नमस्कार मंडळी!!
माझी आजी(आईची आई) कोकणातील देवरुखजवळच्या एका खेड्यातली होती. तिच्या लहानपणीच तिची आई वारली आणि सगळ्या भावंडात आजी मोठी असल्याने लहान वयातच तिच्यावर स्वयंपाक करण्यापासुन, सगळी घरकामे ,भावंडांचे करणे वगैरे जबाबदारी आली. वडील शाळामास्तर होते, त्यांनी मुलांना चांगले शिकवले, पण मुलींना त्या मानाने कमी शिकवले, कदाचित तो काळच तसा होता(१९२०-३०). पुढे आजी लग्न झाल्यावर ठाण्याला रहायला आली, पण २ मुली झाल्यावर वयाच्या ३० व्या वर्षी तिचा नवरा जलोदराने गेला.( म्हणजे काय नक्की माहित नाही). काही दिवस रडत काढल्यावर मात्र तिने कंबर कसली आणि पुन्हा शाळेत नाव घालुन मुलींच्या बरोबरीने शिकायला सुरुवात केली. त्याकाळी सातवी पास झाल्यावर (व्हर्नाक्युलर फायनल) नोकरी मिळत असे. त्याप्रमाणे तिला सरकारी शाळेत शिक्षिका म्हणुन नोकरी मिळाली. त्याचे उल्लेख माझ्या आधीच्या लेखनात आले आहेतच.
जाहीरात
स्मृतींची चाळता पाने
अशा रितीने लहान वयातच तिला खूप अनुभव आले असतील. मदत करणारे, त्रास देणारे, ओरबाडणारे,सावरणारे, डोळे पुसणारे, रडवणारे लोक भेटले असतील. त्यातुन तिच्यापुरते तिने एक जीवनाचे तत्वज्ञान बनवले होते. आणि ते तिच्या तोंडुन वेळोवेळी म्हणींच्या रुपाने बाहेर पडे. मी तेव्हा बराच लहान होतो(१ ली ते ७वी), त्यामुळे त्याचे महत्व तेव्हा फार कळले नाही. केवळ गंमतशीर म्हणी म्हणुन ऐकुन हसायला यायचे, पण आज आमचे ते संवाद आठवताना त्यामागचे तत्वज्ञान लक्षात येते.
वैधानिक ईशारा--आजी कोकणी होती त्यामुळे पुढील लेखात काही आक्षेपार्ह शब्द येऊ शकतात. त्यामुळे लेख पुढे वाचावा की नाही तुम्ही ठरवा. संमं ना विनंती की तसेच वाटल्यास धागा उडवुन टाकावा.
तर आजीला फिरायची जबरदस्त आवड होती. रोज सकाळी ती तलावपाळीला फेरी मारायचीच, पण आमच्याकडेही राहायला आली की सकाळफेरी चुकवायची नाही. "चरैवेती चरैवेती " हा तिचा मंत्र होता. ईतरवेळी कुणाही नातेवाईकाकडे लग्न कार्य असेल, तर सगळ्यात अनुभवी म्हणुन आजीला पहीले बोलावणे असेच आणि ती सुद्धा घर साफ करण्यापासुन ते रुखवताची तयारी करण्यापर्यंत सगळीकडे हजर असे. तू सगळ्या दुरच्या /जवळच्या नातेवाईकांकडे बिन धास्त कशी राहतेस १५-१५ दिवस? यावर "कामावे तो सामावे" हे तिचे उत्तर असे.
जेवताना हावरटपणा केला की "आधाशी मेला आणि गांडीवाटे जीव गेला" ही म्हण ऐकायला मिळे. आता लक्षात येत की शास्त्रीय द्र्ष्ट्या ही म्हण किती चपखल आहे. अन्न कमी पडले की "भुके राखे चौथा कोन" असे म्हणुन ताक,आमटी किवा पाणी प्यायला देई. तिन्हीसांजेला जेवायच्या तासभर आधी भूक भूक केले की "तिन्हीसांजेला कावळासुद्धा खात नाही" असे म्हणुन वाट बघायला लावे.
बाहेर जायला निघाले की हे कपडे घालु की ते असे होई. हा शर्ट जुनाच आहे, ती पँट फाटलीच आहे, असे नखरे तिच्यापुढे कोणी केले की "सतरा साडे तरी भागुबाईचे कुल्ले उघडे" ही म्हण ठरलेली. पुढे आमच्यावेळी असे नव्हते, "एक कपडा दांडीला आणि एक गांडीला" एव्हढेच कपडे मिळत असेही सांगे. लोकांकडे नीटनेटके जावे हे सांगताना "लोकाकडे गेली ताका, नी शेंबुड तिच्या नाका" असे म्हटले की आम्ही पळालोच नाक शिंकरायला.
आजी काही सूचना देत असेल आणि ते न ऐकता हे काय? आणि ते कशाला? असे विचारत बसले की "धू म्हणलं की धुवायचं, काय लोंबतय ते विचारायचं नाही" हा संवाद ठरलेला. घरात तान्हे मूल असेल आणि त्याने अंगावर शी शू केल्याबद्दल कोणी तक्रार केली तर "चहाडाच्या तोंडाचा नी लहानाच्या गांडीचा भरवसा धरु नये" असे ऐकवे.
आणि सगळ्यात शेवटी, काही कारणावरुन रुसुन बसल्यास त्या नातवंडाचा रुसवा घालवताना "रुसुबाई रुसली, कोपर्यात बसली, तिकडुन आली बायको नी खुदकन हसली" असे म्हटल्यावर जे हसायला येई त्यात रुसवा कुठच्या कुठे पळुन जाई.
असो. जेव्हढे लक्षात आहे तेव्हढे लिहिले. कदाचित अजुन बरेच काळाच्या ओघात गडप झाले असेल. आहेत का तुमच्याही घरात असे सोप्या भाषेत जीवनाचे सार सांगणारे लोक?
वाचने
9098
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी खर आहे..
चपखल हो !
अय्यो!
चपखल( आणि वात्रट) म्हणींसाठी दोन गावे पुढे होती.
सर्व वाचकांचे धन्यवाद!!
म्हणी बोलीचा बऱ्या.
In reply to सर्व वाचकांचे धन्यवाद!! by राजेंद्र मेहेंदळे
अंगात नाही जोर अन ...
आजीचा सहवास नाही लाभला
@कर्नलतपस्वी : लेखाचा दुवा उघडत नाहिये.
In reply to आजीचा सहवास नाही लाभला by कर्नलतपस्वी
दुवा घ्या आणि दुवा द्या :)
In reply to @कर्नलतपस्वी : लेखाचा दुवा उघडत नाहिये. by चित्रगुप्त
माझी पणजी आजी खूप म्हणी
वा वा!!या निमित्ताने जुन्या म्हणींचा एक संग्रह होऊ शकेल
सुरेख आठवणी . शहाण्याला
आमची आजी
दिवस गेला रेटारेटी आणि
In reply to आमची आजी by सौन्दर्य
माझी आजी "दिवस गेला रेटारेटी
In reply to दिवस गेला रेटारेटी आणि by सस्नेह
माझ्या आजीची काही वाक्ये
आपलं घर आणि हागून भर
का गं बाई रोड तर हिला सासरची
मस्त लेख! मला आजीचा
२०११ ची ह्याच विषयावरची आणखीन
In reply to मस्त लेख! मला आजीचा by टर्मीनेटर
जबरी
In reply to मस्त लेख! मला आजीचा by टर्मीनेटर
वा, म्हणींची रेलचेल आहे अगदी.
In reply to मस्त लेख! मला आजीचा by टर्मीनेटर
चच
रिकामा न्हावी, भिंतीला
In reply to चच by nutanm
चच
एक बुडवेपणा कर्जबाजारीपणाचे
भकतीताई, आम्ही