Skip to main content

चला . . कविता लिहू

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 11/04/2024 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
थोडे तांदूळ ,थोडे गहू चला . . . कविता लिहू ! शब्द हाताशी, कल्पना मनाशी जमते का ? .. पाहू ! सुचलेले कागदावरचे, रुचलेले मनातले अंतऱ यातले ,कळते का ? .. पाहू ! तळातून गाळलेले ,गाळातून तळलेले ! चिडचिड संताप , मनस्तापानी भरलेले येते का बाहेर ! ? .. . पाहू ! काव्य गतीचा न्याय विचित्र मनातले लपलेले चित्र सहज निघते बाहेर का, पाहू ! सुरवात म्हणावे, की श्री गणेशा ? सहज टाकला, आला नकाशा ! आता सांगा तुम्ही, मी पुढे जाऊ ? ---------------------- अतृप्त
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 7129
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

मी पुढे जाऊ ?
जा...! शुभेच्छा. :) थोडे शेंगदाणे, थोडे चणे, चला...... बसून पाहू बियर हाताशी, गुदगुल्या मनाशी जमते का ? पिऊन पाहू. -दिलीप बिरुटे ( शीघ्र कवी) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडे शेंगदाणे, थोडे चणे, चला...... बसून पाहू बियर हाताशी, गुदगुल्या मनाशी जमते का ? पिऊन पाहू. ~ प्राडॉ दिबि
थोडी मटकी, थोडे पोहे ईडली कुस्करून घालू पिण्यास मर्री, बिअरची तर्री चढल्यावर तसेही काय कळते चला कॉकटेल मिसळ खाऊन पाहू - कॉकटेल मिसळप्रेमी माहितगार

In reply to by Bhakti

थोडी साय.. थोडी भक्ती माया थोडा फरसाण फक्का...सोडी पुदिना एसपीडिपीत जरा श्रीखंड भक्तीचे घालून पाहू.. :) कॉकटेल एसपीडिपी प्रेमी माहितगार .

In reply to by अत्रुप्त आत्मा

तळातून गाळलेले ,गाळातून तळलेले !
भरभरून दळण येवढी तळणं होऊन राहीली गरम तळणात ईतरांनी पण त्यांच्या जिलब्या तळून घेतली.

थोडे तांदूळ, थोडे गहू थोडे उडीद, थोडे मुग थोडे धणे ,थोडे चणे.... ....................चला थोड्या चकल्या पाडून पाहू

मस्तच

प्रतिभा गेली. तांब्याही गेला. ------------- लिल्या , पांडुब्बा , किच्चु तै , जिल्बुचा आता हिते येत नै नै नै ! आगोबाही पाहात नाही . हन्त हन्त नलिंनी गज उज्जहार का काय ते म्हणतात.

In reply to by कंजूस

सहमत, तांब्या पाणी ब्रॅंड होता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडे पाणी, थोडे पीठ चला... तांब्या भरू कढई हाताशी, जिलब्या मनाशी पडतात का? पाहू

कविता उत्तम, पण तांदूळ आणि गव्हाचा कवितेशी काय संबंध आहे हे कळाले नाही. बहुधा कवीला धान्यफराळ झाल्यावरच कविता सुचतात असे म्हणायचे आहे असे वाटते.

अरे अतृप्ता, ही कविता वाचून 'ह्यांना' दोन गोष्टी आठवल्या: १. "दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे" -- गंगाधर गाडगीळ. २. "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे" -- स.तं. कुडचेडकर ('केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक) -- तस्मात आपली प्रतिभा जिवंत ठेवण्यासाठी केलेला, काहीसा 'दुर्बोध' वाटणारा हा 'प्रयास' प्रशंसनीय आहे, असे 'ह्यांचे' म्हणणे. -- ताईसाहेब फुर्सुंगीकर.

अहो कवी, अशी हाणा की टीकाकारांची ***** बंद होईल.