✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चला . . कविता लिहू

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 04/11/2024 - 06:50
थोडे तांदूळ ,थोडे गहू चला . . . कविता लिहू ! शब्द हाताशी, कल्पना मनाशी जमते का ? .. पाहू ! सुचलेले कागदावरचे, रुचलेले मनातले अंतऱ यातले ,कळते का ? .. पाहू ! तळातून गाळलेले ,गाळातून तळलेले ! चिडचिड संताप , मनस्तापानी भरलेले येते का बाहेर ! ? .. . पाहू ! काव्य गतीचा न्याय विचित्र मनातले लपलेले चित्र सहज निघते बाहेर का, पाहू ! सुरवात म्हणावे, की श्री गणेशा ? सहज टाकला, आला नकाशा ! आता सांगा तुम्ही, मी पुढे जाऊ ? ---------------------- अतृप्त

प्रतिक्रिया द्या
7003 वाचन

💬 प्रतिसाद (20)

वा वा! स्वागत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/11/2024 - 14:32 नवीन
मी पुढे जाऊ ?
जा...! शुभेच्छा. :) थोडे शेंगदाणे, थोडे चणे, चला...... बसून पाहू बियर हाताशी, गुदगुल्या मनाशी जमते का ? पिऊन पाहू. -दिलीप बिरुटे ( शीघ्र कवी) :)
  • Log in or register to post comments

व्वा क्या बात है!

माहितगार
गुरुवार, 04/11/2024 - 17:07 नवीन
व्वा क्या बात है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडे शेंगदाणे, थोडे चणे,

माहितगार
गुरुवार, 04/11/2024 - 17:19 नवीन
थोडे शेंगदाणे, थोडे चणे, चला...... बसून पाहू बियर हाताशी, गुदगुल्या मनाशी जमते का ? पिऊन पाहू. ~ प्राडॉ दिबि
थोडी मटकी, थोडे पोहे ईडली कुस्करून घालू पिण्यास मर्री, बिअरची तर्री चढल्यावर तसेही काय कळते चला कॉकटेल मिसळ खाऊन पाहू - कॉकटेल मिसळप्रेमी माहितगार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/11/2024 - 17:39 नवीन
मस्त...! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

थोडा चक्का...थोडी साखर

Bhakti
गुरुवार, 04/11/2024 - 17:36 नवीन
थोडा चक्का...थोडी साखर उठा चला श्रीखंड करा पाहू... आमची जैरात.. https://misalpav.com/node/52059
  • Log in or register to post comments

थोडी साय.. थोडी भक्ती माया

माहितगार
गुरुवार, 04/11/2024 - 17:50 नवीन
थोडी साय.. थोडी भक्ती माया थोडा फरसाण फक्का...सोडी पुदिना एसपीडिपीत जरा श्रीखंड भक्तीचे घालून पाहू.. :) कॉकटेल एसपीडिपी प्रेमी माहितगार .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

लिल्या , पांडुब्बा , किच्चु

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/11/2024 - 20:41 नवीन
लिल्या , पांडुब्बा , किच्चु तै , जिल्बुचा आता हिते येत नै नै नै ! :(
  • Log in or register to post comments

जिलबी ग्वाडच र्‍हातीजी

माहितगार
गुरुवार, 04/11/2024 - 23:00 नवीन
तळातून गाळलेले ,गाळातून तळलेले !
भरभरून दळण येवढी तळणं होऊन राहीली गरम तळणात ईतरांनी पण त्यांच्या जिलब्या तळून घेतली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

व्वाह, मस्तच

कर्नलतपस्वी
गुरुवार, 04/11/2024 - 21:32 नवीन
थोडे तांदूळ, थोडे गहू थोडे उडीद, थोडे मुग थोडे धणे ,थोडे चणे.... ....................चला थोड्या चकल्या पाडून पाहू
  • Log in or register to post comments

मस्तच

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/11/2024 - 21:42 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

प्रतिभा गेली.

कंजूस
Fri, 04/12/2024 - 09:08 नवीन
प्रतिभा गेली. तांब्याही गेला. ------------- लिल्या , पांडुब्बा , किच्चु तै , जिल्बुचा आता हिते येत नै नै नै ! आगोबाही पाहात नाही . हन्त हन्त नलिंनी गज उज्जहार का काय ते म्हणतात.
  • Log in or register to post comments

हा हा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/14/2024 - 10:02 नवीन
सहमत, तांब्या पाणी ब्रॅंड होता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

थोडे पाणी, थोडे पीठ

प्रचेतस
Sun, 04/14/2024 - 10:45 नवीन
थोडे पाणी, थोडे पीठ चला... तांब्या भरू कढई हाताशी, जिलब्या मनाशी पडतात का? पाहू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हायला,प्रचेतस भौ...

कर्नलतपस्वी
Sun, 04/14/2024 - 12:23 नवीन
नीं पेरणा घेऊन कवीता पाडली म्हणजे महान कवीता आहे. व्याध,क्रौंच आणी वाल्मीकी असे चित्र समोर आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हायला,प्रचेतस भौ...

कर्नलतपस्वी
Sun, 04/14/2024 - 12:23 नवीन
नीं पेरणा घेऊन कवीता पाडली म्हणजे महान कवीता आहे. व्याध,क्रौंच आणी वाल्मीकी असे चित्र समोर आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/14/2024 - 13:02 नवीन
=)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कविता उत्तम, पण तांदूळ आणि

प्रचेतस
Sat, 04/13/2024 - 10:29 नवीन
कविता उत्तम, पण तांदूळ आणि गव्हाचा कवितेशी काय संबंध आहे हे कळाले नाही. बहुधा कवीला धान्यफराळ झाल्यावरच कविता सुचतात असे म्हणायचे आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

प्रशंसनीय : 'दुर्बोधता' आणि 'प्रतिभेचा प्राणवायु'

चित्रगुप्त
Sun, 04/14/2024 - 03:38 नवीन
अरे अतृप्ता, ही कविता वाचून 'ह्यांना' दोन गोष्टी आठवल्या: १. "दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे" -- गंगाधर गाडगीळ. २. "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे" -- स.तं. कुडचेडकर ('केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक) -- तस्मात आपली प्रतिभा जिवंत ठेवण्यासाठी केलेला, काहीसा 'दुर्बोध' वाटणारा हा 'प्रयास' प्रशंसनीय आहे, असे 'ह्यांचे' म्हणणे. -- ताईसाहेब फुर्सुंगीकर.
  • Log in or register to post comments

अहो कवी,

कंजूस
Sun, 04/14/2024 - 19:43 नवीन
अहो कवी, अशी हाणा की टीकाकारांची ***** बंद होईल.
  • Log in or register to post comments

ऑ चक्क इतक्या दिवसांनी कवी

प्रमोद देर्देकर
Sun, 04/14/2024 - 20:58 नवीन
ऑ चक्क इतक्या दिवसांनी कवी महाराजांनी काव्य प्रसवले. ऍक्टिव्हधारी बुवा काडी टाकू का?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा