Skip to main content

ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग १)

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 31/08/2022 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली! १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या काळात कळसाला पोहोचलेले अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपविण्यात गोर्बाचेव्ह यांनी पुढाकार घेतला. अमेरिकेसोबत शस्त्रकपातीचा करार व पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध वाढविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या ग्लासनोस्त व पेरेत्राईका म्हणजे रशियातील पोलादी पडदा हटवून खुलेपणा आणणे या धोरणांची जगभर प्रशंसा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपमधील रशियात सामील करून घेतलेले १८ देश त्यांच्या काळात स्वतंत्र झाले. त्यांच्याच काळात १९४६ मध्ये दोन तुकडे करण्यात आलेल्या पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले. हे होताना दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सीमेवर बांधलेली अजस्त्र भिंत पाडून टाकली. ते अध्यक्ष असताना रशियापासून स्वतंत्र होणाऱ्या बाल्टिक व पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी रणगाडे व बंदुकीच्या जोरावर ती आंदोलने चिरडून टाकण्याऐवजी हे दैश स्वतंत्र करण्यास पुढाकार घेतला. रशियाने १९५६ मध्ये हंगेरी व १९६८ मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया या दोन देशात सैन्य पाठवून तेथे रशियाच्या तालावर नाचणारी साम्यवादी राजवट बसविली होती. रूमेनिया, बल्गेरिया, पोलंड या देशात हेच केले होते. तेथील नागरिकांचे आंदोलन रशियाने रणगाडे पाठवून चिरडून टाकले होते. परंतु १९८९ मध्ये गोर्बाचेव्ह यांनी कोणताही विरोध न करता या देशांना स्वतंत्र होण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे या देशातील साम्यवादी राजवट तेथील नागरिकांनी उलथून टाकली. रशियात बळजबरीने सामील केलेले जॉर्जिया, अझरबैजान, युक्रेन, लाटव्हिया, इस्टोनिया इ. १८ देश सुद्धा याच काळात रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झाले. अर्थात रशियातील कट्टर साम्यवाद्यांना हे अजिबात मान्य नव्हते. विद्यमान अध्यक्ष पुटिन यांनी हे देश परत रशियात आणणार असे २०१८ मध्ये सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले आहे. त्यांच्याविरूद्ध १९९१ मध्ये लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांचे सहकारी बोरिस येलत्सिन यांच्या नेतृत्वाखाली तो शमविण्यात आला. हेच येलत्सिन नंतर रशियाचे अध्यक्ष झाले. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.

वाचने 29662
प्रतिक्रिया 238

प्रतिक्रिया

च्यायला, बरं झालं गुरुजी फ्रेश धागा सुरु केला. त्या व्हिडीयो लिंकाळ्या धाग्यात जीव गुदमरायला लागला होता. बाय द वे, सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपावर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! :) -दिलीप बिरुटे

सर्व मिपाकर मंडळी आणि वाचकांना श्रीगणेश चतुर्थी आणि श्रीगणेश उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! :) बाप्पाच्या आशिर्वादाने आपल्या सगळ्यांच्या विघ्नांचा नाश होवो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभुन सर्व कार्यात यश प्राप्त होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी करतो. _/\_

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- DEVA SHREE GANESHA - Agneepath - Banjo Cover

२० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.
ॐ शांती.

पेरेत्राईका पेरेस्त्रोईका , म्हणजेच पुनर्बांधणी - री - कन्स्ट्रक्शन मिखाईल गोर्बाचेव्ह ह्यांना श्रद्धांजली. ################## . आपणा सगळ्यांना गणेशोत्सव पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा, बाप्पा कायम आपल्यासोबत राहो हीच प्रार्थना हॅप्पी बर्थ डे टू यू मिसळपाव.

आत्ता पर्यंतचा इतिहास पाहिल्यास हिंदूंचे अपार रक्त सांडुन त्यांच्या स्त्रीयां ची भयंकर विटंबना करुन धर्माच्या आधारावर निर्माण झालेल्या पाकिस्तानने आपल्याला सातत्याने रक्तबंबाळ केले, कॉपीवुडला छुपा पतपुरवठा करुन हिंदू विरोधी, देश विरोधी चित्रपटांद्वारे वैचारिक आतंकवाद पोसला. अनेक वेळा देशभर बॉम्ब स्फोट घडवुन आणले,कारगिल आणि पुलवामा सारखे अमानुष हल्ले करुन आपल्या जवानांना क्रुरपणे ठार केले. सातत्याने त्यांच्या देशातील अल्पसंख्यक हिंदूंची या देशात हत्या केली जाते आणि हिंदू मुलींना पळवुन नेऊन एक तर जबरदस्तीने धर्म परिवर्तन करुन लग्न लावले जाते किंवा त्यांच्यावर बलात्कार करुन त्यांची अमानुषपणे हत्या केली जाते. हे आपले शत्रु राष्ट्र असुन चीन सारख्या मुख्य शत्रुराष्ट्रा बरोबर या देशाची घनिष्ठ मैत्री आहे, ती आपल्या देशाला हानी पोहचवण्यासाठीच केलेली आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. हाच पाकिस्ताना आत्ता पुर परिस्थीतीने ग्रस्त झाला असुन आपल्याकडे मदतीची याचना करण्या पर्यंत त्यांची स्थिती बिकट झालेली आहे. आपले सध्याचे पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी पाकिस्तानच्या सध्य स्थितीवर एक ट्विट केले आहे, ते खालील प्रमाणे आहे :- मला मोदीजींना सांगायचे आहे... ट्विट केले हेच जास्त झाले आहे, मदतीची भीक या कृतघ्न देशास आता तरी घालु नका ! कारगिल मधील त्यांनी पकडलेल्या आपल्या जवानांचे डोळे फोडणारा, त्यांच्या कानात तापलेल्या सळ्या घालणारा, त्यांचे नाक,जीभ आणि कान कापणारा, त्यांचे जनन इंद्रिय कापणारा हाच जिहादी साप आहे, त्याला दूध पाजण्याचे पाप करु नका ! दर वर्षी दिवाळीत आपल्या जवानांना ठार करुन त्यांना शवपेट्यात घरी पाठवणारा हाच देश आहे याचा कोणाला विसर पडु शकतो का ? आपल्या देशातील लोकांचा या आतंकावादाचे जागतिक केंद्र असणार्‍या नीच देशाला कोणतीही मदत करण्यास मोठा विरोध आहे, तेव्हा जनभावनेच्या विरोधात जाऊन नापाकिस्तानला कोणत्याही प्रकारची मदत करण्याचे पाप करु नका ! अमानविय अत्याचार करणार्‍या या देशास मानविययतेचा विचार करुन मदत करण्यास माझ्या सकट देशातील सर्व नागरिकांचा प्रखर विरोध आहे आणि तो कायम तसाच असेल. जय हिंद !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- DEVA SHREE GANESHA - Agneepath - Banjo Cover

In reply to by मदनबाण

अमानविय अत्याचार करणार्‍या या देशास मानविययतेचा विचार करुन मदत करण्यास माझ्या सकट देशातील सर्व नागरिकांचा प्रखर विरोध आहे आणि तो कायम तसाच असेल.
संपूर्ण सहमती जय हिंद !

In reply to by मदनबाण

त्यामुळे, पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांना, कुठल्याही प्रकारची मदत करायची, माझी तरी इच्छा नाही ...

पाकिस्तानी डीप स्टेटची पापं पाकिस्तानी जनतेच्या माथी मारू नयेत. उलट हा मोका वापरून उत्तम सायकॉलॉजीकल वॉरफेर राबवला जाऊ शकतो, जगात आपली प्रतिमा धुवून घेण्याचा आणि पाकिस्तानी जनतेत पाकिस्तानी डीप स्टेट विरुद्ध मत पेरून पुढेमागे पाकिस्तान अंतर्गत अस्थिरतेकडे ढकलून "इम्प्लोड" करण्याचा हा उत्तम पर्याय असेल असे वाटते. बाकी राज्यकर्ते जाणोत. प्रत्येक गोष्टीला द्वेषमूलक उत्तर नसते, आपत्तीला इष्टापत्ती बनवून घेणारेच जगात पुढं जाणार हे सत्य आहे उदाहरणे पण तीच आहेत, दिवस रात्र इस्लामिक दहशतवाद, आजूबाजूला फक्त इस्लामिक शत्रुदेश असूनही शेतीवाडी करून रग्गड सुगी पिकविणाऱ्या इस्राएलने आपले वाढीव शेती उत्पादन पार सौदी वगैरेंना पण एक्सपोर्ट करणे कधीच थांबवले नव्हते, इम्पोर्टेड फ्रॉम इस्राएल स्टिकर न लावता खाडी देश सुद्धा हा माल बिनधोक आयात करत असत/ करतात. त्यामुळे फुकट भावनिक उमाळे काढणे मला तरी अव्यवहार्य वाटते.

In reply to by जेम्स वांड

पाकिस्तानी डीप स्टेटची पापं पाकिस्तानी जनतेच्या माथी मारू नयेत.
पुरोगामी लोकांचा नेहमीचा युक्तीवाद. त्या जनतेचे हिंदु लोकांच्या बद्दल काय मते आहेत ती बघा. अर्थात काही लोक हिंदुवर अत्याचार झाले की गप्प बसतात. ते डिप स्टेट नसले तरी त्यांना हिंदु काफिर किंवा धिम्मी आहेत.
प्रत्येक गोष्टीला द्वेषमूलक उत्तर नसते, आपत्तीला इष्टापत्ती बनवून घेणारेच जगात पुढं जाणार हे सत्य आहे
हे म्हणजे मी शाकाहरी आहे म्हणुन मला वाघ खाणार नाही त्या पध्दतीचा युक्तीवाद झाला.
जगात आपली प्रतिमा धुवून घेण्याचा आणि पाकिस्तानी जनतेत पाकिस्तानी डीप स्टेट विरुद्ध मत पेरून पुढेमागे पाकिस्तान अंतर्गत अस्थिरतेकडे ढकलून "इम्प्लोड" करण्याचा हा उत्तम पर्याय असेल असे वाटते.
पाकीस्तान अस्थिर करण्यापेक्षा, त्याला कर्जबाजारी किंवा मोठ्या संकटात ढकलुन पुर्ण जम्मु आणि काश्मिर राज्य (गिल्गिट बाल्टिस्तान सकट) कसे ताब्यात येईल हे बघितले पाहिजे. अफगाणिस्तान आणि वरती रशियाकडे जायचे मार्ग उपलब्ध होणे आपल्यासाठी महत्वाचे आहे.

In reply to by Trump

पाकीस्तान अस्थिर करण्यापेक्षा, त्याला कर्जबाजारी किंवा मोठ्या संकटात ढकलुन पुर्ण जम्मु आणि काश्मिर राज्य (गिल्गिट बाल्टिस्तान सकट) कसे ताब्यात येईल हे बघितले पाहिजे.
ह्याला अस्थिर करणे नाही तर अजून काय म्हणायचं ?
पुरोगामी लोकांचा नेहमीचा युक्तीवाद. त्या जनतेचे हिंदु लोकांच्या बद्दल काय मते आहेत ती बघा.
दाखवा की, ती पण बघू, पॉइंट फक्त मला लिबरल म्हणून तळतळाट द्यायचे असल्यास तेवढं असू देत मग. बाकी लिबरल असण्याची लाज मला नाही, पण लिबरल आहे म्हणून अँटी हिंदू बोलेनच मी, ही तुमची सोयीस्कर मांडणीही मला माझ्यापुरतं मंजूर नाही. तर्काला तर्क द्या, मजा येईल काही नवीन शिकायला समजून घ्यायला, उगाच ह्यांचा हाच प्रतिवाद त्यांचा तोच प्रतिसाद असणार वगैरे नाक मुरडणे इंटरेस्ट असल्यास आमचा सविनय पास.
हे म्हणजे मी शाकाहरी आहे म्हणुन मला वाघ खाणार नाही त्या पध्दतीचा युक्तीवाद झाला.
आपत्तीत संधी शोधण्याला जर आपण नेभळट पेंट करत असाल तर तो आपला वैयक्तिक चॉईस आहे पण "वीर भोग्या वसुंधरा" जगायचे असेल तर "साम दाम दंड आणि भेद" असे सगळे वापरावे, खासकरून पाकिस्तानवर तर जास्तच... पटलं तर बघा, नाहीतर द्या सोडून :)

In reply to by जेम्स वांड

ह्याला अस्थिर करणे नाही तर अजून काय म्हणायचं ?
अर्थात तुम्ही पाकिस्थान म्हणजे काय समजता त्यावर अवलंबुन आहे. हेतुतः जम्मु आणि काश्मिर राज्य (गिल्गिट बाल्टिस्तान सकट) हे पाकिस्तानचा कायदेशीर भाग नाही. त्यामुळे माझी प्रतिक्रिया सिंधुदेश, बलुचीस्थान इ. प्रादेशिक भागांशी संबधित आहे. उत्तरेकडे जायचा मार्ग मोकळा होणे भारतासाठी महत्वाचे आहे. पाकिस्तानचे बलस्थान त्यांचे सैन्य, किंवा आण्विक आयुधे नसुन माथेफिरु लोक त्यांच्या रिलिजनसाठी काहीही करायला तयार असलेले लोक आहेत. जरी उद्या पाकिस्तानने भारतात सामील होण्याची तयारी दाखवली तरी शाहणे भारतीय तयार होतील असे वाटत नाही.
दाखवा की, ती पण बघू, पॉइंट फक्त मला लिबरल म्हणून तळतळाट द्यायचे असल्यास तेवढं असू देत मग. बाकी लिबरल असण्याची लाज मला नाही, पण लिबरल आहे म्हणून अँटी हिंदू बोलेनच मी,
बोला बिनधास्त हिंदु धर्माविरुध्द, पुर्ण पाठिंबा आहे. न तर आमचा हिंदु धर्म इतका लेचापेचा आहे जो टिकेला घाबरेल. पण कधीतरी इतर रिलीजनबद्दल ही बोला. तथाकथित पुरोगामी लोकांची तिथे त त प प होते. हा मुळ मुद्द्याला उत्तर द्या. जेव्हा तुम्ही हा दुजाभाव बंद कराल तेव्हा मजा येईल. नाहीतर तुमच्याबरोबर चर्चा म्हणजे भाकड गायीचे दुध काढण्यासारखे आहे. ---
आपत्तीत संधी शोधण्याला जर आपण नेभळट पेंट करत असाल तर तो आपला वैयक्तिक चॉईस आहे पण "वीर भोग्या वसुंधरा" जगायचे असेल तर "साम दाम दंड आणि भेद" असे सगळे वापरावे, खासकरून पाकिस्तानवर तर जास्तच...
दिखाव्यापुरते पाकिस्तानला मदत करायला किंवा मदतीचे नाटक करायला काही हरकत नाही.

In reply to by Trump

हा मुळ मुद्द्याला उत्तर द्या. जेव्हा तुम्ही हा दुजाभाव बंद कराल तेव्हा मजा येईल. नाहीतर तुमच्याबरोबर चर्चा म्हणजे भाकड गायीचे दुध काढण्यासारखे आहे.
नक्कीच साहेब, यथाशक्ती, यथायोग्य ठिकाणी मी मला जे बोलायचे आहे ते सुस्पष्ट बोलेन ह्याची खात्री बाळगा, फक्त तेव्हा नीरक्षिर विवेकाने वाचाल ही अपेक्षा. कारण कोण लिहितं आहे ह्यापेक्षा काय लिहिलं आहे ह्याला प्रामाणिक प्रतिसाद असतील माझे तरी. :)

' हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या आगमनानिमित्त मिपाकरांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! --- मराठी आंतरजाल विश्वाचा मानबिंदू असलेल्या मिसळपाव.कॉमच्या वर्धापनदिनानिमित्त मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा! - मिपाकर गणेशभक्त वामन '

बीएमसी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे का मुंबईत ? बेस्ट बस थांब्यावर बहुसंख्य ठिकाणी आज हे पोस्टर पाहायला मिळाले .

In reply to by जेम्स वांड

एकूण १५ महापालिकांची मुदत संपली आहे. त्यातील ८ भाजपकडे व ४ सेनेकडे होत्या. आपण या महापालिका हरणार हे दोन्ही पक्षांना माहिती असल्याने दोघेही निवडणूक न घेता पुढे ढकलत आहेत. पुढील २ वर्षे निवडणूक होण्याची शक्यता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

उद्या गृहमंत्री अमित शहा पण येतायत मुंबईत. प्रयोजन काही कळले नाही, मीडिया म्हणतोय की बी.एम.सी. निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याचा चान्स आहे. अर्थात मीडिया वर गुर्जींचा भरवसा नाही म्हणा ते एक असो. वरील बॅनरचे प्रयोजन पण कळले नाही मला, भाजपला स्वतःची हिंदुहितवादी भूमिका इतकी ओवर द टॉप मांडण्याची काय गरज पडली असेल ? ते पण optics त्यांनी पार राममंदिर मुद्दा निकालात काढून मंदिर निर्माण धसास लावल्याचे असताना ? ते ज्ञानवापी मस्जिदचे काय झाले पुढे ? हिंदूंना ऑप्शन नाही दुसरा पक्ष हे कैक लोक मानतात (मिपावर पण त्या अनुषंगाने बहुसंख्य प्रतिसाद सापडतात)

In reply to by जेम्स वांड

आपले सी एम शिंदे साहेब कुठे आहेत ? सरकार मध्ये ते पण आहेत ना ?

In reply to by कपिलमुनी

पण पोस्टर मुंबई भाजपने छपाई करून बेस्ट थांब्याचे पैसे भरून लावले आहेत त्यामुळे त्याच्यात महाराष्ट्राचे सीएम असेल तरी शिंदेंना ठेवायचे धर्मदाय भाजप करेल असे वाटत नाही मला तरी.

In reply to by श्रीगुरुजी

जोपर्यंत मोदी शहा हे शिंदेंच्या मागे उभे आहेत तोपर्यंत मानावेच लागेल. फडणवीस तर माननाणरच. त्यांचेचमुळे शिंदेसाहेब मोदी-शहांपर्यंत पोहचू शकले आहेत. शिंदेसारखा एक चांगला माणूस मिळालाय तो मोदी-शहा गमावणार नाहीत असे वाटते. १५ वर्षे भाजपा विरोधात असताना भाजपाची लोकं उघडपणे म्हणत असत की, भाजपा सत्तेत येऊ शकत नाही. भाजपा स्वतःचा फायदा करू शकत नाही. यास्तव स्वतःचा तरी फायदा करून घ्यावा. तेव्हां भाजपाची लोकं तोडपाणी करण्यात धन्यता मानत असत. जे कर्तृत्ववान भाजपा नेते होते त्यात फडवीस हे एकमेव अपवाद होते. स्वच्छ नेतृत्वाची ही त्यांची छबी १९९५ पासून आहे. त्यांचे वडीलही तसेच होते व त्यांच्या काकूही तशाच होत्या. "माझा आमदारकीचा पगार, माझ्या बायकोचा पगार आणि शेतीतील उत्पन्न यातूनच मी माझी संपत्ती मिळवली आहे." असे फडणवीस म्हणतात. भाजपातील असे किती जण म्हणू शकतील? आणि जे म्हणू शकतील ते फडणवीसांइतके कर्तृत्ववान आहेत का? ते तपासायला लागेल. शेवटी मला काय वाटते ते महत्वाचे नाही. तर मोदींना फडणवीस भरवशाचे का वाटतात त्याचे कारण मी वर स्पष्ट केले आहे. मात्र शिंदेंच्या रूपाने अजित पवार, जयंतराव व आव्हाड यांचेसारखेंवर ताबा ठेऊ शकणारे व उठा यांना शह देऊ शकणारे शिंदे यांचा उपयोग मोदी-शहा करून घेणार हे नक्की. मात्र माझे वरील विवेचन समजून घेण्यासाठी भाजपा प्रेम बाजूला ठेऊन महाराष्ट्राचे भले कशाने होईल या विचारात राजकारणाकडे बघता आले पाहिजे. असो.

In reply to by श्रीगुरुजी

:)

चिनुक हेलिकॉप्टर संबंधी ही बातमी वाचली भारताने हे पांढरे हत्ती पोसायला कश्याला घेतले असतील हेच मला कळत नाहीये अजूनही, युएसची डिझाईन फिलॉसॉफी वेगळी आहे राव, चिनुक ज्या रोलमधील हेलिकॉप्टर आहे त्याची भारताला गरज काय तेच कळेनासे होते आहे मला तरी अजूनही.

In reply to by जेम्स वांड

खबरदारीचा उपाय म्हणून चिनूक हेलिकॉप्टर ग्राउंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समस्या हनीवेल इंटरनॅशनल इंक द्वारा निर्मित इंजिनची आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की इंजिनचे काही घटक ओ-रिंग डिझाइन वैशिष्ट्यांनुसार नव्हते. ही भारतात असलेल्या चिनूक हेलिकॉप्टरच्या इंजिनात नसतीलही.
भारताने हे पांढरे हत्ती पोसायला कश्याला घेतले असतील हेच मला कळत नाहीये
चिनूक एक multi-role, vertical-lift प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा वापर सैन्य, तोफखाना, उपकरणे आणि इंधन वाहतूक करण्यासाठी केला जातो . हे आपत्ती निवारण कार्यांसाठी आणि मदत पुरवठा वाहतूक आणि निर्वासितांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर यासारख्या मोहिमांमध्ये देखील वापरले जाते. चिनूकमध्ये माल चढवण्याची अनेक साधने आहेत ज्यात फ्यूजलेजमध्ये अनेक दरवाजे, फ्यूजलेजच्या मागील बाजूस असलेला एक विस्तृत लोडिंग रॅम्प आणि अंडरस्लंग लोड वाहून नेण्यासाठी तीन बाह्य हुक आहेत. फक्त ३ क्रू वापरून हे उडते. वापरून पक्के अनुभव असलेले तंत्रज्ञान आहे. त्यामुळे हा पांढरा हत्ती मला तरी दिसत नाही. आपल्याकडे हिमालयात हे चिनूक प्रामुख्याने वापरात आहेत. त्यात नेमक्या ठिकाणी तोफखाना वेगाने हलवणे हा मोठा फायदा दिसतो. आता आपण सिकोर्स्की CH-37 मोजावे पण घ्यायला हवे असे वाटते. किंवा multi-role, vertical-lift प्लॅटफॉर्म भारताने तयार करावे असे ही वाटते.

In reply to by निनाद

आपल्याकडे हिमालयात हे चिनूक प्रामुख्याने वापरात आहेत.
Are you sure ? चिनूकची सर्व्हिस सीलिंग काय आहे ?? हिमालयाच्या विरळ वातावरणात डबल रोटर इंजिन कार्यक्षमता किती अन् कशी बदलते ह्यावर काहीतरी सांगा सर....
चिनूकमध्ये माल चढवण्याची अनेक साधने आहेत ज्यात फ्यूजलेजमध्ये अनेक दरवाजे, फ्यूजलेजच्या मागील बाजूस असलेला एक विस्तृत लोडिंग रॅम्प आणि अंडरस्लंग लोड वाहून नेण्यासाठी तीन बाह्य हुक आहेत.
हे तर मी पण वाचले विकिपीडियावर, त्याच्या पुढे जाऊन अजून काही fact आहेत. . हा चिनूकचा performance. . ही सर्व्हिस सिलिंगची परिभाषा . क्रमांक ६, चिनूकने सेट केलेले आजवरचे एल्टीट्युड रेकॉर्ड. (प्रॅक्टिकल फ्लाइंग कंडीशन मधील) त्यामुळे चिनूक हिमालयन हाईट्स वर किती परिणामकारक असेल ह्याबाबत मी अजूनही साशंक आहे. अर्थात तुम्ही aviation expert असल्यास मला कल्पना नाही, त्यामुळे माझे काही चुकत असल्यास नक्की दुरुस्त करा. गवि शेठ ह्यांचे मत इथे यावे अशी विनंती करतो, मला वाटतं प्रोफेशनल विमानशास्त्र जाणणारे ते आहेत एक आपल्यात.

In reply to by निनाद

सर्व्हिस सिलिंग हे एक मानक आहे. हे आपल्याला कोणत्याही वातावरणात जास्तीत जास्त वजन घेऊन जास्तीत जास्त किती उंचीवर सुरक्षितपणे १२ महिने उडता येईल याचा एक अंदाज दिलेला असतो. उदा. मिग २५ चे सर्व्हिस सिलिंग ८० हजार फूट आहे पण रशियन वैमानिकाने ते सव्वा लाख फुटावर क्षितीजाच्या पार उडवून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. चेतक /चित्ता या हेलिकॉप्टर चे सर्व्हिस सिलिंग १०५०० फूट आहे पण ती सर्रास १२ ते १५ हजार फूट सियाचेन बेस कॅम्प पासून ते उंचावरच्या ठाणी येथे उड्डाणे करत आली आहेत. tandem contra rotating twin rotars चा फायदा असा आहे कि एकाच मोठा मुख्य पंखा असेल तर त्याची लांबी फारच जास्त असावी लागते आणि त्या पंख्यामुळे हेलिकॉप्टर गोल फिरू नये म्हणून शेपटीवर एक दुय्यम पंख बसवावा लागतो आणि या दोन्ही पंख्यात अंतर ठेवावे लागते कारण हे काटकोनात फिरत असतात. हा प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेने चिनुक मध्ये दोन पंखे एक पुढे आणि एक मागे बसवले तर रशियाने कामोव्ह हेलिकॉप्टर मध्ये एकाच अक्षावर एक घड्याळाच्या दिशेने आणि एक घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरणारे पंखे बसवले. यामुळे या दोन्ही हेलिकॉप्टरचा आकार बराच कमी झाला भारताने मि २६ आणि मि १७ या रशियन हेलिकॉप्टर्स च्या मधल्या आकाराचे पण अधिक जलदगतीने काम करणारे आणि भरवशाचे म्हणून चिनूक हे हेलिकॉप्टर विकत घेतले आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस रशियाची एकंदर स्थिती फारशी चांगली नव्हती यामुळे रशियाकडून घेतलेल्या हेलिकॉप्टरचे सुटे भाग मिळणे सुद्धा कठीण झाले होते. एकंदर या हेलिकॉप्टरची विश्वसनीयता कमी होत चालली होती अशा वेळेस कमी आकाराचे पण जास्त चपळ आणि दऱ्याखोऱ्यात जास्त उत्तम तर्हेने नेता येण्यासाठी भारताने चिनूकची निवड केली. https://swarajyamag.com/news-brief/india-negotiating-purchase-of-more-a…

RSS ने २००४ मध्ये देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला”, माजी प्रचारकाचा धक्कादायक आरोप बातमी : https://www.loksatta.com/desh-videsh/rss-ex-pracharak-claimed-that-bomb… चित्रफीत : https://twitter.com/i/status/1565217854970281984 अर्थात अधिक माहिती व पुरावे समोर आल्याशिवाय कोणतेही आरोप सत्य मानणे अयोग्य ठरेल. खासकरुन या यशवंत शिंदेंची विश्वासार्हता तपासली पाहिजे

In reply to by तर्कवादी

RSS ने २००४ मध्ये देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला”, माजी प्रचारकाचा धक्कादायक आरोप
बातमी अजिबात विश्वसनीय नाही. अहो ते काय बॉम्बस्फोट करणार? त्याला हिम्मत लागते*. स्वतःच्या पक्ष्याच्या राष्ट्रीय प्रवक्त्या महिलेचे रक्षण ते करू शकले नाहीत ते काय बॉम्बस्फोट करणार? --- * बॉम्बस्फोट करायला माझे समर्थन नाही, जस्ट तार्किक विधान करतोय.

In reply to by तर्कवादी

लोकसत्तेतील 99 टक्के बातम्या खोट्या असतात. संपादकीय तर विचारूच नका. तसे ही मी फेकसत्ता हे नाव ठेवले आहेय. बाकी आरएसएस जेवेढे मी ओळखतो, असले फालतू प्रकार तिथे नसतात.

Medha Patkar’s name as AAP CM candidate for Gujarat lands Kejriwal into trouble as 13 out of 19 candidates threaten to quit party ahead of polls https://www.opindia.com/2022/09/medha-patkar-gujarat-aam-aadmi-party-ar… उत्तम आहे. या बाईंना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार करूच द्या आप चा गुजरात मध्ये मोठा पराभव नक्की. याच बाईंनी सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये नर्मेदेचे पाणी पोचणे अशक्य आहे आणि सरदार सरोवर प्रकल्प विकास कसा आतबट्ट्याचा आणि जनतेच्या नुकसानीचा आहे असे अनेक वेळेस बोलून दाखवले होते काही तरी करून चर्चेत राहायचं हाच अजेंडा आहे या बाईंचा https://www.newsclick.in/Narmada-Water-Unfit-Organic-Farming-Medha-Patk…

In reply to by सुबोध खरे

ही बाई फक्त उपद्रव देण्यापुरती मर्यादित आहे. तिला गुजरात मध्ये आणणे आप ची सर्वात मोठी घोडचूक ठरेल ..

आज भारतीय बनावटीची आय एन एस विक्रांत समुद्रात उतरली. त्याच्या गुण अवगुणाबद्द्ल चर्चा करणारी ही चित्रफीत पाहिली. उत्तम वाटली. हा दुवा

https://indianexpress.com/article/political-pulse/kavita-krishnan-quits… ‘Admit our gods’ atrocities (in USSR, China)’: CPI(ML)-free Kavita Krishnan stirs up fiery Left debate
श्री कविता कृष्णनने तथाकथित पुरोगाम्यांचा दांभिकपणा चांगलाच फोडला आहे. मिपावरील पुरोगाम्यांची मते ऐकायला मजा येईल.

थोडक्यात: आरोपी सीमा पात्रा या झारखंडच्या रहिवासी असून त्या माजी आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. मागील आठ वर्षांपासून आरोपी सीमा पात्रा पीडित आदिवासी महिला सुनीता यांचा छळ करत होत्या. त्यांनी पीडित महिलेला आपल्या जीभेनं चाटून शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय पीडित महिलेच्या शरीरावर अनेक जखमाही आढळल्या आहेत. आरोपी सीमा पात्रा यांनी आपल्याला गरम वस्तूंने चटके दिल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. रम्यान, खुद्द आरोपी सीमा पात्रा यांचा मुलगा आयुष्मान यानंच पीडितेची त्यांच्या जाचातून सुटका केली आहे. त्यानं यासंदर्भात आपल्या एका मित्राला कल्पना दिल्यानंतर या मित्रानं पीडितेला वाचवण्यास आयुष्मानची मदत केली. यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलिसांना पात्रा यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पात्रा यांना अटक करण्यात आली आहे. पुर्ण बातमी इतर माध्यमांतील बातमी (ज्यांचा लोकसत्तावर विश्वास नाही त्यांच्याकरिता)


In reply to by तर्कवादी


In reply to by तर्कवादी


In reply to by तर्कवादी


जम्मू-कश्मीर: पाकिस्तानी आतंकवादियों को संवेदनशील सूचना भेजने के आरोप में मदरसा शिक्षक गिरफ्तार https://www.google.com/amp/s/navbharattimes.indiatimes.com/state/jammu-…

https://maharashtratimes.com/business/business-news/india-beats-uk-to-b… ब्रिटनला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानी आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीवरून तयार करण्यात आलेला एका अहवालात ही माहिती देण्यात आली. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी या जगातील सर्वांत मोठ्या, पहिल्या चार क्रमांकाच्या अर्थव्यवस्था आहेत. त्यानंतर ब्रिटनचा क्रमांक लागत होता. मात्र, ब्रिटनला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी आली आहे.

In reply to by मुक्त विहारि

अन् त्यावरून जळजळ पण बरीच झाली आहे इंग्लंडची, लॉर्ड फॉकलंडच्या जमान्यातून बाहेर न आलेले फिरंगी अंग्रेज बघा कश्या नथीतून दुगाण्या झाडतायत. .

टाटा समूहाचे औटघटकेचे सर्वेसर्वा झालेले अन् वादळी अल्पजीवी कार्यकाळ संपवून टाटा समूहातून बाहेर पडलेले उद्योगपती सायरस मिस्त्री ह्यांचा पालघर जवळ अपघाती मृत्यू

In reply to by जेम्स वांड

याचे पोल खुलले आहेत( त्यांचे air bags ) उघडून जीव काही वाचत नाही. मोठ्या हाइवेवरती १२०+ किमी तासाने जाणारे वाहन ( सेकंदात ४०मिटरस वेग) आदळते तेव्हा अर्ध्या सेकंदात शून्यावर येते. तर काय इतक्या कमी वेळात वेगाचा अंदाज घेणारा सेन्सर ते मोजून air bag मध्ये हवा भरेल का हे गणिती कोडे आहे.

In reply to by कंजूस

भरतात, अन् हे छातीठोक सांगायला मी तुमच्या समक्ष जिवंत प्रतिसाद देतो आहे. कोणाला उगाच पैसा वाचवायचा असेल तर तो आपापला वैयक्तिक चॉईस आहे, पण उपयोग नाही हे वाढीव झाले, बरं तो नाही हे मान्य केले तरी बिन एअर बॅग मरण्यापेक्षा मी एअर बॅग खर्च करणे प्रेफर करेनच कारण तो लास्ट ऑप्शन असेल तरी गाडीत नाही काही तर.

In reply to by कंजूस

सीट बेल्ट बांधलेला नसेल तर त्या ठिकाणची air bag उघडत नाही. त्यांनी सीट बेल्ट बांधलेला होता किंवा नाही याची खात्री झाल्यावरच air bag बद्दल चर्चा करणे योग्य ठरेल.

दु:खद बातमी ! देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. ज्या गाडीतून ते प्रवास करत होते ती मर्सिडीज म्हणजे एक महागडी आणि सुरक्षित समजली जाणारी कार आहे. कोणतीही गाडी कितीही सुरक्षित असली तरी ती १००% टक्के जीवीत रक्षणाची ग्वाही नसते ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे पण ज्याला परवडेल त्यानी जास्तीत जास्त सुरक्षित गाडी घेतलीच पाहिजे. दुसरे म्हणजे आपल्याकडे रस्ते बांधणी करणारे खरोखरीच इंजिनियर असतात की नाही हा देखील एक चर्चेचा विषय ठरवा. ७ वी-८वी ला आम्हाला एका धड्यात बँकींग ऑफ रोडस नावाचा एक भाग शिकवला होता तो तर मला अजून भारतात कुठे आढळला नाही. वाहन चालकांचे आणि पादचार्‍यांचे दिव्य ज्ञान हा अजून एक वेगळाच विषय. प्रथम दर्शनी बातमीत गाडी दुभाजकावर आदळून अपघात झाले असे समजते. यात गाडी किती सुरक्षित आहे हा एक प्रश्न झाला पण दुसरा प्रश्न जो नेहमी दुर्लक्षित केला जातो तो ड्रायव्हरच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचा. बरेचदा जे लोक ड्रायव्हर ठेवतात ते त्याला देखील एक मशिनच समजतात. त्याला पुरेशी विश्रांती मिळाली आहे की नाही त्याची मानसिक अवस्था ठीक आहे की नाही याचा त्यांना पत्ताच नसतो. ह्या बाबीवर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. ह्या घटनेत असे झाले असेलच असे माझे मत नाही. एकंदरीत प्रत्येक मुद्द्यावर कितीही चर्चा होऊ शकते पण सुधारणा किती होईल माहित नाही. जन्माला येणारा प्रत्येक जीव कधीतरी जाणार असतो पण असे त्रासदायक मरण कोणाला येऊ नये ही ईश्वराला प्रार्थना करण्यापलिकडे जास्त काही करता येईल असे वाटत नाही.

In reply to by धर्मराजमुटके

पण ज्याला परवडेल त्यानी जास्तीत जास्त सुरक्षित गाडी घेतलीच पाहिजे.
हा ऑप्शन द्यायलाच नको, तुमचं बजेट आहे त्यात एखाद्या अजस्त्र गाडीचे बेस मॉडेल घेण्यापेक्षा एखाद बारक्या गाडीचे टॉप एंड मॉडेल संपूर्ण सेफ्टी फीचर्स सहित घेणे ही कधीही अक्कल असण्याचे लक्षण ठरेल. दुसरे म्हणजे आपल्याकडे रस्ते बांधणी करणारे खरोखरीच इंजिनियर असतात की नाही हा देखील एक चर्चेचा विषय ठरवा. भारत म्हणे जगातील सगळ्यात मोठा पूल आहे इंजिनियर्सचा lol

In reply to by जेम्स वांड

तुमचं बजेट आहे त्यात एखाद्या अजस्त्र गाडीचे बेस मॉडेल घेण्यापेक्षा एखाद बारक्या गाडीचे टॉप एंड मॉडेल संपूर्ण सेफ्टी फीचर्स सहित घेणे ही कधीही अक्कल असण्याचे लक्षण ठरेल.
ते ठीक आहे पण एअर बॅग्ज असून मृत्यू का होतात याचं नेमकं अधिक विस्तृत विश्लेषण समोर येणं गरजेचं आहे त्याखेरीज लोकांचा एकरबॅग्जवर विश्वास बसणार नाही. आता जसं या अपघातात काय झालं ? मर्सिडिज कंपनीने या अपघाताचा स्वतंत्ररीत्या अभ्यास करुन अहवाल प्रसिद्ध करायला हवा. हा अपघात का झाला ? चूक कुणाची होती ? कारच्या सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का ? या अपघातानंतर कंपनी कारमध्ये अधिक काही बदल करणार आहे का ? अर्थात असा अहवाल तयार व्हायला अनेक महिने किंवा एखादं-दोन वर्षेही लागू शकतात. पण हे व्हायला हवं. national geographic वर air crash investigation ही सिरीज पाहिली तर आपल्याला कळेल की प्रत्येक विमान अपघाताचं किती सखोल विश्लेषण केलं जातं त्याकरिता कितीतरी खर्च केला जातो... भरपूर पैसा आणि मनुष्यबळ वापरुन संशोधन करुन अहवाल तयार करण्यात येतो , सुधारणा अंमलात आणल्या जातात. मग रस्ते अपघाताच्या बाबत असं काही होत नाही का ? की रस्त्यावर मरणार्‍याला काहीच किंमत नाही...

In reply to by तर्कवादी

नुकतेच एका वर्तमानपत्रात वाचले की खड्डा चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला. खड्डे चुकविणाच्या नादात होणार्‍या अपघातांची आणि त्यामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मी तर बुवा अचानक खड्डा दिसला तर अजिबात चुकविण्याचा प्रयत्न करत नाही. खड्ड्यात गाडीचे नुकसान होवो, आपल्याला झटका बसो ते एकवेळ परवडले असेच म्हणावे लागते.

In reply to by तर्कवादी

हे म्हणणे मी नाकारत नाही, मर्सिडीजने पोस्ट accident investigation करावे, सत्य नारायण घालावेत, गाड्या शोरुम मधून काढतानाच लिंबं ओवाळून टांगून काढाव्यात, काय वाटेल ते करावे, त्याबद्दल माझी काही मना नाही किंवा लोकांच्या उत्तरे मिळण्याच्या हक्कावर पण मला आक्षेप नाही, पण एक मर्सिडीजचा अपघात झाल्यावर डायरेक्ट पोल खोल, पितळ उघडे पडणे वगैरे वगैरे म्हणणे आपल्याला मंजूर नाही बॉ! अन् तसेच म्हणणं असेल तर काढा आकडे, एअर बॅग्समुळे किती लोक वाचले अन् किती दगावले त्याचे सविस्तर, एअर बॅगचे आकडे जास्त असले तर एअर बॅग सक्सेस असल्याचे मानणार की नाही मग अश्या परिस्थितीत ? उगाच काय पोल खोल अन् काय पण, एअर बॅग जीव वाचवतात, एखाद दुर्दैवी प्रसंगात त्या deploy होत नाहीत किंवा फॉल्ट असतात पण म्हणून पूर्ण एअर बॅग सिक्युरिटी सिस्टम हे स्कॅम ठरत नाही उलट जीवनावश्यक ठरतात असे वाटते.

In reply to by जेम्स वांड

अन् तसेच म्हणणं असेल तर काढा आकडे, एअर बॅग्समुळे किती लोक वाचले अन् किती दगावले त्याचे सविस्तर, एअर बॅगचे आकडे जास्त असले तर एअर बॅग सक्सेस असल्याचे मानणार की नाही मग अश्या परिस्थितीत ?
बरोबर आहे. एअर बॅग्ज उपयुक्त असतीलही पण कोणत्या परिस्थितीत त्या उपयुक्त ठरल्या नाहीत ते समजणे पण महत्वाचे ठरते. एअर बॅग्ज म्हणजे नेमकं काय व कसं काम करतात , त्यांची उपयुक्तता व गरज काय हे सामान्य लोकांना नीट समजेल अशा पद्धतीने पोहोचवायला हवं यासाठी वाहन निर्मिती कंपन्या , सरकारी संस्था (ARAI) driving school यांनी लोकशिक्षण करायला हवे. नुसतेच सीटबेल्ट वापरा किंवा एअर बॅग्ज असलेली कार घ्या इतकं सांगणं पुरेसं ठरणार नाही. सीटबेल्टचा नेमका उपयोग काय व कसा होतो हे सामान्य व्यक्तीला समजल्या शिवाय तो ते वापरण्यास उत्सुक नसेल. मला ही हेल्मेटबद्दल प्रबोधन करणारी जुनी जाहिरात आठवते. असल्या कोणत्या जाहिराती आता येत नाहीत !!

In reply to by जेम्स वांड

हे जाहीर करावं. म्हणजे गैरसमज दूर होईल. समजा वाहन वेगात (८०+) आहे आणि रस्त्यावर काही प्राणी दिसला तर ब्रेक मारला जाईल. तर तो वेग मला वाटतं चार सेकंदांत शून्यावर येतो असे धरा. वेग अचानक कमी होण्याचं एक सेन्सर मोजत असणार आणि पिशवीत हवा सोडण्याचा नळ उघडला जात असणार. हि क्रिया ब्रेक मारल्यावर काम करतेय का प्रयोगशाळेत तपासत असतील. आणि त्यावर विश्वास ठेवत असतील. पण प्रयोगशाळेत प्रत्यक्ष वाहन वेगवेगळ्या वेगात आपटवून परीक्षण करतात का हे कार कंपन्यांनी सांगावे. दुसरी एक गोष्ट की अपघातात मोडलेल्या गाड्यांचे सांगाडे पाहिले तर ते एवढ्या मोठ्या धक्क्याला मोडतात हे दिसते आहे. म्हणजे किती वेगाच्या धक्क्यात सांगाडा किती मोडतो हेसुद्धा महत्त्वाचे. सामान्य माणसाचे तर्क आहेत. अपेक्षित परिणाम दिसत नाहीत म्हणजे एक/दोन/तीन/चार चुकीच्या गोष्टी एकाच वेळी घडत आहेत हे नक्की.

In reply to by कंजूस

पिशवीत हवा सोडण्याचा नळ उघडला जात असणार.
दुरुस्ती/ किंवा माहिती ऑटोमोबाईलच्या पुढील भागात सेन्सर आहेत जे टक्कर झाली ओळखतात. हे सेन्सर सोडियम अझाइड असलेल्या डब्याला इलेक्ट्रिक सिग्नल पाठवतात आणि इलेक्ट्रिक सिग्नल थोड्या प्रमाणात इग्निटर कंपाऊंडचा स्फोट करतात. या प्रज्वलनाच्या उष्णतेमुळे रसायनांचे विघटन सुरू होते आणि एअर बॅग भरण्यासाठी नायट्रोजन वायूची निर्मिती होते. थोडक्यात हा एक नियंत्रित स्फोट असतो. एअरबॅगला सप्लिमेंटरी रेस्ट्रेंट सिस्टम (SRS) किंवा सप्लिमेंटरी इन्फ्लेटेबल रेस्ट्रेंट (SIR) म्हणून ओळखले जाते . येथे "पूरक" या शब्दाचा अर्थ असा आहे की एअरबॅग हे सीटबेल्ट बदलण्याऐवजी तुमचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे (तुमचा सीटबेल्ट न बांधता तुमचे संरक्षण करण्यासाठी एअरबॅगवर अवलंबून राहणे अत्यंत धोकादायक आहे). १९९५ मध्ये, एड्रियन लंड आणि सुसान फर्ग्युसन यांनी १९८५ ते १९९३ या आठ वर्षांतील रस्ते वाहतूक अपघातांचा एक मोठा अभ्यास प्रकाशित केला. त्यांना आढळून आले की एअरबॅगमुळे अपघातात मृत्यूचे प्रमाण २३ ते २४ टक्क्यांनी आणि सर्व प्रकारच्या अपघातांमध्ये १६ टक्क्यांनी कमी होते. वैयक्तिकरित्या मी सर्व एअर बॅग असलेल्या अगदी कर्टन एअर बॅग पण असलेल्या कार मध्ये प्रवास करणे योग्य मानेन.

In reply to by धर्मराजमुटके

गाडी दुभाजकावर आदळून अपघात असे असेल तर त्या व्यवसायाच्या गृप ने सरकार दावा दाखल करून हलगर्जीपणे रस्ते बांधणी केल्याने मृत्यु झाल्याबद्दल भरपाई मागितली पाहिजे. कारण एखादा उद्योगपती गमावणे हा देशाचा ही तोटा आहे. या निमिताने एक मोठा प्रश्न समोर येईल. सरकारने देशव्यापी रस्ते बांधणी सुरक्षा धोरण (रस्ते बांधणी धोरण नाही) आणि रस्ता कसा बांधला तर तो रस्ता मानला जावा याची मानके निर्धारीत केली पाहिजेत. ही मानके पूर्तता झाल्या शिवाय काम पूर्ण झाले असे मानले जाऊ नये.

In reply to by निनाद

१) तुम्ही म्हणता तसे पट्टे लावले पाहिजेत. ते मागच्या सीटवरच्या दोघांनी बहुतेक लावले नव्हते. म्हणजे सेन्सरच्या दृष्टीने त्या ठिकाणी पसेंजर नव्हते. तिथल्या पिशव्या उघडल्या गेल्या नाहीत. वाचले नाहीत. २) गाडी चालवणारी अनाहिता ही डावीकडून ओवरटेक करत होती. ३) एखाद्या कार कंपनीने कारची माहिती दिली त्यात टॉप स्पीड १८०,२००,२५०,३२० दिला असला तरीही भारतीय रस्त्यावर अधिकृत टॉप स्पीड ओलांडल्यास काय होईल? अपघातात कायद्याचे / विम्याचे संरक्षण मिळेल का? ४) गाड्या खरोखरच किती वेगाने जातात हे काही त्याचा प्रवासाचा वेळ पाहिल्यावर समजू शकते. अहमदाबाद मुंबई पाचशे किमी.चा प्रवास सहा तासांपेक्षा कमी वेळात करत असतील तर ८०च्यावर वेग आहेच.

तबारक हुसैन हा दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडत भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा भारतीय सैन्याच्या गोळीबारात जखमी झाला होता. त्याच्यावर उपचारादरम्यान भारतीय जवानांनी रक्तदान केलं होतं. पण नंतर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं बातमी

In reply to by तर्कवादी

असा ब्लड डोनेशन केलेले आमीर खान शाहरुख खानने चित्रपटात दाखवले असते तर लोकांनी बाण मारून जीव घेतला असता

In reply to by कपिलमुनी

असा ब्लड डोनेशन केलेले आमीर खान शाहरुख खानने चित्रपटात दाखवले असते तर लोकांनी बाण मारून जीव घेतला असता
चित्रपट आणि वास्तव यातला फरक करता आला नाहीतर अनेक चित्रपटांत काही ना काही आक्षेपार्ह सापडेल. किती अभिनेत्यांना (की निर्माता/ लेखक /दिग्दर्शकांना) बाण मारणार ? के जी एफ - चाप्टर टू मध्ये नायक (!!) संसदेच्या सभागृहात एकटयाने जावून एका खासदार की मंत्र्याची हत्या करतो. हा संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचा अपमान आहे. संसदेची सुरक्षाव्यवस्था कोणत्या दलाकडे असते याबद्दल मला निश्चित माहिती नाही. पण तरी ती निमलष्करी दलाकडे असावी असा माझा कयास असेल. जर तसे असेल तर तो त्या दलाच्या कार्यक्षमतेचा अपमान नाही का ? आणि जरी सुरक्षाव्यवस्था निमलष्करी दलाकडे नसून पोलिस दलाकडे असेल असे म्हंटले तरी पोलीस दलाचाही इतका मोठा अपमान चित्रपट निर्माता/दिग्दर्शाकाने का करावा ?

झारखंड मध्ये अरमान अन्सारीने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून मारून टाकले आहे. तिचा मृतदेह झाडावर लटकवून ठेवला होता. गेल्या महिन्याच्या अखेरीस, शाहरुख हुसेन आणि त्याच्या मित्राने त्या एका किशोरवयीन मुलीला तिच्या घरात झोपलेले असताना जिवंत जाळले आहे.

क्या बात है, स्वतः गणेशोत्सव साजरा करतातच आता घरात आलेल्या नवीन सुनेच्या हातून गणेशमूर्तीची घरात प्राणप्रतिष्ठापना करून साजरा केला ह्या मुस्लिम कुटुंबाने गणेशोत्सव, मागच्या दशकापासून सुरू आहे घरी गणपती स्थापन करण्याची परंपरा.