सद्दीत सुमारांच्या ह्या
लेखनविषय:
काव्यरस
जटिलाच्या दारावरती
दुर्बोध देतसे थाप
भेटीत उमजले दोघा,
"उभयतांस एकच शाप
सद्दीत सुमारांच्या ह्या
उ:शाप नसे शापाला
अस्वस्थ उद्याची हाक
ऐकू ना येई कुणाला"
दुर्बोध जटिलसे हसले
दुर्बोधून जटिलही गेले
अन् विषण्ण होऊनी दोघे
आश्रयी कवीच्या गेले :)
वाचने
2253
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
फारच आवडली. नेहमीप्रमाणेच
सुमारांची सद्दी
दोन्ही कवीता आवडल्या.
गवि, तिमा, कर्नल
सुमारांची वाढ खरंच बेसुमार