शोनार बांगला... भाग ३ - खुलना, बांगलादेश
भाग १ - कलकाता, भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ –चितगांव बांगलादेश, भाग ६ – सिल्हेट बांगलादेश, भाग ७ – राजशाही बांगलादेश, समाप्ती – ढाका बांगलादेश
पूर्वी त्रिपुरा मधून वेगवेगळ्या भागातून बांगलादेश चे अवलोकन केले होते. सीमेवर एखाद दोन वैध-अवैध भेटीही झाल्या परंतु अनेक वर्षांनी ती सीमा आता अधिकृतरीत्या ओलांडली. बांगलादेश चा व्हिसा अनिवार्य असला तरी विनामूल्य असतो. 'प्रोसेसिंग फी' च्या नावाखाली थोडेफार पैसे घेतातच तरी. पण असो, प्राथमिक सोपस्कार पार पाडले आणि व्हिसा तयार ठेवला. सहा महिन्याचाच मिळाला पण पुरेसा होता. अफगाणिस्तान प्रमाणेच पायी प्रवेशाचा संकल्प, तो घोजाडाङा-भोमरा सीमेवर पासपोर्ट वर ठप्पा मारत साधला. दोन्ही बाजूचे कस्टम अधिकारी निर्लज्ज पणे पैसे मागत होते, परंतु फार त्रास देण्यासारखे काही नव्हतेच माझ्याकडे. बेनापोल ची सीमा सामान व रेल्वे इत्यादी वाहतुकीसाठी सर्वात महत्वाची आहे व इथून फार लांब नाही, त्यामुळे इथे या सीमेवर फार सेवा सुविधा विकसित झालेल्या नाहीत. सीमेपलीकडे काही चलन बदली करून अजिबात वेळ न दवडता जणू काही आधीच ठरलेले असल्याप्रमाणे बाईक वर डबल सीट लिफ्ट, तीही दीड तास प्रवासासाठी, थेट पहिला थांबा जिथे होता त्या ईश्वरीपूर या गावात.
जशोरेश्वरी काली - ५० शक्तिपीठांमधील हस्तकमल पीठ (हाताचे तळवे). मंदिर अलीकडेच नव्याने उजळले आहे, कारण ठरले ते मोदींच्या भेटीचे. मागील बांगलादेश भेटीत त्यांनी या जागेला भेट देण्याचे जाहीर करताच रातोरात मंदिराची डागडुजी करून रंगरंगोटी करून उत्तम करण्यात आले. गावात साडी-ओटीचे सामान घेताना गावकऱ्यांनीही मोदींच्या प्रवासाच्या हकीकती सांगितल्या. हिंदू धार्जिणा नेता म्हणून त्यांचा तिरस्कार असला तरी भक्कम नेतृत्वाचा त्यांना हेवा वाटतो हे एका शेंदरी दाढीवाल्याने आवर्जून सांगितले.
मंदिराचा आवार स्वच्छ व मोठमोठ्या वृक्षांनी सुशोभित आहे. जुन्या ऐतिहासिक मंदिराच्या बांधकामाचे अवशेष एका बाजूला अजूनही तशाच जीर्ण अवस्थेत दुःखद कथा सांगायला उभे आहेत. पत्र्याचा मंडप आता नव्याने परिसराच्या नशिबी आला आहे. देवी घोररुपा आहे. मंदिर अगदी सुंदरबनाच्या काठीच असल्याने प्राचीन काळी दाट जंगलातच असले पाहिजे. अगदी अलीकडेपर्यंत मंदिरात भगवतीच्या सान्निध्याला वाघ येत असत असे ऐकले. मंदिरात शांत एकांत जो इथे मिळाला तो पश्चिम बंगाल मध्ये अगदीच दुर्मिळ होता. पठण-ध्यान-उपचारादि आनंद करत उत्तम समय व्यतीत केला.
इथे व्हिडीओ डकवता येत नसल्याने या लिंक वर पहा: https://youtube.com/shorts/ioqZPN4zMIk?feature=shared बाकी गावात काही सुविधा नाही. पुढे बस वा मिळेल त्या साधनाने उपजिल्ह्याचे ठिकाण श्यामनगर, तेथून सातखिरा व मग खुलना. प्रत्येक ठिकाणी काही काळ व्यतीत करत, स्थानिकांना भेटत खुलना मुक्कामी, परंतु अन्य भारतीय शहरासारखेच शहर ते. परंतु या लेखासाठी उल्लेखनीय असे तेथे फार काही नाही. तिथून पुढे शेजारील राज्य बरीषाल विभागाकडे पुढील भागात.
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, ईशान्य भारत : आसाम, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान , पूर्व आफ्रिका - इथियोपिया , अखंड बंगाल
वाचने
5780
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
प्रतिक्रिया
वाचताना व फोटो पाहताना एका
तिन्ही भाग एकदमच वाचले आणि
हा भागही छान
बंगाल यात्रा
In reply to बंगाल यात्रा by धर्मराजमुटके
प्रतिसाद आवडला ...
In reply to बंगाल यात्रा by धर्मराजमुटके
बंगाली आणि मराठीत
In reply to बंगाली आणि मराठीत by चौकस२१२
मला वाटतं की ....
In reply to मला वाटतं की .... by नठ्यारा
बंगालला शिवाजी का लाभला नाही
In reply to बंगाल यात्रा by धर्मराजमुटके
शेताच्या एका भागात तांदूळ
हा पण भाग आवडला
समर्पक भाऊ मस्त चालू आहे सहल
छान
छान लेखमाला.
आवडला हा भागही
अनवट सफर.
आवडला!