मोकलाया मन बोझील माझे, विश्वास शोधत राहीलो मी
अनाकलनीय,अविश्वसनीय सारे चूपचाप बघत राहीलो मी
अष्टावधानी होतो तरिही,अनभिज्ञ राहीलो मी
ती(संधी) समोर होती,तरिही निशब्द राहीलो मी
अविरत,उद्रेक भावनांचा,सावरत राहीलो मी
बांध व्यर्थ आत्मविश्वासाचा, बांधत राहीलो मी
बाळगून उगा तमा जगाची,निरंतर अव्यक्तच राहीलो मी
भेटेल कुणी मनकवडा,निरंतर वाट पहात राहीलो मी
भ्रमनिरास झालो अंती,मग माझाच न राहीलो मी
दिव्यांग नव्हतो तरीही अव्यक्तच राहीलो मी
२७-१-२०२३
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3391
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा !
सुरेख
भ्रमनिरास झालो अंती,मग माझाच
धन्यवाद....
In reply to भ्रमनिरास झालो अंती,मग माझाच by प्रचेतस
'गझले'चा तोंडावळा ल्यालेली रचना
'बोलबच्चन' होतो तरिही, अव्यक्तच राहिलो मी ???
च्यामायला मोकलाया वाचल्यावर
मोकलाया दाहि दिश्याआठवलि https://www.misalpav.com/node/6332 तुम्हि कॉपिराईट भंग केला आहे :=) :=)+११११११११११
In reply to च्यामायला मोकलाया वाचल्यावर by रंगीला रतन
छान!