"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
वाचने
124047
प्रतिक्रिया
590
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to कल्पना विलासात खुश रहा. by वेडा बेडूक
भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादाला by सुबोध खरे
भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन
In reply to भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन by अमरेंद्र बाहुबली
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन by कांदा लिंबू
भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादाला by सुबोध खरे
उपदेशोही मूर्खाणां प्रकोपाय न
In reply to भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन by अमरेंद्र बाहुबली
ना केजरीवाल नें मांगी इन्सुलिन....
याना आवरा राव...
हा हा हा. हिंदी लिंकांची
In reply to याना आवरा राव... by सामान्य माणूस
ईडी सरळ भाजप मध्ये का
तुमच्या
In reply to ईडी सरळ भाजप मध्ये का by अमरेंद्र बाहुबली
मी राजनेता नाही
In reply to तुमच्या by वेडा बेडूक
केजरीवालना तुरुंगात इन्सुलिन
शराब नीति घोटाला केस में बढ़ सकती है केजरीवाल की मुश्किलें, जल्द
'क्या आप UN के मेंबर हैं?', 75 हजार जुर्माना लगाकर HC ने रद्द की
आप झूठ बोल रहे हैं` - अरविंद केजरीवाल की तिहाड़ जेल सुपरिटेंडेंट
केजरीवाल ७ मे पर्यंत तुरूंगातच
ये तो होना ही था...
In reply to केजरीवाल ७ मे पर्यंत तुरूंगातच by चंद्रसूर्यकुमार
दिल्ली शराब कांड....
गिरफ्तारी पर रोक नहीं थी, 9 बार समन को टाला', केजरीवाल की अर्जी
'सीएम हैं तो क्या गिरफ्तार नहीं होंगे केजरीवाल', ED ने SC में हल
साडेचारशे प्रतिसाद बघून ....
साडेचारशे प्रतिसाद बघून ....
केजरीवाल को लेकर संजय सिंह का डर अपनी जगह, लेकिन ED के आरोप तो ब
दिल्ली हाईकोर्ट की कड़ी फटकार,'केजरीवाल ने निजी हित को ऊपर रखा,
केजरीवाल ने इस्तीफा न देकर निजी हित को राष्ट्रहित से ऊपर रखा', द
In reply to दिल्ली हाईकोर्ट की कड़ी फटकार,'केजरीवाल ने निजी हित को ऊपर रखा, by मुक्त विहारि
महाराष्ट्रात मविआचे पारडे जड
In reply to केजरीवाल ने इस्तीफा न देकर निजी हित को राष्ट्रहित से ऊपर रखा', द by मुक्त विहारि
किंवा....
In reply to महाराष्ट्रात मविआचे पारडे जड by अहिरावण
जेल में केजरीवाल, पत्नी सुनीता ने दिल्ली में किया पहला रोड शो, ज
नजरेतुन उतरले?
In reply to जेल में केजरीवाल, पत्नी सुनीता ने दिल्ली में किया पहला रोड शो, ज by मुक्त विहारि
सुरुवातीला, अण्णांचा पाठिंबा होता...
In reply to नजरेतुन उतरले? by अहिरावण
अण्णांमुळे विश्वास? आमचा तर
In reply to सुरुवातीला, अण्णांचा पाठिंबा होता... by मुक्त विहारि
सौ. सुनिताक ह्यानाही मोदिनी
In reply to जेल में केजरीवाल, पत्नी सुनीता ने दिल्ली में किया पहला रोड शो, ज by मुक्त विहारि
मोदी म्हणजे कायदा नाही...
In reply to सौ. सुनिताक ह्यानाही मोदिनी by अमरेंद्र बाहुबली
इड़ी ला पाहून?
In reply to मोदी म्हणजे कायदा नाही... by मुक्त विहारि
केजरीवाल-केजरीवाल Yes पापा...महाठग सुकेश ने तिहाड़ से फिर लिखी च
दिल्ली CM पर ‘सिख फॉर जस्टिस’ समेत खालिस्तानी संगठनों से 133 करो
Delhi LG Saxena seeks NIA probe against Kejriwal for receiving f
मराठी वृत्तपत्रे म्हणजे गोदी
In reply to Delhi LG Saxena seeks NIA probe against Kejriwal for receiving f by मुक्त विहारि
हे नक्की का?
In reply to मराठी वृत्तपत्रे म्हणजे गोदी by अमरेंद्र बाहुबली
केजरीवाल के जेल से सरकार चलाने की याचिका HC से खारिज
जेल जाने के बाद भी CM पद क्यों नहीं छोड़ा? अरविंद केजरीवाल ने ख
ईडी सारख्या भाजपसाठी काम
In reply to जेल जाने के बाद भी CM पद क्यों नहीं छोड़ा? अरविंद केजरीवाल ने ख by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to ईडी सारख्या भाजपसाठी काम by अमरेंद्र बाहुबली
भुजबळ बुवा
In reply to ईडी सारख्या भाजपसाठी काम by अमरेंद्र बाहुबली
केजरीवाल ने देश को दीं 10 गारंटी
आणि लोकांना, फुकट का द्यायचे?
In reply to केजरीवाल ने देश को दीं 10 गारंटी by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to आणि लोकांना, फुकट का द्यायचे? by अमरेंद्र बाहुबली
केजरीवाल सरकार ने किया 1300 करोड़ का क्लासरूम घोटाला:विजिलेंस डाय
In reply to केजरीवाल ने देश को दीं 10 गारंटी by मुक्त विहारि
DJB Scam: क्या है दिल्ली जल बोर्ड घोटाला? जिसमें केजरीवाल को मिल
In reply to केजरीवाल ने देश को दीं 10 गारंटी by मुक्त विहारि