Skip to main content

दिवाळी अंक २०२३ - कुंपण

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
kumpan

चांदणठिणग्यांचे नभझुंबर पहाटफुटणीत विझता विझता शब्द गवसले- त्यांची पडझड बघत राहिलो दिवस उगवता

शब्दाशब्दामधुनी वाटले- येईल काही अमोघ उसळत पण निष्प्रभ अर्थाचा खुर्दा आला हाती.. बसलो मोजत साखरझोपेच्या काठावर शब्द भासले होते ओतीव धग दिवसाची सोसून कळले ते ही निपजले पोकळ, निर्जीव लख्ख समजले पुन्हा यापुढे भ्रमनिरास ना होऊ देणे ओलांडून शब्दांचे कुंपण अर्थनिरर्थापल्याड जाणे

वाचने 4757
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

फारच आवडली, छान लिहिली आहे पैजारबुवा,

कवींच्या शब्दप्रतिभेचं मला खूप कौतुक वाटतं! चांदणठिणग्या, पहाटफुटणी कसं काय सुचतं बुवा?

या रचनेच्या वर्णनासाठी शब्द नाहीत.

चांदणठिणग्यांचे नभझुंबर आवडले. -दिलीप बिरुटे

अनंतयात्रींची आणखी एक सुरेख रचना. खूपच आवडली. सं - दी - प

अप्रतिम ! अद्भुत !
चांदणठिणग्या, नभझुंबर, पहाटफुटणी
वाह, क्या बात हैं ! ही सुंदर चित्रदर्शी आशयघन रचना अर्थात बेहद्द आवडली !