाव बदललंय वाटतं) इत्यादि थेटरांत 'खास' शिणेमे लागत. आम्ही मोठ्या आशेने जात असू. नंतर अर्थातच निराशाच होत असे. पण आम्ही प्रयत्न कधी सोडले नाहीत. (प्रयत्नांती परमेश्वर काही भेटला नाही कधी)
(अवांतरः त्या काळी ............जाउ द्या)
खराटा
(रंग माझा वेगळा)
In reply to >>>छ्या ! by नितिन थत्ते
भारत, श्रीकृष्ण , डिलक्स (आजुन काय बरं ? ) तिकडं जायचं ना =)) =)) =))
आम्ही फक्त रोज पेपरचा जाहिरात कॉलम धुंडाळायचो .. अन खुष व्हायचो
(वाचक)बेसनलाडू
मॅटिनीचे चित्रपट म्हणजे कॉलेजकुमारांना नुसता त्रास !
ऐकुनी उसासे.... थरारे श्वास.
काहीच ना घडते...मग सुटतो निश्वास.......
अभिप्रायासाठी सर्वांचे आभार :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! :)
लिखाळा,
आयटम कळाला नाय रे!
(मठ्ठ) तात्या.
हाहाहाहाह