किती दिवसांनंतर, महिन्यांनंतर, वर्षांनंतर
उमटलीत माझी पावलं गावच्या मातीवर
जिथे बहरलेलं असतं माझं बालपण
वसलेल्या असतात आठवणी
इथल्या कणाकणात.
पण हा गाव आज ओळख दाखवत नाही.
येऊन उभा राहतो घरासमोर
तुटू पाहणाऱ्या वाश्याला
बांबूचा आधार घेऊन
उभं असलेलं घर पाहून
आठवतो कमरेत वाकलेला बाप
हातात काठीचा आधार घेऊन उभा असलेला.
अनोळखी माणसाला पाहून करावी कुरकुर
तसं घराचं दार लागलंय कुरकुरायला
उघडता उघडत नाही.
आईनं हातानं सारवण केल्यावर
उमटलेली आमच्या पावलांची नक्षी
केव्हांच पुसून गेलेली.
आता दिवसा घराच्या सावलीत
राहत असते उदास शांतता
अन रात्री नांदत असतो भयाण काळोख.
Deepak Pawar
दिवाळी अंक वर्ष
वाचने
5473
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण हा गाव आज ओळख दाखवत नाही..
पण हा गाव आज ओळख दाखवत नाही.....
हुं.
आवडली कविता.
आवडली कविता.
जुने दिवस आता बदलले आहेत.
जुने दिवस आता बदलले आहेत.
मनःपूर्वक धन्यवाद.
कंजूस सर, कॉमी सर, पाषाणभेद सर मनःपूर्वक धन्यवाद.
बरोबर
वास्तवदर्शी चित्रण...
मनःपूर्वक आभार.
श्वेता२४ मॅडम मनःपूर्वक आभार
व्वा .. सुंदर रचना !
व्वा .. सुंदर रचना !
आ व ड ली !
खरोखर काळ इतक्या वेगात पळतो आपण जुन्या सुखांपासून दुर येऊन पोहोचतो ..
जुन्या आठवणी अपल्या मनामनात वहात असतात ... आपण गावासाठी आसुसलेलो ... पण गाव आपल्याला ओळखत नाही.
मनःपूर्वक धन्यवाद.
चौथा कोनाडा सर मनःपूर्वक धन्यवाद
छान आहे
एकदम वास्तव चित्र उभे केलेय....
खूप सुंदर कविता!
खूप सुंदर कविता आहे सर! गावाविषयीचं आपलं एक भावनिक नातं असतं. ते या कवितेतून उत्तम मांडले आहे.
मनःपूर्वक धन्यवाद.
dadabhau सर, कवी मुक्तविहारी सर मनःपूर्वक धन्यवाद.
व्यनि
In reply to मनःपूर्वक धन्यवाद. by Deepak Pawar
तुम्हाला व्यनि केला आहे. धन्यवाद.
व्यक्तिगत संदेश.
In reply to व्यनि by dadabhau
dadabhau सर व्यक्तिगत संदेश केला आहे.