दिवाळी अंक २०२४ - गावातील घर
किती दिवसांनंतर, महिन्यांनंतर, वर्षांनंतर
उमटलीत माझी पावलं गावच्या मातीवर
जिथे बहरलेलं असतं माझं बालपण
वसलेल्या असतात आठवणी
इथल्या कणाकणात.
पण हा गाव आज ओळख दाखवत नाही.
येऊन उभा राहतो घरासमोर
तुटू पाहणाऱ्या वाश्याला
बांबूचा आधार घेऊन
उभं असलेलं घर पाहून
आठवतो कमरेत वाकलेला बाप
हातात काठीचा आधार घेऊन उभा असलेला.
अनोळखी माणसाला पाहून करावी कुरकुर
तसं घराचं दार लागलंय कुरकुरायला
उघडता उघडत नाही.
आईनं हातानं सारवण केल्यावर
उमटलेली आमच्या पावलांची नक्षी
केव्हांच पुसून गेलेली.
आता दिवसा घराच्या सावलीत
राहत असते उदास शांतता
अन रात्री नांदत असतो भयाण काळोख.
Deepak Pawar
दिवाळी अंक वर्ष
वाचने
5427
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
पण हा गाव आज ओळख दाखवत नाही..
आवडली कविता.
जुने दिवस आता बदलले आहेत.
मनःपूर्वक धन्यवाद.
बरोबर
मनःपूर्वक आभार.
व्वा .. सुंदर रचना !
मनःपूर्वक धन्यवाद.
छान आहे
खूप सुंदर कविता!
मनःपूर्वक धन्यवाद.
In reply to मनःपूर्वक धन्यवाद. by Deepak Pawar
व्यनि
In reply to व्यनि by dadabhau
व्यक्तिगत संदेश.