Skip to main content

माझी ट्रेन माझी प्रेयसी (३)

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 15/08/2023 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ इथे .. नमस्कार सर्वांना स्वातंत्र्य वर्धापन दिनाच्या शुभेच्छा ! अजून चार दिवसांनी या धाग्याच्या मागच्या भागाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. परंतु आजच्या दिनाचे औचित्य साधून हा नवा भाग चालू करत आहे. नव्या वाचकांसाठी : सन 2017 मध्ये चालू झालेले हे सदर रेल्वेविषयक कुठलीही माहिती व अनुभव लिहिण्यासाठी आहे. इतिहास, तंत्रज्ञानातील प्रगती, सुरक्षितता आणि अपघात, प्रवाशांच्या सोयी-गैरसोयी, प्रस्तावित नवे रेल्वेमार्ग, आर्थिक पैलू, परदेशी आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे असे काहीही इथे लिहता येईल- गद्य, पद्य किंवा प्रकाशचित्र अशा कोणत्याही स्वरूपात. रूळगाडीतील सर्व सहप्रवाशांचे नव्या डब्यात स्वागत ! भारतीय रेल्वे ok इथपासून…. ...... ते ok इथपर्यंत. *****************************************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33224
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

वंदे भारत गाडीमध्ये प्रत्येक सीटच्या मागे खाण्याचे पदार्थ ठेवण्यासाठीचे trays दिलेले आहेत. त्या ट्रेवर फक्त खाद्यपदार्थ ठेवणे अपेक्षित असून तेवढेच वजन त्यांना पेलणार आहे. तरीसुद्धा काही पालक आपल्या लहान मुलांना खुशाल त्या ट्रेवर बसवत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत जाहीर नापसंती व्यक्त केलेली आहे .

सुरत जवळ सचिन नावाचे रेल्वे स्थानक आहे. परंतु त्याचा क्रिकेटपटूशी काही संबंध नाही.

IRCTC website चालत नव्हती पंधरा दिवस. महिना,दिवस यासाठी कॅलेंडरवर क्लिक केले की बंद होत असे. पण आता ओके. तारीख आपणच बदलायची आहे.(dd/mm/yyyy) .शिवाय ट्रेन टाइमटेबलमध्ये किमी डिस्टन्स आकडे येत नव्हते ते आले. (पण NTES APPमध्ये एंजिन रिवर्सल देतात ते मात्र नाही) ------------- Unreserved डब्यात टू टिअर बाकडी आहेत. वरच्या बाकावर कुशन आहे पण वरती चढून बसायला शिडी नाही. कुशन लावलेले बाक सामानासाठी?

धावत्या ट्रेनची वेळ आणि स्थान यांची परिस्थिती दाखवण्यासाठी जी 'रेलयात्री' सुविधा आहे तिचा अत्यंत टुकार अनुभव आला. प्रत्यक्ष गाडी दोन तास उशिरा धावत असूनही त्या ॲपमध्ये ती वेळेवर दाखवल्याचे दिसले. एकाने प्रवासात सुचवले, की त्यापेक्षा 'व्हेअर इज माय ट्रेन' हे ॲप बघत चला. आता अनुभव घेईन.

In reply to by हेमंतकुमार

रेलयात्री app रेल्वेचं नाही. Locate my train ही बरं आहे. सर्वोत्तम म्हणजे Osmand map app मधून महाराष्ट्र/कर्नाटक वगैरे map download (फक्त १६०/१७० एमबीचा असतो.) करून ठेवावा. इंटरनेट बंद ठेवूनही गाडी प्रमाणे map वर बाण सरकताना दिसतो. इतर वेळीही रस्त्याने जाताना ही युक्ती उपयोगी पडते. रूट ट्रेसिंगही करून कुणाला नकाशा देता येते.

Railway चं NTES app सुद्धा धावत्या ट्रेनची वेळ आणि स्थान यांची परिस्थिती दाखवण्यासाठी वापरता येते. जीपीएस'ची गरज नसते. इंटरनेट मात्र लागते. धावत्या ट्रेनच्या आतमध्ये असलात तर काही स्टेशनांदरम्यान इंटरनेट बंद पडते ही एक अडचण.

एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ! पुढील पंधरा वर्षात रेल्वे मंत्रालयाने सुमारे आठ हजार नव्या गाड्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तिकिटांची 'प्रतीक्षा यादी' ही स्थिती संपुष्टात यावी असा हेतू आहे.

प्रतीक्षा यादी' ही स्थिती संपुष्टात येणे अशक्य. पुरवठा अधिक आणि मागणी कमी अशी परिस्थिती दिसली की रेल्वेने या अगोदर गाड्या कमी केल्या /अंतरे कापली आहेत. तेच होणार. किंवा मुख्य शहरांत धावणाऱ्या एक्सप्रेस होणार. अधिकाधिक लोक गावे सोडून शहरातील खुराड्यात येणार. एसटीने कोकणात जाणारे चाकरमानी तेव्हा किती खेपा करत होते आणि आता पाहा. जोडून सुट्टी आली की जाऊन येतात.

पहिल्यांदाच बुकींग करून रेल्वेने प्रवास केला. सेकंड किलास एसी, जळगाव ते भोपाळ. रेल्वे प्लॅटफोर्मवर येईपर्यंत धाकधूक होती. रेल्वे ने चादर नी ऊशी दिली. मस्त झोपून प्रवास झाला. वेटींग तीकीट कन्फर्म झालं. एका रेस्टोरंट मधून भूसावळ ला २०० रूपयाची महाराजा थाळी मागवली पण फोटोतले नी थाळीतले पदार्थ मॅच झाले नाहीत. रेल्वे ला तक्रार केला पण काही झाले नाही. पावलापावलावर फसवणूक :(

भारताच्या 15 राज्यात दाट धुके पसरले असल्याने चालकांना गाडी चालवताना बऱ्यापैकी कष्ट होत आहेत. त्यांच्या मदतीसाठी FogPass हे उपकरण उपयोगी येत आहे

In reply to by हेमंतकुमार

पण रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्या माणसांना आणि जनावरांना गाडी दिसत नाही. त्यांच्यासाठी गाडी सावकाशच न्यावी लागेल.

भारतीय रेल्वेची दोन स्थानके चक्क निनावी आहेत. त्यापैकी एक पश्चिम बंगाल तर दुसरे झारखंडमध्ये आहे. ok त्या स्थानकांच्या आजूबाजूच्या दोन गावांमधल्या ग्रामस्थांमध्ये आपापले नाव देण्यावरून वाद आहे..

एकदम धमाल नावे असलेली भारतीय रेल्वे स्थानके : ok

ट्रेनच्या दाराजवळील खिडक्यांना बाकीच्या खिडक्यांपेक्षा जास्त रॉड असतात. सहज चोरी रोखण्यासाठी .. आता हे बारकाईने बघून घेण्याचे कुतूहल आहे. :)

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या आंध्र प्रदेश मधील ट्रेन अपघाताचे कारण रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित ट्रेनचे चालक व सहचालक दोघेही चालत्या गाडीत मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहण्यात दंग असल्यामुळे त्यांनी सिग्नल तोडला.

वंदे भारत गाड्या जिथे एकेरी रूळ आहेत तिथे या गाड्यांना पुढे काढतात आणि इतर गाड्यांचे वेळापत्रक बिघडतात.

खरगपूर भद्रक पॅसेंजरने खरगपूर-भद्रक या अंतरासाठी ४० रुपये तिकीट आणि त्याच ट्रेनने भद्रक- खरगपूर या तेवढ्याच पण उलट अंतरासाठी ७५ रुपये तिकीट ! प्रवाशांनी तक्रारी केलेल्या आहेतच. अजून निर्णय झालेला नाही

ट्रेनच्या आरक्षित डब्यांमध्ये स्लीपर असो अथवा 3AC, परिस्थिती भयानक दयनीय होत चाललेली आहे आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांकडून जवळपास दररोज X या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांना थेट लिहिले जात आहे. १. २.

In reply to by हेमंतकुमार

आरक्षित डब्यांत confirmed ticket नसताना शिरून प्रवास करणे हे काही भागांत ( railway zones) सामान्य झाले आहे. हे लोक तिकीट खिडकीवर waitlisted तिकीट मिळवतात आणि प्रवास करतात. (Irctcसाईटवरचे waitlisted ticket seat confirm न झाल्यास रद्दच होते ) उत्तर भागांत गर्दीचा रेटाच एवढा भयानक असतो की तिकीट तपासनीस काही करू शकत नाहीत. दक्षिणेकडे तर त्याचे काय करतात हे सरळ सरळ सिनेमांतच दृष्य घेतले आहे. - चेन्नई एक्सप्रेस.

कोकण रेल्वे कार्पोरेशन स्थापन झाली. रेल्वेसाठीची जमीन चार राज्यांनी देण्याचं आश्वासन देऊन संपादन करून दिलीसुद्धा. एकेरी रूळ यासाठी बहुतेक घेतली आहे. गाड्या कमी होत्या आणि वेळेत नेणे शक्य होत होते. पण आता तीस वर्षांत गाड्या खूप वाढल्या तरीही रूळ मार्ग एकेरीच राहिलेत. परिणाम म्हणजे दोन तास उशिरा धावणे हे सामान्य झाले आहे. आता दुहेरी रुळासाठी जमीन मिळवणे अशक्य झाले असावे. जमीन मिळाली तर रूळ टाकायला वेळ लागत नाही. नेहमीच्या गाड्या ११० किमी वेगाने धावतात पण सिग्नल न मिळाल्याने दहा पंधरा मिनीटे स्टेशनांवर उभ्या राहतात. मागच्या आठवड्यात पंधरा ठिकाणी गाडी थांबण्याचा अनुभव घेतला.

एसी लोकलमधील साठ हजार फुकट्या प्रवाशांकडून दोन कोटी रुपयांचा दंड वसूल. आता एक्सप्रेस गाड्यांमध्येही अशी कारवाई वाढत्या प्रमाणात व्हायला हवी.

पुणे रेल्वे स्थानकावर सहा नवे फलाट नव्याने बांधण्यात येणार आहे नुकताच रेल्वेमंत्र्यांनी तसा आदेश काढला आहे. तसेच सध्याच्या फलाटांपैकी काहींची लांबी वाढवण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे. (बातमी छापील म टा 13/9)

रेल्वेचे नवीन RailOne app ( २७ जून २०२५ पासून) रेल्वेची तीन ॲपस अगोदरपासून होतीच. १. टिकेट बुकिंगचे RAIL CONNECT IRCTC app त्यात पॅसेंजर ट्रेन्स अनारक्षित गाड्या वेळापत्रक नाही. २. NTES App मध्ये सर्व गाड्यांचे वेळापत्रक मिळते, spot your train, exception table आहे पण बुकिंग होत नाही. ३. UTS app यात प्लॅटफॉर्म तिकिट, जर्नी टिकेट अशी अनारक्षित तिकिटे मिळतात. या तिन्हींचे एकत्रीकरण करून RailOne app जून २०२५ मध्ये सुरू झाले आहे. RAIL CONNECT IRCTC चे लॉगिन पासवर्ड ,युझरनेम वापरता येतात. सहा आकडी यूजर पिन नवीन टाकावा लागेल. किंवा नवीनच नोंदणी करता येईल. शिवाय कोच पोझीशन, rail madad तक्रार आहे. ____________________________ गाडीचे वेळापत्रक आणि सर्व थांबे तसेच कोणत्या राज्यांतून जाते हे पाहण्यासाठी मात्र Railyatri app( रेल्वेचे नाही हे) पाहावे लागते.

In reply to by कंजूस

माहितीबद्दल धन्यवाद ! www.irctc.co.in या संकेतस्थळावरुन तिकीट काढायचे असल्यास आता आपल्या खात्यात जाऊन परवलीचा शब्द बदलून ठेवा; आता तो अकरा अक्षरांचा करायचा आहे. तसेच तत्काळ तिकीटासाठी पूर्वतयारी म्हणून आधार Authentication करून ठेवावे. ( ओटीपीद्वारा) आधार verification व Authentication या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.

In reply to by हेमंतकुमार

पाच सहा वर्षांपूर्वी IRCTC registration ..... करतानाच फोन नंबर, आधार आणि इमेल व्हेरिफिकेशन केले होते तसेच पोस्ट ऑफिस आणि पोस्टल पिन नंबरही अद्ययावत केलेले. आता ओनलाइन तिकिट काढण्यासाठी हे सर्व केले असले तरच तिकिट निघेल असा नियम आल्याचे यूट्यूबवर विडिओ टाकत आहेत लोक.

In reply to by हेमंतकुमार

आधार Authentication नाही तर तिकिट नाही.... हे आता लागू झाले आहे हे मान्य पण ते मी फार पूर्वीच केले आहे अकाऊंट उघडताना. आधार कार्डाला जोडलेल्या फोनला ओटिपी घेऊन. _______________________ बाकी काही विशेष तिकिटे ही तिकिट काउंटरवरच मिळवावी लागतात, ओनलाइन मिळत नाहीत. त्यांचे विडिओ पाहा...... 1. What is circular journey ticket? https://youtu.be/bGNnNSJDN60?si=1emxkWWA8eEkNBib 2. What is break journey ticket? https://youtu.be/2t99uIaaREg?si=97IZR4hs8NH6EMVT 3. What is onward journey ticket? https://youtu.be/C6HqCMfLwdw?si=SpdmR0kgvSoMAGrO 4. Counter ticket x online ticket https://youtu.be/X4gYCVUvS8w?si=0TVILDZhcX7_mjBV

रेल्वे गाडीची कोच पोझिशन ..... हे मात्र रेल्वेला सुसंगत करता आले नाही अजून हे माझ्या गेल्या सहा महिन्यांतल्या अनुभवावरून सांगतो. गाडीचा चार्ट तयार झाल्यावर आणि येण्यासाठी दोन तास बाकी असताना तिकिटांच्या PNR चा अंतिम मेसेज येतो त्यात दाखवलेल्या क्रमांकाने डबे नसतात, उलट असतात. पण फलाटावर लावलेल्या सूचनेप्रमाणे असतात. हे मात्र मेसेजमध्ये बरोबर उलट सापडते. डेटा अपडेट होत नाही. रेल्वेलाच अचुकता राखता येत नाही तर इतर ॲपतरी असं बरोबर सांगणार? असो.

एरवीचे तिकीट काढताना रेलयात्री app वरून बऱ्यापैकी सोपे जाते; त्यांचे captcha सुद्धा डोळ्यांना सुखद असतात. परंतु तात्काळच्या दिवशी सकाळी दहा वाजता संकेतस्थळ बरोबर खुले होते मात्र रेलयात्रीला त्या कामासाठी साडेदहापर्यंत प्रवेश नसतो. म्हणजे रेलयात्री app हे खाजगी दलालासम धरले जाते की काय कोण जाणे ? तत्काळच्या वेळेस संकेतस्थळावर जी काही ऑनलाईन ' चेंगराचेंगरी' होते त्याला तोड नाही. यावर्षीपासून तात्काळ तिकीट काढायला बसले की अंगावर काटाच येतो. शिल्लक जागा आपण क्लिक करतो व पैसे भरायला जाईपर्यंत ती संपुष्टात येते. एका ग्राहकाने या संबंधित केलेले टिप्पणी

In reply to by कंजूस

मी कुठलेही वॅलेट वापरत नाही. त्या व्हिडिओत दाखवलेल्या गोष्टी कितपत विश्वासार्ह आहेत त्याची शंका वाटते. तिथल्या खालच्या काही प्रतिक्रिया पण तशा वाटल्या. बघू नीट अभ्यास करायला पाहिजे. माहिती तील कोणाचा अनुभव असेल तर जास्त बरे होईल. आभार !

In reply to by हेमंतकुमार

IRCTC ई-वॉलेट विश्वासार्ह आहे. विशेषतः तात्काळ तिकिटांसाठी उपयुक्त ठरत. OTP ची आवश्यकता नसल्यामुळे व्यवहार लवकर पूर्ण होऊन तात्काळ तिकिट मिळवणे सोपे होते.

In reply to by हेमंतकुमार

इतर यूट्यूबर लोकांनी हीच पद्धत दिली आहे. . . १८ तारखेची खरड पाहिली का? विविध तिकिटांचे प्रकार दिले आहेत पण मी ते करून पाहिले नाहीत अजून. ब्रेक जर्नी, ओनवर्ड जर्नी, सरक्यूलर तिकिट इत्यादी. पूर्वी धार्मिक यात्रा करणारे गट सरक्यूलर तिकिटे काढायचे. अजुनही काढतात. सौराष्ट्रात जाणारे विशेषतः

In reply to by कंजूस

मी पण नाही पाहिलेले ते प्रकार अजून करून. . . . मध्यंतरी रात्रीचा प्रवास करताना दोन गाड्यांमध्ये पाच तासांचे अंतर होते तेव्हा प्रथमच रेल्वे स्थानकावरील समूह विश्रांतीगृह ऑनलाईन बुक करून पाहिले. मला साधी खिडक्या उघड्या असलेलीच खोली हवी होती परंतु ती उपलब्ध नसल्याने नाईलाजाने वातानुकूलित घेतली. याचे तासांवर पैसे असतात. तिथे दोन बर्थ या पद्धतीने एकूण दहा माणसे होतो. माझ्या डोक्याकडचा आणि डोक्यावरचा हे दोघेही प्रचंड घोरणारे निघाल्यामुळे अजिबात झोप आली नाही 😂

In reply to by हेमंतकुमार

एसी प्रीपेड रिटायरिंग हॉल आवडू लागले आहेत. चेन्नई एगमोर आणि सेंट्रलला ३५/- तास . रेल्वेचे कर्मचारीच काम पाहात होते. मदुरैला २०/- दर होता. वडोदरा २०/- तास. खाजगी स्टॉलवालाच काम पाहात होता. त्रिची २०/- शेजारच्या खाद्यपदार्थ स्टॉलला एक छोटी खिडकी दिली होती आणि त्यातूनच पदार्थ घेता येत होते. पदार्थ फारच चांगले होते.

In reply to by हेमंतकुमार

काही ठिकाणी रेल्वे रुळांवर हत्ती/ नीलगायी येतात अचानक. त्यांना वाचवण्यासाठी काही प्रणाली शोधताना याचा शोध लागला म्हणे.

Railone हे सरकारी ॲप तिकीट काढायला सुटसुटीत असल्याचे वाचले. त्यावर यूपीआय वापरता येईल. IRCTC सदस्याला तिकडचीच सदस्य माहिती इथे वापरता येते. आता काही दिवसांनी अनुभव पाहू.

In reply to by हेमंतकुमार

मी जरा चाचपले RailOne... मधल्या त्या तारखेला आरक्षण मिळत नसेल तर railconnect मध्ये तिथेच कॅलेंडरवर क्लिक करून तारीख बदलता येते ती सोय दिसली नाही. परत मागे जाऊन तारीख बदलावी लागते ही छोटीशी गोष्ट लक्षात आली.

विशेष आराम गाड्यांच्या ( राजधानी, वन्दे भारत वगैरे) आरक्षणांतून जेवणाचे पर्याय यातून "नको" हा पर्याय काढला रेल्वेने ( आइआरसिटीसीने) अशी ओरड सुरू झाली दोन चार दिवसांत. यावर रेल्वे अधिकारी म्हणतात नाही काढला. तिथेच बाजूला कुठेतरी तो पर्याय आहे ( बातमी.) खरं खोटं खोटं माहीत नाही.