Skip to main content

दिवाळी अंक २०२४ - गावातील घर

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
किती दिवसांनंतर, महिन्यांनंतर, वर्षांनंतर उमटलीत माझी पावलं गावच्या मातीवर जिथे बहरलेलं असतं माझं बालपण वसलेल्या असतात आठवणी इथल्या कणाकणात. पण हा गाव आज ओळख दाखवत नाही. येऊन उभा राहतो घरासमोर तुटू पाहणाऱ्या वाश्याला बांबूचा आधार घेऊन उभं असलेलं घर पाहून आठवतो कमरेत वाकलेला बाप हातात काठीचा आधार घेऊन उभा असलेला. अनोळखी माणसाला पाहून करावी कुरकुर तसं घराचं दार लागलंय कुरकुरायला उघडता उघडत नाही. आईनं हातानं सारवण केल्यावर उमटलेली आमच्या पावलांची नक्षी केव्हांच पुसून गेलेली. आता दिवसा घराच्या सावलीत राहत असते उदास शांतता अन रात्री नांदत असतो भयाण काळोख. Deepak Pawar
दिवाळी अंक वर्ष

वाचने 5435
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

वास्तवदर्शी चित्रण...

व्वा .. सुंदर रचना ! आ व ड ली ! खरोखर काळ इतक्या वेगात पळतो आपण जुन्या सुखांपासून दुर येऊन पोहोचतो .. जुन्या आठवणी अपल्या मनामनात वहात असतात ... आपण गावासाठी आसुसलेलो ... पण गाव आपल्याला ओळखत नाही.

एकदम वास्तव चित्र उभे केलेय....

खूप सुंदर कविता आहे सर! गावाविषयीचं आपलं एक भावनिक नातं असतं. ते या कवितेतून उत्तम मांडले आहे.