Skip to main content

ती आणि तो .

लेखक जागु यांनी मंगळवार, 12/05/2009 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
ती : नेहमीच राहतोस एकाकी ,भग्न, चेहर्‍यावर शोधत प्रश्नचिन्ह, साचवत असतोस सदा एकांत ! तो : कुणी नसे मज, मला एकटेपण कुणासाठी मी नसे साजण विश्वच सारे मजसाठी दुष्मन ती : का आणिलेस स्वतःस एकाकीपण मी आहे तुझीच साजण विश्वात कोण तुज दुष्मन ? तो : कुणासही नसे माझे भान घरी-दारी नसे मज मान कुणीच ना म्हणे मज छान ! ती (नियती) : तू कुणाचे ठेवलेस भान घरी दारी दिला कुणास मान ? कुणास तू म्हटलास छान ? प्रत्येकास आपलं मान, प्रेमाचं कर तु दान, क्षमेसाठी धर कान ! तो : उघडले आता माझे कान ! उमगली मज हे गुढ सान अहंभाव हा पेटवितो रान
लेखनविषय:

वाचने 2514
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

In reply to by अनंता

अहंकार आत्मीयतेला नेहमीच मारकठरतो. वास्तवदर्शी कविता. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** http://www.agnisakha.blogspot.com

तू कुणाचे ठेवलेस भान घरी दारी दिला कुणास मान ? कुणास तू म्हटलास छान ? एक नंबर! मस्त! -संदीप. काय'द्याच बोला.

"अहंभाव हा पेटवितो रान" नो इगो. म स्त. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)