✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझी ट्रेन माझी प्रेयसी (३)

ह
हेमंतकुमार यांनी
Tue, 08/15/2023 - 07:13  ·  लेख
लेख
भाग २ इथे .. नमस्कार सर्वांना स्वातंत्र्य वर्धापन दिनाच्या शुभेच्छा ! अजून चार दिवसांनी या धाग्याच्या मागच्या भागाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. परंतु आजच्या दिनाचे औचित्य साधून हा नवा भाग चालू करत आहे. नव्या वाचकांसाठी : सन 2017 मध्ये चालू झालेले हे सदर रेल्वेविषयक कुठलीही माहिती व अनुभव लिहिण्यासाठी आहे. इतिहास, तंत्रज्ञानातील प्रगती, सुरक्षितता आणि अपघात, प्रवाशांच्या सोयी-गैरसोयी, प्रस्तावित नवे रेल्वेमार्ग, आर्थिक पैलू, परदेशी आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे असे काहीही इथे लिहता येईल- गद्य, पद्य किंवा प्रकाशचित्र अशा कोणत्याही स्वरूपात. रूळगाडीतील सर्व सहप्रवाशांचे नव्या डब्यात स्वागत ! भारतीय रेल्वे ok इथपासून…. ...... ते ok इथपर्यंत. *****************************************************
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
32589 वाचन

💬 प्रतिसाद (133)

प्रतिक्रिया

सांगली अव्वल...

हेमंतकुमार
Sat, 09/30/2023 - 16:32 नवीन
सांगली स्थानक महाराष्ट्रात स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर Image removed. अभिनंदन !
  • Log in or register to post comments

दुवा

हेमंतकुमार
Sat, 09/30/2023 - 16:33 नवीन
इथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

एक सुंदर चित्रफीत

धर्मराजमुटके
Wed, 10/04/2023 - 15:21 नवीन
वंदे भारत बद्द्ल एक सुंदर संवाद इथे पहा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

हेमंतकुमार
Wed, 10/04/2023 - 16:18 नवीन
सुरवात पाहिली. एक तासाची मुलाखत आहे सवडीने पहावी लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

पुणेरी मेट्रोमध्ये अत्याधुनिक ‘थर्ड रेल सिस्टिम’

अनिकेत वैद्य
गुरुवार, 10/05/2023 - 10:31 नवीन
पुणेरी मेट्रोमध्ये अत्याधुनिक ‘थर्ड रेल सिस्टिम’ बातमीचा दुवा
  • Log in or register to post comments

???

बोका
Sat, 10/07/2023 - 22:05 नवीन
लोकसत्ताला यात विशेष काय वाटले कोणास ठाउक. अशी 'अत्याधुनिक' सिस्टिम कोलकाता , कोची, बंगळूरात वापरात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिकेत वैद्य

मुंबईच्या पोटातून प्रवास ...

हेमंतकुमार
Fri, 10/13/2023 - 13:06 नवीन
जमिनीखाली बोगद्यांचे जाळे उभारणार. अभ्यासासाठी समिती स्थापन
  • Log in or register to post comments

एकटीसाठी राजधानी..

हेमंतकुमार
Sat, 10/14/2023 - 13:27 नवीन
त्या तरुणीच्या हट्टापुढे रेल्वेनंही नमतं घेतलं; एकटीसाठी 535 KM धावली राजधानी एक्सप्रेस
  • Log in or register to post comments

निलगिरी.. ११६ वर्षे

हेमंतकुमार
Wed, 10/18/2023 - 09:14 नवीन
निलगिरी पर्वतातील मीटर गेज रेल्वेची 116 वर्षे पूर्ण ! ती या श्रेणीमधली आशियातील सर्वात लांब पल्ल्याची आणि सर्वात जास्त चढाचा मार्ग असलेली आहे.
  • Log in or register to post comments

मला माहित नाही की या धाग्याच्या आशयात बसेल की नाही...पण

शशिकांत ओक
Fri, 10/20/2023 - 13:01 नवीन
हवाईदलात असताना रेल्वे प्रवासाचे रंजक किस्से सादर केले गेले होते. त्याची लिंक देत आहे.
  • Log in or register to post comments

समुद्राखालून ट्रेन

हेमंतकुमार
Sat, 10/21/2023 - 13:43 नवीन
मुंबई ते दुबईचा अमिरातीकडून प्रस्ताव.
  • Log in or register to post comments

https://www.loksatta.com/desh

गवि
Mon, 10/30/2023 - 06:52 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh/massive-accident-in-andhra-pradesh-two-trains-collided-3-dead-40-injured-rmm-97-4016735/ पुन्हा एकदा दोन ट्रेन्सची समोरा समोर धडक. अशा घटना वाढल्या आहेत का? पूर्वी रेल्वे प्रवास सर्वात सुरक्षित वाटत असे. समोरासमोर दोन ट्रेन्स येणे आणि आदळणे ही तर कल्पनाही मनात येत नसे प्रवास करताना. आताशा मात्र किमान तीन चार घटना घडल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments

खरंय..

हेमंतकुमार
Mon, 10/30/2023 - 09:29 नवीन
काळजी वाटते
  • Log in or register to post comments

कालचा

हेमंतकुमार
Tue, 10/31/2023 - 09:54 नवीन
आंध्र प्रदेशातील अपघात लोको पायलटच्या चुकीमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष
  • Log in or register to post comments

पूर्णपणे रुळावर आधारित

गवि
Tue, 10/31/2023 - 10:08 नवीन
पूर्णपणे रुळावर आधारित व्यवस्थेत लोको पायलटच का, कोणत्याही एका व्यक्तीचे काहीतरी चुकण्यावर अथवा न चुकण्यावर अपघात होण्या न होण्याची शक्यता का शिल्लक ठेवली गेली आहे हे अभ्यासून बघावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

‘रुळानुबंध’

हेमंतकुमार
Fri, 11/03/2023 - 09:36 नवीन
‘रुळानुबंध’ : ‘लोकोपायलट’ गणेश कुलकर्णींचे आत्मकथन नाव छान आहे.
  • Log in or register to post comments

एक झकास व्हू :- New Vande

मदनबाण
Sun, 11/05/2023 - 11:39 नवीन
एक झकास व्हू :- New Vande Bharat Express | Kesari/Saffron/Orange Coloured | Crossing Aroor Bridge 4K मिपा तंत्रज्ञ यांना विनंती... ते जरा embedded कोड एनेबल करण्याची कृपा करावी, व्हिडियो देताना बरं वाटतं !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Thaai Kelavi - Official Video Song | Thiruchitrambalam | Dhanush | Anirudh | Sun Pictures
  • Log in or register to post comments

कोल्हापूर -मुंबई (आता पुणेपर्यंत) सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुर

अनिकेत वैद्य
Mon, 11/06/2023 - 10:45 नवीन
कोरोनाकाळात बंद झालेली कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस आता कोल्हापूर पुणे अशी सुरु झाली आहे. बातमीचा दुवा
  • Log in or register to post comments

रेल्वे संबंधित चांगली पुस्तके

कंजूस
Mon, 11/06/2023 - 19:06 नवीन
रेल्वे संबंधित चांगली पुस्तके आहेत पण ती खाजगी आहेत. खूप महागही आहेत.
  • Log in or register to post comments

तिहेरी उर्जा...

हेमंतकुमार
Wed, 11/08/2023 - 20:45 नवीन
भारतीय रेल्वेची विद्युतीकरणामधील प्रगती चांगली आहे. अलीकडे युरोपमध्ये tribrid ट्रेन्स ही नवी प्रगती म्हणावी लागेल. तीन प्रकारच्या उर्जेवर त्या चालू शकतात : निव्वळ बॅटरी, विद्युत प्रवाह आणि डिझेल. Image removed.
  • Log in or register to post comments

युवकाचा संताप

हेमंतकुमार
Mon, 11/13/2023 - 15:35 नवीन
एसी डब्याचं तिकिट घेऊनही गर्दीमुळे ट्रेन चुकलेल्या युवकाचा संताप पूर्ण परतावा मिळावा म्हणून त्याचे रेल्वेमंत्र्यांना इ-निवेदन .
  • Log in or register to post comments

कधी सुधारणार लोक ??

हेमंतकुमार
गुरुवार, 11/23/2023 - 12:41 नवीन
वंदे भारत गाडीमध्ये प्रत्येक सीटच्या मागे खाण्याचे पदार्थ ठेवण्यासाठीचे trays दिलेले आहेत. त्या ट्रेवर फक्त खाद्यपदार्थ ठेवणे अपेक्षित असून तेवढेच वजन त्यांना पेलणार आहे. तरीसुद्धा काही पालक आपल्या लहान मुलांना खुशाल त्या ट्रेवर बसवत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत जाहीर नापसंती व्यक्त केलेली आहे .
  • Log in or register to post comments

बालहट्ट

कंजूस
गुरुवार, 11/23/2023 - 14:11 नवीन
बालहट्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

सचिन...स्थानक !

हेमंतकुमार
Wed, 11/29/2023 - 08:36 नवीन
सुरत जवळ सचिन नावाचे रेल्वे स्थानक आहे. परंतु त्याचा क्रिकेटपटूशी काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments

IRCTC website चालत नव्हती

कंजूस
Wed, 12/13/2023 - 18:49 नवीन
IRCTC website चालत नव्हती पंधरा दिवस. महिना,दिवस यासाठी कॅलेंडरवर क्लिक केले की बंद होत असे. पण आता ओके. तारीख आपणच बदलायची आहे.(dd/mm/yyyy) .शिवाय ट्रेन टाइमटेबलमध्ये किमी डिस्टन्स आकडे येत नव्हते ते आले. (पण NTES APPमध्ये एंजिन रिवर्सल देतात ते मात्र नाही) ------------- Unreserved डब्यात टू टिअर बाकडी आहेत. वरच्या बाकावर कुशन आहे पण वरती चढून बसायला शिडी नाही. कुशन लावलेले बाक सामानासाठी?
  • Log in or register to post comments

गाडी कुठे आहे ..

हेमंतकुमार
गुरुवार, 12/14/2023 - 09:13 नवीन
धावत्या ट्रेनची वेळ आणि स्थान यांची परिस्थिती दाखवण्यासाठी जी 'रेलयात्री' सुविधा आहे तिचा अत्यंत टुकार अनुभव आला. प्रत्यक्ष गाडी दोन तास उशिरा धावत असूनही त्या ॲपमध्ये ती वेळेवर दाखवल्याचे दिसले. एकाने प्रवासात सुचवले, की त्यापेक्षा 'व्हेअर इज माय ट्रेन' हे ॲप बघत चला. आता अनुभव घेईन.
  • Log in or register to post comments

रेलयात्री app रेल्वेचं नाही.

कंजूस
गुरुवार, 12/14/2023 - 15:16 नवीन
रेलयात्री app रेल्वेचं नाही. Locate my train ही बरं आहे. सर्वोत्तम म्हणजे Osmand map app मधून महाराष्ट्र/कर्नाटक वगैरे map download (फक्त १६०/१७० एमबीचा असतो.) करून ठेवावा. इंटरनेट बंद ठेवूनही गाडी प्रमाणे map वर बाण सरकताना दिसतो. इतर वेळीही रस्त्याने जाताना ही युक्ती उपयोगी पडते. रूट ट्रेसिंगही करून कुणाला नकाशा देता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

वा,

हेमंतकुमार
गुरुवार, 12/14/2023 - 17:27 नवीन
माहितीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

Railway चं NTES app सुद्धा

कंजूस
Fri, 12/15/2023 - 03:18 नवीन
Railway चं NTES app सुद्धा धावत्या ट्रेनची वेळ आणि स्थान यांची परिस्थिती दाखवण्यासाठी वापरता येते. जीपीएस'ची गरज नसते. इंटरनेट मात्र लागते. धावत्या ट्रेनच्या आतमध्ये असलात तर काही स्टेशनांदरम्यान इंटरनेट बंद पडते ही एक अडचण.
  • Log in or register to post comments

अबब !

हेमंतकुमार
Fri, 12/15/2023 - 18:10 नवीन
एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ! पुढील पंधरा वर्षात रेल्वे मंत्रालयाने सुमारे आठ हजार नव्या गाड्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तिकिटांची 'प्रतीक्षा यादी' ही स्थिती संपुष्टात यावी असा हेतू आहे.
  • Log in or register to post comments

प्रतीक्षा यादी' ही स्थिती

कंजूस
Fri, 12/15/2023 - 20:19 नवीन
प्रतीक्षा यादी' ही स्थिती संपुष्टात येणे अशक्य. पुरवठा अधिक आणि मागणी कमी अशी परिस्थिती दिसली की रेल्वेने या अगोदर गाड्या कमी केल्या /अंतरे कापली आहेत. तेच होणार. किंवा मुख्य शहरांत धावणाऱ्या एक्सप्रेस होणार. अधिकाधिक लोक गावे सोडून शहरातील खुराड्यात येणार. एसटीने कोकणात जाणारे चाकरमानी तेव्हा किती खेपा करत होते आणि आता पाहा. जोडून सुट्टी आली की जाऊन येतात.
  • Log in or register to post comments

अरेरे......

हेमंतकुमार
Wed, 12/20/2023 - 20:57 नवीन
दिल्ली मेट्रोच्या ट्रेनच्या गेटमध्ये साडी अडकल्याने महिलेचा मृत्यू आदरांजली.....
  • Log in or register to post comments

पहिल्यांदाच बुकींग करून

अमरेंद्र बाहुबली
Tue, 12/26/2023 - 14:00 नवीन
पहिल्यांदाच बुकींग करून रेल्वेने प्रवास केला. सेकंड किलास एसी, जळगाव ते भोपाळ. रेल्वे प्लॅटफोर्मवर येईपर्यंत धाकधूक होती. रेल्वे ने चादर नी ऊशी दिली. मस्त झोपून प्रवास झाला. वेटींग तीकीट कन्फर्म झालं. एका रेस्टोरंट मधून भूसावळ ला २०० रूपयाची महाराजा थाळी मागवली पण फोटोतले नी थाळीतले पदार्थ मॅच झाले नाहीत. रेल्वे ला तक्रार केला पण काही झाले नाही. पावलापावलावर फसवणूक :(
  • Log in or register to post comments

Order food बकवास आहे.

कंजूस
गुरुवार, 12/28/2023 - 11:18 नवीन
Order food बकवास आहे. निघतानाच काही समोसे,कचोरी पॅक करून घेणे उत्तम. केळीसुद्धा घ्यावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

दाट धुक्यातून जाताना..

हेमंतकुमार
गुरुवार, 12/28/2023 - 11:11 नवीन
भारताच्या 15 राज्यात दाट धुके पसरले असल्याने चालकांना गाडी चालवताना बऱ्यापैकी कष्ट होत आहेत. त्यांच्या मदतीसाठी FogPass हे उपकरण उपयोगी येत आहे
  • Log in or register to post comments

पण रेल्वे रूळ ओलांडून

कंजूस
गुरुवार, 12/28/2023 - 11:20 नवीन
पण रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्या माणसांना आणि जनावरांना गाडी दिसत नाही. त्यांच्यासाठी गाडी सावकाशच न्यावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

२ निनावी स्थानके

हेमंतकुमार
Fri, 12/29/2023 - 10:52 नवीन
भारतीय रेल्वेची दोन स्थानके चक्क निनावी आहेत. त्यापैकी एक पश्चिम बंगाल तर दुसरे झारखंडमध्ये आहे. Image removed. त्या स्थानकांच्या आजूबाजूच्या दोन गावांमधल्या ग्रामस्थांमध्ये आपापले नाव देण्यावरून वाद आहे..
  • Log in or register to post comments

बाप अणि साली !

हेमंतकुमार
गुरुवार, 01/04/2024 - 12:20 नवीन
एकदम धमाल नावे असलेली भारतीय रेल्वे स्थानके : Image removed.
  • Log in or register to post comments

माझी पसंती ....

नठ्यारा
Mon, 01/08/2024 - 23:41 नवीन
याबाबत माझी पसंती भदभदाघाट : https://indiarailinfo.com/departures/5222 -नान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

प्रेयसीचे होणारे नातेवाईक.

कंजूस
Tue, 01/09/2024 - 00:09 नवीन
प्रेयसीचे होणारे नातेवाईक. चालायचंच.म्हणजे चालवून घ्यायचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

दाराजवळील खिडक्या

हेमंतकुमार
Mon, 01/08/2024 - 17:27 नवीन
ट्रेनच्या दाराजवळील खिडक्यांना बाकीच्या खिडक्यांपेक्षा जास्त रॉड असतात. सहज चोरी रोखण्यासाठी .. आता हे बारकाईने बघून घेण्याचे कुतूहल आहे. :)
  • Log in or register to post comments

स्वित्झर्लंडचे तंत्रज्ञान

हेमंतकुमार
Fri, 01/19/2024 - 17:43 नवीन
भारतीय रेल्वे दोन यंत्रणासाठी स्वित्झर्लंडचे तंत्रज्ञान घेणार १. hub-and-spoke model Image removed. २. बोगद्यांचे काम
  • Log in or register to post comments

चालकविरहित ट्रेन..

हेमंतकुमार
Wed, 02/07/2024 - 16:41 नवीन
पहिल्या चालकविरहित ट्रेनचे चीनहून समुद्रमार्गे चेन्नईच्या बंदरात आगमन ! तिची यथावकाश चाचणी घेतली जाईल. Image removed.
  • Log in or register to post comments

डब्याला आग

हेमंतकुमार
Fri, 02/16/2024 - 20:17 नवीन
बऱ्याच दिवसांपासून रुळावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला आग लागली होती . अशी आग का लागते ते समजले नाही.
  • Log in or register to post comments

रेल्वे बंदचा इशारा

हेमंतकुमार
Fri, 03/01/2024 - 13:05 नवीन
जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास १ मे २०२४ पासून सर्व रेल्वे गाड्या बंद ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा.
  • Log in or register to post comments

अमेरिकेत संरक्षण खात्यातल्या

कंजूस
Fri, 03/01/2024 - 18:34 नवीन
अमेरिकेत संरक्षण खात्यातल्या लोकांनाही पेन्शन योजना नाही असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments

धक्कादायक व अक्षम्य

हेमंतकुमार
Mon, 03/04/2024 - 08:57 नवीन
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या आंध्र प्रदेश मधील ट्रेन अपघाताचे कारण रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित ट्रेनचे चालक व सहचालक दोघेही चालत्या गाडीत मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहण्यात दंग असल्यामुळे त्यांनी सिग्नल तोडला.
  • Log in or register to post comments

मुंबईतील

हेमंतकुमार
Wed, 03/13/2024 - 08:51 नवीन
रेल्वे स्थानकांचे घाऊक नामांतर; मंत्रिमंडळात आज चर्चा
  • Log in or register to post comments

लांबलचक नावाची घोषणा करणे आणि

कंजूस
Wed, 03/13/2024 - 12:26 नवीन
लांबलचक नावाची घोषणा करणे आणि ती घाईत असलेल्या प्रवाशाला कळणे कठीण होतं आहे.
  • Log in or register to post comments

सांगलीतून एक्सप्रेस...

हेमंतकुमार
Fri, 03/15/2024 - 10:36 नवीन
सांगली-बंगळूर राणी चन्नम्मा एक्सप्रेस ही सांगलीतून सुटणारी पहिली एक्सप्रेस गाडी ठरली आहे Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा