मिल्या ह्यांची अप्रतिम गजल 'सोडू नको' ही वाचल्यावर विडंबनधर्मा सोडू नको असे आमच्या मनाने बजावलेच! ;)
संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको!
अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको!
तू तिच्यापासून नक्की वाचशी, सांगू कसे?
हेलमेटा रोज तू घालायचे सोडू नको!
केस हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी
रोज तू गच्चीवरी 'कोंबा'यचे सोडू नको!
काय झाले सदनिकांतुन लोक पळती शेकडो?
तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको!
पाहिजे तर काढ सदरा सोड दोंदा मोकळे
बावळ्या 'सलमान'ची जिरवायचे सोडू नको!
काय हा भारी तुझा पण खर्ज 'रंग्या' लागला
गर्दभासम रोज तू रेकायचे सोडू नको!
चतुरंग
वाचने
4994
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा ...
हा हा हा
रस्सा, सलमान आणि
रस्सा, थिरकणे
खि: खि: खि:..
संपला
वा
पाहिजे तर
मस्तच
एक नंबर
(विषय दिलेला नाही)
कोंबायचे !!
प्रतिसाद देण्याचे न सोडलेल्या आणि सोडलेल्या
लय लय भारी...
जबरी
झकास
मस्तच !
लै भारी
भारी
(समदु:खी गॉन-केस) नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आवडले
In reply to भारी by नंदन
हेहेहे
In reply to आवडले by श्रावण मोडक
मजा आली वाचतांना !