Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by Trump on Sat, 06/24/2023 - 23:12
लेखनविषय (Tags)
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
शिफारस
दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे पर्यटनासाठी जायचे योजत आहेत. सदर प्रवास हा हिप्पी आणि कमनियोजीत (कमीत कमी नियोजीत), कमीत कमी खर्चात अशा प्रकारचा करायचा आहे. त्यामुळे हॉटेल हा शेवटचा पर्याय आहे. कृपया राहण्यासाठी ठिकाणे सुचवा. १. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेपासुन जवळ असावे. २. जेवण स्वतः बनवण्याची मोकळीक असावी. ३. ठिकाण सुरक्षित असावे, मालक प्रामाणिक असावा. दिलेले कपडे, बिछाणे, भांडी स्वच्छ असावीत. आपत्कालीन व्यवस्था असावी. ४. जवळ तयार जेवणाची व्यवस्था असावी, गरज पडल्या विकत घेता येईल. किराणा मालाचे दुकान जवळ असावे. ५. भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे. ६. शाकाहरी जेवण, मराठी बोलणारे व्यवस्थापक्/मालक असल्यास प्राधान्य जरी सगळ्या अटीत बसणारी ठिकाणे नसतील तरी सुचवा. मदतीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • 17867 views

प्रतिक्रिया

Submitted by कानडाऊ योगेशु on Sun, 06/25/2023 - 01:22

Permalink

वृंदावन च्या मुख्य रस्त्यावर

वृंदावन च्या मुख्य रस्त्यावर बर्याच धर्मशाळा आहेत तिथे वाजवी दरात सोय होऊ शकते. वृंदावन च्या जवळच गोवर्धन पर्वत आहे तिथे इलेक्ट्रीक रिक्षाने परिक्रमा करता येऊ शकते. माकडे भरपूर आहेत व उपद्रवी आहेत. शक्यतो चष्मा/मोबाईल बाहेर न काढणे उत्तम. मथुरा उभ्या उभ्या पाहण्यासारखे आहे. तिथे राहयची आवश्यकता नाही. आग्र्यासाठी अगोडा वगैरे साईट वर डिल मिळते का ते पाहा. दिल्लीसाठी महाराष्ट्र मंडळात सोय होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user इपित्तर इतिहासकार

Submitted by इपित्तर इतिहासकार on Sun, 06/25/2023 - 07:46

In reply to वृंदावन च्या मुख्य रस्त्यावर by कानडाऊ योगेशु

Permalink

दिल्लीचे

महाराष्ट्र मंडळ ह्याबद्दल विवेक पटाईत ह्यांना विचारा डिटेल. मला वाटते दिल्लीत (महाराष्ट्र मंडळात राहून) आग्रा वारी करता येईल (दोन तासच आहे प्रवास)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 06/25/2023 - 10:29

In reply to दिल्लीचे by इपित्तर इतिहासकार

Permalink

महाराष्ट्र मंडळ,पहाडगंज,नवीदिल्ली

याच जुन्या इमारतीत गिजरे यांचे टुअर office आहे. त्यांचे एक एजंट पुण्यात आहेत. तेही बुकिंग करून देतात. पण दिल्लीला राहून आग्रा/जयपूर ट्रीप करू नये.
  • Log in or register to post comments
Profile picture for user इपित्तर इतिहासकार

Submitted by इपित्तर इतिहासकार on Sun, 06/25/2023 - 10:57

In reply to महाराष्ट्र मंडळ,पहाडगंज,नवीदिल्ली by कंजूस

Permalink

हमम

पण दिल्लीला राहून आग्रा/जयपूर ट्रीप करू नये. #### का? जयपूर ठीकच आहे पण आग्र्याने काय घोडे मारले ??
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Mon, 06/26/2023 - 11:32

In reply to महाराष्ट्र मंडळ,पहाडगंज,नवीदिल्ली by कंजूस

Permalink

फक्त राहण्याचे ठिकाण हवे आहे.

याच जुन्या इमारतीत गिजरे यांचे टुअर office आहे. त्यांचे एक एजंट पुण्यात आहेत. तेही बुकिंग करून देतात.
धन्यवाद. फिरण्याचे नियोजन मुद्दामहुन तिथे जाऊन करायचे असे ठरवले आहे. फक्त राहण्याचे ठिकाण हवे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Mon, 06/26/2023 - 12:22

In reply to दिल्लीचे by इपित्तर इतिहासकार

Permalink

काय?

दिल्ली-आग्रा २ तास? अहो यमुना एक्स्प्रेस वे झालाय तरीही ५-६ तास लागतात. दिल्लीहुन आग्र्याला जाउन फक्त ताजमहाल बघुन यायला पुर्ण दिवस लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Tue, 06/27/2023 - 16:13

In reply to काय? by राजेंद्र मेहेंदळे

Permalink

दिल्ली ते ताजमहाल अर्ध्या

दिल्ली ते ताजमहाल अर्ध्या दिवसात करता येतो, मात्र तिकीट महाग आहे. नवी दिल्ली येथून सकाळी ६.०० भोपाळ शताब्दी पकडायची, ती आग्र्याला आठ वाजता पोचते. साधारण तीन तासात ताजमहाल पाहून होतो. परतीसाठी ११.२५ ला वंदे भारत एक्स्प्रेस आग्र्याहून आहे, ती दुपारी १.२० ला निजामुद्दीन स्थानकावर परत पोचवते. या ट्रिपमध्ये दुपारपासून संध्याकाळचा वेळ वाचतो. शताब्दी सुमारे ५०० रुपये आणि वंदे भारत ७५० रुपये अधिक २५० ताज तिकीट आणि आग्र्यातील रिक्षा एकूण २००-३०० रुपये असा खर्च येईल. साधारण एका महिन्यापूर्वी केलेल्या ट्रिपचे हे आकडे आहेत. या ट्रीपमध्ये आग्ऱ्याचा किल्ला पाहणे होत नाही, तेवढा वेळ हाताशी नाही. पहाडगंज येथील स्वस्त हॉटेलमध्ये राहिल्यास सकाळी ६.०० ला शताब्दी पकडणे सोपे होते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 07/01/2023 - 10:00

In reply to दिल्ली ते ताजमहाल अर्ध्या by मनो

Permalink

यापेक्षा सकाळी जाताना आणि

यापेक्षा सकाळी जाताना आणि येताना शताब्दी घेतली तर रात्री २०.३८ ला आग्र्याला बसलात तर २३०० ला नवी दिल्ली स्थानकावर उतरून गंतव्य स्थानी पोचता येईल. म्हणजे सकाळी आठ ते रात्री आठ असे पूर्ण १२ तास मिळतात ज्यात ताजमहाल आग्र्याचा किल्ला आरामात पाहून होईल आणि नीट कार्यक्रम आखला तर फतेहपूर सिक्रि सुद्धा ( घाईघाईने) करता येईल. आणि नवी दिल्ली स्थानकावरच रेल्वेची रिटायरिंग रुम घेतली तर तेवढीच सुविधा होते. शुक्रवारी ताजमहाल पाहण्यासाठी फुकट आहे पण शुक्रवारी फतेहपूर सिक्रि बंद असते.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Sat, 07/01/2023 - 11:00

In reply to यापेक्षा सकाळी जाताना आणि by सुबोध खरे

Permalink

माझ्या माहितीप्रमाणे

माझ्या माहितीप्रमाणे शुक्रवारी स्थानिक मुसलमानांसाठी ताज मशीद उघडी असते, पण त्याकरता स्थानिक पत्ता असलेला आयडी दाखवावा लागतो. इतरांना बाहेरून किंवा नदीच्या पलीकडे जाऊन फुकट :-D
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 07/01/2023 - 13:41

In reply to यापेक्षा सकाळी जाताना आणि by सुबोध खरे

Permalink

ताज शुक्रवारी बंदच धरावा.

तशी पाटीही बऱ्याच हॉटेलांच्या रिसेप्शन रुममध्ये लावलेली सापडेल. ट्रंप कुठून निघणार माहीत नाही. पण मुंबईत वर्ल्ड ट्रेंड सेंटरमध्ये उप्र पर्यटन केंद्र आहे ते ढीगभर नकाशे आणि पत्रक देतात. तसेच इंडिया टुरिझम ऑफिसमध्येही पत्रकं देतात. ते कार्यालय आता चर्चगेट समोरच्या रूझर्वेशन इमारतीतून मरीन ड्राईवकडे हलवले आहे. लाभ घ्यावा.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Mon, 06/26/2023 - 11:28

In reply to वृंदावन च्या मुख्य रस्त्यावर by कानडाऊ योगेशु

Permalink

धन्यवाद. संपर्कमाहिती असल्यास द्यावे.

दिल्लीसाठी महाराष्ट्र मंडळात सोय होऊ शकेल.
धन्यवाद. संपर्कमाहिती असल्यास द्यावे.
वृंदावन च्या जवळच गोवर्धन पर्वत आहे
टाकतो यादीमध्ये
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 06/27/2023 - 19:03

In reply to धन्यवाद. संपर्कमाहिती असल्यास द्यावे. by Trump

Permalink

वर मी दिलेल्या फोटोंत एक

वर मी दिलेल्या फोटोंत एक पत्रक महाराष्ट्र मंडळाचेच आहे. फोन नंबर बदलले असण्याची शक्यता आहे. करून पाहा. पुण्याचा नंबरही आहे. वेबसाईट आहे. बाकी दिल्लीवरून आग्रा पाहून जाण्याची घाई कशाला? आग्रा फोर्ट स्टेशन जरी ताज आणि लाल किल्ल्याजवळ असले तरी आग्रा कंटोनमेंट स्टेशन हे दिल्ली मुंबई मेन लाईनवर आहे. त्या स्टेशन बाहेर बरीच स्वस्त हॉटेल्स आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 06/25/2023 - 05:19

Permalink

ही सहल केली आहे पण . . .

पण खूप दिवस राहून पाहण्यासारखे मथुरा, वृंदावनला काय आहे? मला तरी तसे वाटले. Visa2explore channel चे विडिओ आहेत. पंधरा विडिओंची प्लेलिस्ट आहे. पूर्ण भाविकपणा हवा. बाकी विचारलेल्या राहण्याच्या जागा शोधाव्या लागल्या नाहीत कारण स्वस्त हॉटेल्स सगळीकडे आहेत. आणि सात दिवसांत दिल्ली आग्रा मथुरा जयपूर होऊ शकते. तुम्ही म्हणता तशा स्वस्त जागांना तिकडे 'बरसाती' म्हणतात. पत्रकार(कै.) विश्वास मेहेंदळे यांच्या एका पुस्तकात त्याची माहिती आहे. दूरदर्शनसाठी ते दिल्लीत सुरुवातीला राहिले होते. तिकडेच राहणाऱ्या कुणाशी ओळख असेल तर सोय होईल. किंवा तिकडे गेल्यावर 'बरसाती'ची चौकशी केल्यास सापडतील.
  • Log in or register to post comments
Profile picture for user इपित्तर इतिहासकार

Submitted by इपित्तर इतिहासकार on Sun, 06/25/2023 - 07:55

Permalink

शाकाहारी जेवण

ओघाने आलेच कारण ९०% टूर हा भक्ती मार्गावरील आहे तुमचा. पण मराठी बोलणारा मॅनेजर असण्याचे प्रयोजन समजले नाही खास मला...... असो, आपापली चॉईस आहे, मुळात मथुरा - वृंदावन - आग्रा ही तिन्ही ठिकाणे दिल्ली पासून २-३ तासांच्या अंतरावर आहेत, मोठ्या बॅग अन् इतर जड सामान दिल्लीत महाराष्ट्र मंडळाच्या (मराठी बोलणाऱ्या) मॅनेजरच्याच अखत्यारीत अन् सुरक्षेत सोडून सड्याने उरलेली तिन्ही ठिकाणे फिरता येतील. Itenary खालील प्रमाणे :- दिवस १ - दिल्ली आगमन, वाटल्यास दिल्ली दर्शन नाहीतर आराम. दिवस २ - खासगी ठरवून घेतलेली गाडी किंवा सार्वजनिक प्रवास साधने वापरून आग्रा - सायंकाळी परत दिल्ली असेच तिसरा अन् चौथा दिवस वृंदावन आणि मथुरा करावे. बफर म्हणून २-२ दिवस ठेवता येतील वाटल्यास. हिप्पी नियोजन म्हणजे राहण्याचे खाण्याचे जास्त लाड नको आहेत असे धरून चालतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Mon, 06/26/2023 - 11:37

In reply to शाकाहारी जेवण by इपित्तर इतिहासकार

Permalink

हिप्पी म्हणजे कमीत कमी नियोजनात मनमौजी प्रवास.

पण मराठी बोलणारा मॅनेजर असण्याचे प्रयोजन समजले नाही खास मला......
धन्यवाद. कारण सोबतची काही माणसे मराठीशिवाय कोणतीही भाषा बोलत नाही. तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्कृती जाणुन घ्यायची इच्छा आहे.
हिप्पी नियोजन म्हणजे राहण्याचे खाण्याचे जास्त लाड नको आहेत असे धरून चालतोय.
हिप्पी म्हणजे कमीत कमी नियोजनात मनमौजी प्रवास.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 06/25/2023 - 13:08

Permalink

बरोबर कोण आणि किती जण आहेत?

याने या ट्रिपमध्ये फरक पडतो. ---- जर का पुढेमागे उत्तराखंड, हिमाचल, करणार असाल तर आणि विमान प्रवास नसेल तर एक धक्का दिल्लीत होणारच. तेव्हा त्याचा उपयोग करा आणि या सहलीतून दिल्ली गाळावी.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Mon, 06/26/2023 - 11:40

Permalink

फक्त दिल्ली. जास्त इतर ठिकाणी नाही.

बरोबर कोण आणि किती जण आहेत?
८ ते १० तरुण लोक. फक्त दिल्ली. जास्त इतर ठिकाणी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Mon, 06/26/2023 - 13:58

Permalink

ट्रम्प भौ

महाराष्ट्र समाज आग्रा ,महाराष्ट्र मंडळ पहाडगंज नवी दिल्ली गुगलून बघा . टेलिफोन करा पुढील मार्ग सुचेल. म मं न दिल्ली तर चोविस तास टेलिफोन उपलब्ध असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Tue, 06/27/2023 - 11:23

In reply to ट्रम्प भौ by कर्नलतपस्वी

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 06/26/2023 - 14:54

Permalink

हे घ्या.

1) Image removed.

2) Image removed.

3)sightseeing by hoho Image removed.

4) sightseeing by metro Image removed.

  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Tue, 06/27/2023 - 11:24

In reply to हे घ्या. by कंजूस

Permalink

धन्यवाद. २०१४ ची माहिती पाहुन

धन्यवाद. २०१४ ची माहिती पाहुन आदर दुणावला.
  • Log in or register to post comments

Submitted by रंगीला रतन on Tue, 06/27/2023 - 02:56

Permalink

अशे तरुण लोक आज भारतात आहेत?

कारण सोबतची काही माणसे मराठीशिवाय कोणतीही भाषा बोलत नाही. बरोबर कोण आणि किती जण आहेत? ८ ते १० तरुण लोक. अशे तरुण लोक आज भारतात आहेत? असतील तर त्यांच्यासोबत जाताना तुम्हाला लाज वाटायला पाहीजे. नुस्ती फालतुगीरी
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 06/27/2023 - 05:01

In reply to अशे तरुण लोक आज भारतात आहेत? by रंगीला रतन

Permalink

हा मुद्दा कळला नाही.

मला वाटतं गप्पाटप्पा मराठीतच व्हाव्यात हा उद्देश असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Tue, 06/27/2023 - 06:06

In reply to अशे तरुण लोक आज भारतात आहेत? by रंगीला रतन

Permalink

प्रत्येक शब्दावरी माझा ठसा,माझा ठसा शब्द माझा चेहरा,शब्द माझा आर

अशे तरुण लोक आज भारतात आहेत? असतील तर त्यांच्यासोबत जाताना तुम्हाला लाज वाटायला पाहीजे. नुस्ती फालतुगीरी का लाज वाटायला पाहीजे? नाही येत दुसर्‍या भाषा म्हणून काय नातेवाईक मित्र सोडून द्यायचे? दक्षिण भारतात लोक फिरायला जातात तेव्हां तीथले लोक मराठी हिन्दी समजत नाही किंवा समजुन सुद्धा न समजल्या सारखे करतात. आमचे काही मित्र पहिल्यांदाच उत्तर भारतात गेले. बोलता बोलता म्हणाले, तुम्हारा खुन करनेवाला और हमारा खुन करनेवाला एकच है समोरचा यजमान गोंधळात पडला. बरोबरच्या एकाला लगेच कळाले त्याने सारवा सारव केली. उनको कहना है की हम दोनो को (खुन) बनानेवाला एक ही परमात्मा है. तेव्हा ही फालतूगीरी नाही. भाषेचा सभ्यतेने वापर करावा. प्रत्येक शब्दावरी माझा ठसा,माझा ठसा शब्द माझा चेहरा,शब्द माझा आरसा. शांताबाई शेळके.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Tue, 06/27/2023 - 11:13

In reply to प्रत्येक शब्दावरी माझा ठसा,माझा ठसा शब्द माझा चेहरा,शब्द माझा आर by कर्नलतपस्वी

Permalink

हमारे इधर पाऊस लई पड्या

का लाज वाटायला पाहीजे? नाही येत दुसर्‍या भाषा म्हणून काय नातेवाईक मित्र सोडून द्यायचे? दक्षिण भारतात लोक फिरायला जातात तेव्हां तीथले लोक मराठी हिन्दी समजत नाही किंवा समजुन सुद्धा न समजल्या सारखे करतात.
+१
तुम्हारा खुन करनेवाला और हमारा खुन करनेवाला एकच है
हे भारी आहे. मी "हमारे इधर पाऊस लई पड्या" असे हिंदी(?) बोलणारे लोक बघितले आहेत. असली भाषा ऐकुन समोरचा जीवच देईल. ह्यावर एक मस्त धागा होऊ शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Tue, 06/27/2023 - 11:56

In reply to हमारे इधर पाऊस लई पड्या by Trump

Permalink

यावरून आठवले

आमच्या सासूबाई लखनऊ आल्या होत्या, कामवाली बाईला म्हणाल्या, तुमरे या धुपकाला अधीक है. धुपकाला म्हणजे उन्हाळा.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Tue, 06/27/2023 - 12:19

In reply to हमारे इधर पाऊस लई पड्या by Trump

Permalink

ह्यावर एक मस्त धागा होऊ शकतो.

ह्यावर एक मस्त धागा होऊ शकतो. उन्हळ्यात उत्तरेत "चिमडी " नामक एक टरबुजासारखे पण छोटे फळ असते त्याची नुसती साखर घालून कोशिंबीर सारखे काहीतरी बनवले जायचे.. यावर एका व्यक्तीने " रामू ( आचारी नाव) "आज चीम्बडि "संप" गयि " असे "आचारी संपावर जायला" भाग पडणारे वाक्य फेकलेले आठवले सुदैवाने तो नोकर पिढ्यान पिढया मराठी कुटुंबात नोकरीत असल्यामुळे. "मामीजी मला समझले " असे काहीसे पुटपुटला असो विषयांतर झाले,,, हिप्पी सहलीला मदत करूयात ( एक उनाड दिवस याची आठवण झाली )
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Tue, 06/27/2023 - 11:09

In reply to अशे तरुण लोक आज भारतात आहेत? by रंगीला रतन

Permalink

तरुण हा सापेक्ष शब्द आहे. काही लोक वयाने तरुण पण मनाने म्हातारे

मोठा आहे दगदगीचा प्रवास असल्याने काही लोक आजारी पडण्याची, किंवा आरामाची गरज लागणे गृहीत धरले आहे. अशा वेळी समजुन घ्यायला/सांगायला मराठी माणसे जास्त उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे. आणि भविष्यातील नातेसंबध वृधिंगत होण्याची शक्यता आजमावण्याची आहे.
८ ते १० तरुण लोक.
तरुण हा सापेक्ष शब्द आहे. काही लोक वयाने तरुण पण मनाने म्हातारे असतात, तसेच उलट.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Tue, 06/27/2023 - 12:22

In reply to तरुण हा सापेक्ष शब्द आहे. काही लोक वयाने तरुण पण मनाने म्हातारे by Trump

Permalink

अशा वेळी समजुन घ्यायला

अशा वेळी समजुन घ्यायला/सांगायला मराठी माणसे जास्त उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे. ठीक आहे त्यासाठी मराठी माणूस बरोबर पाहिजे.. म्हणजे प्रवासात एक मराठी वाटाड्या / आयोजक पाहिजे कि तेथील राहण्याचं ठिकानि फक्त मराठी भाषिक मालक / नौकर पाहिजे.. काय गौड्गबल आहे हे ? दगदगीचा प्रवास ? २०२३ सालि
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Tue, 06/27/2023 - 06:40

Permalink

आग्रा,दिल्ली ही.

शहरे रामायण महाभारत कालापासून प्रसिद्ध आहेत. काय बघायचे किती बघायचे पहिलेच ठरवा. उदाहरणार्थ आग्रा ताजमहाल करता प्रसिद्ध आहे पण लाल किल्ला, इत्मद्दौला, संग्रहालय, अकबराची कबर जवळपास फतेहपुर सिक्री ,डिग पॅलेस(महाराजा सुरजमल जाट) याची राजधानी,भरतपुर पक्षी उद्यान आणखीन बरेच काही. तसेच दुसर्‍या शहरातही भरपुर बघण्या सारखे आहे. दिल्लीचे नवीन शहिद स्मारक व जुने इंडीया गेट बघायला विसरू नका. नवीन संसद,जुनी पार्ल्यमेंट,राष्ट्रपती भवन,पालिका बझार आणी बरेच काही.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Tue, 06/27/2023 - 11:00

In reply to आग्रा,दिल्ली ही. by कर्नलतपस्वी

Permalink

नेताजी सुभाष चंद्रांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा

दिल्लीचे नवीन शहिद स्मारक व जुने इंडीया गेट बघायला विसरू नका. नवीन संसद,जुनी पार्ल्यमेंट,राष्ट्रपती भवन,पालिका बझार आणी बरेच काही.
हो, नक्कीच. नेताजी सुभाष चंद्रांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा यादीमध्ये आहेच. श्री सावरकारांचा फोटो संसदेत लावलेला स्मरणात आहे. त्यामुळे तो काही बघता येणार नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Tue, 06/27/2023 - 09:57

Permalink

काय बघायचे किती बघायचे पहिलेच

काय बघायचे किती बघायचे पहिलेच ठरवा अगदी बरोबर दिल्लीतून आग्रा , ताज आणि आग्र्याचा लाल किल्ला एवढे सकाळी लवकर निघून रात्री पर्यंत परत येणे असे करता येते पण मग बाकी राहून जाईल आग्र्याचा लाल किल्ला ला कधी जे वाटाडे असतात त्यांना तुम्हाला महाराष्ट्राच्या संधर्भात सांगा असे सांगितले तर ते आपली " कॉमेंट्री" थोडॆ बदलतात पण त्यात विशेष तसे का हि वेगळे नसते बाकी तुम्हाला "हिप्पी "पद्धतीने भटकंती कराव्यायची आहे हे ऐकून मौज वाटली एकीकडे म्हणता ना नियोजन न करत हिप्पी पद्धतीने आणि दुसरी कडे मराठी मालक, जेवण बनवता आले पाहिजे मी आपत्कालीन सेवा? आणि भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे. मग कसलं हो हिप्पी पद्धतीने ? ना नियम हि खरी हिप्पी पद्धत .. उचल पिशव्या आणि निघा .. येथे प्रश्न हे सुधाच एक प्रकाचे नियोजन बरं दिल्ली आग्रा वैगरे हि " चावून चोथा " अशी "पर्यटन स्थळे" आहेत त्यात तुमचं या "मराठी फक्त" चमूला हिप्पी पद्धतीने जर भटकायचे तर ते खूप "आयोजन" करून शोधावे लागेल .. बाकी सरधोपट येवध्या गोष्टी उपलब्ध आहेत कि शोध घेणे सोप्पे आहे तुमचं काही अटी जरा मौजेचं वाटत - जेवण बनवता आले पाहिजे आणि हॉटेल नको + स्वस्तात, दिलि सारख्य मेट्रो शहरात असे ठिकाण मिळेल? आणि जेवण बनवण्याची सुविधा पाहिजे तर मग "फर्निश्ड अपार्टमेंट " मग ती कसली असणार आहे स्वस्त? - शाकाहरी जेवण, मराठी बोलणारे व्यवस्थापक्/मालक-- किती दिवसांचा प्रश्न आहे ? एकूण ७-८ असावेत असे वाटते , आणि ते सुद्धा उत्तर भारतातील या मुखय शहरात मग तिथे शाकाहारी जेवण मिळणे अवघड आहे का हो? अगदी जामा मस्जिदी पाशी पण मिळेल .. काय गंमतशीरअट आहे" तुम्ही काही क्रोएशिया किंवा बुरुंडी ला नाही चालला तम्ही भाऊ -भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे.... म्हणजे? अहो कुठेहि माणसांची मर्यादा असणारच ना ? आणि "आपत्कालीन व्यवस्था " ह्याचा विचार केला तर एक खोलीत किती माणसे एकावेळी" याचा विचार मालक आणि राहणार्याने केला पाहिजेच कि मिपावर मदत करायला लोक उत्सुक असतात हो पण मदत/ माहिती विचारणाऱ्याने पण जरा तारतम्य बाळगावे हि माफक अपेक्षा असो, झाली एकदाची "हिप्पी" पद्धतीची भटकंती कि आमचं सारखया चाकरीतील मिपाकरांना टायचाच संचितार वृत्तांत आवडेल बजेटच्या साठी, https://www.youtube.com/@Bha2Pa/featured वर काही आहे का पहा जाता जाता .... "हिप्पी" पद्धतिने म्हणजे स्वस्त असेच नसते , त भरपूर खर्च करीत सुध्दा हिप्पी हिंडता येते
  • Log in or register to post comments
Profile picture for user इपित्तर इतिहासकार

Submitted by इपित्तर इतिहासकार on Tue, 06/27/2023 - 10:31

In reply to काय बघायचे किती बघायचे पहिलेच by चौकस२१२

Permalink

वाह बुआ!!

सणसणीत पण थेट अन् तितकाच कायदेशीर प्रतिसाद. आवडला आपल्याला. मी तर ईव्हन हे म्हणतो की इतका खर्च ते संगमरवरी थडगे तरी कश्याला पहावे ! जेव्हा सील केलेली दालने उघडतील तेव्हा पाहूया की.... (बोल्ड केले आहे ते मावैम) अर्थात आपण कोणाच्या वैयक्तिक आवडीवर काय बोलावे म्हणा, ज्याला जिथे आवडेल त्याने तिथे पर्यटन करावे, जो जे वांछील तो ते लाहो.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Tue, 06/27/2023 - 11:23

In reply to काय बघायचे किती बघायचे पहिलेच by चौकस२१२

Permalink

काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे

आग्र्याचा लाल किल्ला ला कधी जे वाटाडे असतात त्यांना तुम्हाला महाराष्ट्राच्या संधर्भात सांगा असे सांगितले तर ते आपली " कॉमेंट्री" थोडॆ बदलतात पण त्यात विशेष तसे का हि वेगळे नसते
जरा सविस्तर सांगा. जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे माहिती आहे. तेथील किल्लामार्गदर्शक लोक चुकीचा इतिहास सांगतात.
ना नियम हि खरी हिप्पी पद्धत .. उचल पिशव्या आणि निघा .. येथे प्रश्न हे सुधाच एक प्रकाचे नियोजन
प्रवास हिप्पीच आहे, पण अचानक अडचणी येऊ शकतात हे गृहीत धरुन नियोजन. एकदा राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था झाली की बाकीचे नियोजन तिथे जाऊन करता येईल.
- जेवण बनवता आले पाहिजे आणि हॉटेल नको + स्वस्तात,
काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Tue, 06/27/2023 - 12:05

In reply to काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे by Trump

Permalink

जंजिर्‍यावर भगवा झेंडा

जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे .. कधी काय संदर्भ? तुम्हाला "मराठीच सर्व काही पाहिजे" म्हणून केवळ एका अनुभवावरून सांगितले... आमचे बोलणे ऐकून वाटाड्याने जरा मराठी लोकांना म्हणजे आग्र्याहून सुटका वैगरे संधर्भ घालून सांगितले एवढेच , फार त्यात विशष नाही , बाकी तिथे कोणत्यातरी महाराष्ट सरकारने महाराजांचा पुतळा उभा केला आहे त्यामुळे आल्या आल्या मराठी भागातील पर्यटक तर सुखवतोच . तेथील किल्लामार्गदर्शक लोक चुकीचा इतिहास सांगतात. असे जर तुमचे मत असेल तर नका वापरू .. महाराष्ट्रातील जाणकार घेऊन जा ( बलकवडे येतात का बघा ) पण स्वस्तात कसे? आणि त्या वाटाड्याला तुमचे हे हिप्पी फिरणे परवडलं का? बाकी मला तरी मराठी इतिहासाशी निगडित गोष्टीं गोष्टीन पेक्षा स्वारस्य एकूण इतिहास यात जास्त स्वारस्य होते, एकूण पण आग्र्याचा लाल किल्ला आणि फतेपूर सिकरी नक्की बघावा, नुसता ताज महाल नको प्रवास हिप्पीच आहे, पण अचानक अडचणी येऊ शकतात हे गृहीत धरुन नियोजन. : अनेकांना हा हिप्पी प्रवास वगैरे यात काही वाटत नाहाये उगाच शब्द वापरल्यासारखा वाटतोय ,,, सर्वसाधारण प्रवाशांसारखया गरजा दिसत आहेत , उगाच हिप्पी वगरे विशेषणे काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे. परत कोड्यात बोलताय ,, शारिरिक कि वैद्यकीय ? शारिरीक अडचणीमुळे, स्वतःचा स्वयंपाक...? बर बुवा असेल काही तरी मग "फर्निश्ड अपार्टमेंट" शिव्या पर्याय दिसत नाही ... पण तो स्वस्त कसा असेल? नाहीतर " कोणाचाच तरी काय फालतुगिरी " असा प्रतिसाद आला तर नवल नाही ! सर्वात शेवटी... ७-८ जणांसाठी त्रिकोण ( दिलि आग्रा जयपूर ) सहल "मराठी पद्धतीने ( आणि बाकी जे काय विशेष गरज असले ती ) आयोजित करणारी एकादी सन्स्था असेल महाराष्ट्रात ,, आजोब सांगायचे कि पूर्वी एक "यात्रा" कंपनी रेल्वे बोगी भाड्याने नेऊन अशी सहल आयोजित करायचे , साबुदाण खिचडी पासून ते पियुष ...सर्व काही, बोगी चा एक भाग हा स्वयंपाकघराचं असायचा ,, ( चेष्टा करीत नाहीये तर "श्री दत्तदिगंबर यात्रा कंपनी होती खरी https://www.tourtravelworld.com/travel-agents/datta-digambar-tours-travels-383989/contact.htm
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Tue, 06/27/2023 - 12:50

In reply to जंजिर्‍यावर भगवा झेंडा by चौकस२१२

Permalink

स्थानिकांचा स्वभाव दाखवणारे काही अभिप्राय

जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे .. कधी काय संदर्भ?
एका पर्यटकाला किल्ल्यावर भगवा झेंडा फडकावायला विरोध केला होता. २०२१ - २०२२ च्या दरम्यानची घटना आहे. तो अभिप्राय मला लगेच सापडला नाही. त्या मुलाने त्याचा बोटीत बसुन भगव्या झेंड्याचा फोटो टाकला आहे. स्थानिकांचा स्वभाव दाखवणारे काही अभिप्राय
vijay murudkar There is no Indian Flag hosted on Entire Murud-Janjira Fort and I found It is Very 'DISRESPECTFULL' People are very profit centric and asking charges for everything (ie. Boat charges, Fort cahrges, Guide charges etc etc) but no-one is interested in good governance of heritage like Janjir Fort which has very special place our heart & nation history.
Shrikant Auti Minority captured all business... Local muslims misbehave with tourist.
Shivaji Nade किल्ल्यातील आतील भागाची बरीच पडझड झालेली आहे. येथील काही नावाडी लोक संभाजी आणि शिवाजी महाराजांबद्दल आदराने बोलत नाहीत(सध्याची परिस्थिती कदाचित बदलली असेल). सिद्दी जौहर बद्दल मात्र आदर आणि अभिमानाने बोललं जातं. शक्य असेल तर सकाळी किंवा दुपार नंतर जाणे योग्य.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Wed, 06/28/2023 - 00:10

In reply to जंजिर्‍यावर भगवा झेंडा by चौकस२१२

Permalink

बाकी तिथे कोणत्यातरी महाराष्ट

बाकी तिथे कोणत्यातरी महाराष्ट सरकारने महाराजांचा पुतळा उभा केला आहे त्यामुळे आल्या आल्या मराठी भागातील पर्यटक तर सुखवतोच .
पुतळा बाहेर रस्त्यावर आहे. इतर शहरात असलेल्या तत्सम शिवाजी चौकामधील पुतळ्यासारखाच. आग्रा किल्ल्यामध्ये मी गाईड ला मुद्दामुन शिवाजी महाराजांना जिथे ठेवले होते ती कोठडी दाखवायला सांगितले होते. त्याने ही एका बंद दरवाजामागे असलेल्या एका वास्तुत ती असल्याचे सांगितले .पण एकुण ह्याबाबतीत उदासीनताच दिसली. पण तरीही अश्या परिसरातुन शिवाजी महाराज निसटले ह्या कल्पनेनेच अंगावर शहारे आले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 06/27/2023 - 11:35

Permalink

कमीतकमी खर्चात मी फिरतो.

मला हव्या त्या ठिकाणी खातो,राहतो,हवा तेवढा वेळ भटकतो. दुसरा कुणी बरोबर घेतला की चर्चा आली,त्याची आवड जपायला हवी. गाईड घेत नाही कारण मला वाचून सर्व माहिती मिळालेली असते. (जुनी लोनली प्लानिट पुस्तके). आगावू हॉटेल आरक्षण कधीच करत नाही. कुटुंबासह गेल्यासही नाही. जागा पाहून एक खोली स्वस्तात कुठेही मिळते. दुपारी बारा अगोदर हॉटेलवाले रेट कमी करायला तयार असतात. पावती नको असल्यास चांगली रुमही मिळते. दुपारी चार नंतर मात्र घासाघीस करता येत नाही. ओनलाइन बुकिंग न घेणारी बरीच हॉटेल्स रिकामी असतात. ओटो रिक्षा फिरवत हॉटेल रुम शोधायला कधीच जाऊ नका. (फक्त रेल्वेचं जाण्यायेण्याचं आरक्षण. तेही रद्द केल्यास दोनशे चाळीस रुपये कापून बाकीचे परत मिळतात.)
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Tue, 06/27/2023 - 11:39

In reply to कमीतकमी खर्चात मी फिरतो. by कंजूस

Permalink

तुम्ही दर्जाबद्दल कशी खात्री करता, किंवा जाणुन घेता?

ओनलाइन बुकिंग न घेणारी बरीच हॉटेल्स रिकामी असतात. ओटो रिक्षा फिरवत हॉटेल रुम शोधायला कधीच जाऊ नका.
तेही माझ्या लक्षात आले आहे. तुम्ही दर्जाबद्दल कशी खात्री करता, किंवा जाणुन घेता?
  • Log in or register to post comments
Profile picture for user इपित्तर इतिहासकार

Submitted by इपित्तर इतिहासकार on Tue, 06/27/2023 - 13:41

Permalink

Trump

गुरुनाथ ट्रॅव्हल्स, बाजीराव रस्ता, पुणे, इथे चौकशी करा कदाचित तुमच्या सगळ्या अटी आणि शर्तीत बसणारी टूर बनवून देतील ते लोक.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Tue, 06/27/2023 - 14:02

In reply to Trump by इपित्तर इतिहासकार

Permalink

इतरांनी दिलेल्या माहितीमुळे ते सुटतील असे वाटते.

गुरुनाथ ट्रॅव्हल्स, बाजीराव रस्ता, पुणे, इथे चौकशी करा कदाचित तुमच्या सगळ्या अटी आणि शर्तीत बसणारी टूर बनवून देतील ते लोक.
पुर्ण सहल नको आहे. प्रश्न फक्त राहण्याचा आणि खाण्याचा होता. इतरांनी दिलेल्या माहितीमुळे ते सुटतील असे वाटते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by महिरावण on Tue, 06/27/2023 - 13:46

Permalink

धागालेखक, धाग्याचे स्वरुप आणि

धागालेखक, धाग्याचे स्वरुप आणि धाग्यातील अटी पाहता धागा काढण्याच उद्देश निकोप न वाटता केवळ सदस्यांना कामाला लावून मजा बघण्याचा वाटतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user इपित्तर इतिहासकार

Submitted by इपित्तर इतिहासकार on Tue, 06/27/2023 - 14:34

In reply to धागालेखक, धाग्याचे स्वरुप आणि by महिरावण

Permalink

लोल

:D :D
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Tue, 06/27/2023 - 19:20

In reply to धागालेखक, धाग्याचे स्वरुप आणि by महिरावण

Permalink

सुरवातीला निकोप हेतू वाटून २

सुरवातीला निकोप हेतू वाटून २-४ गोष्टी सुचवयवाश्या वाटल्या तर धागाकर्ता काहीतरी गोंधळाचे आणि उगाच वेळखाऊ लिहीत आहेत असे वाटते आहे म्हणे तरुण टोळकं पण मनाने वयस्कर? सगळे ७-८? स्वतःचे जेवण स्वतः , ठीक असेल काही कारण पण त्यासाठी मग ठिकाण महाग असू शकते हे मेनी दिसत नाही , आणि ते सुद्धा मराठी मालकीचे? हे तर विचित्र अट आहे एकीकडे म्हणे हिप्पी आणि नियोजन नको आणि नियोजनाचे प्रश्न तर ५०
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 06/27/2023 - 14:50

Permalink

फक्त दोन ठिकाणी हॉटेल किंवा

फक्त दोन ठिकाणी हॉटेल किंवा जागा शोधावी लागेल. दिल्ली आणि आग्रा. त्यासाठी चार चार जणांचे दोन गट करून काम होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 06/27/2023 - 14:57

Permalink

तुमच्यापैकी किती जणांनी अशी

तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे यावर अवलंबून आहे. अशी म्हणजे तिथे जाऊन जागा शोधणे ,पाहाणे आणि मग ठिकाणं कशी पाहाणे हे ठरवणे. अगदी प्रथम बिचकायला होतं पण नंतर सवय होते. हॉटेल वाले,एजंट,बसवावे,टॅक्सी/ओटोवाले कसे कुठे फसवतात हे अगोदरच समजते. तशी बोलणी करता येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Tue, 06/27/2023 - 15:12

In reply to तुमच्यापैकी किती जणांनी अशी by कंजूस

Permalink

अजुन तरी बहुतेकांनी अशी यात्रा केली नाही.

तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे यावर अवलंबून आहे. अशी म्हणजे तिथे जाऊन जागा शोधणे ,पाहाणे आणि मग ठिकाणं कशी पाहाणे हे ठरवणे. अगदी प्रथम बिचकायला होतं पण नंतर सवय होते.
अजुन तरी बहुतेकांनी अशी यात्रा केली नाही. त्यामुळे अंगवळणी पडल्या नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 06/27/2023 - 19:10

In reply to अजुन तरी बहुतेकांनी अशी यात्रा केली नाही. by Trump

Permalink

हं. मला तशी शंका आली.

हं. मला तशी शंका आली. आठ लोकांची राहाणे व्यवस्था, वाहन इत्यादी यासाठी अनुभव हवा. तीन ओटो रिक्षा करणे खटाटोप आणि गडबडीचे आहे. तीन वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतात आणि गोंधळ. त्यात हिंदी न बोलणारे म्हणजे अजून गोंधळ होऊ शकेल. सावधान. रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूस कमीतकमी चार नाके असतात. कोण कुठे भलतीकडेच गेला तर चुकामुक.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Tue, 06/27/2023 - 19:37

In reply to हं. मला तशी शंका आली. by कंजूस

Permalink

ओला किंवा तत्सम सेवा वापरायचा इरादा आहे.

ओला किंवा तत्सम सेवा वापरायचा इरादा आहे. त्यांच्याकडे ८ माणसांच्या गाड्या असतात. ज्यांना आराम करायचा असेल त्यांनी आरामशीर हॉटेलवर पडुन राहायचे. इतके लोक असल्यामुळे अडचण येण्याची शक्यता गृहीत धरली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Tue, 06/27/2023 - 19:33

In reply to तुमच्यापैकी किती जणांनी अशी by कंजूस

Permalink

तुमच्यापैकी किती जणांनी अशी

तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे मी काही ठिकाणी / काही वेळा असे केले आहे ऐनवेळी काय होते ते बघू पहिले १-२ दिवसांचे आरक्षित करायायचे आणि त्या वेळेस इतर काय आहे उपलब्ध हे बघायचे एकदा अंगाशी आले होते कामानिमित्त सिंगापुर ला ३१ डिसेंबरला होतो आणि स्वखर्चाचा मामला असल्यामुळे जरा पैसे वाचव्यायचे होते... सिंगापुर ला ३१ डिसेम्बर ला काहीतरी विचित्र नियम आहे / प्रथा आहे त्यादिवशीच फक्त सगळ्या होटेल भांड्यांवर एक मोठा सरचार्ज लावतात .. त्यामुळे आणि ऐनवेळी केल्याने फर महाग होते.. ४ वाजत आले आणि कामात बुडालो होतो आधीचे होटेल सोडेल होते ..ओळ्खिचे कुटुंब एक, ते पण पण त्यादिवंशी गावात नव्हते शेवटी कसे बसे एक बॅकपॅकर हॉस्टेल मिळाले, चान्गले होते पण धांदल झाली
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com