Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by साहित्य संपादक on गुरुवार, 09/15/2022 - 09:48
गलेमा संपली की मिपाच्या संपादक मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाचे. या वर्षी गलेमाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता दिवाळी अंकही धमाकेदार बनणार यात काही शंकाच नाही . आपला सर्वांचा उत्साह वाढवणारी अजून एक गोष्ट यावेळी घडते आहे ती म्हणजे, या वेळी दिवाळी अंक आवाहन धागा प्रसिध्द होण्याआधीच आपल्याला दिवाळी अंकासाठी लेख मिळायला सुरुवात झाली आहे. तर काहीनी आपापले रुमाल टाकून जागा अडवून धरल्या आहेत. तेव्हा मंडळी तुम्ही तरी का बरं मागे राहताय? सरसावा आपापल्या लेखण्या आणि होऊ द्या मिपावर बरसात तुमच्या कसदार आणि जोमदार लेखनाची. या वर्षीही दिवाळी अंकाकरिता ठराविक अशी काही थीम नाही. लेख, कविता, कथा, प्रवासवर्णन, भाषांतर, शशक, अलक, किंवा आपल्याला जे आवडेल, रुचेल ते तुम्ही लिहू शकता. लेखन देण्याची मुदत २० सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ अशी असेल. कोणत्याही प्रकारे पूर्वप्रकाशित लेखन कृपया पाठवू नये. आपलं लेखन आपण साहित्य संपादक या व्यनिवर पाठवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा. किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. जर तुम्ही ईमेलद्वारे लेखन पाठवलं, तर मेलमध्ये आपला मिपा आयडी लिहायला विसरू नका. काही प्रश्न, अडचणी असतील तर मदतीसाठी साहित्य संपादक आहेतच. आलेल्या लेखनातील अंकाला साजेसं लेखन निवडून ते प्रकाशित केलं जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय संपादक मंडळाचा असेल. अजून एक महत्वाचे - अंकामधे काय असेल या बद्दल वाचकांची उत्सुकता कायम रहावी या करता आपण आपल्या लिखाणाबद्दल जाहीर तपशील प्रकट करु नये अशी विनंती. मंडळी दिवस थोडेच उरले आहेत, तेव्हा जास्त वेळ वाया न घालवता लिहायला घ्या बरं... आपल्या लेखनाच्या प्रतीक्षेत -टीम मिपा दिवाळी अंक
  • Log in or register to post comments
  • 21381 views

प्रतिक्रिया

Submitted by स्वधर्म on गुरुवार, 10/27/2022 - 14:15

Permalink

वाट पाहत आहोत

दिवाळी अंकाची
  • Log in or register to post comments

Submitted by Jayant Naik on Fri, 10/28/2022 - 11:00

Permalink

पुढची तारीख काय?

अंदाजे केव्हा प्रकाशित होणार?
  • Log in or register to post comments

Submitted by Jayant Naik on Fri, 10/28/2022 - 11:01

Permalink

पुढची तारीख काय?

अंदाजे केव्हा प्रकाशित होणार?
  • Log in or register to post comments

Submitted by Jayant Naik on Fri, 10/28/2022 - 12:17

Permalink

पुढची तारीख काय?

अंदाजे केव्हा प्रकाशित होणार?
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 10/28/2022 - 14:59

Permalink

मिपाचा दिवाळी अंक येईपर्यंत

मिपाचा दिवाळी अंक येईपर्यंत नुकताच दिवाळी अंकाच्या विश्वातला वेगळा प्रकार पहायला मिळाला त्या बद्दल सांगतो 'ऑल दि बेस्ट' 2022 चा  हा दिवाळी विशेषांक इतरांपेक्षा वेगळा म्हणजे Multimedia विशेषांक आहे.कृपया पुढील लिंकवर क्लिक करा

https://tinyurl.com/All-the-Best

हा स्मार्ट  दिवाळी अंक असून मजकूर, रेखाचित्रे, फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ एकाच सेल्फ-कन्टेड पॅकेजमध्ये एकत्रित करणारा हा अशा प्रकारचा पहिला प्रकार आहे . क्लिक केल्यावर यातल्या कलाकृतींचे वाचन करता येते ! फॉण्ट मोठा करता येतो ( हे मोबाईल वर खुप फायद्याचे आहे) वाचून बघा / पाहून वाचा अन सांगा कसा वाटतोय ते !
  • Log in or register to post comments

Submitted by आलो आलो on Fri, 10/28/2022 - 17:05

In reply to मिपाचा दिवाळी अंक येईपर्यंत by चौथा कोनाडा

Permalink

मस्त !

हे तर लईच भारिये .
  • Log in or register to post comments

Submitted by आलो आलो on Fri, 10/28/2022 - 17:06

In reply to मिपाचा दिवाळी अंक येईपर्यंत by चौथा कोनाडा

Permalink

मस्त !

हे तर लईच भारिये .
  • Log in or register to post comments

Submitted by अनिंद्य on Sat, 10/29/2022 - 07:59

Permalink

कधी येतोय अंक ?

कधी येतोय अंक ?
  • Log in or register to post comments

Submitted by आलो आलो on Sat, 10/29/2022 - 12:55

Permalink

अपडेट्स जाहीर करावे

अशी संपादक मंडळाला नम्र विनंती आपले नम्र मि दी अं २०२२ ची आतुरतेने वाट पाहणारे वाचक मंडळ सदस्य व एकही अपडेट्स न देणाऱ्या संपादक मंडळाच्या णिशेध मोर्च्याच्या तयारीतील समूह कार्येकरता.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 10/31/2022 - 07:30

Permalink

मराठी कल्चर अ‍ॅन्ड फेस्टिवल्स

मराठी कल्चर अ‍ॅन्ड फेस्टिवल्स या अमेरिकास्थित संस्थेचा यंदाचा दिवाळी अंक. मिपाच्या यंदाच्या दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 10/31/2022 - 09:43

In reply to मराठी कल्चर अ‍ॅन्ड फेस्टिवल्स by श्रीरंग_जोशी

Permalink

अंकाची मांडणी, सजावट सुरेख.

अंकाची मांडणी, सजावट सुरेख. पूर्ण वाचून मग अंतरंगाबद्दल नक्की पोच देईन. या दुव्यासाठी रंगाभाऊंना धन्यवाद ! स्नेहा
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Mon, 10/31/2022 - 12:19

In reply to मराठी कल्चर अ‍ॅन्ड फेस्टिवल्स by श्रीरंग_जोशी

Permalink

रंगाभौ धन्यवाद.

रंगाभौ धन्यवाद. अंक सजावट छान आहे. वरवर चाळला. व्यंगचित्रे व मंदिराचे चित्र खुप आवडले. श्रेया राजवाडे यांची कविता खुप सुंदर आहे. माझा पाऊस ही कवीता सुद्धा छान आहे. सवडीनुसार पुर्ण वाचणार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Tue, 11/01/2022 - 10:14

In reply to मराठी कल्चर अ‍ॅन्ड फेस्टिवल्स by श्रीरंग_जोशी

Permalink

दिवाळी अंक २०२२ - अमेरिकेतील उत्साही मराठी मंडळींचा

श्रीरंग जोशी, आपण सादर केलेली लिंक पाहिली. अंक दिमाखात सादर केला आहे. या अंकातील विविध लेखांवर प्रतिक्रिया व्यक्त करायला सोय आहे का? फ्रान्सुआ गोतिए यांनी लोहगाव पासून ४ किमीवर श्री शिवाजी महाराज म्युझियम बनवले आहे याची ओळख करून दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की मिलिटरी कमांडर्स कंबाईन्ड या बॅनर्स मधून शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या लढाया सध्याच्या मिलिटरी कमांडरांना नियोजन करून पार पाडायची कामगिरी करायची आज्ञा दिली तर ते कसे काय पूर्ण करतील या प्रमेयावर आधारित नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा यावर आधारित बॅनर्स प्रदर्शन जून २०२२ पासून कायमचे उपलब्ध आहे. ते वाचायला हवे असेल तर https://alkaoaksebookshoppy.online या इथे ईबुकसाठी अधिक माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 11/04/2022 - 13:08

In reply to मराठी कल्चर अ‍ॅन्ड फेस्टिवल्स by श्रीरंग_जोशी

Permalink

मराठी कल्चर अ‍ॅन्ड फेस्टिवल्स

मराठी कल्चर अ‍ॅन्ड फेस्टिवल्स या अमेरिकास्थित संस्थेचा यंदाचा दिवाळी अंक ...... सुं द र आहे.... डोळ्यांना सुखावणारा आशुतोष बापट यांचा मंदिर विषयक लेख वाचला... सुरेख आणि माहितीपूर्ण. बाकीचा अंक टप्याटप्याने वाचत आहे. धन्यवाद श्रीजो!
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Mon, 10/31/2022 - 08:38

Permalink

मुखपृष्ठ रंगसंगती आकर्षक आहे.

मुखपृष्ठ रंगसंगती आकर्षक आहे. मिपा यंदा लेट पण थेट :)
  • Log in or register to post comments

Submitted by चष्मेबद्दूर on Tue, 11/01/2022 - 10:02

Permalink

अंकाच्या प्रतीक्षेत

  • Log in or register to post comments

Submitted by चष्मेबद्दूर on Tue, 11/01/2022 - 10:49

Permalink

अंकाच्या प्रतीक्षेत

अंकाच्या प्रतीक्षेत इतके दिवस गेले आहेत की भाऊंचा पुढचा चघळचोथा " मिपकरांच्या हालाला जबाबदार आघाडी की बिघाडी?(सूज्ञास काय अधिक सांगणे?)" या विषयावर असेल हे नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by आलो आलो on Tue, 11/01/2022 - 23:07

Permalink

साहेबा....

आतां वाट पळोवंक मेळना आतां कितें करचें
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Wed, 11/02/2022 - 10:18

Permalink

दिवाळी अंकासाठी लेख पाठवलेल्या लेखकांच्या भावना

आता काहीशा अशा असतील : https://youtube.com/shorts/Ie-aPEFceEo?feature=share
  • Log in or register to post comments

Submitted by साहित्य संपादक on Wed, 11/02/2022 - 11:30

Permalink

दिवाळी अंकाचे ९०% काम पूर्ण झाले आहे. आज

दिवाळी अंकाचे ९०% काम पूर्ण झाले आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत अंक प्रकाशित होणे अपेक्षित आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे अंक प्रकाशनास होत असलेल्या विलंबासाठी दिलगीर आहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Wed, 11/02/2022 - 12:05

In reply to दिवाळी अंकाचे ९०% काम पूर्ण झाले आहे. आज by साहित्य संपादक

Permalink

धन्यवाद

आपले अथक परिश्रम प्रशंसनीय आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by बाबुराव on Wed, 11/02/2022 - 13:19

In reply to दिवाळी अंकाचे ९०% काम पूर्ण झाले आहे. आज by साहित्य संपादक

Permalink

ब्र.

आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत अंक प्रकाशित होणे अपेक्षित
ब्वॉरं. देर ना हो जाये कही दे ना हो जाये.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 11/02/2022 - 20:54

Permalink

वाचकांपेक्षा लेखकच अंकासाठी

वाचकांपेक्षा लेखकच अंकासाठी बेचैन झाले आहेत.... :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 11/02/2022 - 21:03

In reply to वाचकांपेक्षा लेखकच अंकासाठी by सस्नेह

Permalink

लेखकांना अप्रूप असते हो कधी

लेखकांना अप्रूप असते हो कधी आपला लेख प्रकाशित होतोय आणि वाचकांच्या त्यावर उड्या पडताहेत :)
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 11/02/2022 - 21:41

In reply to लेखकांना अप्रूप असते हो कधी by प्रचेतस

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by मालविका on Fri, 11/04/2022 - 12:14

Permalink

अजून किती दिवस?

अजून किती वेळ / दिवस लागणार?
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Fri, 11/04/2022 - 12:19

In reply to अजून किती दिवस? by मालविका

Permalink

हेच म्हणतो,

हेच म्हणतो, आता दिवाळी झाली पण तुळशीच्या लग्नाआधी तरी अंक प्रकशित व्हावा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 11/04/2022 - 12:27

Permalink

दिवाळी अंक प्रसिद्ध

दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यासाठी काही मदत हवी असल्यास हक्काने सांगावे.
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Sat, 11/05/2022 - 09:51

Permalink

संपादक मंडळास समर्थन

पोटा पाण्याचे उद्योग आणि व्यक्तिगत जीवनातील अडचणी संभाळून संपादक मंडळ मिपा चे व्यवस्थापन बघत असतात याची कल्पना आहेच. या वीकेन्ड ला वेळ मिळेल आणि अंक प्रकाशित होईल अशी आशा आहे. मुद्दाम कोणी करत नाही. अनेक वेळा अडचणी अशा अडचणी येतात की वेळेवर काम करता येत नाही आणि कारण पण सांगता येत नाही. मी स्वतः या स्थितिचा अनेकदा अनुभव घेतला आहे. तेव्हा माझे संपादक मंडळास समर्थन आहे. जमेल तसे करा. पण नक्की दिवाळी अंक प्रकाशित करा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by ॲबसेंट माइंडेड… on Sat, 11/05/2022 - 10:51

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Sat, 11/05/2022 - 23:14

Permalink

लेख हरवला ?

मी एक लेख पाठवला होता तो दिवाळी अंकात सामाविष्ट झाला नाही. आणि आता पुन्हा "पाठवलेले संदेश" बघत असताना तिथेही तो दिसत नाहीये. ५ ऑक्टोबरच्या आसपास मिपा बंद होते तेव्हा काहीतरी गडबड झालेली दिसते. मिपाच्या विदामधून माझा लेख पुर्णतः उडालाय.. असो. वाचक एका लेखाला मुकलेत :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 11/05/2022 - 23:33

In reply to लेख हरवला ? by तर्कवादी

Permalink

मी सुद्धा दिवाळी अंक २०२२

मी सुद्धा दिवाळी अंक २०२२ साठी एका वेगळ्या विषयावरील मोठा लेख ७ ऑक्टोबरला पाठविला होता. लेख लिहिण्यासाठी बरेच दिवस लागले होते. लेख आवडल्याचे संपादक मंडळाने कळविले होते. नंतर काही व्याकरणाच्या चुका सुधारून सुधारीत लेख १-२ दिवसांनी पुन्हा पाठविला होता. परंतु दिवाळी अंकात तो लेख नसल्याने संपादक मंडळाने तो लेख अंकात समावेश न करण्याचे ठरविले असावे असे मला वाटले. "पाठविलेल्या संदेशा"तही तो लेख दिसत नाही. नक्की काय झाले आहे ते माहिती नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Sun, 11/06/2022 - 00:02

In reply to मी सुद्धा दिवाळी अंक २०२२ by श्रीगुरुजी

Permalink

"पाठविलेल्या संदेशा"तही तो

"पाठविलेल्या संदेशा"तही तो लेख दिसत नाही. नक्की काय झाले आहे ते माहिती नाही.
५ - ७ ऑक्टोबरच्या आसपास मिपाचे सर्वर क्रॅश झाले असावे आणि जुना विदा पुनर्स्थापित (रिस्टोर) केला असे बहुधा दिसते. अनेक धाग्यांतले प्रतिसाद सुद्धा उडाले होते. पण दिवाळी अंकाबाबत संपादक मंडळाने निदान पुन्हा संदेश पाठवून लेख हरवल्याबद्दल सांगायला हवे होते म्हणजे तो पुन्हा पाठवता आला असता. आणि इतके दिवसांत पाठवलेले संदेश आपण काही पुन्हा तपासले नाहीत त्यामुळे आपल्याही लक्षात आले नाही... असो. आता काही करता येण्यासारखे नाही ...
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 11/06/2022 - 00:21

In reply to "पाठविलेल्या संदेशा"तही तो by तर्कवादी

Permalink

२०-२१ ऑक्टोबरला मी "पाठविलेले

२०-२१ ऑक्टोबरला मी "पाठविलेले संदेश" तपासले होते. तेव्हा सर्व संदेश होते. पण आता दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on गुरुवार, 11/17/2022 - 18:17

In reply to "पाठविलेल्या संदेशा"तही तो by तर्कवादी

Permalink

निराशा ..आणि पुन्हा निराशा

दिवाळी अंकाकरिता लेख पाठवून मी तो प्रसिद्ध होण्याची वाट बघत होतो. दिवाळी अंकाला मोठा विलंब झालाच पण माझा लेखही प्रसिद्ध झाला नाही. मिपावरील एक नवीन सदस्य आणि लेखक म्हणून माझा उत्साहभंग झाला. पण नंतर मला दिसले की तो लेख "पाठवलेले संदेश" मधूनही नाहीसा झालाय. तांत्रिक गोंधळामुळे हे झाले असावे म्हणून मी "जाऊ दे झालं ते झालं" म्हणत ते विसरण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात माझे वरील प्रतिसाद वाचून साहित्य संपादक या आयडीने मला व्यक्तिगत संदेश पाठवून तांत्रिक गोंधळामुळे त्यांच्याकडेही तो लेख आता नसल्याचे सांगितले आणि मला लेख पुन्हा पाठवण्याची सुचना केली, मी लेख पुन्हा पाठवल्यास तो दिवाळी अंकात प्रकाशित केला जाईल असे साहित्य संपादकांनी सुचविल्यामुळे माझ्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. वास्तिविक त्या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबरला मी जेव्हा तो संदेश वाचला त्यानंतर काहीच तासांत मला कामानिमित्ताने बेंगळुरुच्या प्रवासाला निघायचे होते. तरीही मी त्या गडबडीतही पुन्हा लगेच लेखाची माझ्याकडील आवृत्ती व्यवस्थित तपासून साहित्य संपादक आयडीच्या संदेशाला उत्तरात लेख पाठवला. आणि पुन्हा एकदा सुरु झाली ती प्रतिक्षा. पण दिवसांमागून दिवस गेलेत पण लेख प्रकाशित झाला नाही. आणि साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेशाद्वारे मोजून ४ वेळा विचारणा करुनही काहीच उत्तर मिळाले नाही. या प्रकारामुळे माझी घोर निराशा झाली आहे. आता दिवाळी अंकातील इतर लेखही वाचायचे मन होत नाही की मिपावर यायचाही फारसा उत्साह राहिला नाही. मिपाला कदाचित नवीन लेखक नको आहेत असेच वाटते. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Fri, 11/18/2022 - 09:57

In reply to निराशा ..आणि पुन्हा निराशा by तर्कवादी

Permalink

.

मिपाला कदाचित नवीन लेखक नको आहेत असेच वाटते.
स्वानुभवावरून सांगतो, असं आजिबात नाहीये. गैरसमज नसावा. :) सं - दी - प
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Fri, 11/18/2022 - 10:36

In reply to निराशा ..आणि पुन्हा निराशा by तर्कवादी

Permalink

मीही दोन लेख पाठवले होते

मीही दोन लेख पाठवले होते,त्यातील एक प्रकाशित झाला.इच्छा असेल तर लेख आताही इतर सदरात प्रकाशित करु शकता.गैरसमज नका करून घेऊ.गोष्टी, थोडं इकडे तिकडे होतं असतं.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Fri, 11/18/2022 - 12:55

In reply to मीही दोन लेख पाठवले होते by Bhakti

Permalink

गैरसमज नाही.

गैरसमज नाही. वर म्हंटल्याप्रमाणे आधी तांत्रिक गोंधळामुळे लेख नाहीसा झाला व प्रकाशित झाला नाही हे माझ्या लक्षात आलं.. त्यावर मी "जाऊ दे" म्हणत सोडूनही दिलं पण पुन्हा लेख मुद्दाम मागवणे पण तो प्रकाशित न करणे आणि दहा-अकरा दिवसानंतरही लेखाची पोच, प्रसिद्ध न करण्यामागचे कारण याबद्दल काहीच उत्तर न देणे- ते ही चार वेळा विनंती करुन हे अगदीच निराशाजनक आहे.
इच्छा असेल तर लेख आताही इतर सदरात प्रकाशित करु शकता
त्यात मजा नाही. निदान तो लेख तरी मी इतर सदरात प्रकाशित करणार नाही. दिवाळी अंकाकरिता लिहिलेला लेख दिवाळी अंकाच्या सजावटीसह सन्मानाने प्रसिद्ध झाला तरच गंमत आहे. बरं लेख प्रसिद्ध न होण्यामागचं कारणही समजत नाही हा खरा उद्वेग आहे. त्या लेखात काहीही नकारात्मक नव्हतं, द्वेषमूलक, कुणावर टीका करणारं, बीभत्स ई असं काहीही नव्हतं... एका यशस्वी गायिकेबद्दल असलेला साधासा लेख होता तो. .. असो. माझी निराशा मला व्यक्त कराविशी वाटली इतकंच. इतर लेखकांना नाउमेद करण्याचा हेतू नव्हता. तुम्ही लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by सर टोबी on Fri, 11/18/2022 - 21:27

In reply to गैरसमज नाही. by तर्कवादी

Permalink

तुमचा उद्वेग समजण्यासारखा आहे

सहानुभूती दर्शविणारे प्रतिसाद अशा वेळेला दुःखात भरच घालतात हे इतरांना समजावे म्हणून हा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by श्वेता व्यास on गुरुवार, 11/17/2022 - 18:51

Permalink

माझा अनुभव याउलट आहे.

माझा अनुभव याउलट आहे. कथा फक्त प्रसिद्धच झाली नाही तर त्यावर टीमने कामही केलं आहे. मी पाठवलेली कथा आणि अंकात दिसते आहे ती कथा यांची तुलना केली. बऱ्याच ठिकाणी शुद्धलेखन, विरामचिन्हे यांवर मूळ कथेमध्ये सुधारणा करून ती प्रसिद्ध केली आहे. नवीन लेखक म्हणून ते वाचून नक्कीच कसं लिहायला पाहिजे हे समजण्यास मदत झाली. आपली वैयक्तिक कामे, प्राधान्यक्रम सगळं सांभाळून हे करणाऱ्या लोकांबद्दल आदर द्विगुणित झाला आहे. धन्यवाद मिपा
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Fri, 11/18/2022 - 10:32

In reply to माझा अनुभव याउलट आहे. by श्वेता व्यास

Permalink

+१

+१ अगदी !मिपा गणेश लेखमाला माझा लेखसुद्धा टर्मिनेटर यांनी व्यवस्थित करुन दिला.पैजारबुवांनीही रेसिपी शुद्धलेखन नीट करुन दिले.मी अनेकदा संपादक मंडळांना शुद्धलेखन व इतर दुरुस्ती करून देण्याची विनंती केली,त्या तत्काळ झाल्या. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com