ती आणि तो .
लेखनविषय:
ती :
नेहमीच राहतोस एकाकी ,भग्न,
चेहर्यावर शोधत प्रश्नचिन्ह,
साचवत असतोस सदा एकांत !
तो :
कुणी नसे मज, मला एकटेपण
कुणासाठी मी नसे साजण
विश्वच सारे मजसाठी दुष्मन
ती :
का आणिलेस स्वतःस एकाकीपण
मी आहे तुझीच साजण
विश्वात कोण तुज दुष्मन ?
तो :
कुणासही नसे माझे भान
घरी-दारी नसे मज मान
कुणीच ना म्हणे मज छान !
ती (नियती) :
तू कुणाचे ठेवलेस भान
घरी दारी दिला कुणास मान ?
कुणास तू म्हटलास छान ?
प्रत्येकास आपलं मान,
प्रेमाचं कर तु दान,
क्षमेसाठी धर कान !
तो :
उघडले आता माझे कान !
उमगली मज हे गुढ सान
अहंभाव हा पेटवितो रान
वाचने
2497
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
डोळे उघडणारे काव्य!!
In reply to डोळे उघडणारे काव्य!! by अनंता
सहमत.
लाइफ इ़ज
छान आहे.
तू कुणाचे
धन्यवाद.
नो