✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा दिवाळी अंक २०२२ - लेखकांना आवाहन

स
साहित्य संपादक यांनी
गुरुवार, 09/15/2022 - 09:48  ·  लेख
लेख
गलेमा संपली की मिपाच्या संपादक मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाचे. या वर्षी गलेमाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता दिवाळी अंकही धमाकेदार बनणार यात काही शंकाच नाही . आपला सर्वांचा उत्साह वाढवणारी अजून एक गोष्ट यावेळी घडते आहे ती म्हणजे, या वेळी दिवाळी अंक आवाहन धागा प्रसिध्द होण्याआधीच आपल्याला दिवाळी अंकासाठी लेख मिळायला सुरुवात झाली आहे. तर काहीनी आपापले रुमाल टाकून जागा अडवून धरल्या आहेत. तेव्हा मंडळी तुम्ही तरी का बरं मागे राहताय? सरसावा आपापल्या लेखण्या आणि होऊ द्या मिपावर बरसात तुमच्या कसदार आणि जोमदार लेखनाची. या वर्षीही दिवाळी अंकाकरिता ठराविक अशी काही थीम नाही. लेख, कविता, कथा, प्रवासवर्णन, भाषांतर, शशक, अलक, किंवा आपल्याला जे आवडेल, रुचेल ते तुम्ही लिहू शकता. लेखन देण्याची मुदत २० सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ अशी असेल. कोणत्याही प्रकारे पूर्वप्रकाशित लेखन कृपया पाठवू नये. आपलं लेखन आपण साहित्य संपादक या व्यनिवर पाठवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा. किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. जर तुम्ही ईमेलद्वारे लेखन पाठवलं, तर मेलमध्ये आपला मिपा आयडी लिहायला विसरू नका. काही प्रश्न, अडचणी असतील तर मदतीसाठी साहित्य संपादक आहेतच. आलेल्या लेखनातील अंकाला साजेसं लेखन निवडून ते प्रकाशित केलं जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय संपादक मंडळाचा असेल. अजून एक महत्वाचे - अंकामधे काय असेल या बद्दल वाचकांची उत्सुकता कायम रहावी या करता आपण आपल्या लिखाणाबद्दल जाहीर तपशील प्रकट करु नये अशी विनंती. मंडळी दिवस थोडेच उरले आहेत, तेव्हा जास्त वेळ वाया न घालवता लिहायला घ्या बरं... आपल्या लेखनाच्या प्रतीक्षेत -टीम मिपा दिवाळी अंक
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21381 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

अरे वा

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/15/2022 - 09:54 नवीन
भारी, दिवाळी अंक चांगला होईल यात काही शंका नाही, अनेक शुभेच्छा, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

वा!

चांदणे संदीप
गुरुवार, 09/15/2022 - 10:00 नवीन
आता मिपा दिवाळी अंकाची प्रतिक्षा. सर्व लेखकांना आगाऊ शुभेच्छा! सं - दी - प
  • Log in or register to post comments

छान

हेमंतकुमार
गुरुवार, 09/15/2022 - 10:07 नवीन
शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मिपा दिवाळी अंक व आगावू

पाषाणभेद
गुरुवार, 09/15/2022 - 10:07 नवीन
मिपा दिवाळी अंक व आगावू लेखकांना शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

हीहीही

सुरिया
गुरुवार, 09/15/2022 - 10:29 नवीन
मिपा दिवाळी अंक व आगावू लेखकांना शुभेच्छा !!
लेखक बाय डिफॉल्ट आगावू असणार, तुम्हाला शुभेच्छा आगावू द्यायच्यात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

क्षमा करा सर / म्याडम

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/15/2022 - 12:12 नवीन
सरसकट सर्व लेखकांना आगावू ठरवण्या आधी तुम्ही आमच्या श्री श्री १०८ महागुरुंचे महान आत्मचरित्र वाचावे ही नम्र विनंती करतो. ते वाचल्यावर लेखक अगावू असतात हा आपला गैरसमज निवळण्यास मदत होईल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

शुभेच्छा !

धर्मराजमुटके
गुरुवार, 09/15/2022 - 12:45 नवीन
नेहमीप्रमाणे दिवाळी अंक पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन देऊ नका ही मिपास खास विनवणी. मुख्य फळ्यावरचे धागे, दिवाळी अंकाचे धागे यांची सरमिसळ होऊ द्या. काय की पीडीएफ अंक उपलब्ध झाला की तो संग्रही ठेऊन कधीही वाचता येतो, इतरांना पाठवता येतो त्यामुळे मिपावरची ट्राफीक कमी होते.
  • Log in or register to post comments

मिदिअंकाला शुभेच्छा!

वामन देशमुख
गुरुवार, 09/15/2022 - 12:56 नवीन
मिदिअंकाला शुभेच्छा! - वाचनप्रेमी
  • Log in or register to post comments

मिसळपाव दिवाळी अंक - २०२२

तुषार काळभोर
गुरुवार, 09/15/2022 - 14:15 नवीन
यंदाच्या मिसळपाव दिवाळी अंकाला शुभेच्छा!! आगाऊ लेखकांना आगाऊ शुभेच्छा!! सर्व वाचकांना शुभेच्छा!! सर्व शुभेच्छुकांना शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

हेहेहे...

चांदणे संदीप
गुरुवार, 09/15/2022 - 18:38 नवीन
कविवर्य पाडगावकारांच्या 'सलाम' कवितेसारखं होऊ शकतं. आणखी काही लोकांना शुभेच्छा लिहा हिंदकेसरी. :) सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

छानच फार!

खेडूत
गुरुवार, 09/15/2022 - 16:57 नवीन
छानच फार! आताच वाट पहायला सुरुवात केली आहे. आगावू शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

नक्की लिहिणार

मित्रहो
Fri, 09/16/2022 - 11:00 नवीन
नक्की लिहणार. ५ ऑक्टोबर पर्यंत लेख पाठवितो. दिवाळी अंकासाठी शुभेच्छा
  • Log in or register to post comments

नक्की लिहीतो

विजुभाऊ
Fri, 09/16/2022 - 13:42 नवीन
नक्की लिहीतो
  • Log in or register to post comments

निर्धारित वेळेत लेख

अनिंद्य
Mon, 09/19/2022 - 20:37 नवीन
निर्धारित वेळेत लेख पाठवण्याचा प्रयत्न असेल. लेखासाठी काही शब्दमर्यादा असल्यास कळवावे.
  • Log in or register to post comments

शब्दमर्यादा नाही

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/22/2022 - 10:15 नवीन
दिवाळी अंका करता कोणतीही शब्दमर्यादा नसते, किंबहूना शशक सोडून कोणत्याही लेखनप्रकारासाठी मिपावर तरी शब्दमर्यादा नाही पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य

अरे वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/20/2022 - 08:44 नवीन
दिवाळी अंक टीमला शुभेच्छा. लिहायचा प्रयत्न आहेच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मिपा दिवाळी अंकाला शुभेच्छा!!!

अथांग आकाश
गुरुवार, 09/22/2022 - 10:58 नवीन
मिपा दिवाळी अंकाला शुभेच्छा!!! Image removed.
  • Log in or register to post comments

मिपा अखंड व्यवस्थित चालावे

तर्कवादी
गुरुवार, 10/13/2022 - 17:08 नवीन
मिपा अखंड व्यवस्थित चालावे यासाठी शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग आकाश

हो ना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/13/2022 - 19:37 नवीन
आपलं दुसरं काहीही मागणे नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

दिवाळी अंक तर ठीक आहे.. पण

तर्कवादी
Mon, 10/17/2022 - 11:03 नवीन
दिवाळी अंक तर ठीक आहे.. पण त्या आधी मिपा यंदाची दिवाळी बघणार की नाही अशी परिस्थिती झालीये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिवाळी अंक तर ठीक आहे.. पण

तर्कवादी
Mon, 10/17/2022 - 11:03 नवीन
दिवाळी अंक तर ठीक आहे.. पण त्या आधी मिपा यंदाची दिवाळी बघणार की नाही अशी परिस्थिती झालीये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नक्की पाठवतो.

नीलकंठ देशमुख
Wed, 09/28/2022 - 22:42 नवीन
नक्की पाठवतो. मिसळपाव मुळेच , 'देशमुखी'हा विनोदी कथा व ललित लेख संग्रह प्रकाशित करायची प्रेरणा मिळाली असे मला वाटते.सुदैवाने त्याला वाचकांचा छान प्रतिसाद मिळत आहे.
  • Log in or register to post comments

मिपा दिवाळी २०२२

अरुण मनोहर
Fri, 09/30/2022 - 08:30 नवीन
खूप काळानंतर मिपावर आलो. दिवाळी अंकासाठी मिपाला आणि सर्व लेखकांना शुभेच्छा. कथा पाठवली आहे.
  • Log in or register to post comments

लेखक लोक्स घाई करा

साहित्य संपादक
Sat, 10/01/2022 - 09:13 नवीन
दिवाळी अंका करता साहित्य देण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक आहेत. जरा ढिले सोडा आपल्या लेखण्यांचे लगाम आणि लिहुद्या त्यांना मुक्त पणे. साहित्य संपादक,
  • Log in or register to post comments

त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा....

साहित्य संपादक
Mon, 10/03/2022 - 08:52 नवीन
दिवाळी अंकाकरता आपले साहित्य देण्याची मुदत दोन दिवसांनी संपत आहे, तेव्हा झरझर लेखण्या चालवा आणि भरभर व्यनि करा, साहित्य संपादक,
  • Log in or register to post comments

मी देखील लिहीण्याचा प्रयत्न

पॉल पॉट
Tue, 10/04/2022 - 00:15 नवीन
मी देखील लिहीण्याचा प्रयत्न करतो. ह्या आधी कविता लिहील्या आहेत काही. मिपावरही एक दोन प्रसिध्द केल्या आहेत. २०११ साली मी एक्टीव होतो तेव्हा प्रसिध्द केल्या होत्या. आता तो आयडीही विसरलो नी पासवर्डही.
  • Log in or register to post comments

मिपा पुन्हा सुरु झाले.

विजुभाऊ
Mon, 10/17/2022 - 22:48 नवीन
मिपा पुन्हा सुरु झाले. आज आनंदी आनंद झाला..... दिवाळी अंकासाठी आता कसलीच बाधा येणार नाही....... लै भारी
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

सौंदाळा
Tue, 10/18/2022 - 10:20 नवीन
हेच म्हणतो पण दिवाळी अंक संपादक आणि बाकी टीमला या डाऊनटाईममुळे ओव्हरटाईम करायला लागतो की काय आता. असो, आता मिपा चालू झालय आणि दिवाळी अंक वेळेवर प्रदर्शित होण्यासाठी सर्व संबंधितांना ऑल द बेस्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

+१

सागर
Tue, 10/18/2022 - 11:22 नवीन
हेच म्हणतो मिपा कायम सुरु राहू देत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

मिपाला फार मिस केले या ३-४ दिवसात

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 10/18/2022 - 12:13 नवीन
आता मिपा सुरळीत चालु रहावे यासाठी शुभेच्छा आणि मेंटेनन्स क्रू चे आभार!!
  • Log in or register to post comments

@ प्रशासक

हेमंतकुमार
Tue, 10/18/2022 - 15:34 नवीन
मी प्रतिसाद दिल्यानंतर असा संदेश येतो: The website encountered an unexpected error. Please try again later. माझा प्रतिसाद प्रकाशित झालेला असतो परंतु मला दिसत नाही. आणि पुन्हा मुख्य पानावर त्याच धाग्यावर गेले असता माझ्या प्रतिसादाला न वाचल्याचे लाल वर्तुळ असते.
  • Log in or register to post comments

माझी कविता दिसत नाहीये आता.

शर्मिला र.
Wed, 10/19/2022 - 10:44 नवीन
माझी अग्निकूंड ही कविता दिसत नाहीये आता.
  • Log in or register to post comments

आपल्याला व्य.नि. पाठवला आहे.

साहित्य संपादक
Wed, 10/19/2022 - 11:30 नवीन
आपल्याला व्य.नि. पाठवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शर्मिला र.

मिपा सुरू झाले

स्वधर्म
Wed, 10/19/2022 - 17:50 नवीन
याचा आनंद आहे. ऐन वेळी खूप काम करावे लागले असेल. दिवाळी अंकासाठी अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

यंदाच्या दिवाळी अंकाला .........

सुधीर कांदळकर
गुरुवार, 10/20/2022 - 18:48 नवीन
अनेक, अनेक शुभेच्छा. खमंग फराळाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

यंदाच्या दिवाळी अंकाला .........

सुधीर कांदळकर
गुरुवार, 10/20/2022 - 18:48 नवीन
अनेक, अनेक शुभेच्छा. खमंग फराळाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

आपणा सर्वांस दिपावलीच्या

चौथा कोनाडा
Fri, 10/21/2022 - 21:08 नवीन
आपणा सर्वांस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! Image removed.
  • Log in or register to post comments

संपादक मंडळ ,

बिपीन सुरेश सांगळे
Sat, 10/22/2022 - 19:10 नवीन
संपादक मंडळ , सस्नेह नमस्कार . कथा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वर अगोदरच पाठवली आहे . हरकत नाही . आता पुन्हा पाठवतो आहे . कथा जरूर वाचावी , थेट स्वीकारू शकता . मिपाला काही समस्या होती . ती दूर झाली असेल न पुन्हा येऊ नये हीच सदिच्छा . दीपावलीच्या सर्व मिपाकरांना खूप शुभेच्छा . धन्यवाद
  • Log in or register to post comments

संपादक मंडळ ,

बिपीन सुरेश सांगळे
Sat, 10/22/2022 - 19:11 नवीन
संपादक मंडळ , सस्नेह नमस्कार . कथा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वर अगोदरच पाठवली आहे . हरकत नाही . आता पुन्हा पाठवतो आहे . कथा जरूर वाचावी , थेट स्वीकारू शकता . मिपाला काही समस्या होती . ती दूर झाली असेल न पुन्हा येऊ नये हीच सदिच्छा . दीपावलीच्या सर्व मिपाकरांना खूप शुभेच्छा . धन्यवाद
  • Log in or register to post comments

संपादक मंडळ ,

बिपीन सुरेश सांगळे
Sat, 10/22/2022 - 19:11 नवीन
संपादक मंडळ , सस्नेह नमस्कार . कथा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वर अगोदरच पाठवली आहे . हरकत नाही . आता पुन्हा पाठवतो आहे . कथा जरूर वाचावी , थेट स्वीकारू शकता . मिपाला काही समस्या होती . ती दूर झाली असेल न पुन्हा येऊ नये हीच सदिच्छा . दीपावलीच्या सर्व मिपाकरांना खूप शुभेच्छा . धन्यवाद
  • Log in or register to post comments

मंडळी क्षमा असावी .

बिपीन सुरेश सांगळे
Sat, 10/22/2022 - 19:15 नवीन
मंडळी क्षमा असावी . संदेश जात नव्हता . एरर येत होती . एक मेसेज तीन वेळा आला आहे .
  • Log in or register to post comments

अंक कधी प्रसिद्ध होणार?

श्रीगुरुजी
Mon, 10/24/2022 - 09:12 नवीन
अंक कधी प्रसिद्ध होणार?
  • Log in or register to post comments

दिवाळी अंक २६-१०-२०२२ रोजी प्रकाशित

साहित्य संपादक
Mon, 10/24/2022 - 09:24 नवीन
मध्यंतरी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे 'मिपा दिवाळी अंक २०२२' च्या प्रकाशनास थोडा विलंब होत आहे त्यासाठी दिलगीर आहोत. दिवाळी अंक २६-१०-२०२२ रोजी प्रकाशित होणे अपेक्षीत आहे. टिम - मिपा दिवाळी अंक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नवं कॅलेंडर घ्यावं कि काय ?

आलो आलो
गुरुवार, 10/27/2022 - 22:48 नवीन
नाही म्हणजे आमच्याकडील हि तारीख उलटून गेलीये. ह. घ्या. 
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहित्य संपादक

नवं कॅलेंडर घ्यावं कि काय ?

आलो आलो
गुरुवार, 10/27/2022 - 22:48 नवीन
नाही म्हणजे आमच्याकडील हि तारीख उलटून गेलीये. ह. घ्या. 
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहित्य संपादक

अनेक शुभेच्छा

विजुभाऊ
Mon, 10/24/2022 - 15:51 नवीन
अनेक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

दिवाळी अंक

चष्मेबद्दूर
Wed, 10/26/2022 - 11:53 नवीन
अजून प्रकाशित झाला नाही का? की मला दिसत नाहीये ???
  • Log in or register to post comments

दिवाळी अंक

चष्मेबद्दूर
Wed, 10/26/2022 - 11:53 नवीन
अजून प्रकाशित झाला नाही का? की मला दिसत नाहीये ???
  • Log in or register to post comments

दिवाळी अंक

चष्मेबद्दूर
Wed, 10/26/2022 - 11:53 नवीन
अजून प्रकाशित झाला नाही का? की मला दिसत नाहीये ???
  • Log in or register to post comments

कुठपर्यंत आली तयारी?

आनन्दा
Wed, 10/26/2022 - 20:12 नवीन
कुठपर्यंत आली तयारी?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा