स्वामी त्रिकालदर्शी आपल्या गुहेत ध्यानस्थ बसले होते. २५ वर्षाचे युवा व्यापारी धर्मदेव स्वामींच्या दर्शनार्थ आले. आपली समस्या स्वामींच्या पुढे मांडत धर्मदेव म्हणाले, माझ्या वडिलांचा मृत्यू असमय झाला. त्यांची इच्छा व्यापारातून मिळालेल्या फायद्याचा अधिकांश भाग समाजसेवेसाठी खर्च करायची होती. पण गेल्या काही वर्षांपासून व्यापारात सतत तोटा होत असल्याने, इच्छा असूनही ते समाजसेवा करू शकले नाही. वडिलांच्या मृत्यू समयी त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे. त्यांच्या एवढ्या इच्छा कश्या पूर्ण करू हेच मला कळत नाही. स्वामीजी धर्मदेव कडे पहात हसत-हसत म्हणाले, त्यांच्या सर्व इच्छा तू सहज पूर्ण करू शकतो. स्वामीजींनी धर्मदेवला एक कान मंत्र दिला.
पुढील २० वर्षांत धर्मदेव यांनी वडिलांच्या स्मृतीत अनेक शाळा, कॉलेजेस अनाथाश्रम, वृध्दाश्रम बांधले. एक मोठे चॅरीटेबल हॉस्पिटल ही बांधले. कोट्यवधी रुपये दरवर्षी ते यासाठी खर्च करतात. एकदा एका पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला, तुम्ही कोणताही व्यापार, धंधा, उद्योग करत नाही, मग हे सर्व तुम्हाला कसे काय जमते. धर्मदेव म्हणाले ही सर्व भगवंताची कृपा आहे. स्वामी महाराजांनी मला कान मंत्र दिला आणि हे सर्व साध्य झाले. पत्रकाराने विचारले स्वामीजींनी तुम्हाला कोणता कानमंत्र दिला होता. "स्वामीजींनी मला भगवंताचे भव्य मंदिर उभारण्याचा आदेश दिला आणि म्हणाले भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील". आपली सर्व जमापूंजी आणि व्यापार विकून मी इच्छापूर्ती करणाऱ्या भगवंताचे भव्य मंदिर बांधले. मी भगवंताची सेवा करतो आणि भगवंताने माझ्या स्वर्गीय वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या.
वाचने
5541
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहवा
मंदिर धंधा नाही.प्राचीन
In reply to वाहवा by सुरिया
सहमत, पण पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना.
In reply to वाहवा by सुरिया
@सुरैया यांच्या..
चांगल्या वाईटाच्या कल्पना
आपल्याला कशा आव्हान देतात....
In reply to चांगल्या वाईटाच्या कल्पना by सर टोबी
१००% सहमत
In reply to चांगल्या वाईटाच्या कल्पना by सर टोबी
लेखात काहीही वाईट नाही.
In reply to चांगल्या वाईटाच्या कल्पना by सर टोबी
लेखाला सुचवायचंय की
हिंदू मंदिर
आजिबात नाही. मंदीर माध्यमाचा
In reply to हिंदू मंदिर by वामन देशमुख
गंदा हैं, पर धंदा हैं ....
आज देशात ५ लाख कोटी धंधा
In reply to गंदा हैं, पर धंदा हैं .... by मुक्त विहारि
मंदिर, हा प्रमूख धंदा...
In reply to आज देशात ५ लाख कोटी धंधा by विवेकपटाईत
माझा आवडता आदर्श उद्योग
In reply to आज देशात ५ लाख कोटी धंधा by विवेकपटाईत
तुर्की लोकांनी जेव्हा
देवळांवर अमाप चरून लठ्ठ झालेला ....
मी पाहीलाय. नोटबंदीत १०
In reply to देवळांवर अमाप चरून लठ्ठ झालेला .... by नठ्यारा
तुम्हाला एवढेही माहित नाही
In reply to मी पाहीलाय. नोटबंदीत १० by अमरेंद्र बाहुबली
ते कर्मचारी दानपेट्यांना
In reply to तुम्हाला एवढेही माहित नाही by विवेकपटाईत
एक पुजारी सापडला तर ....
In reply to ते कर्मचारी दानपेट्यांना by अमरेंद्र बाहुबली
दुनिया झुकती है......
शेवटचा परिच्छेद आवडला...
In reply to दुनिया झुकती है...... by कर्नलतपस्वी