स्टेजवरची वज्रमूठ,
मेजवरती ठरली झूट,
मतपेटीतलं भूत,
मेले नाही।।
सुपारी फुटायच्या आत,
बुंदी खायची घाई,
मतदारच बाप अन् आई
विसरले।।
कमळ विकसले,
काका आकसले,
नाना प्रकाशले,
बुध्दिबळे।।
भांडे लपवले ताका,
बोबडले ते काका,
नाही राहीला धाका,
पक्ष-फूटी।।
सत्तेसाठी ता ता थय्या,
भाजप व विरोधक एकशय्या
'समान नागरी' ची नैय्या
पार पडो।।
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2849
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिगू कधीच वेडा झाला....
हा हा हा....
घ्या..(कर्नलजी धन्यवाद आपल्या नेहमीच्या सपोर्टसाठी)
In reply to हा हा हा.... by कर्नलतपस्वी
ताई मालक पक्षाची ( हा हा हा)
In reply to घ्या..(कर्नलजी धन्यवाद आपल्या नेहमीच्या सपोर्टसाठी) by बाजीगर
असंगाशी संग भाग २.
ना मैने सिग्नल देखा ना तुने
जबराव जबराव जबराव
आता २ सभा चालू आहेत ,
छान जमले हो .
बंद झाला राजकारण धागा जरीही.