बाळेश्वर मंदिर आणि पेडगावचा किल्ला
पेडगावची भग्न मंदिरे: भाग १
पेडगावची भग्न मंदिरे - लक्ष्मीनारायण मंदिर
बाळेश्वर मंदिर
पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या अगदी पुढ्यातच आहे हे भग्न मंदिर, ते आहे बाळेश्वराचं. आजमितीस ह्या मंदिराचे शिखर आणि सभामंडप संपूर्ण उध्वस्त स्थितीत असून फत गर्भगृह शाबूत आहे. जरी हे मंदिर छोटेखानी आणि भग्न असलं तरी दिसायला अत्यंत देखणं आहे. कदाचित भग्न असल्यामुळेच अधिक देखणंही दिसत असावं असं मला वाटतं. हे मंदिर एका अधिष्ठानावर उभारले असून सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना आहे. मंदिराचे शिखर भग्न झाल्यामुळे याची शैली कोणती ते आज कळत नसली तरी ते भूमिज मंदिर असावे असे वाटते. सभामंडपाचे छत आज अस्तित्वात नाही आणि फक्त आतले स्तंभ आज कसनुसे उभे आहेत.
बाळेश्वर मंदिर
सभामंडपातील स्तंभ निर्विवादपणे देखणे आहेत आणि त्यांवर विविध मूर्ती पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत.
स्तंभांवरील शिवतांडव आणि नृत्य करणारा गणेश
--
वाली-सुग्रीवाचे युद्ध, आणि बाजूला बाण सोडण्याच्या तयारीत असलेला राम
एका स्तंभावर योग नृसिंहाची मूर्ती दिसते.
येथील प्रत्येक स्तंभावर वेगवेगळ्या प्रकारची सुरेख नक्षी दिसते.
---
मंदिराचे अंतराळ एकूण दोन अर्धस्तंभांवर आणि दोन पूर्ण स्तंभांवर तोललेले असून त्यावरील कलाकुसर देखणी आहे.
अंतराळातून दिसत असलेले समोरचे लक्ष्मीनारायण मंदिर.
अंतराळात समोरासमोर दोन देवकोष्ठे आहेत पण त्यात मूर्ती नाहीत. येथील सर्वाधिक देखणा जो भाग आहे तो येथले गर्भगृहाचे प्रवेशद्वार जे अतिशय सालंकृत आहे. द्वारपट्टीकेवर गणेश असून नक्षीदार स्तंभाच्या भोवती चामरधारी सेवक सेविका, द्वारपाल आणि मंदिराच्या बांधकामासाठी धन, पाणी वगैरे आणणारे सेवक कोरले आहेत. द्वाराची पायरी सुद्धा नक्षीकामाने अलंकृत असून त्यातही दोन्ही बाजूंनी किर्तीमुखे आहेत तर त्यांच्या बाजूस गजव्याघ्रादी शिल्पे कोरलेली आहेत. हे मूळात शैव मंदिर असून येथे वैष्णव मूर्तीचे प्राबल्य दिसते ते बहुधा समोरील भव्य लक्ष्मीनारायण मंदिरामुळे.
प्रवेशद्वारावरील गणेशपट्टीका
डाव्या बाजूवरील पाण्याचा हंडा घेऊन येणारे सेवक, चामरधारी द्वारपाल आणि सेविका
उजव्या बाजूवरील सेविका, द्वारपाल आणि धनाची पिशवी घेऊन येणारे सेवक.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची सालंकृत पायरी
गज व्याघ्रादी जोड्या
---
गर्भगृहात शिवलिंग असून अभिषेकाच्या पाण्यास शाळुंकेतून वाट करुन दिली आहे. ह्या गाभार्यात दोन आश्चर्ये वसली असून ती आवर्जून पाहावी अशीच आहेत. पैकी छतावर एक प्रमाणबद्ध किर्तीमुख आहे तर एका भिंतीत गुडघ्याचा आधार घेऊन डोके टेकवून बसलेल्या एका वानराची अत्यंत सुरेख आकृती कोरलेली आहे.
शिवलिंग
छतात कोरलेले किर्तीमुख
वानराची अत्यंत देखणी मूर्ती
मंदिराच्या सभोवती फिरताना विविध देवकोष्ठे केलेली आढळून येतात. येथील बाह्यभिंतीची पडझड झालेली असल्याने पुरातत्व खात्यातर्फे जीर्णोद्धाराचा प्रयत्न सुरु असलेला दिसतो. व त्यांचे खडून कोरलेले क्रमांकही येथे टाकलेले दिसून येतात.
बाह्यभिंतीवरील विविध मूर्ती व पुरातत्व खात्याने टाकलेले क्रमांक
गरुड आणि विदारण नृसिंह
----
ब्रह्मदेव
त्रिविक्रम विष्णू
मंदिराच्या बाह्यभिंती
कोसळते मंदिर
गेल्या ४/५ वर्षात पेडगावला जाणे झालेले नाही, आजमितीस हे मंदिर अजून ढासळले असेल की ह्याचा अजून जीर्णोद्धार झाला असेल याची काहीच कल्पना नाही पण आज ते ज्या अवस्थेत आहे त्यातही हे अतिशय सुंदर दिसते आहे हे निश्चित, मग ते पूर्णपणे शाबूत असताना काय सुंदर दिसत असेल.
भीमेच्या तटावर असणारे मंदिर
पेडगावचा बहादूरगड अर्थत धर्मवीरगड
पेडगावचा बहादूरगड हा मोगलांचा सरदार बहादूरशहा कोकलताश याने बांधला असे मानत असले तरी हा किल्ला निर्विवादपणे प्राचीन भुईकोट आहे. याची निर्मिती यादवांनी केली आहे असे येथील जुन्या मंदिरांवरुन निश्चितच म्हणता येते. मंदिरे सोडल्यास किल्ल्यात फारसे काही पाहण्यासारखे नाही मात्र हा किल्ला एका दु़:खद घटनेचा साक्षीदार आहे. येथेच औंरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कैदेत ठेवले होते, येथेच त्यांची उंच विदुषकी टोपी काढून धिंड काढण्यात आली होती व येथेच तापती सळई खुपसून त्यांचे डोळे काढण्यात आले आहे. संभाजी राजांच्या त्या बलिदानाला स्मरुनच ह्या किल्ल्याचे नामकरण अलीकडे धर्मवीरगड असे केले आहे.
ह्या किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी बहादूरखानाची
जेथे संभाजी राजांचे डोळे काढले असे मानतात ती जागा, येथे एक जुन्या मंदिराचा स्तंभ असून तो बाळेश्वर मंदिराचा असावा असे वाटते.
किल्ला बघायला जाताना रामेश्वर मंदिरापासून पुढे गेल्यावर बुरुजासारखे बांधकाम असलेली एक मोट आहे, तिला हत्तीमोट असे म्हणतात. भीमानदीचे पाणी मोटेखालच्या हौदात आणून ते वर उचलण्यासाठी मोटेवर एक दोरी अडकवण्यासाठी हूकांसारखी रचना केलेली आढळते. येथूनच पआणी किल्ल्यात खेळवण्यात येई.
हत्तीमोट
हत्तीमोटेवरुन पुढे गेल्यावर प्रवेशद्वार येते. ह्याच्या बाजूलाच मशिदीचे पडके बांधकाम आहे.
प्रवेशद्वारातून आत आल्यावर उपरोल्लेखित संभाजी महाराजांचे हाल हाल जिथे केले ते दृष्टीस पडते तर नदीकाठावर हमामखाना आणि काही उध्वस्त इमारतींचे अवशेष दिसतात.
इमारतींचे भग्नावशेष
हमामखाना
एकात एक असलेल्या खोल्या
येथूनच झरोक्यातून खाली पाहता नदीकाठावर एक बुरुजवजा बांधकाम दिसते जे बहुधा नदीचे पाणी वर उचलण्यासाठी बांधलेली मोट असावी.
येथून भीमेचे विस्तीर्ण पात्र दिसते.
येथे आपल्या पेडगावच्या भटकंतीची इतिश्री होते. ही भटकंती मोठे मोठे ब्रेक घेत लिहिली. मध्ये काही इतर विषयांवर लेख लिहित गेल्यामुळे पेडगाववर लिहिणे मागे पडले होते. पण शेवटी लिहिणे पूर्ण झाले इतकेच.
वाचने
8690
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
सुंदर फोटो!
आणखी एक उत्तम लेख.
In reply to आणखी एक उत्तम लेख. by गवि
ही त्यावेळची मोठी इंडस्ट्री
In reply to आणखी एक उत्तम लेख. by गवि
पूर्वी विचारले होते का आठवत
In reply to पूर्वी विचारले होते का आठवत by प्रचेतस
अत्यंत माहितीपूर्ण
In reply to अत्यंत माहितीपूर्ण by गवि
अगदीच अगम्य अशी काही कला
खुप सुंदर धागा.
पेडगाव खरंच आणखिन ढासळण्याआधी
जबरदस्त ....
आवडलं.
मला वाटते इतीहास बघावा तर
खूप सुंदर चित्रे आहेत.
सुरेख
लेख आणि संपूर्ण लेखमाला दोन्हीही सुंदर.
मस्तच आहे मंदिर. सुंदर शिल्पे
In reply to मस्तच आहे मंदिर. सुंदर शिल्पे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद.
सुंदर जागा आणि देखणे फोटो.
उत्तम लेख
वाह...!
In reply to वाह...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
In reply to धन्यवाद by प्रचेतस
ओह ! आयाम सॉरी.
In reply to ओह ! आयाम सॉरी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाय द वे वल्ली शिल्पातील
In reply to बाय द वे वल्ली शिल्पातील by प्रचेतस
लिहिणार तर आहेच.
In reply to लिहिणार तर आहेच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेरुळच्या लेणी क्रमांक बहुतेक
@ प्रा.डॉ.दिबि. - सौंदर्यविषयक मर्मग्राही दृष्टीने लौकर लिहा भौ.
In reply to @ प्रा.डॉ.दिबि. - सौंदर्यविषयक मर्मग्राही दृष्टीने लौकर लिहा भौ. by चित्रगुप्त
वॉव.. फेमस दीदारगंज यक्षी,
'झिलई' म्हणजे काय ?
In reply to 'झिलई' म्हणजे काय ? by चित्रगुप्त
झिलई म्हणजे दगडी मूर्ती घासून
'हमामखाना' म्हणजे स्नानगृह ?
In reply to 'हमामखाना' म्हणजे स्नानगृह ? by चित्रगुप्त
बर्याच मुघलकालीन
माहितीपू्र्ण लेख
नेहमीप्रमाणेच मस्त लेख! पहिला आणि पाचवा फोटो CGI