आत्ममग्न
प्रियकरामागून जातेस
नीऑन रंगांच्या दरवाज्यातून
बेदरकारपणे -
होतेस स्वार - गार वार्यावर,
मागे उडणारी रंगीत वस्त्रे
सावरण्याची शुद्ध नाही तुला
कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे?
*
एकटीच असतेस
पांढर्या गजांच्या खिडकीसमोर
निर्विकारपणे -
शहारतेस - गार वार्याने,
पारदर्शक वस्त्रांतून काटकुळे अंग
दिसू नये याची शुद्ध नाही तुला
कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे?
*
कोणी बघितले
हायफंडु आहे बॉ - बाउन्सर
सही ....
बादवे
छान पन कोनावर लिहिली आहे?
माफ करा, पहिलं कडवं समजलं
कविता छान आहे..
बापरे
धन्यवाद
थोडी गफलत
होय
सूर्य हा प्रियकर आणि त्याच्या
+१
सुंदर कल्पना.. (अर्थात
कविता
दोन्ही कडवी तरुण मुलीवर
लय आवडली.
मलाही एका उशरुंखल / बिनधास्त
फोटो बघितल्यावर कविता एकदम
आवडली, संदर्भचित्रांच्या नंतर पुन्हा
धन्यवाद
तरुणी आणि वृद्धा
भारीच!
कवीता