Skip to main content

उरलेला गतकाल

लेखक जागु यांनी सोमवार, 11/05/2009 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
उरले जे जगायचे, वाया क्षण गतकालीचे, जगूनी क्षण साफल्याचे, माघारी तव फिरुनी यावे. राहीले जे मिटायचे, वाद आप्त - परकीयांचे निपटून सारे वाद, गोडी-गुलाबी परतूनी यावे. राहीले जे अधुरे, स्वप्न मनातील जागपणीचे स्वप्न साकारुन मनीचे, समाधान जिंकून यावे. उरले जे ऋण भाळीचे, संकटकाळी उपकाराचे फेडुन ऋण उपकाराचे, ऋणास त्या वंदूनी यावे. राहीले जे जुळवावयाचे, आप्तसंबध माणूसकीचे जोडूनी नाते माणूसकीचे, माणूस बनुनी माणसांत यावे. राहीले जे योग्य फलाचे, कर्तव्य ते जीवनाचे फळ मिळवून कर्माचे, कर्तव्यदक्ष बनुनी यावे. राहीले जे भोगावयाचे, भोग जगल्या पापाचे भोगुन भोग गतकालाचे, उरले जीवन पुर्ण जगावे. .
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3381
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

राहीले जे पार पाडायचे, कर्तव्य ते जीवनाचे ह्म्म.... चुचु

उरले जे जगायचे ते, वाया क्षण गतकालीचे, जगूनी क्षण साफल्याचे, माघारी तव फिरुनी यावे. सुंदर.. मागे फिरणे नेहमीच सोपे नसते ! कधी कधी मोहामुळे तर कधी मागे फिरल्यामुळे होणा-या त्रासामुळे मागे फिरण्याची इच्छा होत नाही .... माणूस जगणे विसरतो मोहापायी... तर मागे वळणे जवळ जवळ अशक्य. थोडेसं नवीन !

उरले जे जगायचे ते, वाया क्षण गतकालीचे, जगूनी क्षण साफल्याचे, माघारी तव फिरुनी यावे. छान आहे , हेच म्हणतो !

In reply to by उदय सप्रे

छान आहे. -संदीप. काय'द्याच बोला.

छान कविता!

राहीले जे मिटायचे, वाद आप्त - परकीयांचे निपटून सारे वाद, गोडी-गुलाबी परतूनी यावे. 'भले-बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर' आठवले. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com

मराठे, राजे, अवलिया, सँडी, उदय, क्रांती, प्राजू, कर्क, सायली. तुमचे मनापासुन धन्यवाद.

"भोगुन भोग गतकालाचे" काय सांगावे, खरे वाटते हे. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

सकारात्मक विचाराची कविता.

उरले जे ऋण भाळीचे, संकटकाळी उपकाराचे फेडुन ऋण उपकाराचे, ऋणास त्या वंदूनी यावे. सुरेख आहे ही कल्पना! आवडली.

राहीले जे जुळवावयाचे, आप्तसंबध माणूसकीचे जोडूनी नाते माणूसकीचे, माणूस बनुनी माणसांत यावे. सुंदरच... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.