उरले जे जगायचे, वाया क्षण गतकालीचे,
जगूनी क्षण साफल्याचे, माघारी तव फिरुनी यावे.
राहीले जे मिटायचे, वाद आप्त - परकीयांचे
निपटून सारे वाद, गोडी-गुलाबी परतूनी यावे.
राहीले जे अधुरे, स्वप्न मनातील जागपणीचे
स्वप्न साकारुन मनीचे, समाधान जिंकून यावे.
उरले जे ऋण भाळीचे, संकटकाळी उपकाराचे
फेडुन ऋण उपकाराचे, ऋणास त्या वंदूनी यावे.
राहीले जे जुळवावयाचे, आप्तसंबध माणूसकीचे
जोडूनी नाते माणूसकीचे, माणूस बनुनी माणसांत यावे.
राहीले जे योग्य फलाचे, कर्तव्य ते जीवनाचे
फळ मिळवून कर्माचे, कर्तव्यदक्ष बनुनी यावे.
राहीले जे भोगावयाचे, भोग जगल्या पापाचे
भोगुन भोग गतकालाचे, उरले जीवन पुर्ण जगावे.
.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3381
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
राहीले जे
कविता छान
In reply to राहीले जे by पर्नल नेने मराठे
उरले जे
+१
In reply to उरले जे by दशानन
छान !
+१
In reply to छान ! by उदय सप्रे
छान!
मस्त!
खूप आवडली कविता..
धन्यवाद.
भोगुन भोग गतकालाचे
मस्त !
उरले जे ऋण
राहीले जे