Skip to main content

(सोडू नको)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 12/05/2009 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिल्या ह्यांची अप्रतिम गजल 'सोडू नको' ही वाचल्यावर विडंबनधर्मा सोडू नको असे आमच्या मनाने बजावलेच! ;) संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको! अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको! तू तिच्यापासून नक्की वाचशी, सांगू कसे? हेलमेटा रोज तू घालायचे सोडू नको! केस हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी रोज तू गच्चीवरी 'कोंबा'यचे सोडू नको! काय झाले सदनिकांतुन लोक पळती शेकडो? तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको! पाहिजे तर काढ सदरा सोड दोंदा मोकळे बावळ्या 'सलमान'ची जिरवायचे सोडू नको! काय हा भारी तुझा पण खर्ज 'रंग्या' लागला गर्दभासम रोज तू रेकायचे सोडू नको! चतुरंग
लेखनविषय:

वाचने 4994
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

हा हा हा ... :) रस्सा आणि अंगणी पडणारे केस आवडले. -- लिखाळ.

रंगाशेठ, एकदम जब्राट विडंबन.. चालू दे.. केशवसुमार

नेहमीप्रमाणेच मस्त. काय हा भारी तुझा पण खर्ज 'रंग्या' लागला गर्दभासम रोज तू रेकायचे सोडू नको! ..... खरंच भारी!! राघव

संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको! अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको! मस्त रे रंगा! :) तात्या.

चालू द्या. हे आपले म्हणायचे म्हणून, हे आम्ही सांगण्यासाठी तुम्ही थोडेच थांबणार आहात... ;)

पाहिजे तर काढ सदरा सोड दोंदा मोकळे बावळ्या 'सलमान'ची जिरवायचे सोडू नको! =)) =)) लै भारी इडंबन ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

"केस हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी रोज तू गच्चीवरी 'कोंबा'यचे सोडू नको! काय झाले सदनिकांतुन लोक पळती शेकडो? तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको!" बारीक निरीक्षण. प्र. के. अत्रेंची आठवण झाली. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

चतुरंगराव, एकदम झकास विडंबन.

जबरी विडंबन. आवडले.. =)) =D> आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

झकास विडंबन... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

मस्तच ! :) --अवलिया

मूळ कविता नाही वाचली, तरी स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणुन सुद्धा कविता आवडली .

In reply to by नंदन

गॉन-केस आवडलं. तुझ्या दुःखात लांबूनच सहभागी आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

मस्तच विडंबन! गॉन केस (काका) लोकांना सहानुभूतीदेखील दर्शवून घेते.

संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको! अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको! मलाबी हेच आवडले !