दिस सरतो असा, आठवांचा ठसा, मिटून चालला
दिस सरतो असा, पाखरांचा थवा, उडून चालला.
दिस मेघापरी झरुन चालले
दिस वाळूपरी सुटून चालले
दिस सरतो असा, स्वप्नांचा दिवा, विझून चालला.
दिस गंधापरी विरून चालले
दिस रंगापरी पुसून चालले
दिस सरतो असा, या फुलांचा पसा, लुटून चालला.
दिस आले कधी सोबती घेउनी
दिस गेले कधी एकटा सोडुनी
दिस सरतो असा, ओळखीचा जसा, निघून चालला.
दीपक पवार.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2739
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा. सुंदर, अर्थघन, व्याकुळ आर्ततेचे अस्तर असलेली रचना.
मनःपुर्वक धन्यवाद.
In reply to वा. सुंदर, अर्थघन, व्याकुळ आर्ततेचे अस्तर असलेली रचना. by चित्रगुप्त
आवडली,सुदंर
मनःपुर्वक धन्यवाद.
In reply to आवडली,सुदंर by कर्नलतपस्वी
चित्रगुप्त +१
मनःपूर्वक आभार.
In reply to चित्रगुप्त +१ by भागो