✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मध्यम वर्ग: मतदान प्रति अनास्था

व
विवेकपटाईत यांनी
Tue, 04/30/2024 - 17:03  ·  लेख
लेख
गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा. मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स. हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन ते पाच हजार मतदार असल्याने चुनाव आयोगाने अनेक हाउसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मतदान केंद्र स्थापित केले गेले होते. सोसायटीतल्या एसी क्लब हाऊस मध्ये बसण्याची व्यवस्था. चहा, कॉफी, थंड पेय समोसे, बिस्कीट इत्यादी ही. एसी रूम्स मध्ये मतदान केंद्र. आता फक्त फ्लॅट मधून बाहेर निघून, लिफ्ट ने उतरून, पन्नास पाऊले चालून, एसीत खुर्च्यांवर बसून, दोन चार मिनिटे एसीत उभे राहून मतदान करायचे. तरीही अधिकांश जागी ४५ टक्के पेक्षा कमीच झाले असेल. गौतम बुध्द नगर येथे ५३ टक्के मतदान अनधिकृत वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या संघटीत मतदरांमुळे शक्य झाले. असे म्हणता येईल. देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहे? खरे तर सर्वात जास्त मतदान शिक्षित मध्यम वर्गाने केलें पाहिजे. मतदान कमी झाल्याचे पहिले कारण २६ एप्रिलला शुक्रवार होता. अनेक रहिवासी २५ ला रात्री किंवा २६ ला पहाटे कारने पहाड़ी हवेचा आनंद घ्यायला निघूंन गेले. आजकाल उत्तम रस्त्यांमुळे चार पाच तांसात मसूरी पोहचता येते. कॉर्बेट इत्यादी तीन तासांत. शिक्षित मध्यम वर्गाला तीन दिवसांचा सुट्टीचा आनंद पाच वर्षातून होणाऱ्या मतदानापेक्षा श्रेष्ठ वाटला. बाकी उरलेल्या अर्ध्यांचे विचार सरकार कुणाचीही बनो, आपले काय जाते. पहिला प्रश्न जो नेहमीच माझ्या मनात येतो मतदान करणारे अल्प साक्षर आणि मतदान न करणारे अत्याधिक साक्षर. या पैकी शिक्षित कुणाला म्हणावे? देशात अस्थिरता आली तरी मेहनत करून रोटी खाणाऱ्यापाशी काम राहील. पण शिक्षित मध्यम वर्ग सर्वात आधी बेरोजगार होणार. एवढे साधे गणित ही मध्यम वर्गाला कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. पण सरकार वर टीका टिप्पणी करण्यात हा वर्ग पटाईत असतो. मला आठवते १२ वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या एका नातेवाईकाने मी पंतप्रधान कार्यालयात काम करतो हे माहित असताना ही रात्री जेवताना सरकार वर विशेषकरून प्रधानमंत्री वर टीका टिप्पणी सुरू केली. मला ते आवडले नाही. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही मतदान केले होते का? त्यांनी उत्तर दिले, ते मतदान करत नाही. कारण मतदान केल्याचा मध्यम वर्गाला काही एक फायदा होत नाही. मी त्यांना स्पष्टपणे म्हटले, जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. त्यांना वाईट वाटले. पण पुढील दोन दिवस त्यांनी सरकार पर एकही टिप्पणी केली नाही. जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49811 वाचन

💬 प्रतिसाद (250)

प्रतिक्रिया

सर जी

सुबोध खरे
गुरुवार, 05/16/2024 - 19:28 नवीन
सर जी दळभद्री कम्युनिस्ट/ समाजवादी विचारसरणी चा हा एक मोठा मानसिक अडथळा असतो. संगणक आले तेंव्हा त्यांनी धाय मोकलून रडारड केली कि आता यंत्रामुळे हातानं काम मिळणार नाही. पुढे काय झालं चिडू काकांनी डिजिटायझेशन बद्दल रडारड केली होती कि गरीब कष्टकरी महिला विक्रेत्यांकडे पैसे घ्यायला इंटरनेट असेल का? डिजिटल पेमेंट सामान्य माणसांना परवडेल का? आज जगात सर्वात जास्त डिजिटल पेमेंट भारतात होतात. आणि १२ रुपये द्यायचे असले तरी भाजीवाले पेटीएम चा क्यू आर कोड पुढे करतात. वैचारिक बद्धकोष्ठ नि झापडबंद वृत्ती असल्यामुळे असं होतं. रेल्वेची पायाभूत साधने रेल्वेमार्ग, रूळ, सिग्नलिंग सिस्टीम १०० वर्षे जुनी झालेली होती त्यामुळे वारंवार बिघडत असे ती बदली करणे आवश्यक होते यासाठी पैसे कुठून येणार होता? मतांसाठी गरीब पिछडे वर्ग याबद्दलची केवळ रडारड केली जाते. पण रेल्वेचे आधुनिकीकरण झाल्यामुळे वाचणारा वेळ आणि श्रमशक्ती याचे गणित काही वाममार्गी लोकांना करता येत नाही. त्यामुळे हे डावे लोक कालबाह्य झाले आहेत. पण ते सुधारणार नाहीतच रेल्वेचे आधुनिकीकरण झाले नसते तर ती प्रणाली मोडून पडली असती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

संगणक आले तेंव्हा त्यांनी धाय

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/16/2024 - 19:38 नवीन
संगणक आले तेंव्हा त्यांनी धाय मोकलून रडारड केली कि आता यंत्रामुळे हातानं काम मिळणार नाही. भाजपेयींनी संगणकाला विरोध म्हणून बैलगाडी यात्रा काढली होती ना?? आता भांडवलशाहीचे ठेकेदार बनले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भुजबळ बुवा

सुबोध खरे
गुरुवार, 05/16/2024 - 19:41 नवीन
भुजबळ बुवा प्रत्येक ठिकाणी आपण पचकलंच पाहिजे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

जिथे जिथे खोट पचकणार, तिथे

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/16/2024 - 19:59 नवीन
जिथे जिथे खोट पचकणार, तिथे तिथे आम्ही लिहिणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सुबोध खरे

सर टोबी
गुरुवार, 05/16/2024 - 19:57 नवीन
हा सगळा डोलारा कोसळून पडायला जो वेळ लागेल तेव्हडा द्यावा लागेल ना! आणि एखादा विचार पटत नसेल तर द्याना सोडून. कशाला दुसऱ्यांची मानहानी करण्यात भूषण मानता आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कोविडच्या काळात मुंबई

सुबोध खरे
गुरुवार, 05/16/2024 - 19:18 नवीन
कोविडच्या काळात मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस जी बंद केली ती अजून सुरु केली नाहीय. हायला काहीही फेकायचं का? गेली दोन अडीच वर्षे मी रोज सकाळी कोयना एक्सप्रेस कोल्हापूर कडे जाताना आणि संध्याकाळी परत येताना पाहतोय. रेल्वे रूळ माझ्या दवाखान्याच्या समोरच आहेत हां, अजूनही तिला डिझेलचं इंजिनचा लावलेलं दिसतंय WDP ४ D. कदाचित कोल्हापूर पर्यंत विद्युतीकरण पूर्ण झालेला नसावं ११०२९ गुगलून पहा म्हणजे आजची गाडी कुठवर आली (current status) आहे ते सुद्धा स्पष्टपणे कळेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

०१०२९/०१०३० या क्रमांकाने

सुबोध खरे
गुरुवार, 05/16/2024 - 19:36 नवीन
०१०२९/०१०३० या क्रमांकाने कोयना एक्सप्रेस कोविड काळातही चालू होती असे स्पष्ट दिसते आहे. तुमच्या साठी हा व्हिडीओ सुद्धा दिला आहे. https://www.youtube.com/watch?v=-HJd_gxI2H4 सर टोबी जरा माहिती तरी अस्सल असू द्या उगाच नाक्यावर काहीतरी ऐकून इथे फुक्या मारल्या तर तोंडघशी पडायला होतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सह्याद्री एक्सप्रेस

सर टोबी
गुरुवार, 05/16/2024 - 19:50 नवीन
हे नाव मला आठवले नाही. हि गाडी अजूनही बंद आहे असे समजते. सर्वसाधारण तपशिल बरोबर असेल तर नेमकं कुणाला काय म्हणायचं आहे हे माणसं समजून घेतात. पण तो सभ्यपणाचा भाग झाला नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पण तो सभ्यपणाचा भाग झाला नाही

कांदा लिंबू
गुरुवार, 05/16/2024 - 20:59 नवीन
पण तो सभ्यपणाचा भाग झाला नाही का
लिहिण्याच्या आधी विचार करणे लिहिण्याच्या नंतर विचार करणे यातला सभ्यपणा कोणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

सुप्रिया सुळे यांची आई बार

सुबोध खरे
Fri, 05/17/2024 - 09:43 नवीन
सुप्रिया सुळे यांची आई बार मध्ये काम करत असे राहुल गांधी हे नाव मला आठवले नाही. सर्वसाधारण तपशिल बरोबर असेल तर नेमकं कुणाला काय म्हणायचं आहे हे माणसं समजून घेतात. पण तो सभ्यपणाचा भाग झाला नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

नकारत्मक बघायचे आहे तर कोण काय करणार ,

चौकस२१२
गुरुवार, 05/16/2024 - 15:55 नवीन
मग कोणत्या विशेष गुणांच्या आधारे परकीय देश भारतात उत्पादन घेणार आहेत? भारतीय ब्रँड : ऑस्ट्रेल्या सारखया छोट्या देशात शुद्ध महिंद्रा आणि टाटा ट्रॅक्टर आणि आता गाड्या विकते अप्रत्यक्ष निर्यात: ऑस्ट्रेल्या सारखया छोट्या देशात सुझुकी छोटी गाडी मिळत ती मेद इन इंडिया आहे भारत फोर्ज सारखी कंपनी जगातील उच्च वाहक उत्पादकांना कधी पासून पूर्वतः करीत आहे कोळपूर मधील हि कंपनी बघा यूरोप ला उत्पादन पाठवते तुम्हाला सगळे नकारत्मक बघायचे आहे तर कोण काय करणार , आणि हो आज जर काँग्रेस सरकार असते आणि त्यांनी धोरणे आखून अश्या निर्यातीला प्रोत्सहन दिले असते तराही माझ्य सारख्याने त्याचे कौतिकचह केले असते भाजप सोडा बार्हताचं आधीचं सरकारे सुद्धा परदेशी उद्योगांना भारतात प्रवेश देताना " येतेच बनवा" असे धोरण ठेवले होते , सिमेन्स चे उद्धरण घ्या १०० हुन अधिक वर्षे भारत्तात ती उप्त्पादन बनवते उगाच भाजप आणि मोदी दिवशी म्हणून भारतटाने केलेलया प्रगतीला भारतात बसूनच नावे ठेवायची वाह रे देशभक्त तेव्हा उघडा डोळे आणि बघा नीट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

टाटा महिंद्रा तर मोठे उद्योग

चौकस२१२
गुरुवार, 05/16/2024 - 15:59 नवीन
टाटा महिंद्रा तर मोठे उद्योग झाले कोल्हापुरातील हे पहा निर्यात करणारे https://datta.co.in/industries/index.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

ह्या विषयावरील, तुमचे सगळे मुद्देसूद प्रतिसाद आवडले....

मुक्त विहारि
गुरुवार, 05/16/2024 - 17:29 नवीन
संयमित भाषेचा अतिशय उत्तम वापर केला आहात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

उपयोग आहे का संयमित भाषेचा..

अहिरावण
गुरुवार, 05/16/2024 - 19:19 नवीन
उपयोग आहे का संयमित भाषेचा.. लाथों के भुत... बातोंसे नही मानते... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कला पित्ताशयावर निर्बंध थोडा

चौकस२१२
Wed, 05/15/2024 - 13:51 नवीन
कला पित्ताशयावर निर्बंध थोडा लाल असले तर त्याचा देशाला फायदाच कि टंकलेखन गुगल मराठी मधून करताना असे काही तरी असंबद्ध होते
  • Log in or register to post comments

भुके नंगे रहेंगे ! राहुल जी

अहिरावण
Wed, 05/15/2024 - 19:33 नवीन
भुके नंगे रहेंगे ! राहुल जी को जिताएंगे !!
  • Log in or register to post comments

भुके नंगे रहेंगे ! राहुल जी

कांदा लिंबू
Fri, 05/17/2024 - 11:00 नवीन
भुके नंगे रहेंगे ! राहुल जी को जिताएंगे !!
अरे देवा! त्यांच्यावर आता ही पाळी आलीय? एकेकाळी ते आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे ! असं म्हणायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

भुके नंगे रहेंगे ! राहुल जी

गवि
Fri, 05/17/2024 - 12:50 नवीन
भुके नंगे रहेंगे ! राहुल जी को जिताएंगे !!
क्रॉनोलोजी चुकतेय का अगदीच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

क्रोनोलोजी सोडा ! रिदम बघा !!

अहिरावण
Fri, 05/17/2024 - 12:52 नवीन
क्रोनोलोजी सोडा ! रिदम बघा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

क्रोनॉलोजी सुधारली म्हणजे

गवि
Fri, 05/17/2024 - 13:01 नवीन
क्रोनॉलोजी सुधारली म्हणजे वाक्यातील घटनांचा उलट क्रम केला, म्हणजेच कृती आणि परिणाम असा नैसर्गिक क्रम लावला तरी तुमचा रिदम उत्तम टिकतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

हाण तेज्यायला

अहिरावण
Fri, 05/17/2024 - 13:02 नवीन
हां तसे होय हरकत नाही ... राहुलजी को जिताएंगे ! भुके नंगे रहेंगे !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

क्रोनोलोजी सोडा ! रिदम बघा !!

कांदा लिंबू
Fri, 05/17/2024 - 13:17 नवीन
क्रोनोलोजी सोडा ! रिदम बघा !!
काय अहिरावण हे? गविंचं म्हणणं पटकन कळलं नाही तुम्हाला? पहा, रागांच्या नामोच्चाराने कशी भल्या भल्यांची भंबेरी उडते ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

मला भुके नंगे च्या ऐवजी नंगे

अहिरावण
Fri, 05/17/2024 - 13:26 नवीन
मला भुके नंगे च्या ऐवजी नंगे भुके असा प्रयोग करा असे वाटले. गवींचे म्हणणे समजायाला वेळ लागतोच त्यात रागांचा उल्लेख... समजुन घ्या ! आता लक्षात आले ७० वर्षे देश का हळू हळू चालत होता.. कुछ तो बात है की नींद आ ही जाती है !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कांदा लिंबू

+१०८

कांदा लिंबू
Fri, 05/17/2024 - 13:11 नवीन
क्रॉनोलोजी चुकतेय का अगदीच?
येक नंबर, गवि!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

संगणकास विरोध म्हणून बैलगाडी .... ? टोटल लागंत नाय !

नठ्यारा
Sat, 05/18/2024 - 00:48 नवीन
अमरेन्द्र बाहुबली,
भाजपेयींनी संगणकाला विरोध म्हणून बैलगाडी यात्रा काढली होती ना?? आता भांडवलशाहीचे ठेकेदार बनले.
मला काहीतरी वेगळंच सापडलं. वाजपेयी पेट्रोल व रॉकेलच्या भडकत्या किंमतींच्या विरोधात रोष प्रदर्शित करण्यासाठी इ.स. १९७३ साली बैलगाडीतनं संसदेत दाखल झाले होते. त्याचा राजीव गांधींच्या संगणकीकरणाशी ( इ.स. १९८५ नंतर ) कसलाही संबंध नाही. संदर्भ : https://www.indiatoday.in/fact-check/story/fact-check-why-atal-bihari-vajpayee-arrived-parliament-bullock-cart-1699474-2020-07-11 -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

राजीव गांधी बैलगाडीत संगणक

रामचंद्र
Sat, 05/18/2024 - 05:00 नवीन
राजीव गांधी बैलगाडीत संगणक घेऊन शेतकऱ्यांच्या भेटीला आलेत असं त्या काळात एक व्यंगचित्र पाहिल्याचं आठवतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

अवांतर : बैलगाडीवर आक्षेप का

नठ्यारा
Sat, 05/18/2024 - 18:04 नवीन
अवांतर : माझ्या मते बैलगाडी हे अतिशय उपयुक्त वाहन आहे. शेतकऱ्यास वा शेतमालास नजीकच्या केंद्रावर जाण्यासाठी बरं पडतं. उगीच मोटारवाहन व इंधनावलंबन वाढवायचं कशाला. काम होत असेल तर काय वाईट आहे. मला एकदा अत्याधुनिक बैलगाडीचं आरेखन पाहिल्याचं आठवतं. हे असं काहीतरी ( इंग्रजी दुवा ) : https://www.downtoearth.org.in/coverage/bullock-cart-in-its-new-avatar-12232 -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

सोलापूरच्या अरुण

रामचंद्र
Sat, 05/18/2024 - 19:38 नवीन
सोलापूरच्या अरुण देशपांड्यांनी बैलाला कमीत कमी त्रास होईल अशा रीतीने त्यांच्याकडून काम करून घेणारा 'बैझेल' पॉवर टिलर तयार केल्याचं अवचटांच्या लेखात वाचल्याचं आठवतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

+१

गवि
Sat, 05/18/2024 - 19:47 नवीन
+१ अगदी हेच आठवले. रुरर्बनायझेशन हा शब्द पण. असे प्रयोग (उदा मिनिमलिझम, स्वावलंबन, खेड्यात जाऊन आधुनिक वस्ती) प्रत्यक्षात बघू जाता एकेका व्यक्तीने किंवा कुटुंबाने आदर्श रित्या केलेले पण स्केलेबल होण्याच्या दृष्टीने बहुतांश वेळा फसलेले दिसतात. खेड्यात स्वतः पुरती शेती आणि राहणे अशी कॉलनी, शहरातील एलिट लोक बुक देखील करतात पण प्रत्यक्षात राहायला कोणी जात नाही. कारणे शोधणे रोचक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

बरोबर

हणमंतअण्णा शंक…
Sat, 05/18/2024 - 19:55 नवीन
बोरडम. मागासलेपणा. शिस्तीचा अभाव. चोंबडेपणा. अकार्यक्षमता. स्वातंत्र्य. संधी. यांचे व्यत्यास म्हणून तर शहरे तयार होत असतात नैसर्गिकपणे. बहुतेक लोकांना सोयी सुविधा नसल्या तरी चालतील पण वर वरील गोष्टींशी डील करणे अवघड जाते. ज्यांना जमते तेच उलटं मायग्रेशन करू शकतात. उदा. आमच्या रावळगुंडवाडीत भैरोबा एक महिनाभर शिकारीला जातो तेव्हा तो परत येईपर्यंत गावात मटण खात नाहीत. आयला याला काय लॉजिक आहे काय कुणास ठाऊक. तो गेला तर आपण का खायचे नाही हे काय कळत नाही. भैरोबा स्वतः शिकारीला जातो. म्हणजे तो नॉनव्हेज असणार. तरीही लिंगायतांनी त्याला पार व्हेजच करून टाकला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अगदी बरोबर

स्वधर्म
Mon, 05/20/2024 - 19:01 नवीन
आपल्या लहानपणी होतं तसं स्वप्नातलं गांव कुठेही नसतं, हे नीट पचवायला यायला पाहिजे. आणखी एक कारण म्हणजे खेड्यातील समाजाचा आडमुठेपणा. उदा. आमच्या शेतावर जाण्यासाठी एक दोन किमीचा रस्ता आहे. त्याची वर्षानुवर्षे दुरावस्था आहे. लोकांच्या पाठी आणि गाड्या दोन्ही मोडत आहेत. मंजूरीहि मिळाली आहे. तरी हे होत नाही, कारण सुरूवातीचे दोन तीन शेतकरी त्यांची थोडीशी जागा रस्त्याच्या गटारीसाठी द्यायला तयार नाहीत, जरी रस्त्यासाठी त्यांच्या वाडवडीलांनी दिली आहे. जि. प. गटारासाठी जागा असल्याशिवाय रस्ता करत नाही. परिणामी पुढे घर व शेत असलेल्या पन्नासएक लोकांना तो रस्ता तसाच वापरत रहावे लागते. जे अडवणूक करत आहेत, त्यांची शेत व घरे सुरूवातीलाच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

या बाबतीत एकेकटे पण स्वतंत्र

रामचंद्र
Sat, 05/18/2024 - 23:46 नवीन
या बाबतीत एकेकटे पण स्वतंत्र बुद्धीने यशस्वी अशीच उदाहरणे अधिक दिसतात हे खरं आहे. उदा. द बेटर इंडियामधील बहुतांश यशोगाथा. तेच प्रारूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाल्याची उदाहरणे त्यामानाने नाहीतच. मग या संदर्भात इस्रायली किबुत्झ पद्धत कशी यशस्वी ठरली ते पाहणं उद्बोधक ठरेल. मुळात शेतीआधारित काय किंवा अन्य कुठलाही प्रकल्प हा भक्कम विपणनयंत्रणेशिवाय तोट्यातच जाण्याची शक्यता असते हे स्पष्ट आहे. हे असं का होतं ते काही मिपाकर (बहुधा मुक्त विहारी) स्वानुभवावरून सांगू शकतील. यातही भांडवलशाहीप्रमाणे स्वयंप्रेरणा आणि व्यक्तिगत प्रयत्न हेच यशाला कारणीभूत ठरतात असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सर्व वाचकांना आणि प्रतिसाद

विवेकपटाईत
Wed, 11/27/2024 - 11:44 नवीन
सर्व वाचकांना आणि प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद. महाराष्ट्र विधान सभेत 66 टक्के मतदान झाले. एका रीतीने माझ्या लेखनाचा प्रभाव थोडा बहुत पडला असे वाटते.
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र विधान सभेत 66

अमरेंद्र बाहुबली
Wed, 11/27/2024 - 11:46 नवीन
महाराष्ट्र विधान सभेत 66 टक्के मतदान झाले विशेष म्हणजे. ५ पर्यंत कमी मतदान होतं नी पुढील एका तासात अचानक ७ ते ८ टक्क्यांनी वाढलं. विश्वगुरू मोदीजींच्या राज्यात काय काय चमत्कार होतात नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Tue, 12/10/2024 - 04:08 नवीन
मनोरंजक प्रतिसाद... आपल्याला, एखाद्या उत्तम मार्गदर्शकाची नितांत गरज आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खरं आहे.

श्रीगुरुजी
Tue, 12/10/2024 - 08:15 नवीन
खरं आहे. मॅरॅथॉनचे ४२ किमी ३०० मी. अंतर २ तास २० मिनिटात पूर्ण करणारा धावपटू २ तास १० मिनिटात ३८ किमी धावतो व उर्वरित ४ किमी ३०० मी. फक्त १० मिनिटात कसे धावतो हे समजणे ज्यांच्या आवाक्यात नाही, त्यांना मतांची टक्केवारी समजणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अगदी अगदी....

मुक्त विहारि
Tue, 12/10/2024 - 08:45 नवीन
अगदी... अगदी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आकडेवारीनुसार विश्लेषण केले

श्रीगुरुजी
Tue, 12/10/2024 - 09:06 नवीन
आकडेवारीनुसार विश्लेषण केले तर, पहिल्या १० तासात ५ वाजेपर्यंत ५८.३३% मतदारांनी मत दिले होते. म्हणजे प्रति तास सरासरी ५.८३% मते. मग उर्वरित १ तासात या वेगाने अजून ५.८३% मते पडून एकूण मते ६४.१६% असायला हवी. परंतु ६ वाजता मत देणे थांबत नाही. ६ वाजता रांगेत उभे असलेल्या प्रत्येकाला मत देण्यासाठी संधी द्यावी लागते. ही रांग म्हणजे विद्युत मंडळाच्या खिडकीसमोर शुल्क भरण्यासाठी उभे असलेल्यांची रांग नसते. विद्युत मंडळ ४ वाजले किंवा कामाची अधिकृत वेळ संपली की रांगेत अजून किती माणसे उभी आहेत याची पर्वा न करता वेळ संपली, उद्या या असे सांगून तोंडावर खिडकी लावून घेतात. निवडणूक केंद्राबाहेर ६ वाजता रांगेत असलेल्या प्रत्येकाला मत देण्याची संधी द्यावी लागते. म्हणजे मत देण्याची अधिकृत वेळ ६ वाजता संपत असली तरी प्रत्यक्ष प्रक्रिया अजून ३०-४० मिनिटांनंतर संपते. म्हणजे ५ वाजल्यानंतर पुढील दीड तासात अंदाजे ८.७५% मते अधिक आधीची ५८.३३% मते मिळून ६७.०८% टक्केवारी होते व निवडणूक आयोगाने जाहीर केलेले आकडे या टक्केवारीच्या जवळपास आहेत. अर्थात शिळ्या वडापाववर दिवस काढत 'आवाज कोणाचा' अश्या, उन्हात उभे राहून दिवसभर घोषणा देणाऱ्यांना हे समजणे त्यांच्या आवाक्यात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

४ ते ५ वेळा आयोगाने वेगवेगळी

अमरेंद्र बाहुबली
Tue, 12/10/2024 - 09:16 नवीन
४ ते ५ वेळा आयोगाने वेगवेगळी आकडेवारी सांगितली. दुसऱ्या दिवशी तर अजूनच वेगळी सांगितली. अर्थात आयोगच भाजप धार्जिणा असल्याने आयोगाच्या फेरफारीचे समर्थन करण्याची भाज समर्थकात चढाओढ लागलेली असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Tue, 12/10/2024 - 11:24 नवीन
मनोरंजक प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मागील वर्षाची बातमी. ० मते

अमरेंद्र बाहुबली
Tue, 12/10/2024 - 09:18 नवीन
मागील वर्षाची बातमी. ० मते मिळाली उमेदवाराला. हा झोल नाही तर काय? काळजी भाजप उमेदवारा सोबत होते का असे? Image removed.
  • Log in or register to post comments

राज्यात इव्हिएम विरोधात

अमरेंद्र बाहुबली
Tue, 12/10/2024 - 09:22 नवीन
राज्यात इव्हिएम विरोधात वातावरण असताना, शिवसेनेने धुळे शहरात इव्हीएमची अंत्ययात्रा काढली. https://youtu.be/vQjgixYUqDs
  • Log in or register to post comments

तुम्ही डोक्यावर टापशी बांधून

श्रीगुरुजी
Tue, 12/10/2024 - 09:34 नवीन
तुम्ही डोक्यावर टापशी बांधून हातात मडके घेऊन असाल. पण ही मविआ पक्षांची अंत्ययात्रा होती हे समजलं नसेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मविआ पक्षांची. - चूक.

अमरेंद्र बाहुबली
Tue, 12/10/2024 - 09:43 नवीन
मविआ पक्षांची. - चूक. लोकशाहीची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

लोकशाहीची चूक

वामन देशमुख
Tue, 12/10/2024 - 10:06 नवीन
लोकशाहीची चूक दुरुस्त करा दुरुस्त करा...! मविआला मोडीत काढा मोडीत काढा...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मनुवाद्याना

अमरेंद्र बाहुबली
Tue, 12/10/2024 - 10:08 नवीन
मनुवाद्याना मोठे करा मोठे करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

सारखे कुठेही संताजी-धनाजी

वामन देशमुख
Tue, 12/10/2024 - 10:27 नवीन
सारखे कुठेही संताजी-धनाजी दिसल्यासारखे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अबांचे तसेच झाले आहे.....

मुक्त विहारि
Tue, 12/10/2024 - 11:29 नवीन
त्यांना अजूनही, पराभव पचवता आलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

तुम्हाला "उबाठा" सेना असे म्हणायचे आहे का?

मुक्त विहारि
Tue, 12/10/2024 - 11:27 नवीन
धनुष्य आणि बाण, हे चिन्ह असलेली, एकनाथ शिंदे, यांची खरी शिवसेना.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खो खो खो!

अमरेंद्र बाहुबली
Tue, 12/10/2024 - 11:58 नवीन
खो खो खो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा