प्रेरणा: 'स्वप्लिल मन' यांची ही सुगंधित सफर बघून काही (नको त्या) आठवणी जाग्या झाल्या !!
-----------------------------------------------------------------------
एकदा plane मधे एक अप्सरा आणि तिची आई जवळ येऊन बसली
journey मग ती विस्मरणीय होऊन गेली !
आईला तिच्या बरोबर पाहून मला वाईट वाटले
दुर्भाग्यावर माझ्या मला नवल नाही वाटले
ओढणी तिची माझ्या खा॑द्यावर पडत होती
आणि तिची आई मात्र बाजूला करत होती
विमान जसे उडे तसे वाटे व्हावा स्पर्श तिचा
आईकडे बघून माझ्या अंगावर काटा यायचा
माझी चांगली window seat तिला मी देऊ केली
thank you म्हणून स्वीकारत आई मधे बसली !
केस तिचे तिच्या चेहर्याशी खेळत होते
आईमुळे मला ते जराही दिसत नव्हते
सुवास तिच्या पर्फ्युमचा मंद येत होता
पण मधे आई असल्याने खूप लांब होता
कसा गेला दिवस नाही कळले काही
नाव विचारण्याचे धैर्य झाले नाही
उतरताना हळूच माझ्याकडे पाहून ती हसली
अन् बरोबर ती आपल्या आईस घेऊन गेली
अजूनही तो चेहरा कायम समोर दिसतो
प्रत्येक सु॑दर मुलीसोबत तिच्या आईचा चेहरा दिसतो
असेल नशिबात तर नक्की पुन्हा भेटेन
भेटल्याभेटल्या पहिले आईस बाजूला करेन
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3401
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
आईगं...
हा हा हा!!
आणि तरूण प्रवाशाला
In reply to हा हा हा!! by चतुरंग
मस्त
अरेरे !
मजा आली
विसमरणीय
हम्म..
धन्स ... धन्स...
शिकवणी
आवडली. आलेत
माझा सल्ला
हीहीही ...
:-)
एकदम सही