✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जंजिरा - इतिहास

स
सुमीत यांनी
Tue, 05/05/2009 - 15:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
80339 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

छान

उमेश__
Tue, 05/05/2009 - 15:59 नवीन
छान लेख....उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद्
  • Log in or register to post comments

मस्त

विशाल कुलकर्णी
Tue, 05/05/2009 - 16:05 नवीन
मस्त माहिती, छान लेख सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

सहमत!

धमाल मुलगा
Tue, 05/05/2009 - 16:39 नवीन
आणखी एका किल्ल्याची उत्तम माहिती. धन्यवाद सुमीत! बाकी, लायजी पाटलाच्या ह्या धाडसी निर्णयाला मोरोपंतांनी आधी परवानगी का दिली, दिली तर मोरोपंतांना कुमक घेऊन येणे का जमले नाही ह्या बाबी इतिहासात का नाहीत हे कळत नाही. मोरोपंतांनी ह्या अपयशाचे कारण महाराजांना सांगितले असेलच, परंतु इतर बाबींचा जसा उल्लेख येतो तसा ह्या मोठ्या धाडसी अश्या रचलेल्या डावाविषयी उल्लेख का नसावा ह्याचा एक खंतवजा प्रश्न राहुन राहुन सतावतो. असो. बाकी, जंजीरा दुर्ग आहे मोठा खासा! हा पाडायचा तर सिंहाचं काळीज घेऊनच लढावे लागले असणार हे नक्की. :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

सुरेख ! हा

अवलिया
Tue, 05/05/2009 - 18:46 नवीन
सुरेख ! हा पण लेख छानच !! येवु दे अजुन !! लेखाबरोबर फोटो पण देता आला तर बघा ! :) --अवलिया
  • Log in or register to post comments

जंजीरा

अभिषेक पटवर्धन
Tue, 05/05/2009 - 18:59 नवीन
माहीती थोडीशी तोकडी वाटली...संभाजी महाराजांनी हा कील्ला जिंकण्यासाठी पाषाणांचा सेतु बांधयचं ठरवलं. रात्रंदिवस होणार्या गोळा गोळीतही काम बंद पडलं नाही..पण शेवटी औरंगजेबने उत्तर कोकणात जोरदार हल्ला चढवला...त्याला थोपवण्यासाठी महाराजांना जातीनं जाणं भाग पडलं आणि जंजीर्‍याची मोहीम अर्ध्वट राहीली. पेशवाई मधे देखील जंजीरा जिंकण्याचा असफल प्रयत्न झाला..पण यश कोणालाच आले नाही...शेवटपर्यन्त हा कील्ला अजिंक्यच राहीला. अवांतरः पु.लं. नी भाषांतरीत केलेलं 'कान्होजी आंग्रे' नावाचं पुस्तक फार वाचनीय आहे. फारसा माहीती नसलेला आणि पेशवाई च्या सुरुवातीच्या काळात महत्वाची भुमीका बजावणार्‍या एका अद्वीतीय सरखेलाचं दर्शन ह्या पुस्तकात होतं. शिवाय मराठी राज्याबद्दल एका अमराठी व्यक्तीच्या नजरेतुन बघताना मजा येते.
  • Log in or register to post comments

उत्तम.

क्रान्ति
Tue, 05/05/2009 - 19:49 नवीन
हा ही लेख उत्तम. शिवरायांचे गड हे नेहमीच मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय आहेत. अजून लेखांचं स्वागत! क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

आणखी थोडी माहिती

नभा
Wed, 05/06/2009 - 12:37 नवीन
क्रांती, जंजिरा शिवरायांचा गड नाही. माझ्या माहितीप्रमाणे जंजिरा किल्ला कोळ्यांनी नव्हे तर सिद्दी (हबशी)लोकांनी बांधला. सिद्दी आफ्रिकेतून आले होते. जंजिरा हा शब्द जझिरा या उर्दू शब्दावरून आला असावा ज्याचा अर्थ बेट असा आहे. जंजिरा संस्थानाला 'हबसाण जंजिरा ' असे म्हणत. त्या वेळच्या नाण्यांवरही हबसाण जंजिरा असा उल्लेख आहे. जंजिर्‍याच्या प्रवेशद्वारावर एक मुद्रा कोरली आहे, ज्यात सिद्दी लोकांचे चित्र दिसते. जंजिरा किल्ला बांधताना दोन दगडांच्या सांध्यात शीशे ओतले आहे असे म्हणतात्.त्यामुळे दगड झिजले तरी सांधे अजूनही तसेच आहेत. जंजिरा अभेद्य राहण्याचे सर्वात मोठे कारण त्याचे लोकेशन आहे. तिन्ही बाजुंनी अफाट समुद्र.... फक्त एका बाजुलाच समुद्र किनारा दिसतो (राजपुरी गाव). त्यामुळे येणार्‍या शत्रूवर नजर ठेवणे अतिशय सोपे होते. जवळ जवळ १९६० पर्यंत किल्ल्य्या त मनुष्य वस्ती होती. नंतर त्या सर्व लोकांना किल्ला सोडण्याचा आदेश दिला गेला. मग ते मुरुड आणि नजिकच्या परिसरात रहायला गेले.
  • Log in or register to post comments

ध्न्यवाद नभा.

क्रान्ति
Wed, 05/06/2009 - 22:53 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद नभा. [गड म्हटलं की शिवाजी महाराज, इतकंच इतिहासाचं ज्ञान उरलंय आता काळाच्या ओघात!] खूप छान माहिती मिळतेय मिपाच्या लेखांमधून. धन्यवाद. क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नभा

चांगली

जागु
Wed, 05/06/2009 - 12:56 नवीन
चांगली माहीती मिळत आहे.
  • Log in or register to post comments

भारतात

रम्या
Wed, 05/06/2009 - 15:04 नवीन
मूळ लेख आणि जंजीरा बद्दलची माहीती उत्तम. शिवरायांना आणि त्यानंतर संभाजी महाराजांना समुद्री आरमाराचं महत्व पुरेपूर माहीत होतं. संभाजी महाराजांनी जंजीरा घेण्याचा प्रयत्न केला असता बरेच मराठे सैनिक हबशांच्या हाती लागले. हबशांनी या सर्व मराठ्यांची डोकी कोयत्याने तोडून ती टोपल्यात भरून मुंबईला ब्रिटीश व्यापार्‍यांकडे पाठवल्याचा इतिहास आहे. यासर्व मराठ्यांची धडे तशीच समुद्रात टाकून देण्यात आली. चतूर ब्रिटीश व्यापार्‍यांना समुद्री आरमार मराठ्यांकडे गेल्यावर होण्यार्‍या व्यापारी आणी राजकिय गैरसोईची पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे हबशांना नेहमीच ब्रिटीशांचा पाठींबा राहीला. अवांतरः भारतात आलेली अफ्रिकन हबशी हि जमात अजूनही भारतात पहावयास मिळते. गुजरात मधे हे लोक राहतात अशी बातमी एकदा टिव्हीवर बघीतली होती. ते स्वतःला गुजरातीच म्हणवून घेतात आणि अगदी छान गुजराती बोललात. थोडे गुगलले असता विस्तॄत माहीती येथे मिळाली. आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments

क्लिप :

चौथा कोनाडा
Mon, 01/20/2020 - 21:21 नवीन
क्लिप :
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रम्या

वाहव्वा !

सुमीत
Wed, 05/06/2009 - 15:59 नवीन
मला अशीच माहीतीची देवान घेवाण अपेक्षीत होती, धमु, तू अगदी विषयालाच हात घातलेस. तसं घास अगदी तोंडा पर्यंत आला होता पण तो उदरात नाही गेला, कारणे अजून माहित नाहीत कींवा ती प्रकाशात आलीच नाहीत. इतिहास पण संभाजी राजां बद्द्ल गरळ ओकतो पण तो खरा आहे का? त्यांचे बदफैली आणि सत्ता लोलूप असे चित्र रंगवले ते मूळातच काही वैयक्तीक आकसा तून अणि त्या टिका कारांनी लिहिलेल्या बखरीतून हा इतिहास उभा राहीला. नाना (अवलिया) फोटो देतो, लवकरच. अभिषेक्,नभा, रम्या मला तुमची माहिती देखील रंजक वाटली. पुढच्या वेळीस आपण अशीच आपली माहीती वाढवूया.
  • Log in or register to post comments

एक दुरुस्ती!

मुशाफिर
Wed, 05/06/2009 - 22:28 नवीन
तुमच्या लेखात जुन्नरचा 'मलिक अहमद' असा उल्लेख आहे. मला वाटतं तो जुन्नरचा सुभेदार 'मलिक अंबर' असा असायला हवा. मलिक अंबर स्वतःही आफ्रिकेतून गुलाम म्हणून भारतात आला होता. तो आपल्या कर्तृत्वाने जुन्नरचा सुभेदार झाला. तसेच पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वीरित्या वापरलेल्या 'गनिमी काव्या' चा जनक ही तोच होता, हे यशवंत रायकर यांच्या 'हबशी' लोकांविषयीच्या एका लेखात वाचले होते. जंजीरा जिंकता आला नसला, तरी सरखेल कान्होजी आग्रें यांनी हबशांच्या सागरावरील संचाराला आणि प्रभवाला चांगलाच आळा घातला होता.कान्होजी आंग्रेनी मराठा आरमार किती सशक्त बनवले होते? याचं एक उदाहरण म्हणजे, ईंग्रज आणि इतर परकिय आरमारांविरुद्द लढण्यासाठी त्यानी केलेला अंदमान बेटांचा वापर होय! साधारण पावणे चारशे वर्षांपूर्वी स्वरा़ज्यापासून एव्हढ्या दूर एका बेटावर आपला तळ उभारून त्याचा वापर परकीयांना जरब बसविण्यासाठी करणारा, तो एक द्रष्टा आणि अजेय सेनानी होता. मुशाफिर. अवांतरः कर चुकवून पळालेल्या व्यापार्‍याला मराठा आरमाराने पाठलाग करून मस्कतच्या बाजारातून मुसक्या बांधून स्वराज्यात आणले आणि त्याला शि़क्षा झाली होती, हे दाउदला दुबईहून भारतात आणण्याच्या वल्गना करणार्‍यांना कोणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

नवीन माहिती

सुमीत
गुरुवार, 05/07/2009 - 09:41 नवीन
धन्यवाद मुशाफीर. फार मोलाची माहिती दिलीत, मराठी आरमार अंदमान बेटांचा वापर केला होता ही अगदी नवीन माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

खरोखरच

पाषाणभेद
गुरुवार, 05/07/2009 - 11:54 नवीन
सरखेल कान्होजी आग्रें हे म्हणजे आपल्या ईतिहासातले मानाचे पान आहे. त्यांना माझा मानाचा मुजरा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत

नेमका संदर्भ ?

माहितगार
Sun, 03/16/2014 - 09:40 नवीन
आंग्रेनी मराठा आरमार किती सशक्त बनवले होते? याचं एक उदाहरण म्हणजे, ईंग्रज आणि इतर परकिय आरमारांविरुद्द लढण्यासाठी त्यानी केलेला अंदमान बेटांचा वापर होय!
आंग्र्यांनी हे साध्य केले असेलतर छानच; हे ऑनलाईन बर्‍याच ठिकाणी वाचलं पण नेमका ऐतिहासिक संदर्भ उधृत केलेला कुठे आढळला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

इंग्रजी वाङ्मयात / इतिहासात

आदूबाळ
Mon, 03/17/2014 - 22:43 नवीन
इंग्रजी वाङ्मयात / इतिहासात "कोन्नाजी आंग्रिया" हा चाचा, लुटारू म्हणून दाखवला जातो**. त्याला कंटाळून कान्होजी आंग्र्यांचं चरित्र मनोहर माळगांवकर यांनी इंग्रजीतून लिहिलं. त्याचा मराठी अनुवाद पु. ल. देशपांड्यांनी केला आहे. मूळ पुस्तक आणि अनुवाद दोन्ही अतिशय वाचनीय आणि संग्राह्य आहेत. -------- ** पायरेट्स ऑफ कॅरिबियन मालिकेतल्या एका चित्रपटातही आंग्रिया हा चाच्यांचा सरदार म्हणून दाखवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अप्रतिम

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/07/2009 - 14:27 नवीन
अप्रतिम लेख आणी तेव्हडीच जतन करुन ठेवावी अशी माहितीची देवाण घेवाण. आमचे ज्ञान समृद्ध करणार्‍या तुम्हा सर्वांचे आभार. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

असेच

दशानन
गुरुवार, 05/07/2009 - 15:27 नवीन
असेच म्हणतो मी पण. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पोहोचलो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/16/2014 - 07:16 नवीन
जंजी-याला पोहोचलो :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

जंजीरा - पेशवे आणि इंग्रज

माहितगार
Sun, 03/16/2014 - 09:46 नवीन
सातत्याचा वेढा देण इतर युद्धांमुळे शिवाजी महाराज, संभाजी महाराज ते राणी ताराबाई या काळात जमल नसाव पण पेशव्यांना दीर्घ कालीन वेढा लावण शक्य होत, आंग्रेंच्या काळानंतर इंग्रजांना तर त्याही पेक्षा अधिक शक्य होत. पण त्यांनी त्याकडे अंशतः दुर्लक्ष केल असेल ?
  • Log in or register to post comments

सुंदर माहितीपूर्ण लेख'

मृगजळाचे बांधकाम
Sun, 03/16/2014 - 11:04 नवीन
सुंदर माहितीपूर्ण लेख' खूप मौलिक माहिती मिळाली
  • Log in or register to post comments

हे कुठलं घाणेकरांचे पुस्तक

आशु जोग
Mon, 03/17/2014 - 10:26 नवीन
हे कुठलं घाणेकरांचे पुस्तक आहे का.. कुणी बांधला ? कधी बांधला ? आर्किटेक्चर कुणाचे ? स्वतंत्र झाला तो कुणाच्या प्रयत्नामुळे... माहीत आहे का
  • Log in or register to post comments

छान लेख आणि माहिती.

तुमचा अभिषेक
Mon, 03/17/2014 - 14:24 नवीन
छान लेख आणि माहिती. फोटोंची कमतरता मात्र जाणवली. स्वता जाऊन आल्याने बघणे झाले आहे, तरीही.
  • Log in or register to post comments

उपयुक्त माहिती

निनाद मुक्काम …
Mon, 03/17/2014 - 15:20 नवीन
उपयुक्त माहिती मागे एका वृत्त पत्रात वाचले होते आजही जंजिरा येथे पर्यटन करतांना गाईड म्हणून हे स्थानिक हबशी आहेत ते इतिहास सांगतांना महाराजांचा उल्लेख एकेरी करतात व मराठ्यांना हा किल्ला जिंकता आला नाही ,आम्ही अजिंक्य होतो हे देखील पर्यटकांना आवर्जून सांगतात. हा किल्ला इंग्रजांनी आपला ताब्यात का घेतला नाही , ते भारतात सत्ताधीश झाल्यावर सिद्धी त्यांचे मांडलिक झाले का ह्यावर प्रकाश पडला तर उत्तम आहे. अवांतर ह्या किल्यात आजही रात्री हा खेळ सावल्यांचा थोडक्यात भुताटकी चे प्रकार चालतात असे वाचून होतो
  • Log in or register to post comments

क्षणचित्रे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/18/2014 - 09:23 नवीन
जंजीरा किल्ल्याला पोहचतांना गुगलवर सर्च मारल्यावरचा सुमितचा हा माहितीपूर्ण लेख मिपावर सापडला आणि खूप आनंद झाला. तिथले मार्गदर्शक म्हणजे एक अजब नमुना आहे. तीन तीनशे रुपये देऊन नसती झकमारी केली असे वाटले. माहिती सांगतांना सिद्दी सत्ताधीशांच्या ताब्यातला हा किल्ला (तुम्हारा) शिवाजी भी जीत न पाया म्हणतांना त्याला कोन अभिमान वाटत होता कोणास ठाऊक. असो. किल्ल्यात पाहण्यासारखे केवळ अवशेष उरले आहेत. पण हा समुद्रात उभारलेला किल्ला एक आश्चर्य वाटावे असेच त्याचे रुप आहे. बाकी, किल्ला पाहणे एक दिव्यच आहे. तीकिट काढल्यानंतर तासभर वाट पाहावी लागते. तासाभरात किल्ला पाहून शिडाच्या नावेत बसवून नेण्याची त्यांच्या त्या सोसायटी करुन नावा चालवणा-या नावाड्यांची धंदा व्हावा म्हणून पर्यटकांची जी दमवणूक करतात ते कठीण काम वाटलं. असो, पण एकदा चक्कर टाकायला हरकत नाही. Image removed. Image removed. (शिडाच्या नावेतून असे कोंबून किल्ल्यापर्यंत पोहचावे लागते. सुरक्षिततेची अजिबात न घेतलेली काळजी) Image removed. (मुख्य प्रवेशद्वारावर अशी गर्दी होते. उतरण्यासाठी ताटकळत बसावे लागते.) Image removed. Image removed. (सात मजली इमारत होती म्हणतात आता उरली ती इतकी) Image removed. Image removed. (सर्वात मोठी तोफ पुढच्या बाजूने बांगडी तोफ, गोमूख तोफ ) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छत्रपती संभाजी महाराज आणी जंजिरा

srahul
Tue, 07/23/2019 - 16:21 नवीन
ज्या कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्याच्या सह शिवाजी महाराजांच्या काळात पन्हाळा जिंकला....त्याच कोंडाजी फर्जंद यांनी संभाजी महाराजांच्या काळात जंजिरा जिंकण्याचा एक अयशस्वी धाडसी प्रयत्न केला......ते व्यापाऱ्याच्या वेशात त्यांच्या सैनिकांसह किल्ल्यात घुसले.......योग्य संधीची वाट ते पाहत होते.....पण कुणी तरी फितुरी केली .....सर्व जण पकडले गेले आणी सर्वांचा शिरच्छेद झाला.....
  • Log in or register to post comments

छत्रपती संभाजी महाराज आणी जंजिरा

विनोदपुनेकर
गुरुवार, 07/25/2019 - 10:00 नवीन
कोंडाजी फर्जंद व्यापारी नाही तर संभाजी महाराजांशी बिनसले असे भासवून सिद्दी च्या चाकरीत गेले होते योग्य वेळ पाहून जंजिरा वरील दारुगोळा कोठार उडवायचा त्यांचा बेत होता पण त्यांचे तिथल्या वास्तव्यात एका दासीशी जवळीक झाली होती तिने ऐन वेळी कोंडाजी बरोबर तिथून पळून जाण्याचा हट्ट धरला त्यामुळे हि खबर सिद्दी ला मिळाली नंतर सिद्दी ने कोंडाजी चे मुंडके महाराजांकडे पाठवले असा उल्लेख संभाजी या कादंबरी मध्ये आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: srahul

विजापूरच्या दरबाराचे अंकित

हस्तर
Tue, 07/23/2019 - 17:52 नवीन
विजापूरच्या दरबाराचे अंकित झुगारून त्यांनी औरंगजेबाकडे अर्ज केला. औरंगजेबाची आरमारी ताकद ह्या मुळे वाढली,?? काही भाग वगळला आहे का ?
  • Log in or register to post comments

थोडेसे मनातले

विनोदपुनेकर
Fri, 12/06/2019 - 17:40 नवीन
किल्ला खरंतर खूप छान आहे पाहण्यासारखा तटबंदि, तोफा, मोठाल्या विहिरी पण सगळ्यात त्रासदायक तिथपर्यंत पोचणे कमालीची अरेरावीची भाषा थोडक्यात दादागिरी, गाईड घेतला तर बोलणे असे कि सिद्दी साब मसाले के बडे व्यापारी थे और शिवाजी और संभाजी ये किला कभी भी जीत नहि पाये.... खरंतर राग आला आणि पुन्हा या जंजिरा वर न जाण्याचा मनाणे ठरावे सो पुन्हा कितीदा तिकडे गेलो पण पण त्या मग्रुरी च्या जागी गेलो नाही.
  • Log in or register to post comments

ह्या किल्ल्यावरची तथाकथित

हंटरब्राव्हो
Sun, 01/12/2020 - 11:38 नवीन
ह्या किल्ल्यावरची तथाकथित गाईड लोकांची दादागिरी मी देखील अनुभवली आहे. ‘तुम्हारा शिवाजी भी इसे जीत नही पाया ‘ असं ऐकल्यावर मात्र त्याला मी लगेच ‘ हाँ क्योंकि बाकी हिंदुस्थान अपने कब्जे में मराठे ले चुके थे और तभी आज हम मस्जिद नही मंदिर में मथ्था टिकाते है. और तो और हमारे शिवाजीके मराठोने तुम्हारे औरंगजेब को इसी मिट्टी में दफनाया दिया था ! जब मुघल काट डाले तो सिद्दी फिद्दी जैसे मामुली लोग रहे क्या और जिये क्या ?‘ हे ऐकवलं होतं. त्याचा वरमलेला चेहरा आसुरी आनंद देऊन गेला.
  • Log in or register to post comments

एक नंबर हाणलात

चाणक्य
Mon, 01/20/2020 - 18:16 नवीन
तोंडच पडलं असेल त्याचं. लक्षात ठेवीन हे उत्तर मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंटरब्राव्हो

जीव ओवाळुन टाकला पाहिजे

सुमीत
Tue, 06/16/2020 - 21:14 नवीन
जीव ओवाळुन टाकला पाहिजे, काय ते बेफाम उत्तर दिलेस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंटरब्राव्हो

सुंदर धागा, उत्तम चरचा !

चौथा कोनाडा
Mon, 01/20/2020 - 21:34 नवीन
सुंदर धागा, उत्तम चरचा !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा