Skip to main content

(एकदा plane मधे एक अप्सरा आणि तिची आई जवळ येऊन बसली)

लेखक संदीप चित्रे यांनी गुरुवार, 07/05/2009 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: 'स्वप्लिल मन' यांची ही सुगंधित सफर बघून काही (नको त्या) आठवणी जाग्या झाल्या !! ----------------------------------------------------------------------- एकदा plane मधे एक अप्सरा आणि तिची आई जवळ येऊन बसली journey मग ती विस्मरणीय होऊन गेली ! आईला तिच्या बरोबर पाहून मला वाईट वाटले दुर्भाग्यावर माझ्या मला नवल नाही वाटले ओढणी तिची माझ्या खा॑द्यावर पडत होती आणि तिची आई मात्र बाजूला करत होती विमान जसे उडे तसे वाटे व्हावा स्पर्श तिचा आईकडे बघून माझ्या अंगावर काटा यायचा माझी चांगली window seat तिला मी देऊ केली thank you म्हणून स्वीकारत आई मधे बसली ! केस तिचे तिच्या चेहर्याशी खेळत होते आईमुळे मला ते जराही दिसत नव्हते सुवास तिच्या पर्फ्युमचा मंद येत होता पण मधे आई असल्याने खूप लांब होता कसा गेला दिवस नाही कळले काही नाव विचारण्याचे धैर्य झाले नाही उतरताना हळूच माझ्याकडे पाहून ती हसली अन् बरोबर ती आपल्या आईस घेऊन गेली अजूनही तो चेहरा कायम समोर दिसतो प्रत्येक सु॑दर मुलीसोबत तिच्या आईचा चेहरा दिसतो असेल नशिबात तर नक्की पुन्हा भेटेन भेटल्याभेटल्या पहिले आईस बाजूला करेन
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3401
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

चतुरंग...?

सुंदरीच्या स्पर्शाने काटा येण्याऐवजी आईच्या दहशतीने काटा उभा करणारी तुझी रोमांचकारी सफर आवडली! तुझं अनिवार दु:ख समजू शकतो रे संदीप! ;) (खुद के साथ बातां : रंगा, मधेच बसणार्‍या मुलीच्या आईला काटेकोरांटी म्हणावे का? :B ) चतुरंग

मुख्य आयडिया जुनीच आहे. पण मांडणी आधुनिक आहे. मस्त वाटल वाचायला. मीनल.

अरेरे ! :) --अवलिया

(प्रवासी)बेसनलाडू

विस-मरणीय सफर आवडली. टाळ्या आणि शिट्ट्या! रेवती

सहानुभूतीसाठी धन्स मित्र-मैत्रिणींनो.... रेवती -- टाळ्या आणि शिट्या पोचल्या :)

घ्या चित्रे साहेब, पण कविता छान.

आवडली. आलेत असे अनुभव. नंतर फोनाफोनी, मेलामेली आणि अधुनमधुन भेटीगाठी चालु होतात.;) अजुनतरी 'काटेकोरांटी' च्या अडचणी नाही आल्या कधी. :) -संदीप. काय'द्याच बोला.

पुढच्या वेळी तिच्या आईशी गप्पा मारा. त्या वेळी नक्की यश मिळेल, आणि वेळही छान जाईल. तथास्तू. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

हीहीही ... एक खडूस शंका: खिडकीत मुलगी, तिच्या शेजारी तिची आई आणि आईच्या शेजारी तुम्ही असताना मुलीची ओढणी तुमच्या खांद्यावर कशी पडली? का आधी ओढणी पडली आणि नंतर तुम्ही सीट देऊ केलीत??

चांगलय. काय राव, मागवून मागवून ज्युस पाजायचे ना काटेकोरांटीला, बरेच ब्रेक मिळाले असते. शिवाय डि.व्ही.टी. ची भिती घालून फेर्‍या मारायला लावायच्या... :-)

खुपच छान स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.