Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by साहित्य संपादक on गुरुवार, 09/15/2022 - 09:48
गलेमा संपली की मिपाच्या संपादक मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाचे. या वर्षी गलेमाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता दिवाळी अंकही धमाकेदार बनणार यात काही शंकाच नाही . आपला सर्वांचा उत्साह वाढवणारी अजून एक गोष्ट यावेळी घडते आहे ती म्हणजे, या वेळी दिवाळी अंक आवाहन धागा प्रसिध्द होण्याआधीच आपल्याला दिवाळी अंकासाठी लेख मिळायला सुरुवात झाली आहे. तर काहीनी आपापले रुमाल टाकून जागा अडवून धरल्या आहेत. तेव्हा मंडळी तुम्ही तरी का बरं मागे राहताय? सरसावा आपापल्या लेखण्या आणि होऊ द्या मिपावर बरसात तुमच्या कसदार आणि जोमदार लेखनाची. या वर्षीही दिवाळी अंकाकरिता ठराविक अशी काही थीम नाही. लेख, कविता, कथा, प्रवासवर्णन, भाषांतर, शशक, अलक, किंवा आपल्याला जे आवडेल, रुचेल ते तुम्ही लिहू शकता. लेखन देण्याची मुदत २० सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ अशी असेल. कोणत्याही प्रकारे पूर्वप्रकाशित लेखन कृपया पाठवू नये. आपलं लेखन आपण साहित्य संपादक या व्यनिवर पाठवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा. किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. जर तुम्ही ईमेलद्वारे लेखन पाठवलं, तर मेलमध्ये आपला मिपा आयडी लिहायला विसरू नका. काही प्रश्न, अडचणी असतील तर मदतीसाठी साहित्य संपादक आहेतच. आलेल्या लेखनातील अंकाला साजेसं लेखन निवडून ते प्रकाशित केलं जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय संपादक मंडळाचा असेल. अजून एक महत्वाचे - अंकामधे काय असेल या बद्दल वाचकांची उत्सुकता कायम रहावी या करता आपण आपल्या लिखाणाबद्दल जाहीर तपशील प्रकट करु नये अशी विनंती. मंडळी दिवस थोडेच उरले आहेत, तेव्हा जास्त वेळ वाया न घालवता लिहायला घ्या बरं... आपल्या लेखनाच्या प्रतीक्षेत -टीम मिपा दिवाळी अंक
  • Log in or register to post comments
  • 21381 views

प्रतिक्रिया

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 09/15/2022 - 09:54

Permalink

अरे वा

भारी, दिवाळी अंक चांगला होईल यात काही शंका नाही, अनेक शुभेच्छा, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on गुरुवार, 09/15/2022 - 10:00

Permalink

वा!

आता मिपा दिवाळी अंकाची प्रतिक्षा. सर्व लेखकांना आगाऊ शुभेच्छा! सं - दी - प
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 09/15/2022 - 10:07

Permalink

छान

शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 09/15/2022 - 10:07

Permalink

मिपा दिवाळी अंक व आगावू

मिपा दिवाळी अंक व आगावू लेखकांना शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

Submitted by सुरिया on गुरुवार, 09/15/2022 - 10:29

In reply to मिपा दिवाळी अंक व आगावू by पाषाणभेद

Permalink

हीहीही

मिपा दिवाळी अंक व आगावू लेखकांना शुभेच्छा !!
लेखक बाय डिफॉल्ट आगावू असणार, तुम्हाला शुभेच्छा आगावू द्यायच्यात का?
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 09/15/2022 - 12:12

In reply to हीहीही by सुरिया

Permalink

क्षमा करा सर / म्याडम

सरसकट सर्व लेखकांना आगावू ठरवण्या आधी तुम्ही आमच्या श्री श्री १०८ महागुरुंचे महान आत्मचरित्र वाचावे ही नम्र विनंती करतो. ते वाचल्यावर लेखक अगावू असतात हा आपला गैरसमज निवळण्यास मदत होईल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 09/15/2022 - 12:45

Permalink

शुभेच्छा !

नेहमीप्रमाणे दिवाळी अंक पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन देऊ नका ही मिपास खास विनवणी. मुख्य फळ्यावरचे धागे, दिवाळी अंकाचे धागे यांची सरमिसळ होऊ द्या. काय की पीडीएफ अंक उपलब्ध झाला की तो संग्रही ठेऊन कधीही वाचता येतो, इतरांना पाठवता येतो त्यामुळे मिपावरची ट्राफीक कमी होते.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 09/15/2022 - 12:56

Permalink

मिदिअंकाला शुभेच्छा!

मिदिअंकाला शुभेच्छा! - वाचनप्रेमी
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 09/15/2022 - 14:15

Permalink

मिसळपाव दिवाळी अंक - २०२२

यंदाच्या मिसळपाव दिवाळी अंकाला शुभेच्छा!! आगाऊ लेखकांना आगाऊ शुभेच्छा!! सर्व वाचकांना शुभेच्छा!! सर्व शुभेच्छुकांना शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on गुरुवार, 09/15/2022 - 18:38

In reply to मिसळपाव दिवाळी अंक - २०२२ by तुषार काळभोर

Permalink

हेहेहे...

कविवर्य पाडगावकारांच्या 'सलाम' कवितेसारखं होऊ शकतं. आणखी काही लोकांना शुभेच्छा लिहा हिंदकेसरी. :) सं - दी - प
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on गुरुवार, 09/15/2022 - 16:57

Permalink

छानच फार!

छानच फार! आताच वाट पहायला सुरुवात केली आहे. आगावू शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Fri, 09/16/2022 - 11:00

Permalink

नक्की लिहिणार

नक्की लिहणार. ५ ऑक्टोबर पर्यंत लेख पाठवितो. दिवाळी अंकासाठी शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 09/16/2022 - 13:42

Permalink

नक्की लिहीतो

नक्की लिहीतो
  • Log in or register to post comments

Submitted by अनिंद्य on Mon, 09/19/2022 - 20:37

Permalink

निर्धारित वेळेत लेख

निर्धारित वेळेत लेख पाठवण्याचा प्रयत्न असेल. लेखासाठी काही शब्दमर्यादा असल्यास कळवावे.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 09/22/2022 - 10:15

In reply to निर्धारित वेळेत लेख by अनिंद्य

Permalink

शब्दमर्यादा नाही

दिवाळी अंका करता कोणतीही शब्दमर्यादा नसते, किंबहूना शशक सोडून कोणत्याही लेखनप्रकारासाठी मिपावर तरी शब्दमर्यादा नाही पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 09/20/2022 - 08:44

Permalink

अरे वाह !

दिवाळी अंक टीमला शुभेच्छा. लिहायचा प्रयत्न आहेच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अथांग आकाश on गुरुवार, 09/22/2022 - 10:58

Permalink

मिपा दिवाळी अंकाला शुभेच्छा!!!

मिपा दिवाळी अंकाला शुभेच्छा!!! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on गुरुवार, 10/13/2022 - 17:08

In reply to मिपा दिवाळी अंकाला शुभेच्छा!!! by अथांग आकाश

Permalink

मिपा अखंड व्यवस्थित चालावे

मिपा अखंड व्यवस्थित चालावे यासाठी शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 10/13/2022 - 19:37

In reply to मिपा अखंड व्यवस्थित चालावे by तर्कवादी

Permalink

हो ना.

आपलं दुसरं काहीही मागणे नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Mon, 10/17/2022 - 11:03

In reply to हो ना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

दिवाळी अंक तर ठीक आहे.. पण

दिवाळी अंक तर ठीक आहे.. पण त्या आधी मिपा यंदाची दिवाळी बघणार की नाही अशी परिस्थिती झालीये..
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Mon, 10/17/2022 - 11:03

In reply to हो ना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

दिवाळी अंक तर ठीक आहे.. पण

दिवाळी अंक तर ठीक आहे.. पण त्या आधी मिपा यंदाची दिवाळी बघणार की नाही अशी परिस्थिती झालीये..
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकंठ देशमुख on Wed, 09/28/2022 - 22:42

Permalink

नक्की पाठवतो.

नक्की पाठवतो. मिसळपाव मुळेच , 'देशमुखी'हा विनोदी कथा व ललित लेख संग्रह प्रकाशित करायची प्रेरणा मिळाली असे मला वाटते.सुदैवाने त्याला वाचकांचा छान प्रतिसाद मिळत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Fri, 09/30/2022 - 08:30

Permalink

मिपा दिवाळी २०२२

खूप काळानंतर मिपावर आलो. दिवाळी अंकासाठी मिपाला आणि सर्व लेखकांना शुभेच्छा. कथा पाठवली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by साहित्य संपादक on Sat, 10/01/2022 - 09:13

Permalink

लेखक लोक्स घाई करा

दिवाळी अंका करता साहित्य देण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक आहेत. जरा ढिले सोडा आपल्या लेखण्यांचे लगाम आणि लिहुद्या त्यांना मुक्त पणे. साहित्य संपादक,
  • Log in or register to post comments

Submitted by साहित्य संपादक on Mon, 10/03/2022 - 08:52

Permalink

त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा....

दिवाळी अंकाकरता आपले साहित्य देण्याची मुदत दोन दिवसांनी संपत आहे, तेव्हा झरझर लेखण्या चालवा आणि भरभर व्यनि करा, साहित्य संपादक,
  • Log in or register to post comments

Submitted by पॉल पॉट on Tue, 10/04/2022 - 00:15

Permalink

मी देखील लिहीण्याचा प्रयत्न

मी देखील लिहीण्याचा प्रयत्न करतो. ह्या आधी कविता लिहील्या आहेत काही. मिपावरही एक दोन प्रसिध्द केल्या आहेत. २०११ साली मी एक्टीव होतो तेव्हा प्रसिध्द केल्या होत्या. आता तो आयडीही विसरलो नी पासवर्डही.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 10/17/2022 - 22:48

Permalink

मिपा पुन्हा सुरु झाले.

मिपा पुन्हा सुरु झाले. आज आनंदी आनंद झाला..... दिवाळी अंकासाठी आता कसलीच बाधा येणार नाही....... लै भारी
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Tue, 10/18/2022 - 10:20

In reply to मिपा पुन्हा सुरु झाले. by विजुभाऊ

Permalink

हेच म्हणतो

हेच म्हणतो पण दिवाळी अंक संपादक आणि बाकी टीमला या डाऊनटाईममुळे ओव्हरटाईम करायला लागतो की काय आता. असो, आता मिपा चालू झालय आणि दिवाळी अंक वेळेवर प्रदर्शित होण्यासाठी सर्व संबंधितांना ऑल द बेस्ट
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Tue, 10/18/2022 - 11:22

In reply to हेच म्हणतो by सौंदाळा

Permalink

+१

हेच म्हणतो मिपा कायम सुरु राहू देत !
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Tue, 10/18/2022 - 12:13

Permalink

मिपाला फार मिस केले या ३-४ दिवसात

आता मिपा सुरळीत चालु रहावे यासाठी शुभेच्छा आणि मेंटेनन्स क्रू चे आभार!!
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 10/18/2022 - 15:34

Permalink

@ प्रशासक

मी प्रतिसाद दिल्यानंतर असा संदेश येतो: The website encountered an unexpected error. Please try again later. माझा प्रतिसाद प्रकाशित झालेला असतो परंतु मला दिसत नाही. आणि पुन्हा मुख्य पानावर त्याच धाग्यावर गेले असता माझ्या प्रतिसादाला न वाचल्याचे लाल वर्तुळ असते.
  • Log in or register to post comments

Submitted by शर्मिला र. on Wed, 10/19/2022 - 10:44

Permalink

माझी कविता दिसत नाहीये आता.

माझी अग्निकूंड ही कविता दिसत नाहीये आता.
  • Log in or register to post comments

Submitted by साहित्य संपादक on Wed, 10/19/2022 - 11:30

In reply to माझी कविता दिसत नाहीये आता. by शर्मिला र.

Permalink

आपल्याला व्य.नि. पाठवला आहे.

आपल्याला व्य.नि. पाठवला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Wed, 10/19/2022 - 17:50

Permalink

मिपा सुरू झाले

याचा आनंद आहे. ऐन वेळी खूप काम करावे लागले असेल. दिवाळी अंकासाठी अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on गुरुवार, 10/20/2022 - 18:48

Permalink

यंदाच्या दिवाळी अंकाला .........

अनेक, अनेक शुभेच्छा. खमंग फराळाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on गुरुवार, 10/20/2022 - 18:48

Permalink

यंदाच्या दिवाळी अंकाला .........

अनेक, अनेक शुभेच्छा. खमंग फराळाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 10/21/2022 - 21:08

Permalink

आपणा सर्वांस दिपावलीच्या

आपणा सर्वांस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपीन सुरेश सांगळे on Sat, 10/22/2022 - 19:10

Permalink

संपादक मंडळ ,

संपादक मंडळ , सस्नेह नमस्कार . कथा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वर अगोदरच पाठवली आहे . हरकत नाही . आता पुन्हा पाठवतो आहे . कथा जरूर वाचावी , थेट स्वीकारू शकता . मिपाला काही समस्या होती . ती दूर झाली असेल न पुन्हा येऊ नये हीच सदिच्छा . दीपावलीच्या सर्व मिपाकरांना खूप शुभेच्छा . धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by बिपीन सुरेश सांगळे on Sat, 10/22/2022 - 19:11

Permalink

संपादक मंडळ ,

संपादक मंडळ , सस्नेह नमस्कार . कथा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वर अगोदरच पाठवली आहे . हरकत नाही . आता पुन्हा पाठवतो आहे . कथा जरूर वाचावी , थेट स्वीकारू शकता . मिपाला काही समस्या होती . ती दूर झाली असेल न पुन्हा येऊ नये हीच सदिच्छा . दीपावलीच्या सर्व मिपाकरांना खूप शुभेच्छा . धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by बिपीन सुरेश सांगळे on Sat, 10/22/2022 - 19:11

Permalink

संपादक मंडळ ,

संपादक मंडळ , सस्नेह नमस्कार . कथा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वर अगोदरच पाठवली आहे . हरकत नाही . आता पुन्हा पाठवतो आहे . कथा जरूर वाचावी , थेट स्वीकारू शकता . मिपाला काही समस्या होती . ती दूर झाली असेल न पुन्हा येऊ नये हीच सदिच्छा . दीपावलीच्या सर्व मिपाकरांना खूप शुभेच्छा . धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by बिपीन सुरेश सांगळे on Sat, 10/22/2022 - 19:15

Permalink

मंडळी क्षमा असावी .

मंडळी क्षमा असावी . संदेश जात नव्हता . एरर येत होती . एक मेसेज तीन वेळा आला आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 10/24/2022 - 09:12

Permalink

अंक कधी प्रसिद्ध होणार?

अंक कधी प्रसिद्ध होणार?
  • Log in or register to post comments

Submitted by साहित्य संपादक on Mon, 10/24/2022 - 09:24

In reply to अंक कधी प्रसिद्ध होणार? by श्रीगुरुजी

Permalink

दिवाळी अंक २६-१०-२०२२ रोजी प्रकाशित

मध्यंतरी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे 'मिपा दिवाळी अंक २०२२' च्या प्रकाशनास थोडा विलंब होत आहे त्यासाठी दिलगीर आहोत. दिवाळी अंक २६-१०-२०२२ रोजी प्रकाशित होणे अपेक्षीत आहे. टिम - मिपा दिवाळी अंक
  • Log in or register to post comments

Submitted by आलो आलो on गुरुवार, 10/27/2022 - 22:48

In reply to दिवाळी अंक २६-१०-२०२२ रोजी प्रकाशित by साहित्य संपादक

Permalink

नवं कॅलेंडर घ्यावं कि काय ?

नाही म्हणजे आमच्याकडील हि तारीख उलटून गेलीये. ह. घ्या. 
  • Log in or register to post comments

Submitted by आलो आलो on गुरुवार, 10/27/2022 - 22:48

In reply to दिवाळी अंक २६-१०-२०२२ रोजी प्रकाशित by साहित्य संपादक

Permalink

नवं कॅलेंडर घ्यावं कि काय ?

नाही म्हणजे आमच्याकडील हि तारीख उलटून गेलीये. ह. घ्या. 
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 10/24/2022 - 15:51

Permalink

अनेक शुभेच्छा

अनेक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by चष्मेबद्दूर on Wed, 10/26/2022 - 11:53

Permalink

दिवाळी अंक

अजून प्रकाशित झाला नाही का? की मला दिसत नाहीये ???
  • Log in or register to post comments

Submitted by चष्मेबद्दूर on Wed, 10/26/2022 - 11:53

Permalink

दिवाळी अंक

अजून प्रकाशित झाला नाही का? की मला दिसत नाहीये ???
  • Log in or register to post comments

Submitted by चष्मेबद्दूर on Wed, 10/26/2022 - 11:53

Permalink

दिवाळी अंक

अजून प्रकाशित झाला नाही का? की मला दिसत नाहीये ???
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 10/26/2022 - 20:12

Permalink

कुठपर्यंत आली तयारी?

कुठपर्यंत आली तयारी?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com